आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, August 16, 2007

आपली मराठ मोळी आई म्हणजे एक मजेदार, प्रेमळ, अस रसायन आहे
*आई तुम्हाला दोन वेळां सल्ला देते. एक तुम्हाला हवा असतो त्या वेळी,व तुम्हाला नको असतो त्या वेळी सुध्धा·
*आई हि अशी एकच व्यक्ति आहे, जिला तुमच्या बद्दल, तुम्हाला तुमच्या बद्दल माहित आहे त्या पेक्षा ज्यास्त माहित असत.
*एखाद्या वेळी एखादी गोष्ट जर तुम्हाला नसेल,व आइला तुम्हि ती तिला विचारली अन जरी तिला ति माहीति नसली तरी ति, गोष्ट माहीति असल्यासारखी ठोकुन देते.
*आई जीतकी चांगली तितके मुंले वाया जाण्याच्या संभावना जादा
*अरे पावसांची चिन्हें आहेत रेनकोट घेउन जा अस ती म्हणते, तुम्हि नेहमी पणे,दुर्लक्ष करता, अन मधे कुठेंतरी नेमका तुम्हाला पाउस गाठ्तो.
* तुम्ही एखादी गोष्ट विसरला, तर ति तुमच्या साऱ्या चुकांची तुम्हाला आठ्वण करून देइल ज्यामुळें तुम्ही ति चुक परत करणार नाहीत.
*तुमच्या साऱ्या गोष्टीवर टीका करण्याचा तिला ह्क्क आहे,जरी त्यातली एखादी गोष्ट तुम्ही केली नसली तरी सुध्धा.
*आई च्या जेवणाला नावे ठेवण्याची चुक करु नका[मेल्या बाहेरच शिळ पाक घाण तेलातल मीटक्या मारत खाशील.]
* आई शी कधीच खोट बोलु नका अन जरी प्रयत्न केला तरी निश्चीत पकडलें जाताल·
*जस जस तुमच वय वाढत जात तस तस एखाद्या लहान मुलासारख तुम्हि तिच्याशी वागायला लागता·
*पैशांची कडकी असते, तिला पैसें मागा ति पैसे देइल अन,तुम्ही पैसे कसे उधळता या वर लेक्चरपण देइल·
*तुम्ही कीतिहि चुका करा, ति हजार वेळा तुम्हाला त्याची आठवण करुन देइल, पण मनांत कधीच ठेवणार नाही·
*तुम्ही एखादी गोष्ट केल्यानंतर[आधी नाही], ती आणखी कशी चांगली करता आली असती हे फक्त तिच सांगु शकते.
*तुमची आई कीतिही गरीब कींवा अशीक्षीत असो ति तुमच्या पेक्षा नेहमीच मोठी आसते.
*एखादी गोष्ट तुम्ही केली तर ति आणखी कशी चांगली करता येइल ते ती तुम्हाला सांगेल ,पण जर तीनें केली अन जर तुम्ही सांगायला गेला तर ती म्हणेंल, मग तुच का नाही करत.
*तुम्ही कितिही चांगला विनोद केला तरी तिला तो विनोद नेहमीच वाह्यात वाटतो.
*आइ काम संपवुन जरा बसली कि मुलाला भुक लागते.
*तुम्हि मोठ होउन नांव काढाव इतकच तिला वाटत असत.

Tuesday, August 14, 2007

|| वंदे मातरम || || वंदे मातरम || || वंदे मातरम ||

सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
सस्य श्यामलां मातरंम् .
शुभ्र ज्योत्सनाम् पुलकित यामिनीम्
फुल्ल कुसुमित द्रुमदलशोभिनीम्,
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम् .
सुखदां वरदां मातरम्

सप्त कोटि कन्ठ कलकल निनाद कराले
द्विसप्त कोटि भुजैर्ध्रत खरकरवाले
के बोले मा तुमी अबले
बहुबल धारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम्

तुमि विद्या तुमि धर्म, तुमि ह्रदि तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारै प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदल विहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलाम्
सुजलां सुफलां मातरम्

श्यामलां सरलां सुस्मितां भूषिताम्
धरणीं भरणीं मातरम्

|| वंदे मातरम || || वंदे मातरम || || वंदे मातरम

देशाच्या ६०व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्याला हार्दीक शुभेछ्चा
!! जय हींद !!
““ माय ””

याचा साहेबी दिमाख,
घरी फाटक्यात माय.
इथे गाडीतं फिरणे,
तिथे अनवाणी पाय.

नळ पाण्याचा चालतो,
इथला चोवीस तास.
एक थेंब पाण्यासाठी,
तिथे लागतात फास.

याची अस्तरी नाजुक,
नाही सोसत उन्हाळा.
मायमाऊलीचा जीव,
झेले मरण अवकळा.

यांचा कुत्रा पांघरे,
मखमालीची चादर.
माय आसवे पिऊन,
ओढे विटका पदर.

याच्या रंगल्या रात्रीच्या,
ओल्या सुक्या मैफीली.
दीसं राबून राबून,
माय उपाशी निजली.

दीसं राबून राबून,
माय उपाशी निजली. !!!

- अरुण नंदन
(या कवितेने जर काही मने मिळली, काही घरे जोडली तर ती मला पावली असं समजेन)
http://arunnandan.multiply.com/journal


सहयोग - सतिश वाघमारे
पर्याय नाही

जगणं म्हणजे फसवणूक, पण फसण्याशिवाय पर्याय नाही
येवढच आपल्या हाती आहे, हसण्याशिवाय पर्याय नाही

आयुष्याच्या पाटीवरच्या सगळ्याच ओळी ख-या नसतात
कितीही आवडो, काही ओळी पुसण्याशिवाय पर्याय नाही

जे काय चाललं आहे त्याने असह्य संताप येतो तरी
मन मारून, हात बांधून बसण्याशिवाय पर्याय नाही

माणूस म्हणून जन्मलो खरं, पण माणसं काही दिसत नाहीत
कलेवरांच्या ढिगा-यात आता, घुसण्याशिवाय पर्याय नाही

आलोच नसतो तर कदाचित वेगळं काही घडलं असतं
आलोच आहे तर आता या "असण्या"शिवाय पर्याय नाही

इच्छेच्या ओंजळीत, का जमवतेस आशेची फुले

कधीचा पळतोय, मला दिशा माहीत नाही
आयुष्य गिळतोय, परिभाषा माहीत नाही

भास्करा तूही विसरलास का पुर्वेची वाट
अंधार छळतोय, मला निशा माहीत नाही

स्वप्न का पाहतेस उज्वल भविष्याचे
तुझ्या हातावरच्या, तुलाच रेषा माहीत नाही

का मागतेस देवाकडे, सात जन्मांसाठी मला
ह्या जन्माचा, का तुला तमाशा माहीत नाही

इच्छेच्या ओंजळीत, का जमवतेस आशेची फुले
नशीबाला पडलेल्या भोकांची, दशा माहीत नाही

मी कधी घेतली, पाय कधी पडले वाकडे
रस्ताच नव्हता सरळ, मला नशा माहीत नाही

मृत्यु तूही का, नेहमीच लपंडाव खेळतोस
माझ्या जिवनाची, तुला दुर्दशा माहीत नाही

माझ्या दु:खावर, जग सांडी मुक्त हास्य फुले
वेदनांची कोणालाच, का इथे भाषा माहीत नाही


@सनिल पांगे
तुम्ही पण कमाल करता यार!
प्रेमाच्या गोष्टी करता यार?

प्रेम on-line खुलते आजकाल
ह्रिदयामधे जपता यार?

scrap,sms हे प्रेमाचे बोल
डोळ्यांची भाषा बोलता यार?

प्रत्येक Forum वर एक मैत्रीण.
एकाच अबोली साठी झुरता यार?

messages आणि chat सोडून
बाहेर भटकायच म्हणता यार?

Blogs वाचायचे मिळतिल ते
तुम्ही पुस्तके वाचता यार?

Community मधे रमायचे आता
चौकात गप्पा मारता यार?

धावायचे सोडून जगासोबत
स्वप्नां मधे रमता यार?

ह्रिदयात जागा मागता यार?
अरे!कोणत्या जगात जगता यार?

Monday, August 13, 2007

कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे
दु:खाला विसरून सुखाला आणणार आहे

आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे







मनापासून प्रेम फ़क्त मीच करत होतो

तुला जगता यावे यासाठी फ़क्त मीच मरत होतो

माझ्या प्रेमाची कदर तुला कधीच कळली नाहि

कारण तुझ्या हृदयाची जागा कधीच खाली झाली नाहि
पण मी आनंदी राहू शकतो हेच तुला दिसणार आहे
कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे






तुला मी नको फ़क्त पैसा नी आराम हवा होता

तुला मी हेही दिले असते मला फ़क्त जरासा वेळ हवा होता
तुला हे सर्व मिळाले असेल पण मी नाहि मिळणार
कारण प्रेम म्हणजे काय तुला कधीच नाही कळणार
मी किती मजेत आहे हे सर्व जग बघणार आहे

कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे, नक्की जगणार आहे

-- प्रेम
http://premkar.multiply.com/journal
!!! तू फक्त हो म्हण !!!
(आपल्या संसारात अचानक आलेल्या प्रेयसीला एक प्रेमळ विनंती )

"आलीच आहेस तर,
रहा चार पाच दिवस पाहुण्यासारखी,
माझी दूरची नातेवाईक म्हणून.
पण चुकूनही माझ्याकडे त्या नजरेने पाहू नकोस,
कि जिच्याने काळजात कालवाकालव होते
आजही.


कर चौकशी आस्थेने
तिच्या दागिन्यांची,वैभवाची.
तिला आवडते ती.....
ती दाखवेल तुला सारं-सारं माझं ऐश्वर्य ?? ???

माझ्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम बघताना,
त्यातल्या माझ्या फोटोकडे
उसासे सोडत जास्त वेळ बघू नको.
तसेच तिच्याशी गप्पा मारताना
उगीच माझ्याकडे बघून हसू नको.
ती मुर्ख नाहिये सीरीयल्समधल्या हिरोईन इतकी.

घरभर फिरताना,
तुला 'ती' माझीही खोली दिसेल.
सांभाळ पावलांना,
आगतिक होतील कदाचित
तिच्या कलाने घे..

लाफ्टवरच्या कोपरयात एक लोखंडी पेटी दिसेल.
ती उघडून पाहण्याचा आग्रह् धरु नकोस.
तिच्या द्रूष्टीने अडगळ असलेल्या पेटीला परवाच तीने एका भंगारवाल्याला
द्यायचं ठरवलय...
काही नाही..
तीत तूझेच 'देणे' अन् माझे 'घेणे' जपले होते आजवर......

जशी आली
तशी जाशील,
हो जाच तु......

पण क्रुपा करुन
महत्प्रयासाने शान्त झालेल्या
माझ्या तळ्यात
तेवढा दगड मात्र टाकू नकोस,
तुला आपल्यात नसलेल्या नात्याची
व असलेल्या ॠणानुबन्धाची शपथ...."

----अरुण नंदन
http://arunnandan.multiply.com/journal


हात तुझा हातात आला... सोडणे राहुन गेले
बोलले डोळे असे की... बोलणे राहुन गेले

चोरट्या पायांसवे तू... निद्रेत माझे ओठ होते
टेकले हलके असे की... जागणे राहुन गेले

बाहुत या माझ्या अशा... ती तुझी निद्रिस्त काया
उठशील तू मग या भितीने... स्पंदणे राहुन गेले

तो तुझा उपवास होता... विरहात जो माझ्या मनाला
सोडणे उपवास जेव्हा... पारणे राहुन गेले

त्या तुझ्या स्पर्शात होती... सौदामिनी ती खेळणारी
झेलली ओठांवरी अन... हालणे राहुन गेले

ऐकल्या गीतांपरी... उरातल्या त्या हालचाली
स्पंदनांना पण तुझ्या... स्पर्शणे राहुन गेले

-- समीक्षा
प्रेमाचा रिंगटोन!

माझ्या आठवणींनी तुझं हृदय
व्हायब्रेट होत राहू दे
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

दूर सखे माझ्यापासून
गेलीस तरी चालेल
बरेच दिवस मला तू
भेटली नाहीस तरी चालेल
पण जाशील तिथे माझ्या आठवणींचं
नेटवर्क कव्हरेज असू दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

अन सखे एकटीच तू
निजशीलही कधी कधी
मी नसलेली उजाड स्वप्नं
बघशीलही कधी कधी
पण पापण्या उघडताच तुझ्या डोळ्यांत,
माझाच मिस्ड कॉल दिसू दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

दूर दूर राहून असं
थकुन जाशील तू सखे
वणवण सारी सारी करून
विझून जाशील तू सखे
अशावेळी मला भेटून
तुझी बटरी रीचार्ज होऊ दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

जमेल तसं प्रेम आपलं
कॉप अप करता यायला हवं
झीरो बलन्स झाला तरी
मोकळं बोलता यायला हवं
मोकळं बोलून, कॉप अप करून
प्रेम 'मोबाईल' राहू दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

-
निळ्या नभातुन बरसेल श्रावण
उन-पावसाचा खेळ करेल श्रावण
तहानलेल्या या धरतीला
धुंद सरींचा घोट पाजेल श्रावण

तना-मनास चिंब भिजवेल श्रावण
शब्दांची धुंद-तार छेडेल श्रावण
मस्त हवेच्या मौसमाने
या मनास मुक्तछंद लावेल श्रावण

हर्ष-उल्हास देईल श्रावण
फ़ुलण्याची नवी आस होईल श्रावण
हिरव्या नवलाईच्या शालुने
आज या धरणीस सजवेल श्रावण

ह्रुदयातली आग विझवेल श्रावण
प्रेमळ सरींनी भिजवेल श्रावण
काल नयनातुन बरसणा-या थेंबाला
आज नभातुन बरसवेल श्रावण

श्रावणाच्या हार्दीक शुभेछ्चा.....

सचिन काकडे
ऑगस्ट १३,२००७

आनंदात राया
दंग झाली काया
पुढे मागे माया
नुरली काही

कशाचा कशाला
मेळ ना राहीला
आतंकात गेला
जन्म अर्धा

बघती हे डोळे
स्वप्नांची वारुळे
फ़ुत्कारही काळे
सुस्तावले

कोणापुढे गावे
काय मी मागावे
कसे ते सांगावे
खुळे पण

मन म्हणे आता
नेमेचीच चिंता
रचुनिया चिता
निद्रा घ्यावी

- सुनिल सामंत
०१।०५।२००७