आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, September 14, 2007

आज माझे, स्वप्न तुटले
एका चिमण्याचे, घरटे मोडले

वाटायचे त्याला, चिमणीने यावे
काडीकाडी जमवलेले, घरटे सजवावे

नव्हती चिमण्याला, कसचीच आस
हवा होता फक्त, चिमणीचा सहवास

चिमणीच्या मनात, वेगळेच होते
चिमण्याच्या घरात, रहायचे नव्हते

चिमणी उडाली, कधीना परतली
चिमण्याच्या डोळ्यात, आसवे उरली

मन आणि घरटे, दोन्ही तुटले
डोळ्यांमध्ये फक्त, पाणी राहीले

कवी: अद्न्यात
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

तुझे ते टपोरे घारे डोळे
व गुलाबासारखे गाल
तुझे ते ओठ नशिले
आणि मस्तानी चाल
फ़क्त माझ्याच या नजरेणे तुलाच बघायचे आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

तुझा तो सुंदर चेहरा
जणू जास्वंदी सोबत मोगरा
तुझे ते सोणेरी रूप
जसे साखरेत मुरलेले तुप
त्यातल प्रत्येक स्वाद मलाच चाखायचा आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

तुझे ते लांब रेशमी केस
हलकेच हवेत उडत
तुला झुल्यात बसवण्यासाठी
मन माझे तडपडत
त्या स्वप्नाच्या झुल्यात मला पण झुलायचे आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

तु जवळून माझ्या जाताना
येत असे सुगंधी वारा
मनात माझ्या बरसे
जणू पावसाच्या धारा
त्या सुगंधी पावसात तुझ्याच बरोबर भिजायच आहे

एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे

कवी : अद्न्यात
मी विचारले एकदा

गुलाबाच्या फुलाला
मी विचारले एकदा
कट्यात फुलल्याचा
खेद नाही का तुला

काट्यात फुलल्याचा
आनंद होतोय मला
माझ रक्षण करणारा
काटा हा बोचरा

कमळाच्या फुलाला
मी विचारले एकदा
चिखलात फुलल्याचा
खेद नाही का तुला

चिखलामुळेच राहते
माझी अबाधित निर्मळता
ताठ उभं रहायला
आधार त्यचाच होता

मोगर्यच्य फुलाला
मी विचारले एकदा
रंग नसल्याचा
खेद नाही का तुला

रंग नसल्याची
नाही मला खंत
सुगंधी ओळख सांगतो
दरवळणारा आसमंत

प्राजक्ताच्या फुलाला
मी विचारले एकदा
झाडावरून पडल्याचा
खेद नाही का तुला

फार होतात वेदना
झाडावर सुखतांना
क्षणार्धात मृत्यू येतो
मातीत मिसळतांना

-- हेमंत मुळे
आठवण आज पुन्हा येते
मन तुझ्या अंगणात घेऊन जाते
तुझा चेहरा डोळ्यासमोरून सरत नाही
तुझी हासरी छवी बघून मन भरत नाही

यालाच का प्रेम म्हणतात
जवळ असताना हे कळत का नाही
दूरगेल्यावर बरचं काही कळत
जवळ असताना वळत का नाही

प्रेम असच असतं
कस्तुरी जवळ असूनही कळत नसतं
जेव्हा कळते तेव्हा ती त्याची नसते
ती कुण्या दुस-याची मिळकत असते

कस्तुरी असो कुठेही सुगंधच देते
सर्वांना आपलसं करुन घेते
कारण तोच तिचा धर्म असतो
तिला माझा तुझा भेदभाव नसतो

जिवन हे असचं असाव
असावे ते चंदनापरी किंवा श्रावणसरी
याच जिवनाला अर्थ आहे
नातरी जगणे तुझे व्यर्थ आहे............

-- सुनिल देशमुख
एक झुळुक हलकीशी

एक झुळुक हलकीशी.....
सळसळती पाने
तुझ्या आठवणींचा दरवळ
तितक्याच वेगाने
आला सोसाट्याचा वारा
पान पान सैरावैरा........
सांडलेल्या दु:खाने
ओलांडला किनारा
आता निनादतील
बघ बेमोसम ढग
भिजेलही कदाचीत
तुझे कोशातील जग

माझे काय........आता मी
पूर्ण पूर्ण रीता!
हवे तर केव्हा ही डोकाव
येता जाता!

बेमोसम पाऊस.....एक झुळुक हलकीशी....

-रमेश पोतदार
पहिल्या भेटित.....

पहिल्या भेटित शांत बसायचही नसत...
पण बड्बड् करुन थकायचही नसत,

पहिल्या भेटीत एकमेकांना आजमावायच असत...
इच्छा असुन सुदधा मनातल मनातच ठेवायच असत...

पहिल्या भेटित खळखळुन हसायच असत,
शब्द नाही सुचले तरि डोळ्यांनी बोलायच असत...
डोळ्यानीच हळूवार स्पर्श करायच असत...

कवी : अद्न्यात
सांगू?? काय काय व्हायचंय मला
खोवशील ना मला माझ्याही नकळत
तुझ्या वेणीतलं मोगर्‍याचं फ़ुल व्हायचंय मला

भिजशील ना माझ्या अंगणात मनसोक्त
तुला आवडणारी सुखद श्रावणसर व्हायचंय मला

झेलशील ना मला हळूवार अलगद
तुझ्या अळवावरचा टपोरा थेंब व्हायचंय मला

देशील ना मला प्रेमानं आलिंगन
तुझ्या कुशीतली कापसाची ऊशी व्हायचंय मला

सावरशील ना मला नेहमी भरकटताना
तुझ्या साडीचा ढळणारा पदर व्हायचंय मला

शोधशील ना मला नितळ सागरकिनारी
तुला सापडणार्‍या शिंपल्यातला मोती व्हायचंय मला

पुसशील ना मला तुझ्या रुमालाने
तुझ्या गालावरुन ओघळणारा अश्रू व्हायचंय मला

घालशील ना हळुवार प्रेमाची फ़ुंकर
तुझ्या नाजूक तळहातावरला फ़ोड व्हायचंय मला
परडीत वेचशील ना मला न तुडवता
तुझ्या परसदारातल्या प्राजक्ताचा सडा व्हायचंय मला

बाळगशील ना मला नेहमी बरोबर
तुझ्या गळ्यातला लाडका ताईत व्हायचंय मला

पहाशील ना माझ्याकडे साश्रू नयनांनी
तुझ्या पाणिदार डोळ्यातलं काजळ व्हायचंय मला

झुलशील ना माझ्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर
तुझ्या कानातलं झुबकेदार डूल व्हायचंय मला

न्याहाळशील ना मला रात्रभर एकटक
तुझ्या शयनगृहातील आरसा व्हायचंय मला

नाचशील ना माझ्या सप्तसुरी तालावर
तुझ्या पायातलं रुणझुणतं पैजण व्हायचंय मला

धरशील ना मला ह्रदयाशी कौतूकानं
तुझ्या पायात घोटाळणारं इवलसं पिलू व्हायचंय मला

पहाशील ना मला सारखं मागे वळून
तुझ्या पाठीवरला न दिसणारा तिळ व्हायचंय मला

कवी : अद्न्यात

कण-कण मरतांना...

अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय...

तुलाच शोधतोय,

काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना...

पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना...

दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना...

तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना...

तुलांच शोधतोय नि शोधत राहिन मातीत या मिसळतांना...
मरणाकडून मरणाकडे प्रवास माझा करताना
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना
तुलांच शोधतोय खरंच कण-कण मरतांना... कण-कण मरतांना..

कवी: अद्न्यात
हुंदका साधा तुझा सांगून गेला
धुंद तो कैफात जे बोलून गेला

लोटली गर्दी घरी या पाहुण्यांची
नेमका 'तो' यायचा राहून गेला

छंद त्याला भावनांशी खेळण्याचा
हासुनी हळुवारसे टाळून गेला

आज भासे रूप माझे आगळेसे
रंग पार्‍याचाच का बदलून गेला?

वादळांसाठी घडवले काळजाला
मंद वारा नेहमी झोंबून गेला!

मी निराकारी व्यथा सांगू कुणाला?
भक्त माझ्याशी पुन्हा भांडून गेला

रक्त त्याचे थंड, उसळेना मुळीही
सभ्यतेचे कातडे ओढून गेला!

कोरड्या खार्‍या खुणा ठेऊन गेला
शोध अश्रू जो तुला ढाळून गेला

माणसांची वोळखोनी लायकी तो
वेद रेड्याच्या मुखे वदवून गेला!

कवी : अद्न्यात
प्रेमाचे चार ऋतू

वसंत -
वसंतातल्या पालवी-कळ्या
मोठ्या खट्याळ असतात छकुल्या
आसुसलेल्या डोळ्यांना, दडून,
हळूच आडून करतात वाकुल्या
-*-

- ग्रीष्म -
व्याकूळ दुपारची ऊन झुळूक
तहानेला करते त्राही त्राही
तोकड्या ओळींची तुझी चिठ्ठी
तळमळ करते लाही लाही
-*-

- हेमंत -
शिशिराच्या शिवेवर जर्द झाडं
फारच दिलदार नाही वाटत?
शिलंगणाचं सोनं काही
दसऱ्यालाच नाही वाटत
-*-

- शिशिर -
परवा पडलेला शुभ्र बर्फ
आज कसा दिसतो रटाळ
प्रेम संपता पत्रामधला
मजकूर जसा दिसतो गचाळ

योगदान : रेशमा


कधी काळी तुझ्यावर प्रेम करत होतो
आता अश्रुंवर प्रेम करण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती माझी घर बसवण्याची
बघ आज माझे घर सोडण्याचे दिवस आलेत.

कधी काळी मी तुझ्यावर मरत होतो
आता खरोखर मरण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती मरणं आजमवण्याची
बघ आज इच्छा पुर्ण करण्याचे दिवस आलेत.

कधी काळी माझ्या कविता हसत होत्या
आता कवितांवर रडण्याचे दिवस आलेत
कागदावर माझ्या शब्दांशीवाय काहीच नव्हते
आज शब्दांसोबत अश्रुंचे डागही आलेत.

कधी मनापासुन मनापर्यंत पोहचत होतो
आज डोळ्यातुन ओघळण्याचे दिवस आलेत
तुझ्या सोडून सागळ्याच्यां डोळ्यात आसवे आहेत
बघ आज तुझ्या सुखाचे नाही माझ्या आसवांचे
दिवस आलेत

योगदान : प्रद्न्या शिंदे

नाते प्रेमाचे
या जगात नाही दुसरे
प्रेमाहुन निर्मळ नाते...
पण हेच नाते क्षणात आपुले
जिवन विस्कटून जाते
या नात्याला व्याख्या नाही
थोर सांगून गेले बरे
मात्र ते फार सुंदर असते!
हे विधान आहे खरे.
केव्हातरी मी हि केले होते,
जिवापाड प्रेम एकीवर...
पण, माझ्या प्रेमाला तिचा
नकार आहे आजवर.
मला दु:ख नाही तिच्या
नकारार्थी उत्तराचे..
दु:ख वाटते ते तिच्या
प्रेमाच्या व्याख्येतल्या वासना आणि
निव्वळ टाईमपास या शब्दांचे....
तिला नाही कळला,
माझ्या एकतर्फी प्रेमाचा अर्थ...
तिच्यासाठी वेचलेले प्रेमाचे अनमोल क्षण,
ते सारे गेले व्यर्थ.
मी तिच्यावर आजही
मनापासून प्रेम करतो,
मनातले प्रेमभाव,
कवितेच्या रुपात वाहतो.

कळेल तिला माझ्या
एकतर्फी प्रेमाची व्यथा जेव्हा!
फार वेळ झाली असेल...
कारण, मी असेन देवाघरी तेव्हा!

योगदान : प्रद्न्या शिंदे

ठरवलेलं मी एकदा की मला
तो अजिंक्य सिकंदर व्हायचय
या दुनियेतल मला
हरऎक भोळं मन जिंकायचय
त्या प्रत्येक मनावर मला
माझं नाव कोरायचयं

जिंकलीयेतही तशी मी
बरीच मुलुखं मनांची पण
त्या सिकंदरासारखं मलाही
शेवटी मोकळ्या हाती जायचय
दुनियेसाठी अजिंक्य असेन मी , भला
पण त्यानंतर मला अपमानाचं,
बदनामीचं जगणं नकळत जगायचय

पण आता मला.........

काहीतरी वेगळं व्हायचयं
कोणा एका मनासाठी तरी मला
आयुष्यात एकदा माझं मन हरायचयं
आयुष्यात कुणावर तरी मला
मला खरं प्रेम करुन पहायाचय

अजिंक्य सिकंदरापेक्षा मला
त्या कथेतल्या हीर-रांझा सारखं
प्रेमाला अमर करुन मरायचय
मला माझं नाव अमर करुन मरायचयं...

सचिन काकडे
आज पाऊले मागे फिरली
आज पाऊले नकळतच मागे फिरली
त्या वळणावरून जाताना,
आता मात्र होरपळुन गेलंय मन
माझं तु दिलेल्या दुःखातुन सावरताना.

कुणाशीही काही न बोलता
मी गप्प उभा होतो,
गच्च काळ्या ढगांआडचे
माझं आभाळ शोधत होतो.

तुझा चंद्र तुला सापडला
मी तिथेच उभा होतो,
तुझ्या आभाळात अनेक तारका
मात्र गर्दीतही मी एकटाच होतो.

हरवलेलं भान घेऊन
मग मी चालु लागलो,
डोळ्यांमागचे वादळ लपवण्याचा
निरर्थक प्रयत्न करु लागलो.

माझं घरटं कोसळुन पडलं कारण
ते उभं होतं भावनांच्या पोकळ वाश्यांवर,
पण तु तोडुन गेलीस
माझं स्व्प्न पैशाच्या जोरावर.

कुणी काटे देतो कुणी बकुळीची फुले
आपले दःख आता आपणच भोगायचं,
कुणीही कसेही वागले
तरी आपण नेहमीच हसतच राहायचे

कवी : अद्न्यात
दोन दिवस
दोन दिवस वाट पाहण्यात गेले;दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे.

शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हरघडी अश्रू वाळविले नहीत,पण असेही क्शण आले
तेव्हा अश्रूच मित्र होउन साहय्यास धवून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला अता जगमय झालो
दु:ख पेलावे कसे,पुन्हा जगवे कसे;याच शाळेत शिकलो.

हे हात माझे सर्वस्व, दरिद्र्यकडेच गहाणच रहिले
कधी माना उंच्वलेले,कधी कलम झालेले पहिले.

झोतभट्टित शेकवे तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले;दोन दु:खात गेले

- नारायण सुर्वे
पहिली भेट
थेट
मनात घेते
पेट
भावनांच्या पानांचा
देठं
कवेत घेतो
समेठ
उभा देह
शहारतो
प्रत्येक क्षन
मोहरतो
कण कण
बहरतो
स्पर्श स्पर्शावर
थरथरतो
स्वप्नांचा झुला
झुलतो
आठवणींचा बहर
फुलतो
हृदयाचा ठोका
चुकतो
आपण आपल्याला
मुकतो
गाठि भेटी
वाढतात
स्वर्शांची पायरी
चढतात
भावना विचारांशी
लढतात
हळवे क्षण
बागडतात
वेळ पुढे
वाहते
भेट लक्षात
राहते
आठवणींच्या सरीत
न्हाहते
प्रेम असेच
बहरते

कवी: अद्न्यात
योगदान : अखिल

एकदा मी नदीला म्हणाले
किती ग, गोड गातेस
केव्हाही बघाव तेव्हा
नुसती खलालत असते

एखाद्या कामासु गृहिणी सारखी
सदा आपली वहातेस...
आणि तीरावाराच्या लोकांची
कालाजी ही तू वहातेस...
कुठल्या आनामिक ओधीने
तू सागाराकडे ओधिली जातेस?
आनी अस्तित्वच सम्प्नार असताना सुध्दा
तू कशी काय गाऊ शकातेयेस

तुज़ जीवन संगीत तुला
कुठे कस गवासल......
याच उत्तेर मला तरी नही गवसल ....!
नदी म्हनाली अग वेडे
नुसतच संगीत ऐकात रहिलिस ?
mazya प्रवाहताल्या खाडकांची
तू कढ़ी दखल घेतालिस?

प्रवाहताल्या या खडकाना
मि बजुला वहा महनत नाहीआणि
मार्गाताल्या अद्चानिचा बागुल्बुआ करत नाही
प्रवाहाताले खड़क काढ़ले तर
माझ संग्गीत मी गमों बसेन
आयुष्याला साचाले पण येईल
मी जीवन चैतन्य च हरावुन बसेन
प्रवाहताल्या या खडकानई
मला माझ संगीत दिले
अन मानवी जीवन प्रवाहाच मर्म
आता तुज्या लक्श्यात आलाय
नक्कीच तुज्या लक्श्यात आलाय

कवी : अद्न्यात
योगदान : दीपाली
चेहरा रडवेला माझा आज आरशाने पाहिला
सुरू न झालेल्या कहाणीचा अंत त्याने पाहिला

वावरताना साऱ्यांत मी त्यांच्यासम राहतो
घाव माझ्या काळजाचा त्यांनी नकळत पाहिला

उरात भिती दाटलेली त्या लहानशा कवडशाची
एक तुकडा अंधाराचा मीही बाळगून पाहिला

कोणी मैफलीत भेटती डोळे भिजवाया माझे
पण खुशाली विचारताना चेहरा हसून पाहिला

वाटले असेत वेगळे माझे वागणे त्यांना
थेंब पापणीत तेंव्हा त्यांचा अडकलेला पाहिला

डोळा लागता पहाटे हलका हुंदका कानी
मला न्याहाळणारा आरसा आज रडताना पाहिला

कवी : अद्न्यात
योगदान : प्रद्न्या
मनातल्या मनात मी

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !

असेच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे,
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे
तुझा सुगंध मात्र मी इथे हळुच हुंगतो !

अशीच रोज अंगणी
लवून वेच तु फुले,
असेच सांग लजुनी
कळ्यांस गूज आपुले;
तुझ्या कळ्या,तुझी फुले इथे टिपुन काढतो !

अजून तू अजाण ह्या,
कुवार कर्दळीपरी;
गडे विचार जणत्या
जुईस एकदा तरी :
"दुरुन कोण हा तुझा मरंद रोज चाखतो?"

तसा न राहिला अता
उदास एकटेपणा;
तुझी रुपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा;
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो

कवी : अद्न्यात
योगदान : रविन्द्र

Wednesday, September 12, 2007

असते मतलबी, दुनिया ही सारी,
पण आपले, निराळे, असतातही काही,
दैव ज्यांची, सतत परिक्षा पाही,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

जिथे असते श्रद्धा आणि भक्ति,
असे पुजनिय, असतात काही व्यक्ति,
क्षणिक असते, अबोल्याची सक्ति,
मैत्रीमधल्या अश्रुंची किंम्मत असते न्यारी

गौण ठरतात मैत्रीपुढे, रक्ताची नाती,
कारन ही असते, सुंदर, निर्मळ नाती,
मनास होत नाही, कधी येथे क्षिती,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी


इथे शब्द असतात काही, जे लागतात जिव्हारी,
विसर पडतो यांचा, इथे माणसं आपलीच सारी,
आठवणींन्ने त्यांच्या, मनास येते नवी ऊभारी,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी...

कवी : अद्न्यात

मला हरवून टाकलेस तू.....( Lost In Love )



काय सखे तु जादू केलीस ,
मी माझ्यातच हरवून गेलो..
तुझ्या आसीम प्रेमाखातर..
माझं मलाच विसरून गेलो...

तुझे ते बंदिशातले केस
आज अचानक वार्‍यासवे डोलू लागले..
जणु माझ्या भुललेल्या चेहर्‍यावर,
पिसार्‍यातले सारे मोरपिस गुदगुल्या करू लागले..

माझे ते छुपे इशारे अन
तुझ्या त्या घाबरलेल्या नजरेचे तीर सारे..
माझ्या काळजाचा ठाव घेऊ लागले..
नकळत एवलूष्या जागेत तुझ्या प्रेमाचे बोन्साय वाढू लागले...

काय म्हणावा तुझा तो नखरा
जणू बारमाही ठरलेला दिवाळी अन दसरा...
मी आपलं स्वत:ला त्यात गुंतवत गेलो..
आनंदाचे दिस कायमचे बस आपलेसे करत गेलो..

तु नाही दिसायची डोळ्यासमोरी माझ्या
तेव्हा माझ्या पापण्याही जड व्हायच्या..
मान उंचावूनी मग त्या नयन बाहूल्या
चराचरात तुला,रातनदिस शोधत रहायच्या..

तुझ्यासोबत मी अनुभवला तो श्रावण मंद सरींचा
काय सांगू तुला मला कधी जाणवलच नाही
असाही असतो पाऊस लहरीचा अन
गोड गुलाबी मंद शिरशिरीचा..

कधी भांडलो तुझ्याशी उगाच,
अन कधी तरसवले मी तुला कारणांविनाच..
मग तुझी माफी मागताना साजने,
केला मी स्वत:ला एका पायवर उभा राहुनी अजब शिक्षेचा जाच

बघ कसा हरवलो सखे मी तुझ्यात
तुच सांग आता ही प्रेमाची कुठली जात..?
का झालोय मी प्रेमवेडा अन
सामावूनी गेलोय तुझ्या त्या अमर आत्म्यात...

-- आ.. आदित्य...

Tuesday, September 11, 2007



-- क्षितिज येलकर
काय बोलु, कस बोलु, लाज वाटते,
बघता तुजकडे,नजर खाली झुकते.

यौवनात मी,देहात रानवारा उफाळे पिसाट
यौवानाच्या उधाण लाटा,उसळती अफाट,
थरथरे देह माझा,घे जवळ प्रियकरा,
जादुई स्पर्शाने, शमव हा पीसाट वारा.

प्रीतिचा रंग मम ह्र्दयी फुलला रे
फुटल्या डाळिंबाचा रंग गालवर पसरला रे.
मोग~याचा गजरा माळला केसांवरी,
कशी बघु, मी मेली, मुलखाची लाजरी.

गोरेपान यौवन.घातली काचोळी काळी,
तुच धर हात, अन, घे मजला जवळी,
कैफ चढला प्रीतिचा,आग लागले उरी,
स्पर्श सुखा आसुसले हे, यौवन बिलोरी,

घे रे चुंबन,टिप, अधरातील मकरंद,
चुंब नग्न देह,मग उरेल, आनंद,आनंद.
देहात विरता देह,श्वासात श्वास मिसळला
ह्या प्रणय वेडीने, तो प्रणय क्षण अनुभवला.

काय बोलु, कस बोलु, लाज वाटते,
बघता तुजकडे,नजर खाली झुकते.
तो प्रणय आठवता, जिव वेडावतो,
आठवणीने नुसत्या,सारा देह मोहरतो

-- अविनाश कुलकर्णी
http://avinashkulkarni.blogspot.com/


शपथ कौमार्याची

लाल अधरी तुझ्या
ओल चूंबनाची
त्या देखण्या तनुवर
आरास लावण्याची

तो स्पर्श यौवनाचा
उधळी पीसाट वारा
बेभान जिव माझा
शोधु कुठे किनारा

तुझी धुंद मीठी
रेशिम यौवनाची
नको करु सैल
शपथ कौमार्याची

कामातुर झाली तुझी
केवड्याची काया
नजरेने पेटली ति,
कर्पुर गौर काया

प्रणयाचा खेळ सखे
चालु असाच राहो
मिठीत प्रिये तुझ्या
शेवटचा श्वास जावो

-- अविनाश कुलकर्णी
झुकव नजर ही तुझी
करी वार ती मदनाचे
पाहुन तव रसभरीत कांती
चुकती हीशेब स्पंदनाचे

वाटतेस अजुन तू
नाजुकशी जरी सोनकळी
गंध दाटतो तव यौवनाचा
अन खुलते तुझी हर एक पाकळी

कुठल्या दिलात जाऊन
सांग त्याचा करशील घात
हाय.......नशीब त्याचे
असेल जो तुझ्या लावण्याचा नाथ

ओठांचे गुलाब तुझ्या
की हे खंजर काळजात शिरले
काया तुझी मदमस्त अशी
पाहुन अंगअंग थरथरले

चालशी अशी तू
जणु नागीण सळसळावी
तुज पाहुन वाटे
चुकुन आज ही पहाट चळावी

पाज मदिरा तव नयनांनी
नशेत मजला झिंगू दे
ये फ़ुलुन तू आज
या भ्रमरास थोडे पिंगू दे

-- संदीप सुराले
उशीर होतोय का??

ती माझ्याकडे बघते
मी तिच्याकडे बघतो
पण बोलणे होतच नाहि
बोलायला उशीर होतोय का?

काल सुद्धा तिने खूप वेळा पाहिले
माझेच लक्षच नव्हते
म्हणून मला नाहि कळले
बघायला सुद्धा आता उशीर होतोय का?

माझी नजर गर्दीतून तिलाच शोधत असते
तिची नजर देखिल कोप-यात वाट पहात असते
नजर मिळाल्यानंतर ती गोड हसते
मला हसायला उशीर होतोय का?

ती का बोलायला येत नाहि
याचा विचार मी करतो
आणि समोर आली कि मला सगळ्याचाच विसर पडतो
माझ्या विचरण्याला उशीर होतोय का?

दिवसामागून दिवस जात आहेत
आमचे नुसते असेच चालू आहे
कधी कोणी तरि पुढे येणार का?
अजून होणारा उशीर थांबवणार का??

आता सुद्धा मला उशीर होतोय
इतके दिवस तिला पहातोय
तिच्या सौंदर्याला शब्दात ऊतरवायला
उशीर होतोय का?
सांगा,उशीर होतोय का??????

---निलेश लोटणकर
भेटलेच तुला कधी स्वप्नात...
हसशील का परत बघून आनंदात पुन्हा?

जोडशील पुन्हा तुटलेले धागेही...
जोडल्या जागी गाठी राहतील का पुन्हा?

दिसला न तु प्रत्यक्ष।त मला...
म ह्या डोळ्यांना तुझी आस का पुन्हा?

तु वेळ जरा दे सावरायास मला...
मग करशील का रे परत बरबाद पुन्हा?

बांधुन वचनात माझ्या एकट्या जिवाला...
शपथा का घालतोस स्वतःच्या जिवाला पुन्हा?

आशेचे किरण होते मावळले...
म स्वप्नांचा हा छळवाद कशाला पुन्हा?

बघीतलेस कधी ह्या जिवाला जळताना...
अश्रु दाखवायला भेटशील का रे स्वप्नात पुन्हा?

-- कल्पेश फोंडेकर

Monday, September 10, 2007

ना कशाची तक्रार, ना कोणाचा राग मला
ना कशाची आस, ना प्रेमाचा रोग मला

मी अर्थहीन गोष्ट, जीला सारांशच नाही
ना कळलो मी जगाला, ना कळले जग मला

एका पराजयाने खचलो, पुन्हा उठलोच नाही
देवा इतके विजय, का दिलेस सलग मला

मिरची समजून कोणी, केली देहाची भाजणी
साखरही दिली कोणी, तरी होते भगभग मला

वेदनांनी मज गोंजरले, दुःखांनी कुरवाळले
तूही दे आसवांचे नव्याने ढग मला

निजलो आज शांततेत, ज्या मृत्युच्या कूशीत
दोन फुले आणशील, का आशेची जाग मला

अंधारात मिटली होती, पापणी माझ्या दु:खांची
मग का दिला जिवना, पुन्हा काळा रंग मला

जिवन प्रश्नचिन्ह झाले, उत्तर सोडवता सोडवता
आता तुझ्याच गणिताचं, तूच उत्तर सांग मला

सनिल पांगे