आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Saturday, October 24, 2009

धुंद किनारी रेतीच्या खोप्यात


धुंद किनारी रेतीच्या खोप्यात
घरटे दोघांचे,नक्षीच्या रंगात
रंगात रंगुन मनातल्या मनात
हात घेऊनी तुझा हातात

क्षितीज भेटते लाल रंगात
लाली चढली तुझ्या गालात
मीच तुझा सये राजस
भरेल लाली तुझ्या भांगात

लहरी समुद्र लहरी वारा
उड्वतो बघ तुझ्या पदरा
चंद्रमा उतरला निळ्या पाण्यात
माझा चाँद माझ्या पुढ्यात

वारा वाहतो किती झोकात
उड्वी कुंतले तुझे नभात
खारया पाण्याचा खाराच स्पर्ष
तुला भेटता होतो गं हर्ष

फ़ेसाळल्या समुद्राच्या लहरी लाटा
तुला बोलावीत उंडारतात नभा
माझ्या मनाचा मोर पिसारा
तुलाच शोधती मनाच्या वाटा

कवी : कल्पी जोशी 
स्त्रोत : विरोप 

इंग्रजी भाषेचा विजय - सलील कुळकर्णी

आज इंग्रजी भाषा ही जगातील अत्यंत प्रगत भाषांपैकी एक आहे. इंग्लडसारख्या एका चिमुकल्या देशात जन्मलेल्या या भाषेची एकेकाळी त्याच देशात किती दयनीय परिस्थिती होती आणि इंग्रजांनी जिद्दीने कशा प्रकारे तिचे पुनरुत्थान केले याचा मागोवा घेणे सुरस ठरेल.

मध्यंतरी माजी पंतप्रधान श्री० अटल बिहारी वाजपेयी यांनी १९६७ साली लोकसभेत केलेल्या एका भाषणासंबंधीचा लेख मला वाचायला मिळाला. चारशे-पाचशे वर्षांपूर्वी इंग्रजी भाषा अत्यंत मागासलेली होती आणि खुद्द इंग्लंडमध्येसुद्धा लोकांना इंग्रजीबद्दल आत्यंतिक न्यूनगंड वाटत होता. पण शेवटी सतराव्या शतकाच्या मध्याला जनमताच्या रेट्याला मान देऊन इंग्रज सरकारने निश्चयाने कायदे करून इंग्रजी भाषेला स्वतःच्या देशात हक्काचे आणि वैभवाचे स्थान कसे मिळवून दिले याची माहिती वाजपेयींनी लोकसभेत सांगितली आणि तशा प्रकारे वैभव मिळवणे भारतीय भाषांनासुद्धा कठीण नाही असे त्यांनी प्रतिपादन केले. तो लेख वाचून माझी जिज्ञासा जागृत झाली व मी या विषयी अधिक माहिती महाजालावरील विकिपीडिया सारखी संकेतस्थळे व वाजपेयींनी उल्लेख केलेला संदर्भग्रंथ यांमधून मिळवली. सर्व माहिती संकलित केल्यावर एक 'सुरस आणि विस्मयकारी' कथा हाती लागलीतीच पुढे देत आहे.

संपूर्ण लेख इथे उपलब्ध आहे....

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=13091:2009-10-03-18-36-31&catid=195:2009-08-14-03-11-12&Itemid=206


कळावे,
आनंद काळे 


सुखं वा यदि दुःखं, प्रियं वा यदि अप्रियं
प्राप्तं प्राप्तं उपासिते. हृदयेन अपरजितः

http://labs.google.co.in/smschannels/subscribe/AnandKshan
http://groups.google.com/group/anandkshan
http://tavalaki.blogspot.com

Friday, October 23, 2009

मराठीतून बोल


मला ही कविता एका विरोपामधून माझ्या गूगलच्या "आनंदक्षण" ग्रुप वर आली आणि वाचताच ग्रुपवर एक नियम लादला.
यापुढे सर्वांनी ग्रुपवर मराठीमध्ये बोलायच आणि याचा सगळ्यान्नि स्वीकार केला. 
जर या पोस्टने एखादा जरी मराठी मधून बोलू लागला तर सार्थकी लागेल ही पोस्ट.

इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल 
मराठी मानसा आता तरी तू मराठीतून बोल...

इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास...

प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते हेंबाड्या
अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या...

माय झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड...

भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका 
मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका...

मराठी इसरत चालल शाळेतले शिक्षण 
मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण...

ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा...

सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी
मराठीतूनच बोला सारे मराठी रक्षणासाठी...!!!

कवी : अद्न्यात 
स्त्रोत: विरोप