~:~ ती परी अस्मानीची ~:~
आनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...
आजचा विशेष
मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे
-- आनंद काळे
बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.
Friday, April 27, 2007
मलाही girl friend मिळावी ॥
सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥
हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी ।
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी ॥
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥
चौपाटीवर पाणीपूरीतून,
प्रणयाचेच घास भरवू ।
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥
आयुष्यातील सारी दु:खं,
जिच्या सहवासात टळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥
द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
आधी girl की आधी friend ।
आयुष्यभराचं नातं हवं,
देव करो तीच्याकडूनचं,
प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी
सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥
हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी ।
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी ॥
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥
चौपाटीवर पाणीपूरीतून,
प्रणयाचेच घास भरवू ।
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥
आयुष्यातील सारी दु:खं,
जिच्या सहवासात टळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥
द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
आधी girl की आधी friend ।
आयुष्यभराचं नातं हवं,
देव करो तीच्याकडूनचं,
प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी
काय सांगू मित्रांनो
काल रात्री कमाल झाली
स्वप्नामध्ये ती आली
आणि एकदम धमाल उडाली
होत माझा वाढदिवस
म्हणूनी मला ती भेटली
पांढरा शुभ्र रंग तीचा
पाहुनी पप्पीच घ्यावीशी वाटली
घेऊनी गेलो तीला मी जेव्हा
सुन्दर साथ दिली मज तीने तेंव्हा
तीच्यासंगे सर्वत्र फ़िरताना
ओढ लागली मला तीची बागडताना
वाऱ्याबरोबर लागे तीची शर्यत
मनमोहक अशी तीची चाल
पहाताच क्षणी कोणीही म्हणेल
च्यायला काय दिसते याची माल!
स्तुती करण्याकरीता शब्द नाही
एवढी आवडली ती मज फ़ार
स्वप्नात् मला जी भेटली होती
प्रत्यक्षात कधी मिळेल मज ती "मर्सिडीज कार"
शाळेतील विनोद।
मास्टर - अरे, तुम्हाला चांगलं वाचता येत नाही. मी वाचून दाखवतो त्याप्रमाणे उद्या धडा वाचून या. (असं म्हणून पांच - सात ओळी वाचून झाल्यावर)
एक वात्रट विद्यार्थी - पुरे, शाबास । दहा मार्क । चांगल वाचलं ।
इंग्लंडच्या इतिहासाचा शिक्षक - जॉन राजाने मॅग्ना चार्टवर सही कोठे केली ?
वर्गातील उजव्या बाजूचा हुशार मुलगा - कागदाचे खालच्या उजव्या कोपऱ्यावर, सर ।
आइ आमच्या सरांना घोडा कसा असतो ते माहित नाहि.
आई :- हे कसे शक्य आहे?
मुलगा:- अग हो , मि त्यांना मि काढलेल घोड्याचे चित्र दाखवले तर ते मला विचारतात हा कोणता प्राणि आहे?
बन्डु नापास होतो म्हणुन गुरुजी त्याच्या पालकान्ना बोलवितात.
गुरुजी : मी बन्डुला विचारले कि जर माझ्याजवळ ५ केळी आहेत आणि त्यातिल मी ३ केळी खाल्ली तर खाली किती केळी राहिली ? तर २ केळी राहिली हे साधे त्याला सान्गता आले नाही.
बन्डुची आई : काय मास्तर, २ केळासाठी पोराला नापास केलं व्हय. उद्या २ डझन केळी पाठवुन देते, करुन टाका पोराला पास.
बाई :- राजु , कायरे तुला आज शाळेत यायला उशिर का झाला?
राजु :- बाई माझे ना रस्त्यात पाच रुपये सांडले, ते शोधत होतो म्हणुन वेळ झाला.
बाई :- गप्पु तुला का उशिर झाला?
गप्पु :- मि त्याच्या पाच रुपयावर पाय ठेउन उभा होतो ना...
सर - चिंटु तुला माझ्या वर्गात झोपता येणार नाहि.
चिंटु :- हो सर तुम्हि जरा हळु बोला , म्हणजे मला निट झोपता येईल।
आमचे गणिताचे सर , एखादे प्रमेय सोडवुन झाले कि विचारायचे , " कळलं का ? "
मग आमचा काहेी जणांचा ग्रुप ओरडायचा " कळुन चुकलं..... "
एकदा गुरुजी विचारतात'माशी आणि हत्त्तीमध्ये काय फरक आहे?
एका बाकावरचा मुलगा'माशी ह्त्त्तीवर बसु शकते पण ह्त्त्ती माशीवर बसु शकत नाही'।
एकदा वर्गात इतिहासाच्या तासाला पुरंदरे सरांनी झोपलेल्या राजूला उठवून विचारले, "काय रे दिल्लीचे तख्त कोणी फोडले"?
राजू झोपेतून जागा होत म्हणाला, "आई शप्पथ सांगतो सर, मी नाही फोडले."
पुरंदरे सरांनी हा किस्सा मधल्या सुट्टीत शिक्षकांच्या खोलीत सांगितल्यावर जोशी बाई सोडून सर्व शिक्षक हसले.
जोशी बाई गंभीरपणे म्हणाल्या," कोण राजू ना? एक नंबरचा वाह्यात पोरगा आहे। त्यानीच फोडले असेल."

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.
होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.
झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.
आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर।
मजेशीर व्याख्या:
१) पेन: दुसरयाकडून घेवून परत न करण्याची वस्तू
२) बाग: भेळ शेवपूरी वगॆरे खाऊन कचरा टाकण्याची जागा
३) चवकशीची खिडकी: 'इथला माणूस कोठे भेटेल हो' अशी चवकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक चवकोनी जागा.
४)ग्रंथपाल: वाचकाने मागितलेले पुस्तक 'बाहेर गेले आहे' असे तंबाखू चघळत तिराकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.
५) विद्यार्थी: आपल्या शिक्शकांना काहीही dyaan नाही असे मानून आत्मकेंद्रीत राहणारा एक जीव
६) कार्यालय: घरगुती ताणतणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा
७) जांभई: विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी
८) शब्दकोश: जिथे 'लग्ना'आधी 'घटस्फोट' होतो असे स्थ्ळ
९) प्रेमप्रकरण: क्रिकेट सारखाच एक खेळ. जिथे पाच दिवसांच्या 'कसोटी'पेक्शा झटपट 'सामने' अधिक लोकप्रिय असतात
१०) सिगारेट: वाळका पाला भरलेली एक सुर नळी जिच्या एका टोकाला आग दुसरया टोकाला मुर्ख माणूस
११) कपबशी: नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू
१२) college: शाळा व लग्न यामधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण

इन्स्पेक्शन
स्थळ : शाळा
वर्ग : एकदम गप्प
कारण : इन्स्पेक्शन
अधिकारी : बोल अफ़ज़लखानाचा खून कोनी केला ?
बन्डु : माफ़ करा सर, मला काही माहित नाही. मी काल शाळेतच आलो नव्हतो. मला तर हा अफ़ज़लखान कोन आहे हे सुद्धा माहित नाही.
अधिकारी : काय सर ! हे काय चाल्ले आहे. मुल्लान्ना काहिच माहित नाहिये.
सर : नाही साहेब, बन्डु तसा खोड्कर आहे पण कोनाचा खून काही तो करनार्यामधला नाहीये.
अधिकारी : काय ! मुख्याध्यापकाना बोलवा.
अधिकारी : महाशय ! आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना काहीच माहित नाही.
मुख्याध्यापक : माझ्या शाळेतील विद्यार्थी असे कधी करणारच नाही. मी ह्याची खात्री देतो.
अधिकारी : तुम्ही खरोखरच मुख्याध्यापक आहात काय ? सर तुम्ही रोज विद्यार्थ्यान्ची हजेरी घेता काय ? काय रे बन्डु ! तू रोज शाळेत येतोस काय ?
बन्डु : माफ़ करा सर, मी शाळेच्या बाहेर केळी विकतो. ह्या वर्गातला एक विद्यार्थी आज भारत-औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेलाय. त्याने मला इथे जबरदस्तीने पाठविले आहे.
सर : माफ़ करा सर, मी समोर पान टपरी चालवितो. ह्या वर्गाचे सर आज भारत-औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेले आहेत. त्यान्नीच मला इथे पाठविले आहे.
मुख्याध्यापक : माफ़ करा सर, मी मुख्यध्यापकान्चा भाऊ आहे. तो आज भारत-औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेलाय. त्याने मला इथे पाठविले आहे.
अधिकारी(हताश होवुन) : अरे बापरे ! मी आलोय तर ही अवस्था आहे। खरे साहेब आले असते तर काय झाले असते देव जाणे ?
**********
Apr 16
एक इन्स्पेक्टर शाळेची तपासणी करताना गुपचुप सातवीच्या वर्गात शिरले. तिथे खुप गोंधळ चालला होता त्यातील एका मुलाची collar पकडत त्याला बदडत त्यांनी मुख्याधापकांकडे चालवले."वर्गात सर्वात मोठा असून असा गोंधळ करतोस?"
मुले त्यांच्या मागोमाग चालू लागली, इन्स्पेक्टर मुख्याध्यापकांच्या रुममधे जाणार तोच मुलं म्हणाली,
"साहेब, आता तरी आमच्या गुरुजींना सोडा।"
Thursday, April 26, 2007
देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली.
फिरायला, कॉलेजला जाताना, सोबत असावी म्हणून मैत्री करणार्या त्या मुली.
"मी तिच्यापेक्ष्या जास्त सुंदर आहे " असा उगाच गोड गैरसमज मनाशी बाळगून असलेल्या त्या मुली.
जरी असतील room mate आणि दिसत असतील घट्टा मैत्रिणी, तरी मनात असते इरशा खुन्नस.
आमची चुकुन पडणारी नजर केवळ आपले सौंदर्या न्यहलण्यासाठीच पडलिये आशय संभ्रमात वावरणर्या मुली.
मुली म्हणजे नाटणमुरडन.
मुली म्हणजे उगाच हसने.
(त्याना हसवायच म्हणजे PJ च मारावे लागतात ,शाब्दिक कोट्या बौधहिक विनोद त्याना झेपत नाहीत)
मुली म्हणजे अय्या इश्शा
मुली म्हणजे लटका गुस्सा
मुली असतात व्यवहार शून्य
दुनियदारी काळत नाही
हे सरकार मान्य.
मुली म्हणजे वैतागवाडी
eyebrows, मेहेन्डी, स्लीवलेस, साडी पर्स लिपस्टिक मेकअप पार्लर ,नाना झंझटि
मुली असतात फूल 2 फिल्मी
आधी आपलस करून नंतर बनतात जुलमी......
पोरिंना वाटते आम्हि पावसाच्या गारा
अग उडालेला फ़्युज तुमचा तुम्हि तुट्लेल्या तारा
सान्गायला सरळ असतात या पोरि वागायला पाजी
खानार्र्याने जपुन खावी हि कार्ल्याची भाजी
(कृपया कुठल्याच मुलीने गैरसमज करून घेऊ नये ... मी आधीच माफी मागून माफीचा साक्षीदार आहे ...
एन्जॉय इट !!!!!)

थोड़े हसा
शर्माजींनी नवी इंडिका घेतली.
तिच्या मागे लिहिलं होतं, 'सावन को आने दो!'
रस्त्यात एका ट्रकने इंडिकाला धडक दिली... त्या ट्रकवर लिहिलं होतं, 'आया सावन झूम के!!!'
***
स्वगत म्हणजे मनातल्या मनात.
विवाहाची आमंत्रणपत्रिका आल्यावर आपण हळूच "आहेर आणू नये" हे वाक्य बघतो व सर्वानी फुकटचे जेवण हादडायला जायचं असं एका सेकंदात मनात ठरवितो, तशागत.
ऎकणारा समोरच्याचे खोटेच कौतुक करत असतो.
पण मनातल्या मनात काय म्हणतो ते पुढे पहाच.
बोलणारा(उघड):(आनंदाने)साहेब पेढे घ्या. ८ वर्षांनी पोर झालं. मुलगा झाला साहेब.
ऎकणारा(मनात):(मग एवढी वर्षे काय करत होतास?)
बोलणारा(उघड):साहेब ही माझी पत्नी सोनाली.
ऎकणारा(मनात):(मग एवढे दिवस तुझ्याबरोबर फिरत होती ती कोण?)
बोलणारा(उघड):साहेब मुलगा १०वीच्या बोर्डात ५वा आला.
ऎकणारा(मनात):(तो शेवटी का येईना मला काय करायचे?)
बोलणारा(उघड):विवाहाचं आमंत्रण द्यायला आलोय, सरोजशी लग्न ठरलंय.
ऎकणारा(मनात):(च्यायला, एवढे दिवस तर ती दिन्याबरोबर फिरत होती.)
बोलणारा(उघड):साहेब बढती मिळाली, उद्या पार्टी ठेवली आहे.
ऎकणारा(मनात):(एवढी वर्षे चमचेगिरी केली त्याचा फायदा झाला म्हणायचा.)
बोलणारा(उघड):ही माझी बायको, पल्लवी
ऎकणारा(मनात):(ह्या माकडाला मस्त चिकनी बायको मिळाली. मजा आहे साल्याची.)
बोलणारा(उघड):हे फोटोंचे अल्बम पाहात बसा.
ऎकणारा(मनात):(आग लावा त्या अल्बम्सना, वॆताग साला.)
बोलणारा(उघड):साहेब मला उद्या सुटी मिळेल का?
ऎकणारा(मनात):(अरे?उद्या तर मला तुझ्या बायकोला पिक्चरला घेऊन जायचे होते.)
बोलणारा(उघड):साहेब आपल्या रेश्मा मॆडम आज येणार नाहीत असा त्यांचा फोन आला होता.
ऎकणारा(मनात):(कशी येणार?काल संध्याकाळी तर मी तिला जोश्याबरोबर बागेत रेडहॆण्ड पकडले होते.)
बोलणारा(उघड):साहेब त्या सुंदर बाई आपल्या ऒफिसमधे का आल्या होत्या?
ऎकणारा(मनात):(तुला कशाला पाहीजेत त्या नसत्या चांभारचौकशा?)
बोलणारा(उघड):साहेब देव्याच्या क्रुपेने एकदाचा माझा मुलगा पास झाला.
ऎकणारा(मनात):(मग काय गावभर पेढे वाटू?)
बोलणारा(उघड):साहेब आज मी नवीन हिरो होंडा मोटर सायकल विकत घेतली
ऎकणारा(मनात):(बाकीचे काय फुकट घेतात की काय शिंच्या?)
बोलणारा(उघड):साहेब ५ वर्षे झाली, आता तरी माझं प्रमोशन करा की?
ऎकणारा(मनात):(लेका तुझं प्रमोशन म्हणजे माझी जागा आहे। ती तुला कशी देऊ?)
***
पती : तू काहीही म्हण, पण पुरूषांचे निर्णय स्त्रियांपेक्षा नेहमीच योग्य असतात.
पत्नी : अर्थातच! म्हणूनच तुम्ही माझ्याशी आणि मी तुमच्याशी लग्न केलं.
***
पेशंट : डॊक्टर, मला रोज सुंदर सुंदर मुलींची स्वप्नं पडतात.
डॊक्टर : अच्छा! म्हणजे तुम्हाला स्वप्नं पडू नयेत असं औषध हवंय तर!
पेशंट : मूळीच नाही, त्या गोड स्वप्नातून नको त्या वेळी मी जागा होतो ते थांबवण्यासाठी मला औषध हवंय।

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती
मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती
तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती
तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती
तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.
नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.
तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती
तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती
आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.
मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती
डोक्टर कडे फोन ची बेल वाजते पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
परत १० मी. फोन येतो.
पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
अस ३ ते ४ वेळा झाल्यावर डोक्टर फ़ार चिडतो.. मनात म्हणतो आता येवू देत फोन बघतोच त्याच्याकडे.
१० मी. पुन्हा बेल वाजते...

डोक्टर: जोरात ओरडतो.. नाहीये का?
पलीकडचा माणूस : आहो मग चिडता कशाला खिशातला काढा की।

एका वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये
एक वेडा डॉक्टरांकडे पुस्तक घेऊन येतो
आणि म्हणतो," हे मी शिवाजी महाराजांवर लिहलय."
डॉक्टर ते पुस्तक सहज उघडुन पाहतात
पहिल्या पानावर लिहलेल असत
शिवाजी महाराजांचे बाबा शहाजी महाराज
दुसर्या पानावर ...
शिवाजी महाराजांची आई जिजाबाई
पुढ्च्या पानावर...
शिवाजी महाराजांचे गुरु....दादोजी कोंडदेव
त्यांनी महाराजांना घोड्यावर बसण्यास शिकविले.
डॉक्टर विचार करतो वेड्याला बरच काही माहीत आहे
मग त्याने शेवट काय केला असावा म्हणुन ते शेवट्च पान उघडतात
तिथे लिहलेल असत शिवाजी महाराज घोड्यावरुन उतरले.
डॉक्टर विचार करतो ...मग मधे काय लिहलय..
पाहतो तर....पुर्ण पुस्तकभर लिहिलेल असत...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
टिक टॉक

मराठी फुसक्या
कोण म्हणतं व्यसन सुटत नाही मी आत्तापर्यंत शंभर वेळा सोडले आहे.
बुडणा-याला काढताना मध्येच सोडून द्यावं, जगण्या आणि मरणातील अंतर कळण्यासाठी.
समोरचा आपल्याला सतत पाहतो आहे हे त्याच्याकडे सतत पाहिल्याशिवाय कळत नाही
माकडांपासुन माणुस बनला असेल तर...... अजून माकडं शिल्लक कशी?
पुण्यात सिग्नलची व्याख्या: करमणुकीसाठी रस्त्यात लावलेले उघडझाप करणारे तिन रंगीत दिवे
लाईन मारताना जपुन! तारा जुळल्या तर ठीक नाहितर कोळसाच
नुसती वाट पाहुन हाती येते ते म्हातारपण
त्या तिच्या नयनात गहिर्या, भाव माझे गुंतले...
ती सखी लाजली अशी की, शब्द माझे संपले...
मोकळा मग श्वास झाला, धन्य झाल्या भावना;
भास मज झाला असा की, आज जग मी जिंकले...
सावरले मन, बावरले मन, धुंद झाले अन् वेडावले;
पुन्हा त्या क्षितीजास हळव्या, मी नाजुकतेने स्पर्शिले...
तिने माळूनी गजरे कुंतली, मज केले भावगंधीत;
जणू सुगंधाचे पावसाळे, अंगणी माझ्या वर्षिले...
हास्य तिचे निर्मळ, गेले करुनी घाव ह्रदयी;
फिरुनी तिने मागे पुन्हा मग, वेदनेला चुंबीले...
ती सखी लाजली अशी की, शब्द माझे संपले...
- निरज कुलकर्णी।
उन्हाळा म्हंटले की मला आइसक्रीम आठवते,
आणि आइसक्रीम म्हंटले की तू..
लस्सी,बर्फाचा गोळा,आइसक्रीम ची नुसती बहार आणतो उन्हाळा,
पण,तुझ्याबरोबर आइसक्रीम खाण्याचा अनुभवच निराळा..
आइसक्रीम खातांना चेहराभर हसू फुललेले,
स्वाद घेतांना थोडेसे नाकालाही लागलेले..
समजते मजा, आयुष्यातल्या अनमोल क्षणांची,
किंमत मोजावी लागते फक्त आइसक्रीमची..
आइसक्रीम खाल्यानंतरची पाण्याची तहानही काही सांगते,
सर्व काही उपभोगूनही मन साध्या गोष्टीसाठी झुरते..
आइसक्रीमसारखेच आहे आयुष्य,आहे तो क्षण फक्त 'आपला',
कृतीहीन राहिलो तर क्षण हातात 'विरघळला'॥
Tuesday, April 24, 2007
नव्वदीतल्या बायजाबाईंना दहा लाखाची लॉटरी लागली. पण, ही बातमी त्यांना सांगायची कशी, हर्षातिरेकाचा धक्का त्या पचवू शकतील का? या प्रश्नाने नातंवाइकांना भंडावून सोडलं होतं. शेवटी डॉक्टरांना बोलवायचं ठरलं. डॉक्टर विनोदनी आल्याआल्या सर्व नातेवाइकांना मोठाच दिलासा दिला. रुग्णांना धक्का बसणार नाही अशा पद्धतीने त्यांना त्यांच्या आरोग्याबाबत कसं सांगायचं हे आम्हाला शिकवलेलंच असतं, असं सांगत ते बायजाबाईंना भेटायला त्यांच्या खोलीत गेले.
""समजा तुम्हाला दहा लाखाची लॉटरी लागली, तर तुम्ही काय कराल?'' हळूहळू गप्पांच्या ओघात डॉक्टरांनी मुद्द्याला हात घातला.
""त्यातले निम्मे मी तुम्हाला देऊन टाकीन।'' बाई सहज म्हणाल्या.डॉक्टर अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शनिवार वाड्याजवळच्या टपरीमध्ये खालील पाट्या होत्या
* इडलीला चमचा मिळणार नाही
* चटणी फक्त दोनदाच मिळेल
* साबुदाणा वडा पार्सल घेतल्यास प्लॅस्टिकची पिशवी मिळ्णार नाही (???)
* पोहे एक प्लेट (२०० ग्रॅम) (प्लेट च्या आकारावरुन वाद नको)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नुकतेच कणेकरांच्या एका पुस्तकात वाचलेला हिंदी संवाद
`घर मै माजी है|`
`यहां माजी कोइ नही, बहेनजी हई` पत्नीचे फणकार्यात उत्तर.
`बहेनजी, आप साबुन कौनसा इस्तेमाल करती हो?`
`मेरेकू ईंपोर्टेड पिअर्स पसंद है, लेकिन परवडता किसको है? ये कवडीचुंबक का घर है`
`तो आपका परिवार कौनसा साबुन इस्तेमाल करता है?`
`परीवार तो घरके मालिक जैसाही बेशरम है. तीन दिन से मै घसा खरवडके चिल्ला रही हुं के साबुन संपा है, लेकिन किसीको ढीम्म नही है. महागलीच्छ परीवार है. मेरे माहेरकू हर आदमी का वेगळा वेगळा साबुन था. एक दिन चुकीसे मेरी माँने टायगर का साबुन लिया तो भडक के मेरे पिताने पूरी साबुनकी वडी गिळी थी. उससे उनका आतडा स्वच्छ हुआ. इतने स्वच्छ परिवारसे मै इस गलिच्छ परिवार मे आ गयी क्यों के मेरा नशीब फ़ुटका था...`
`तीन दिनसे पहेले आप कौनसा साबुन इस्तेमाल करती थी?`
`ये कार्यक्रम करने बाहरगाव गये थे ना, वहां के हॉटेलसे चुराके लेके आये वही छोटी वडी इस्तेमाल करते थे। इनका की नाई नवस है के साबुन विकत आणनेका नही, हॉटेलसे चोरनेका........

परमेश्वराच्या मूतीर्पुढे नतमस्तक होत भक्त कळवळून म्हणाला, ''परमेश्वरा, मला तुझी आठवण सतत राहावी, म्हणून तू मला आयुष्यभर दु:ख दे, यातना दे, टेन्शन दे, मला बरबाद कर, माझ्यामागे हरतऱ्हेची शुक्लकाष्ठं लाव, मला क्षणभराचीही शांतता मिळू देऊ नकोस...''
परमेश्वर कमरेवरचा हात काढून पायरीवरून उतरून पुढे आला, त्यानं भक्ताच्या अखंड बडबडणाऱ्या तोंडावर हात ठेवला आणि तो म्हणाला, ''वत्सा, सरळ सांग ना की तुला लग्न करायचंय!!!!

एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.
बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार".
ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले.
"तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तुम्ही घरी येता आणि एक स्त्री तुमचं प्रेमानं स्वागत करते, तुम्हाला छान छान पक्वान्नं खाऊ घालते, दिवसभरातल्या तुमच्या दगदगीचा शीण आपल्या सोबतीनं हळुवारपणे घालवते... याचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे?...
...
विचार करा...
सापडलं उत्तर?
अहो, तुम्ही चुकीच्या घरात शिरला आहात!!!!!

मुलगा: बाबा, बाबा मला दर महिन्याला जो पॉकेट मनी देता ना. तो थोडा वाढवून द्या. महागाई कसली वाढली आहे.
बाबा: अरे, कस शक्य आहे. परवा तर अर्थमंत्र्यानी सांगितले की सगळ्या गोष्टींचे भाव स्थिर राहतील. मी पाहिल्या ना बातम्या.
मुलगा: तुम्ही पण ना बाबा, अहो तुमचा विश्वास स्वताच्या मुलावर ज्यास्त आहे की अर्थमंत्र्यावर??

गुरुजी : बंड्या. सांग पाहु , एक कोंबडी रोज एक अडे देते , तर
एका महिन्यात ती किती आंदे देएल ?
बंड्या : गुरुजी, मला एक सांगा की ती पण "सोमवार बंद " असते का ?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एकदा देवाने माधवराव शिंद्यांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" माधवराव शिंदे म्हणाले, "एक". देवाने खूश होऊन त्यांना एक नवीकोरी मर्सिडीझ भेट म्हणून दिली.
नंतर देवाने विलासराव देशमुखांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" विलासराव म्हणाले, "तीन". देव थोडासा नाराज झाला आणि त्याने त्यांना एक होंडा सिटी भेट म्हणून दिली.
त्यानंतर देवाने लालूप्रसाद यादवांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" लालू म्हणाले, "बारा". देव चिडला. त्याने लालूंना एक जुनीपुराणी स्कूटर दिली.
हे तिघे रस्त्यातून जात असताना काही वेळाने त्यांना गांधीजी चालत येताना दिसले। लालूंनी गांधीजींना विचारलं, "काय हो गांधीजी, देवाने तुम्हाला काही दिलं नाही वाटतं?" गांधीजी म्हणाले, "ते राहू द्या. आधी मला सांगा की देवाला कोणी सांगितलं की मला 'राष्ट्रपिता' म्हणतात "

पुणेरी पुणे
काही वेळेला 'खोडी' काढायचं मनात नसतं. पण ग्राहकाने अनाठायी शंका विचारून बेजार केलं तर इरसाल पुणेरी उत्तराची चपराक बसते. उदा. शिट्टीवर सुरेल गाणं सादर करणारा मित्रवर्य अप्पा कुलकर्णी मुळात महाराष्ट्र बॆकेत होता.
त्याचा बॆकेसमोरचा रस्ता ओलांडायचा अवकाश. समोरच आणखी एक सहकारी बॆक होती. तिथलाच चेक घेऊन आपल्या महाराष्ट्र बॆकेतल्या खात्यात भरण्यासाठी ग्राहक महाशय आले. नेमकं काउंटरवरच्या अप्पाला त्यांनी विचारलं की,'cash कधी होईल?'
अप्पा म्हणाला,'उद्या सुट्टी आहे. परवा होईल.'
ग्राहकानं विचारलं,'का पण? समोरच्या बॆकेचा तर चेक आहे. वेळ लागतोच कसा?'
'अहो उद्या सुट्टी आहे.'अप्पाचा नम्रपणा अद्याप सुटला नव्हता!
,पण समोर तर बॆक आहे.' ग्राहक हेका सोडेना.
मग खट्याळ अप्पाला राहावेना. तो म्हणाला,'काका काय आहे? केवळ रस्ता ओलांड्यावरचा बॆकेचा चेक आहे, म्हणून लगेच कॆश होतो, असं नसते, प्रोसिजर असते...असं बघा...'
'काही सांगू नका प्रोसिजर-बिसिजर.'
'ऎका तर काका. वॆंकुठ स्मशानभूमीच्या दारातच समजा तुम्ही गेलात म्हणजे मेलात, तर दारातच गेले म्हणून लगेच सरणावर चढवतील का? आधी ससूनला नेतील. चेक करतील. घरी नेतील. हार घालतील. म्रुत्युपास काढतील. मग वॆंकुठकडे...'
'कळलं!' फणकारत ग्राहक महाशय निघून गेले।

आयुष्य कोडं म्हणून पाहीलं
तर सोडवणं अवघड होवून बसतं
उत्तरांच्या असंख्य पारंब्या फुटून
एक भलं मोठं वडं होवून बसतं
सरळ साधं जगणं सोडून, आपण
मोह मायेच्या दूनियेत गुंतत जातो
प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता
उत्तरांनाचं प्रश्नात गुंफत जातो
सुर्याकिरणात चमकणारा दव
मोती बनून मिरवू लागतो
येताच वाऱ्याची एक झूळूक
शेवटी मातीतच हरवू लागतो
प्रत्येक गोष्टीचा अंत असतो
निसर्ग क्षणाक्षणाला शिकवतो
इवलासा दव पण जिवनातलं
सर्वात स्वच्छ प्रतिबिंब दाखवतो
निसर्गाला आयुष्याचा गुरू मानून
कर्तव्याची दुर्वा वहायची असते
आयुष्याला निसर्गासारखं वाहू द्यावं
विणाकारण पर्वा करायची नसते
सुनील पांगे
तर सोडवणं अवघड होवून बसतं
उत्तरांच्या असंख्य पारंब्या फुटून
एक भलं मोठं वडं होवून बसतं
सरळ साधं जगणं सोडून, आपण
मोह मायेच्या दूनियेत गुंतत जातो
प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता
उत्तरांनाचं प्रश्नात गुंफत जातो
सुर्याकिरणात चमकणारा दव
मोती बनून मिरवू लागतो
येताच वाऱ्याची एक झूळूक
शेवटी मातीतच हरवू लागतो
प्रत्येक गोष्टीचा अंत असतो
निसर्ग क्षणाक्षणाला शिकवतो
इवलासा दव पण जिवनातलं
सर्वात स्वच्छ प्रतिबिंब दाखवतो
निसर्गाला आयुष्याचा गुरू मानून
कर्तव्याची दुर्वा वहायची असते
आयुष्याला निसर्गासारखं वाहू द्यावं
विणाकारण पर्वा करायची नसते
सुनील पांगे
~:~ मैत्रिण ~:~
मैत्रिण माझी हट्टी गं
उन्हाळ्याची सुट्टी गं
मैत्रिण माझ्या ओठांवरची
कट्टी आणिक बट्टी गं !
मैत्रिण रुमझुमती पोर
मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण मैत्रिण कानी डूल
मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल !
मैत्रिण मांजा काचेचा
हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण
बदामाचे गूढ मैत्रिण
मैत्रिण माझी अशी दिसते
जणू झाडावर कळी फुलते
ओल्या ओठी हिरमुसते
वेड्या डोळ्यांनी हसते
मैत्रिण माझी फुलगंधी
मैत्रिण माझी स्वच्छंदी
करते जवळिक अपरंपार
तरीही नेहमी स्पर्शापार
मैत्रिण सारे बोलावे
मैत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज,
तितके अलगद सोडावे
मैत्रिण माझी शब्दांआड लपते,
हासुनिया म्हणते-पाण्याला का चव असते
अन् मॆत्रिणीस का वय असते !
मैत्रिण थोडे बोलू थांब
बघ प्रश्नांची लागे रांग
दु:ख असे का मज मिळते
तुझ्याचपाशी जे खुलते !
मैत्रिण माझी स्वच्छ दुपार
मैत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी
मैत्रिण भरलेले आभाळ !
Monday, April 23, 2007
मित्रा,
हल्ली एकटासाच राहु लागलोय,
गप्प बसुन सगळे ऎकु लागलोय,
का कुणास ठाऊक मी कविता करु लागलोय!
मित्रा,
हल्ली स्वतःशीच बोलू लगलोय,
कुणाशी बोलायला घाबरु लागलोय,
का कुणास ठाऊक मी कविता करु लागलोय!
मित्रा,
रात्री उगाचच विचार करु लागलोय,
मधेच काही आठवले तर मोबाईल वर टाईप करु लागलोय,
का कुणास ठाऊक मी कविता करु लागलोय!
मित्रा,
काहीतरी वेगळच वाटु लागलय,
ना सुःख आलयं, ना दुःख गेलयं,
का कुणास ठाऊक मी कविता करु लागलोय!
मित्रा,
एक मोठा अपघात झालाय,
बाकी सगळं ठीक आहे;
ह्रुदय मात्र दुखावलय,
म्हणुनच की काय मी कविता करु लागलोय
शब्दाचं बोट धरून भावना कागदावर अलगद उतरली,
मनातल्या चिमुकल्या बीजातून कवितेची वेल बहरली!
कवितेच्या वेलीला कवितांच्याच कळ्या आल्या,
भावनांच्या रेशीमगाठी अजून-अजून मोकळ्या झाल्या!
एके दिवशी कळ्यांतून मोहक फुलं उमलली,
मनातली अनेक कोडी कवितांनीच उकलली!
कवितेची बकुळफुलं कोमेजूनही फुललेली,
नकळतच दिसली मनाची बंद दारं खुललेली!!
मैत्री असावी अशी... मैत्रीसारखी
मैत्री असावी अशी... मैत्रीसारखीहसत राहणारी
हसवत राहणारी...संकटकाळी हात देणारी...
आनंदी समयी साद घालणारी...
मनाची कवाडे उघडून डोकावणारी...
काहीं गुपितांचे राखण करणारी...
सांगता मोहीत करणारी...
कधी कुणाला न लुटणारी...
चांगल्याच कौतुक करणारी...
तितकीच चूका दाखविणारी...
शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी...
मैत्री असावी अशी... मैत्रीसारखी
~:~ प्रेम ~:~
प्रेम म्हणजे बंधन
प्रेम म्हणजे स्पंदन
प्रेम म्हणजे स्वतः झिजून
इतरांसाठी सुवासणारं चंदन
कधी कधी असंख्य भेटी घडूनही
प्रेमाची भावना जागत नाही
तसं प्रेमात पडायला कधी कधी
ती भेटचं घडावी लागत नाही
प्रेम म्हणजे दोन मनांना
आपुलकीनं जोडणारा सेतू असतो
प्रिय व्यक्तीच्या सुखासाठी धडपड
हाच प्रेमाचा निरागस हेतू अस्तो
प्रेम म्हणजे प्रियजणांच्या
चेहऱ्यावर उमटणारा हर्ष असतो
प्रेम म्हणजे जिवात दडलेल्या
आत्म्याचा स्पर्श असतो
प्रेम म्हणजे बंधन
प्रेम म्हणजे स्पंदन
प्रेम म्हणजे स्वतः झिजून
इतरांसाठी सुवासणारं चंदन
कधी कधी असंख्य भेटी घडूनही
प्रेमाची भावना जागत नाही
तसं प्रेमात पडायला कधी कधी
ती भेटचं घडावी लागत नाही
प्रेम म्हणजे दोन मनांना
आपुलकीनं जोडणारा सेतू असतो
प्रिय व्यक्तीच्या सुखासाठी धडपड
हाच प्रेमाचा निरागस हेतू अस्तो
प्रेम म्हणजे प्रियजणांच्या
चेहऱ्यावर उमटणारा हर्ष असतो
प्रेम म्हणजे जिवात दडलेल्या
आत्म्याचा स्पर्श असतो
Subscribe to:
Posts (Atom)