आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे

बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, September 30, 2009

विनोदी विनोद

एक प्रवासी बसमधून प्रवास करताना समोरच्या प्रवाशाकडे बघून हसला.
समोरच्या प्रवाशाने हसण्याचे कारण विचारताच पहिल्या प्रवाशाने सांगितले की, ''एक मिशा सोडल्या तर तू अगदी माझ्या बायकोसारखा दिसतोस.''
त्यावर दुसरा प्रवासी चिडून म्हणाला, ''पण मला मिशा नाहीयेत.''
त्यावर पहिला प्रवासी हसून म्हणाला, ''पण माझ्या बायकोला आहेत ना.''

************************************************************************************************************************************
सुपे गुरुजी : गण्या, थांब तुझ्या पालकांनाच बोलावून लावतो कसा. अभ्यासात शून्य आणि मी इतका जीव तोडून शिकवतोय तर तुझं सगळं लक्ष खिडकीबाहेर.
हे काय चालायचं नाही. तुझ्यासारख्या मुलांच्या ठायी शिक्षक काय सांगतायत ते नम्रपणे ऐकून घ्यायची वृत्ती, शिकून घेण्याची आस असायला हवी. काय समजलास?
गण्या : माफ करा गुरुजी.
सुपे गुरुजी : अरे शिंचा, मी ओरडतो ते तुमच्या भल्यासाठीच ना? कायम लक्षात ठेव, 'विद्या विनयेन शोभते,' काय समजलास?
गण्या : समजलं गुरुजी!
सुपे गुरुजी : मला सांग बघू तू या शिक्षण संस्थेत कशासाठी येतोस बरं?
गण्या : विद्येसाठीच की!
सुपे गुरुजी : शाब्बास. मग मी शिकवत असताना बाहेर का बरं बघत होतास तू?
गण्या : गुरुजी विद्या अजून आली नाहीय शाळेत ना. म्हणून तिचीच वाट बघत होतो.
************************************************************************************************************************************
संता बस स्टॉपवर उभा होता. एक मोटरसायकलस्वार त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले, ''तुम्हाला लिफ्ट हवी आहे का?''
संता म्हणाला, ''नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!!!!!''
************************************************************************************************************************************
चार मुंग्या पोहत असतात.
तीन जणी नीट पोहत असतात.
एक मुंगी मात्र हात वर करून पोहत असते.
का?
कारण तिचं घड्याळ वॉटरप्रूफ नसतं!!!!!
************************************************************************************************************************************
१९७५ साली बंगलोर-म्हैसूर रस्त्यावरच्या एका डोंगराजवळ तीन पक्षी उडत चालले होते...
अचानक ते रक्तबंबाळ होऊन कोसळले...
का?
अरे आठवा...
गब्बरसिंगने 'तीनो बच गये' म्हणत हवेत तीन गोळ्या नव्हत्या का झाडल्या?!!!!!
************************************************************************************************************************************
दोन झुरळे आयसीसीयूमध्ये अॅडमिट होती.
पहिल्या झुरळाने दुस-याला मोठ्या कष्टाने विचारले, ''काय खाल्लेस? बेगॉन स्प्रे?''
दुसरे त्याहून कष्टाने उत्तरले, ''नाही... चप्पल!!!!!''
************************************************************************************************************************************
बन्या शेवटी एकदाचा अमेकिकेच्या टूरवरून परत आला.
आल्या आल्या स्वत:ला आरशात न्याहाळत त्यांनी बायकोला विचारलं, काय गं, मी फॉरेनरसारखा दिसतोय का?
बनी भातखंडे : छे बुवा!
बन्या : अरे? असं कसं? मला तर तिथे रस्त्यात दोघा चौघा अमेरिकन माणसांनी थांबवून विचारलं की, आर यू फॉरेनर?
************************************************************************************************************************************
बसमध्ये तुडुंब गर्दी होती. विन्या प्रधान एका सीटवर बाहेरच्या बाजूला चेमटून बसला होता.
त्याच्याशेजारी सत्तरीच्या घरातली फ्रेनीआजी उभी होती. तिने विन्याच्या खांद्यावर टकटक केले, तेव्हा विन्याला झोपेचे नाटक सोडून तिच्याकडे पाहावेच लागले.
तिने त्याच्या हातात चार बदाम ठेवले आणि म्हणाली, ''खा बाळा, खा!'' विन्याने चवीचवीने बदाम खाल्ले आणि पुन्हा त्याचा 'डोळा लागला'.
पुन्हा खांद्यावर टकटक झाल्यावरच तो उघडला.
फ्रेनीआजीने पुन्हा त्याच्या हातात चार बदाम ठेवले आणि म्हणाली, ''खा बाळा, खा! तब्येतीला चांगले असतात बदाम.'' विन्याने पुन्हा बदाम मटकावले.
असं आणखी दोनदा झाल्यावर विन्या म्हणाला, ''अहो आजी, असे बदाम वाटत का फिरताय? तुम्ही का नाही खात ते?''
तोंडाचं बोळकं रूंदावत फ्रेनीआजी म्हणाली, ''दात पडले माझे सगळे बाळा! चावणार कशी बदाम?''
'' अहो पण तुम्ही खाऊ शकत नसताना महागडे बदाम विकत घेता कशाला?''
हातातला बदामाच्या चॉकलेटांचा पुडा नाचवत आजी निरागसपणे म्हणाली, ''त्यांच्याभोवतीचं चॉकलेट तर चघळता येतंच ना मला!!!!!!!''

Cheers,

An@nd K@le
सुखं वा यदि दुःखं, प्रियं वा यदि अप्रियं
प्राप्तं प्राप्तं उपासिते. हृदयेन अपरजितः