आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, October 19, 2007

उद्या जगेन उद्या जगेन म्हणून आजवर मरत राहीलास
न पाहीलेल्या भविष्यासाठी वर्तमानात झुरत राहीलास
सागं कधी जगलास का ते उद्याच जीवन तु आजवर?
आजही तेच करतोस जे आयुष्यभर करत राहीलास

मर मर मरुन उद्यासाठी तु खूप काही केलंस
तो उद्या आलाच नाही तु तुझ्यासाठी काय केलस?
आज भुतकाळाच्या जखमा पाहून का रडतोस तु
सुखासाठी हजारदा मन मारलस हे तु काय केलस?

एक दिवस तरी सागं जेव्हा नव्हता दु:खाचा चोप
आठवतय का कधी मिळाली शेवटची साखर झोप
अरे तो दिवस आलाच नाही ज्याची तु वाट पाहीलीस
आठवतय का कधी केलीस अखेरची मन मौज

तु म्हणतोस जे केलं त्यामुळे मी आजवर जगलो
आणि एवढ करुनही आजवर ही नाही मी थकलो
घरासाठी दारासाठी संसारासाठी मी खुप काही केलं
हा माझ्यासाठी मी आजवर काही नाही करु शकलो.

आयुष्यभर धावलास तु न पाहीलेल्या उद्यासाठी
तु राहीलास उपाशी नाही केलास आराम जीवासाठी
सागं हा जिवनाचा खेळ होता का नशिबाचा तमाशा
तु जगलास खरा पण कोणासाठी आणि कशासाठी?

सोडणांर आहेस त्या जगासाठी की तुला विसरणा-या घरासाठी
कपाटातल्या तिजोरीसाठी का त्या पोष्टातल्या खात्यासाठी
आता तरी सागं कशासाठी जगलास तु आजवर बोल?
हातातल्या काठीसाठी की डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी
बघ आजही तरी तुला चींता पुन्हां त्या उद्याची
चदंनाच्या लाकडाची आणि शुद्ध वनस्पती तुपाची.

उशीर झाला हे तुला कळण्यासाठी...

का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठी
का असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी...

भुललो ना मी कधी कोणत्याच अमिषाला
दिला होता तुला 'तो' शब्द पाळण्यासाठी...

वाचले असतेस तु कधी पान माझ्या मनाचे
नसता का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठी

का असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी...
उशीर झाला हे तुला कळण्यासाठी...

कवी: अद्न्यात
काहीच घडले नाही आज तरी डोळे भरूण आले

काहीच घडले नाही आज तरी डोळे भरूण आले
जुने काही परत येऊन पुन्हा छ लु न गेले
विसरलो म्हणता म्हणता काही तरी आठवून आले
जळालेले हृदय आग आश्ृूंमधे बुडून गेले...

का घडावे आसे ? का तिने वागावे आस
प्रश्ना मधे या मन खरेच गडबडून गेले
काहीच घडले नाही आज तरी डोळे भरूण आले
जुने काही परत येऊन पुन्हा छ लु न गेले...

संपलेले सारे पुन्हा पुन्हा उगलते मन
पुढे जायचे तरौन ही मगेच भरकतटे मन
नाही उत्तरे त्या साठीच तर्फडते मन
तिची बाजू ही न समजता जलट राहते मन
कसे सांजौ त्याला ते सारे आता सारून गेले...

काहीच घडले नाही आज तरी डोळे भरूण आले
जुने काही परत येऊन पुन्हा छ लु न गेले...

कवी: अद्न्यात

सहज बोलताना

सहज बोलताना
तुझी बात आली
जुन्या सावल्यांची
जुनी रात आली

हसलो जरी मी
अश्रू फसवून गेले
तुझ्या आठवांची
बरसात झाली...

म्हटले कुणी,
"ती मौजेत आहे",
चला एकदाची
खबरबात आली...

खरे सांग माझे
कसे पाप झाले
का माझ्या स्मृतींना
अशी मौत आली?

लक्ष्मीचीच होती
तुझी पाऊले जी
कुणा पुण्यवंताच्या
दारात गेली...

-सौमित्र साळुंखे
जगण्याचा अर्थ खरा शोधण्यास निघाला..
स्वप्नांचा सुखद किनारा राजा ओढण्यास निघाला..

साला आयुष्य म्हणजे नक्की काय असतं..
स्वतःलाच उत्तर मागत राजा चंदेरी दुनियेत आला...

दुनिया पाहीली स्वप्नांची चंचल मोहक चांदण्यांची..
क्षणीक ते सुख पाहुन वेडा राजा तिथच रमला..

राजा आपला साधा-भोळा पण त्याच्यापरी सारं गाव नव्हते..
तो खेळ होता " सावल्यांचा" त्याला काहीच ठाव नव्हते..

नजरेस पडली राजकुमारी रुप-सौन्दर्य, नितळता ती पाहत बसला..
सोडला तिनं प्रेमळ शब्दांचा अलगद भोवरा राजा भोळा तिथच फसला..

साधं मन समजवत होतं स्वप्नाळु राजाशी तेव्हा सारा गाव भांडला..
पाहता मोहीनी स्वतःची नजरेत त्याचा तिनं लगेच डाव मांडला..

राजाही नशिबाच्या डावात खेळला पहील्याच काही क्षणात हरला..
आपल्याच गावात वेडा ठरला पसारा स्वप्नांचा फक्त मनात उरला..

मैत्री, प्रेम, भावना, आसवं, सा-याचा खोटा बाजार वाटला..
स्वप्न, अपेक्षा, ईछा, आकांक्षा याचा मोठा जुगार दिसला..

खरचं...... मृगजळच सारी दुनिया ही उगा मी या मोहात रमलो..
कालचा "चौकट राजा मी" आज मी क्षणात हरलो......मी क्षणात हरलो.......

-----चौकट राजा [सचिन काकडे ऑक्टोबर १७, २००७]

ती चालली होती, एकटीच
एकटिच्या वाटेने.....
कुणाचीतरी सोबत मिळेल या
वेडया आशेने......

तसा डोक्यावरचा सुर्य
होताच तिच्या साथीला.....
जणु तो साथ देत होता तिच्या
संथ गतीला.......

तिला भान न होते तिच्याही अस्तित्वाचे.........
चटकेही लागत नव्हते पाया
खालच्या विस्तवाचे......

अचानक डोक्यावरचा सुर्य
ढगाआड जाउ लागला.....
भर दिवसा हवेत मंद वारा वाहु लागला.....

तिच्या शांत चेहरयावर हसु उमटले......
गुढ प्रकृतीचे जणु फक्त
तिलाच उमगले......

आतुर होऊन ती ढगाकडे पाहु लागली.......
पावसाच्या नुसत्या
कल्पनेने ती प्रफ़ुल्लीत
होऊ लागली.....

तिला वाटल पावसाच्या आगणित
सरी तिच्यावर कोसळणार.....
अन.. मतीचा सुगंध तिच्या
श्वासात मिसळानार......

पन....तो मात्र तिला नुसतीच
आशा दाखऊन परतला.....
ढगाआड लपलेला सुर्य
गालतल्या गालत हसला......

डोळयातुन तिच्या पाण्याचे
अनेक थेंब ओघळले.......
त्या थेंबाणी मुळे जनु सारे
आसमंत उजळले....

ती शुन्य नजरेने तिच्या
वाटेकडे पाहु लागली.......
थकलेली पाऊले पुन्हा ऊचलु
लागली.... अन...ति पुन्हा एकटिच
चालु लागली........

कवी: अद्न्यात

Thursday, October 18, 2007

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

राजा वदला, "मला समजली शब्दावाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा"
कां राणीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी?
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तार
"उद्या पहाटे दुसर्या वाटा, दुज्या गावचा वारा"
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

तिला विचारी राजा, "कां हे जीव असे जोडावे?
कां दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे?"
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

कां राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना?
का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना?
वार्यावरती विरून गेली एक उदास विराणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

सये सोबत तुझ्या जगताना
अर्थ मला जगण्याचा उलगडला
अन सुखी आयुष्याचा एक
स्वर्गसुखाचा दृष्टांत हयातीतच घडला..

सोबतीला हात तुझा हातात
अन तुझी प्रेमळ साथ
मग मार्ग माझा मला सुचला
थेट यशाच्या क्षितीजाचा पल्लाच गाठला..

सोबत तुझी प्रेमळ मिठी,
अन स्पर्श तुझे माझ्या ओठी
जिव माझा फुलासारखा लाजला
अन तुझ्याच त्या प्रितरसात भिजला..

गीत तुझे मनी गुनगुनत
मनाचे रहस्य सामोरी आले,
अन मग वेडूच ते मनं माझं
तुझ्याच मागोमाग धावत राहीले

तुझ्या चेहर्‍यावरचा आनंद तू
ओंजळीत भरून माझ्यासमोर केलास
का तु असं करून तुझ्या आयुष्याचा
हर्षसरींचा ढग मलाच देऊ केलास..

अघोरी दुखण्यात माझ्या
मलम तुझ्या सहानभूतीचा
अन दावलास मार्ग माझ्या दुखण्याला..
अगदी माझ्या आयुष्याच्या वेशीबाहेरचा..

एकट्याला अन्न गिळायला
खुप जड होत होतं..
पण तुझ्या हातून तर एका घासातच
माझं पोट नेहमीसाठी भरत होतं

खरंतर सोबत तुझ्या जगताना,
मी अर्थपुर्ण होऊन जगत आहे..
तुझ्या साथिला मी माझ्या,
जगण्याचा श्वासचं धरत आहे..

--- आ... आदित्य..
त्या रेतीत खूप किल्ले बांधले होते
त्यात खेळण्यात संबंध दिवस घातले होते
पणं एकाएकीच तू मला सोडून गेली
जशी काही हातातून रेत सुटून गेली

आता तिला आपली आठवण राहाण्यासाठी तिथेच घुटमळतो
म्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......
त्या दमट हवेत आपण दिवसभर रहायचो
तुझी वाट पाहत मी तिच्याशीच बोलायचो

पणं एकदमच तू मूक झाली
जशी ती हवा वाहाण्याचंच थांबली
आता तिला एकटं न पाडण्यासाठी तिच्याशीच खेळतो
म्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......

आठवतंय, तिथे एक खडक होता
ज्याच्याशी आपला बंध जुळला होता
पणं त्याला तू खूप रडवलंस
जसं काही प्रारब्धात अडकवलसं

आता तो आणि मी रडून रडून रोज थोडा झिजतो
म्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......
एक सांगू, आपण सोबत असताना त्यात भरपूर पाणी होतं
कडक उन्हातसुद्धा आपल्या प्रेमाच्या वर्षावाने वाढतच होतं

पणं यंदाच्या उन्हाळ्यात हा पाऊसच थांबला
मग पाण्याचा ओघ आपोआप आकाशाकडे धावला
आता ते पाणी कमी होऊ नये म्हणून माझे अश्रू मिसळवतो
म्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......

म्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......
म्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......

-- निलेश कोटलवार
सये सोबत तुझ्या जगताना
अर्थ मला जगण्याचा उलगडला
अन सुखी आयुष्याचा एक
स्वर्गसुखाचा दृष्टांत हयातीतच घडला..

सोबतीला हात तुझा हातात
अन तुझी प्रेमळ साथ
मग मार्ग माझा मला सुचला
थेट यशाच्या क्षितीजाचा पल्लाच गाठला..

सोबत तुझी प्रेमळ मिठी,
अन स्पर्श तुझे माझ्या ओठी
जिव माझा फुलासारखा लाजला
अन तुझ्याच त्या प्रितरसात भिजला..

गीत तुझे मनी गुनगुनत
मनाचे रहस्य सामोरी आले,
अन मग वेडूच ते मनं माझं
तुझ्याच मागोमाग धावत राहीले

तुझ्या चेहर्‍यावरचा आनंद तू
ओंजळीत भरून माझ्यासमोर केलास
का तु असं करून तुझ्या आयुष्याचा
हर्षसरींचा ढग मलाच देऊ केलास..

अघोरी दुखण्यात माझ्या
मलम तुझ्या सहानभूतीचा
अन दावलास मार्ग माझ्या दुखण्याला..
अगदी माझ्या आयुष्याच्या वेशीबाहेरचा..

एकट्याला अन्न गिळायला
खुप जड होत होतं..
पण तुझ्या हातून तर एका घासातच
माझं पोट नेहमीसाठी भरत होतं

खरंतर सोबत तुझ्या जगताना,
मी अर्थपुर्ण होऊन जगत आहे..
तुझ्या साथिला मी माझ्या,
जगण्याचा श्वासचं धरत आहे..


--- आ... आदित्य..
नेहमीच कसं हसवायचं...??
तूच सांग देवा असं किती दिवस चालायचं...
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं...??

समोरचा तो हसला.....नव्हे!
हसवण्यावर माझ्या फसला!!
त्याच्या समोर रडलोच् तर...
हसवणाराच् मी कसला...

माणसांच्या या गर्दीमध्ये स्वतःला मात्र विसरायचं...
दू:ख दाबून ओठांमध्ये , त्यांतच हसून दाखवायचं
पण .... श्वास जड होतो जेव्हा---...तेव्हा रे काय करायचं???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं...!!!

मी रडू लागलो जेव्हा ...
ते मात्र हसत होते...
कारण, माझ्या रडण्यामधले
व्यंगच त्यांना दिसत होते...

मनातलं सर्व मनातच ठेवून, हसून मग मी दाखवायचं,..
शिषीरा नंतर येतो वसंत.......स्वप्नंच् फक्त पहायचं
पण; ........ह्रूदयातच ढग दाटून येतो....तेव्हा रे काय करायचं....???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं...!!!

कवी : अद्न्यात

Tuesday, October 16, 2007

मी या ब्लोगवर फक्त मराठी साहित्य ठेवनार होतो.
पण या ओळी आवडल्या आणि येथे ठेवाव्या वाटल्या

जब भी किसीको करीब पाया है
कसम खुदा की वही धोखा खाया है
क्यो दोष देते है हम काटॊं को
जख्म तो हमने फुलोंसे पाया है

आंखे खुली हो तो चेहरा तुम्हारा हो,
आंखे बंद हो तो सपना तुम्हारा हो,
मुझे मौत का ड़र भी ना हो,
अगर कफन की जगह, दुपट्टा तुम्हारा हो

रात भी ढल गयी है..
दिन तो गुजर गये युं ही,
कोशीश तो बहोत की दिल ने
पर जुबांपे बात रहे गयी युं ही

युं तो कोई तनहा नहीं होता,
चाह कर भी कोई जुदा नही होता,
मोहब्बत को तो मजबुरीयां ही ले डुबती है,
वरना खुशीं से कोइ बेवफा नही होता

अश्कोंको हमने कई बार रोका,
फिर भी जाने क्यों आंखे धोका दे गयी,
भरोंसा तो था हमें अपने आप पर मगर,
उनकी यांद आंतेही ना जाने क्युं पलकें नम हो गयी

साथ हमारा पल भर का सही,
पर वोह पल जैसे कोई कल ही नही,
रहे जिंदगी मै शायद फिर मिलना हमारा,
लेकीन महकता रहेगा दिल मै हमेशा प्यार तुम्हारा


नकळत तू पण
प्रेमात माझ्या पडावी...

थोडीही का असेना
साथ तुझी मिळावी...

स्वप्नातही माझ्या
नजरेत तू असावी...

आरशातही तूझीच
प्रतिमा दिसावी...

राजा मी माझ्या मनाचा
पण राणी तूच असावी...

आहेच मी 'इन्द्र'
अप्सरा तूच व्हावी...

-- इन्द्रजित महाजन
आकाशातला एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा,
एक छोटे जग प्रत्येका जवळ असावे,
जगाच्या या गर्दित कुणीच एकटे नसावे.....

क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.
आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆत.

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.
असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हा ही
क्षितीजांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी

निराश्रित...

त्या सांजसावल्या गूढ, पारावर भेटून गेल्या,
शून्यात कुठवरी दूर त्या मजला रेटून गेल्या...

मी त्या शून्यातून चालत शून्याच्या काठी आलो,
शून्याच्या लाटेवरती, शून्यात चिंब मी झालो.

दूर पसरली होती, तेथे तिमिराची कुरणे,
तिमिर-लतांतून आली, मजवर तिमिराची किरणे.

मग तिमिराच्या ओटीत, नक्षत्र असे सांडले,
काळोख्या त्या कुरणाशी, ते चमचमचम भांडले.

त्या कल्लोळाला भिऊनी स्मरल्या परतीच्या वाटा,
पण वाटेवरती सयेचा मज खचकन रुतला काटा.

मी परतलो पारावर, पण पार पेटला होता,
अन झगझगत्या तिमिरावर त्या - धूर दाटला होता.

दिपलो त्या लोळाने, अन पडलो मग मी उघडा,
मजला लपवाया माझा, तेजाशी वेडा झगडा.

शून्याच्या काठी मजला आहे तिमिराचे छत्र,
परि डोळ्यांमध्ये शिरूनी, मजला छळते नक्षत्र.

-- योगेश दामले

Monday, October 15, 2007

जे सांगायचे आहे मला ,
ते न बोलता तुला कळेल का ?
पाहते आहे जे स्वप्न मी ...
तेच स्वप्न तुला ही पडेल का ?

कविता माझ्या प्रितीची ,
तुला कधी समजेल का ?
तुझेही ह्रुदय माझ्यासाठी ...
सूर प्रेमाचे कधी छेडेल का ?

बोलू नकोस काहीच ... पण
फक्त् नजरेचा एक इशारा देशील का ?
मी केलं आहे तितकंच प्रेम
तूही कधी माझ्यावर करशील का ???

-- श्वेता पोहनकर
अनेक जण येतील
जवळ सुखःत तु असताना
बघ शोधुन तरी एकदा
सापडेन मी दुःखातही तु असताना

आहे जिवनाच्या संगीतामद्ये
मैत्रीची साथ सांग
काय होईल माझे वाईट
जर हातात असेल तुझाच हात

प्रेम् बिम सारे झुट
असे अनेक लोक बोलतात
तेच लोक पुढे जाऊन
प्रेमावर कवीता करतात

जिवनाच्या वणव्यात जेंव्हा लागु लागते दुखाची झळ
जेंव्हा अश्रुंनी भरुन जाते ओंजळ
तेंव्हा एक हात असतो नेहमीच जवळ
आणी बोलतो फक्त एकदा मागे तर वळ

संकटे आली पर्वतांसारखी
तर आभाळासारखे होऊन
बघ स्वतःसाठी जगताजगता
दुसरयांसाठीही जगुन बघ

जेंव्हा जेंव्हा दरवळतो रातराणीचा सुवास
जेंव्हा जेंव्हा होऊ लागतात स्वप्नांचे भास
हास ना प्रिये एकदाच हास
नाही करवत एकट्याने हा प्रवास

--ओंकार(ओम)
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?
रेशमी वाटणारी घट्ट नाती कुणी तोडुन का जातं?

मनाशी मनं आधी जुळवायची कशाला?
जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला?
कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनास
काट्यांतच मग खुडावं लागतं.....
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतं
बरसतानाच नकळत हरवुनही जातं
भर चांदरातीही मनास मग
एकट्यालाच झुरावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणास कुणी कधि आपलं म्हणु नये
झालात कुणाचे कधि तर दुर जाउ नये
वाळवंटी या जगात
एकट्यालाच मग जगावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

मी जगुन घेतो एकटा
माझ्याशीच मी हसुन घेतो एकटा
तरी एकट्यालाच रोज रोज मला मरावचं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कवी: ...........
बोलावसच वाटत नाही, तु जवळ असताना...
वाटत तुच सगळा ओळखावस, मी नुसत हसताना...

आमची पहीली भेट, ती किती लाजली होती
ते लाजणं डोळ्यात भरून, माझी रात्र गाजली होती

ऐन पहाटे तुझ्या प्रेमासाठी, मला तरसायचं आहे
त्यासाठि प्राजक्त होवुन, तुझ्या घरात मला बरसायचं आहे

असेल काही - पण पलिकडचा, मी जर तुजला दिसलो नाही
म्हणेन परिचय झाला अपुला, परंतु ओळख झाली नाही.

काय सखे तु जादू केलीस , मी माझ्यातच हरवून गेलो
तुझ्या आसीम प्रेमाखातर, माझं मलाच विसरून गेलो

इतक्य दिवसांनी आज तु नजरेस पडल्यावर
तुझ्या नजरेत मला बंदगी दिसली
एकटेपणाच्या तुफ़ान पावसात रडल्यावर
सखे तुझ्या मिठीत आज माझी जिंदगी हसली

नाव तिचे घेण्यात, वेगळीच नशा आहे
कधीतरी हो म्हणेल, अशी वेडी आशा आहे

हसताना तिच्या गालावर, किती सुरेख खळ्या पडतात
अरसिक मी कितीहि तरी, क्षणात मला खुळ्या करतात

तुझ्यासवे पावसात भिजण्यात, एक वेगळाच आनंद आहे
दोघे चिंब, पाऊस बेफान, वातावरणही पार धुंद आहे

केंव्हा तरी फुलांचे रंग सारे पंखात खोवून ,
त्या मोहाच्या रानामध्ये मीच उडेन पक्षी होऊन

हृदयाच्या नदीला पूर आलाय, तुझ्या तिथे पाणि आटलं कसं,
तरीही मी कोरडेपण जाणवतोय, तुला सागराहून विशाल वाटलं कसं

हसायच्या आधी मला जरा सराव करावा लागतो,
मनावरचा घाव बराच दाबून धरावा लागतो

बंध ना अपुला सुटावा, वादळे येता व्यथेची
मी तुला आधार द्यावा, अन मला तू सावरावे