आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, September 14, 2007

प्रेमाचे चार ऋतू

वसंत -
वसंतातल्या पालवी-कळ्या
मोठ्या खट्याळ असतात छकुल्या
आसुसलेल्या डोळ्यांना, दडून,
हळूच आडून करतात वाकुल्या
-*-

- ग्रीष्म -
व्याकूळ दुपारची ऊन झुळूक
तहानेला करते त्राही त्राही
तोकड्या ओळींची तुझी चिठ्ठी
तळमळ करते लाही लाही
-*-

- हेमंत -
शिशिराच्या शिवेवर जर्द झाडं
फारच दिलदार नाही वाटत?
शिलंगणाचं सोनं काही
दसऱ्यालाच नाही वाटत
-*-

- शिशिर -
परवा पडलेला शुभ्र बर्फ
आज कसा दिसतो रटाळ
प्रेम संपता पत्रामधला
मजकूर जसा दिसतो गचाळ

योगदान : रेशमा


No comments: