आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, July 06, 2007

"चकवा"

हरवलो असा मी कसा,
कुठेच काही मागमुस का नाही??
शोधतो वाट चाललो ती,
कुठेच एकही पाऊलखुण का नाही??

क्षितिजावर रक्ताळ शाई जरी,
कुठेच मावळतीचा भाव का नाही??
छाताडावर वेदनांचा नाच तो,
कुठेच ताजा घाव का नाही??

एकटाच उरलो रणावरी,
कुठेच जिंकण्याचा उन्माद का नाही??
जिवंतच जळतो सरणावरी,
कुठेच पावसाचा उच्छाद का नाही??

मागण्याचा हट्ट पुराणा,
कुठेच देणारा कर्ण का नाही??
लुबाडण्याचा नाद आजन्म,
कुठेच स्वार्थ पुर्ण का नाही??

काळाकुट्ट काळोख रात्रीचा,
कुठेच कसा काजवा का नाही??
पुन्हा एकदा हरवुदे मला,
कुठेच कसा चकवा का नाही??

-निलेश
पावसाच्या मनातलं मला काही कळत नाही..
तो बरसतोय अन तिची आठवण काही सरत नाही..

त्याला म्हटलं, टळ की लेका,त्रास का देतोस
तुझी रिमझिम तिची चाहूल काही विसरू देत नाही

तो वाफ़ाळता कप, त्या खिडकीतल्या गप्पा
ते ओलेचिंब भिजणे,डोळ्यांना काही हसू देत नाही

म्हणतो आता जादू बघ, अन हसला गडगडाटी
दारावर टकटक झालं अन पाहतॊ तर ती उभी होती
हसली खुदकन अन ओलेतीच येउन बिलगली
आणि ओढतच मला पावसात घेउन गेली

हं, खरंच पावसाचं मला काही कळत नाही
तो सरलाय आता पण तो क्षण काही सरत नाही

Thursday, July 05, 2007

आवडेल मलाही पाऊस व्हायला...

आवडेल मलाही पाऊस व्हायला...
न सांगता तुझ्या भेटीला यायला...
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला...
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला...
अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला...
आवडेल मलाही पाऊस व्हायला...

आवडेल मलाही पाऊस व्हायला...
गंध होऊनी श्‍वासात तुझ्या मिसळायला...
श्‍वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला...

काळ्या ढगांमधून पळून यायला...
अलगद तुझ्या कुशीत शिरायला...
आवडेल मलाही पाऊस व्हायला...

आवडेल मलाही पाऊस व्हायला...
नकळत हृदयात तुझ्या शिरायला...
हृदयात मेणाचं एक खोपडं बांधायला..

तुझ्या स्वप्नात येऊन तुला जागवायला..
काळजाचा तुझ्या वेध घ्यायला...
आवडेल मलाही पाऊस व्हायला...

आवडेल मलाही पाऊस व्हायला...
हातात हात घालून तुझ्या रानोमाळ हिंडायला...
पंखात तुला घेऊन भरारी घ्यायला...

आठवण बनून तुझ्या डोळ्यात उतरायला...
अश्रूंमध्ये आनंदाची साखर मिसळायला...
आवडेल मलाही पाऊस व्हायला...

आवडेल मलाही पाऊस व्हायला...
एकट्या मनाची सोबत करायला...
कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला...

भाळशील का तू माझ्या या रुपाला
सांग ना जमेल का तुला साथ द्यायला...
तरच आवडेल मला पाऊस व्हायला...
शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी ... वांग्याचे भरीत ...गणपती बाप्पा मोरया ची मुक्त आरोळी.
केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ...
मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी...दुस-याचा पाय चुकून
लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार...दिव्या दिव्या दिपत्कार...
आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेंव्हा लहानमोठी होणारी शेपटी...
दस-याला वाटायची आपट्याची पाने... पंढरपुरचे धुळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफ़ुटाणे...सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श...
कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तसा हया अदृश्य
पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो.
कुणाला देशी मडक्याचा आकार येतो। कुणाला विदेशी कपबशीचा......पु.ल.

गोरी गोरी पान, पैसेवाली छान
दादा मला एक वहिनी आण

वहिनीला आणायाला घेऊ या रे हुंडा
ऑफीसला जायला तुला नवी होंडा
डिग्रीची अपुल्या मनी ठेव जाण
दादा मला एक वहिनी आण

वहिनी अशी आण जशी कुबेराची मुलगी
कायमची राहो तिची पैशाशी सलगी
स्वाभिमान जरी तुझा पडला गहाण
दादा मला एक वहिनी आण

कधीपासून करायचा आहे तुला धंदा
पैसेवाला सासरा रे मग कसला वांधा ?
सासऱ्याच्या बोलण्याला डोलव रे मान
दादा मला एक वहिनी आण

सारं काही कर परी एक रे विनंती
आई-बापाची तरी जाण ठेव अंती
नाही तर बायको तुझी होईल वरताण
दादा मला एक वहिनी आण

सोनंचांदी, पैसाअडका हेच का रे सारं ?
माणसांच्या प्रेमातच सुख आहे खरं !
घेऊ नको मनावर शब्दांचे बाण
दादा मला एक वहिनी आण

गोरी गोरी पान, फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण !

मुनाभाय फाइव्हस्टार हॉटेलमध्ये पहिल्यांदाच गेला. वेटरने अदबीने येऊन विचारले, ''व्हॉट वुड यू लाइक टु हॅव सर... फ्रुट ज्युस, चहा, चॉकोलेट, मिलो की कॉफी!

मुन्नाभाय : एक चाय ला ना भाय!

वेटर : कोणता चहा? सिलोन टी, हर्बल, बुश टी, हनी बुश टी, आइस टी की ग्रीन टी?

मुन्ना : वो तू पहला नाम बोला वोइच ला... सिलोन टी

वेटर : ब्लॅक की व्हाइट?

मुन्ना : व्हाइट ही दे दे.

वेटर : दूध, व्हाइटनर की कंडेन्स्ड मिल्क

मुन्ना : अरे यार, दूधही डाल फस्क्लास!

वेटर : बकरीचं दूध, उंटाचं दूध, म्हशीचं दूध की गाईचं दूध?

मुन्ना : भैंस का दूध डाल यार.

वेटर : जाफराबादी म्हशीचं की गावठी म्हशीचं?

मुन्ना : तेरे को जो अच्छी लगती है, उस का डाल दे.

वेटर : साखर घालू की स्वीटनर की मध?

मुन्ना : शक्कर डाल.

वेटर : बीट शुगर की केन शुगर?

मुन्ना : गन्ने का शक्कर डाल भाय.

वेटर : व्हाइट शुगर, ब्राऊन शुगर की यलो शुगर?

मुन्ना (कातावून) : अरे यार! चाय रहने दे तेरा. एक गिलास ठंडा पानी पिला बस.

वेटर : मिनरल वॉटर की साधं पाणी?

( मुन्ना बेशुद्ध पडला!)
:::: आज मला हा प्रश्न का? ::::

सरळ सोप्या जीवनात आपल्या
निर्माण झाला हा गुन्ता का?
खेळणारा तर वर बसलाय...
मग आपल्या हाती सोंगट्या का?

प्राजक्ताच्या नाजुक नात्याला ...
प्रेमाचे हे कुंपण का?..
कुरवाळले मी ज्या मनाला....
कोमेजलेले आज पाहते का?......

भरुन आलाय "मेघ" जरी....
अबोल माझी घुसमट का?..
घाव तुझ्यावर घालते तरी....
ह्रुदयी माझ्या यातना का?..

दुर कुणी वाट पाहतेय.......
माझ्यासाठी तु थांबलास का?..
समजु शकते तुझे दुःख...
तु अन मी ,वेगळे का?...

शेवटी इतकेच विचारते....

शहाणे अंतर होते अपुले..
असेच नेहमी राहील का?..
निरपेक्ष सुंदर मैत्रीची...
साथ नेहमी देशील का?

:::: आज मला हा प्रश्न का? ::::

काय सांगु माझ्या बद्दल ?

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
पानात पडेल ते खाल्ल्या शिवाय
पोटच आमच भरत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करतोय
पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत

पाउसच सांगेल कदाचित...........................>
.खुपदा विचार छळतोः पाउस कधी कधी माणसासारखा का वागतो?
खुपदा हैराण होतोः पाउस मधेच मंबाजी सारखा का वागतो

कधी वाटते,पाउस दुःखाच्या डोळ्यातील आसवांची वाणी आहे
कधी वाटते,कवींच्या काळजांची ती रडणारी कहाणी आहे

खुपदा उदास होतो,पाउस वाढता अंधार वाहुन नेत नाही म्हणुन
खुपदा होतो डोळ्यांचाच पावसाळा रुसलेला पावसळा येत नाही म्हणुन....

खुपदा वाटते मातीलाच पुसावी आपली आणी पावसाची व्य़ंजक नाती...
खुपदा उत्तरेच वाहुन नेतो पाउस,फ़क्त प्रश्न ठेवतो आपल्या हाती

पावसाच्या कुशीतुन झाडांसोबत आपणही दुनियेत येतो
उधाणुन येणारया गाण्यात पावसाचाच आशय हेतावता असता

खुपदा कळत नाही आपण खुपदा पावसासारखेच का वागतो?
पाउसच सांगेल कदाचित,खुपदा आपण भरती का होतो...ओहोटी का होतो


गांधारी-
कोण म्हणतं ?
दुःखाची परिसीमा
म्हणजे मरण आहे,
मी तर म्हणेन,
स्वतःतून स्वतःच हरवणं
आणि स्वतःच कलेवर
आयुष्यभर वागवणं,
यासारखं दुःख नाही,
डोळे बांधून नावडतं जग
आपलसं करणं आणि
आवडतं सारं स्वप्नात जगणं,
गांधारीसारखं यासारखं दुःख नाही,
हो आणि डोळ्यांना पट्टी बांधली तरी कोण म्हणतं,
गांधारीला स्वप्न पडत नव्हतं।

हो आहोत आम्ही कवि....
हो आहोत आम्ही कवि.....
डोळे वेगळे नाहित आमचे,
दृष्टी वेगळी आहे.
विरंह आणि प्रेमावर लिहितो पण तरीही जाण सगळी आहे
आईबापावर लिहायला आम्हालाही आवडतं आणि जमतं.
पण काय करणार, हे वयंच असं आहे की मन प्रेयसी नि प्रियकरामधे जरा जास्त रमतं.
तिच्यासाठी चंद्रतारे तोडण्याची भाषा करतो आम्ही
आमच्या कवितेतही तिच्याच आठवणीत झुरतो आम्ही
आणि एक दिवस मग त्या नभीच्या ग्रहताऱ्यांशी वैर धरतो आम्ही.
मग मात्र अचानक चंद्रग्रहणावर कविता करतो आम्ही.
माहित्येय अशक्य आहे चंद्र तारे वगैरे तोडणं.
अरे पण आहे ना शक्य, एकंच भावना अनुभवणाऱ्या असंख्य लोकांची मनं एकाच कवितेनं जोडणं.
हां.... पण मान्य आहे मला.... कुठेतरी आम्ही कविही चुकीचा मार्ग धरतो.
एकाच नात्यात गुरफटून आम्ही बाकीच्या नातेसंबंधांवर दुर्लक्ष थोडं करतो.
पण जास्त वेळ नाही, हा प्रकार थोडा काळंच टिकतो.
अशा प्रिय-अप्रिय अनुभवातुनंच तर कवि कविता करायला शिकतो.
प्रेयसीच्या विरहांत झुरणारा हाच कवि, तू परत येऊ नको हे त्याच्याच एखाद्या कवितेतून सांगतो.
तिच्या बाहुपाशांत स्वर्गसुख मानणारा, पंचविशी ओलांडली तरीही आईबापाच्या कुशीत जाण्यासाठी रांगतो.
देश, मित्रमैत्रीणी, कॉलेज, कट्टा, करियर नि सामाजिक विषयावरही तो कविता करायला चुकत नाही.
कविचं सोडा हो, पण कुठलाच माणूस चूकल्याशिवाय एखादी गोष्ट करायला शिकत नाही!!!!

कुणाल.
एवढंच फ़क्त सांगुन जा...
मला अजुनहि कळत नाही
मी का शोधते आहे तुला
जर तुच मार्ग बदललेस
तर दिसणार तरी कसा मला?

आज सुद्धा ऒफ़िस ला जाताना
स्टेशनांसारखं आयुश्य सरकत होतं
काय चुक काय बरोबर
ह्याचं अवलोकन चालू होतं

सगळ्याच घटना येत होत्या
वेगाने डोळ्यासमोर
आणि आपण ह्यात नक्की कुठे??
विचरांचं वारुळ मनावर

दरोजचा प्रवास संपला
पण वारुळ मात्र तसच राहीलं
वाट पाहुन पाहुन शेवटी
डोळ्यातलं पाणी सुद्धा आटल

आता पुढे काय???
ह्याचं उत्तर मिळेना
परत येणार आहेस का?
एवढंच फ़क्त सांगुन जा...

एवढंच फ़क्त सांगुन जा...

थोडसच सईसाठी......

अत्तरच झालय आयुष्य माझ
तुझ्यासाठी दरवळायच,
जरी कबुल केल नाही
कि तु मला कुरवळायच.

पुन्हा सईचा

पुन्हा पावसाचे स्वर दाटतात
पुन्हा सरिन्चे गुणगुणने होते,
चिम्ब भिजलेल्या स्पन्दनान्साठी
पुन्हा सईचे गाणे होते.

सईचा......


काही क्षण स्पन्दनाला
सई लळा लावुनिया गेली,
मोहरलेल्या शब्दान्ना माझ्या
तिचा मोहळ सुगन्ध देऊन गेली

सईचा..........

अजुन काहिसे बोल सईचे
मनात सारखे घुमून येतात,
मग एकान्तातले बरेच क्षण
त्या बोलाशी रमून जातात.

सईचा.........

उद्या पुन्हा सई भेटेल
पुन्हा तिच्याशी बोलावस वाटेल,
तिचे बोल ऐकता ऐकता
तिच्या ओठावर चित्ताचे बिम्ब दाटेल

सईचा.........


सई बोलत राहते, बोलत राहते
मन मुक होऊन ऐकत राहत,
तिच्या ओठावरल्या पाकळीवर
माझ चित्त थेम्ब होऊन विसावुन जात.

सईचा..........


झाली भेट सईची
आता निघायच आहे,
पुन्हा वळुन पाहील काय?
थाम्बुन एकदा बघायच आहे

सईचा.........

-- दीपक
पायाखालुन अलगद सरकत जाणारी वाळू
किंवा त्या वाळूचा हात धरून
तिला ओढत नेणारी लबाड लाट
यातलं नेमक आपलं कोण ?
लाट किंवा वाळू
किंवा मग याही पलीकडे
आपल्या तिघांचा खेळ बघणारा समुद्र नक्की कोण
या खेळाचा पंचच जणू..
बाकी खरं काही असो.
पायाखालून सरकत जाणाऱ्या वाळूचा स्पर्श मात्र
तिच्या पहिल्या स्पर्शासारखाच अगदी नाजुक
आणि हवाहवासा वाटणारा..


संतोष (कवितेतला)
कविता करायला प्रेमात
पडावंच लागतं असं नाही
गुलाबाचा वास घ्यायला ते
खुडावंच लागतं असं नाही

मी जे बोलतोय ते तुम्हांस
कदाचित खरं वाटत असावं
मलासुद्धा हे असंच बोलणं
थोडसं बरं वाटत असावं

तरीसुद्धा सांगतो असं नसतं
असं कधीच होत नाही
पाखरू बनल्याशिवाय आपणांस
उडता कधीच येत नाही

माझ्यासारखे काही जण मग
कवितेसोबतच जगतात
प्रेमात हरल्यावरही काही जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर पूर्णपणेच
वेड्यासारखं वागतात

Wednesday, July 04, 2007

आलिया भोगासी -

"जा आतं, डॉक्टरांनी बोलावलय."

अतिशय सुतकी अशा वातावरणाच्या डॉक्टरांच्या केबिनबाहेरच्या जागेत बसलेलं असताना आपल्याला हाक ऐकू येते। डॉक्टरांच्या केबिनबाहेरची जागा ही तिथे आलेल्या कोणत्याही व्यक्तिला चुकुनही प्रसन्न वाटू नये याची तंतोतंत काळजी घेऊन बनवलेली असते. तिथे नेहमी उदास-भकास असं वातावरण असतं. जागोजागी "शांतता राखा", "कृपया पादत्राणे येथे काढावी", "खुर्चीत बसण्याची योग्य पद्धत" असे कुठली ना कुठली शिस्त शिकवणारे फलक लावलेले असतात. उजेड, हवा असल्या गोष्टी तर निषिद्धच असतात. प्रकाशापेक्षा अंधाराची जाणिव करुन देणारे मंद असे दिवे असतात. वाचायला म्हणुन चार एक वर्षापूर्वीचे काही मासिकांचे अंक असतात. आपण जर १-२ वेळा आधी पण त्याच डॉक्टरकडे गेलो असलो तर ते सगळं आपलं आधिच वाचुन झालेलं असतं. त्याला कंटाळुन आपण इतरत्र भिंतीवर लावलेली पत्रकं जर वाचायला गेलो तर त्यावर कुठल्या कुठल्या महाभयंकर रोगांची "ठळक" लक्षणं लिहीलेली असतात. आजुबाजुच्या उदास वातावरणामुळे त्यातली काही लक्षणं आपल्याला झाली आहेत असं उगाचच आपल्याला वाटायला लागतं. अहो अशा ठिकाणी आजारी तर सोडाच, त्याला घेउन आलेल्या धडधाकट माणसालाही आपल्याला काहीतरी झालं आहे असं वाटायला लागतं. किंबहुना ही पत्रकं लावण्यामागे अजुन काही पेशंट मिळवण्याचं षङयंत्र असावं अशी माझी आपली एक शंका आहे. हे सगळं तर केबिनच्या बाहेर, केबिनच्या आत गेल्यावर कोणत्या दिव्यांतुन जावं लागेल हे मात्र आत कोणत्या प्रकारचा डॉक्टर आहे यावर अवलंबुन असतं.

आपण जर "जनरल फिजिशीयन" असं संबोधल्या जाणार्या व्यक्तिकडे गेलो तर त्यांचं वर्तन एखाद्या सरावलेल्या भटजीसारखं असतं. ठरलेले सोपस्कार पार पडल्याशिवाय ते मुख्य गोष्टीकडे वळतंच नाहीत. भटजी जसे कोणतंही कार्य असलं तरी चौरंग, तांब्या, नारळ, सुपारी, विड्याची पानं याची मनासारखी रचना केल्याशिवाय मुख्या कार्याकडे वळत नाहीत तसेच हे डॉक्टर. त्यांच्याकडे जाउन आपण सांगितलं की "डॉक्टर, जरा गुडघा दुखतो आहे."
आपल्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करुन त्यांचं सुरु होतं ...
"बसा. जीभ बघु (!!). मोठ्ठा आ करा थोडा अजुन. हं .. डोळे पाहू."
"अहो पण तो गुडघा .." आपण क्षीण आवाजात अजुन एकदा प्रयत्न केला तरी डॉक्टरांना ते ऐकू जात नाही कारण तोपर्यंत त्यांनी कानात स्टथोस्कोप घातलेला असतो. तो स्टथोस्कोप आपल्या पोटावर लावुन "श्वास घ्या....सोडा...परत घ्या.....मोठ्याने घ्या जरा" असे प्राणायामाचे धडे आपल्याला दिले जातात. पोटाने त्यांचं समाधान झालं नाही तर पाठीवर पुन्हा तेच. मग एक हात आपल्या पोटावर ठेवुन दुसर्या हाताने त्यावर गुद्दा मारुन काहीतरी ऐकल्यासारखं करतात. असं २-३ ठिकाणी करतात. या क्रियेतुन काय साध्य होतं ते मला आजतागायत कळलेलं नाही. त्यानंतर मग दोन्ही हातांनी आपलं पोट दाबुन घुसळल्यासारखं करतात "इथं दुखतंय ? ... इथं ?" असं विचारतात. पूर्वी एवढ्यावर सुटका व्हायची. आजकाल बी.पी. मोजायची पण फॅशन आहे. हे सगळं मनासारखं करुन झालं की मग विचारतात,
"हं, काय होतंय तुम्हाला?"
हे सुसह्यच म्हणावं लागेल, कारण हे डॉक्टर फक्त हात आणि स्टथोस्कोप या दोनच अवजारांचा वापर करतात। याउलट आपण जर डोळ्याच्या डॉक्टर कडे गेलो तर ते बाकी काहीही संभाषण न करता आधी आपल्या डोळ्यावर टॉर्च मारतात. आता मला सांगा, कोणाच्या डोळ्यावर टॉर्च मारणे हे किती असभ्य वर्तन मानलं जातं? पण इथे असं करण्यासाठीच आपण त्यांना पैसे देतो ! त्यानंतर औषधाच्या नावाखाली आपल्या डोळ्यात २-३ गार पाण्याचे थेंब टाकुन आपल्याला डोळे बंद करुन बसायला सांगतात. त्याने म्हणे डोळे स्वच्छ होतात. मला तर वाटतं, आपल्याला डोळे बंद करायला सांगुन ते हळुच चहा वगैरे पिउन येत असावेत. डोळे उघडल्यावर ते आपल्याला एका मोठ्या मशीनसमोर बसवुन, एक कसलासा स्टॅंड आणुन आपल्याला त्या स्टॅंडवर हनुवटी ठेवुन बसायला सांगतात. मला त्या स्टॅंडवर हनुवटी ठेवुन बसलेला माणुस आणि शिरच्छेदाची शिक्षा झाल्यावर गिलोटीन का काय त्यात मान अडकवुन बसलेला माणुस यात खुप साधर्म्य वाटतं. त्यांचं छोट्या टॉर्चनी समाधान झालेलं नसतं म्हणुन ते मशीन आपल्या डोळ्याजवळ आणुन त्यातुन असुन प्रखर टॉर्च डोळ्यावर मारतात. मग खुप वेळ बघत बसतात, अधुन मधुन "डाविकडे बघा ... उजवीकडे बघा" असं म्हणुन आपण काहीतरी करतो आहे असं भासवतात. "हलु नका, स्थिर रहा ॥ मान सरळ ठेवा .. डोळे नका मिटू" असलंही काहीतरी बोलत असतात. अरे हलू कसलं नका ? काय फोटोसेशन चालू आहे? आणि उठसूट डोळ्यावर असे वेगवेगळे टॉर्च मारले तर चांगले डोळे असलेला माणुसही पुढच्या वेळी आंधळा होउन येइल. हाच त्याचा प्लॅन असणार. मला वाटतं लहानपणी ज्या मुलांना इतरांच्या डोळ्यावर टॉर्च मारुन विकृत आनंद मिळतो तिच मुलं पुढे जाउन डोळ्याचे डॉक्टर होत असतिल. स्वतःच्या छंदाचाच प्रोफेशन म्हणुन वापर करण्याचं याहुन चांगलं उदाहरण शोधुन सापडणार नाही.

आता याऐवजी जर तुम्ही "कांन-नाक-घसा" तज्ञ अशी पाटी असलेल्या खोलित शिरलात तर तिथं तिसरच काहीतरी चालु असतं. इशंही अपल्या नशिबातुन टॉर्च सुटत नाहीच. हे डॉक्टर सगळ्यात आधी आपल्या नाकाचा शेंडा पकडुन वर करतात. म्हणजे साधारणपणे वराह जातिच्या प्राण्याप्रमाणे आपलं नाक केल्यावर मग त्यात टॉर्च मारतात. नंतर मग घसा पहायच्या निमित्ताने ते जीभ बाहेर काढुन आपल्याला "आ" वासायला सांगतात.
"मोठा करा आ ... अजुन मोठा ... जीभ काढा अजुन बाहेर"
आपण जीभ अगदी मुळापासुन निघायच्या बेताला येईबर्यंत बाहेर काढली की मग परत टॉर्च मारतात. त्यांच्या एका डोळ्यावर आरसासदृश गोष्टही असते. अगदी त्यांचा डोळा आपल्या तोंडात जाईपर्यंत जवळ येउन काहीतरी निरीक्षण करतात. मग एक लोखंडाची लांब पट्टी आपल्या घशापर्यंत आत घालुन जीभ अजुन खाली दाबतात. या अनपेक्षित प्रकाराने आपण "ऑक-व्यॅक" असले काहीतरी आवाज काढले की त्यांचं समाधान होतं. मग लगेच "झालं झालं" असं आपलं सांत्वन करतात.

एकदा मी दुपारी "अगदी ओ येईपर्यंत" म्हणतात तसं जेवण केल्यावर या ENT कडे गेलो होतो। नेहमाचे सोपस्कार सुरु झाले. आधीच माझ्या खुप घशाशी येत होतं. त्यातुन तो डॉक्टर माझ्या अगदी समोर बसुन या कसल्या कसल्या लोखंडी पट्ट्या माझ्या घशात घालंत होता. खरं तर त्यावेळी त्याचे सगळे दात त्याच्याच घशात घालायची इतकी तीव्र इच्छा झाली होती की काय सांगु. या सगळ्या गोंधळात माझ्या घशातल्या अन्नावरचा ताबा सुटला असता म्हणजे!!?? पण नाही ! त्याला माझ्या पडजीभेची काळजी "पडलेली"! माझी पडजीभ मनसोक्त पाहुन होईपर्यंत त्याने काही मला सोडलं नाही. बाका प्रसंग थोडक्यात निभावला म्हणायचं.

यानंतर उरतो कान, तिकडे यांचा मोर्चा वळतो. त्याचं पण टॉर्चनी निरीक्षण करुन झालं की त्यात काय काय द्रव्य ओततात, का? तर म्हणे कान साफ करायला. एकदा तर एका पेशंटचा कान साफ करायत्या बहाण्याने त्या डॉक्टरनी एक छोटाशी पिचकारी घेउन चक्क कानात पाण्याचा फवाराच मारला! उगाच काहीतरी क्लिष्ट नाव असलं तरी ती मुळात होती पिचकारीच. अरे माणसाच्या कानाचे अंतरंग म्हणजे काय रंगपंचमी खेळायची जागा आहे का?!

एखाद्याच्या खाजगी बाबतीत इतरांनी लक्ष घालु नये असा साघा सर्वमान्य शिष्टाचार आहे. माणसाचे कान-नाक-घशाचे अंतर्गत ही किती खाजगी गोष्ट आहे. पण हे लोक अगदी टॉर्च मारुन मारुन त्यात बघतात. इतकं "उच्च" शिक्षण घेउनही यांना इतके साधे शिष्टाचार माहित नसावेत ही फार लज्जस्पद गोष्ट आहे.

देव न करो पण कधी तुम्हाला दंतवैद्यक शास्त्राचं शिक्षण घेतलेल्या व्यक्तिकडे जायची वेळ आलीच तर तयारी असावी म्हणुन सांगतो। तिथे गेल्यावर आपल्याला एक मोठ्ठी आरामखुर्चीसारखी खु्र्ची दिसते. आपल्याला वाटतं "व्वा! आपल्या आरामाची केवढी सोय!" पण प्रत्यक्षात ती खु्र्ची म्हणजे आपल्याला अडकवण्यासाठी रचलेला एक सुंदर सापळा असतो. त्यावर आपण बसलो रे बसलो की वरुन एक मोठ्ठा प्रकाशाचा झोत आपल्या तोंडावर पडतो. मग चहोबाजुंनी असख्य ट्रे बाहेर येतात. त्यावर हातोडी(!), पक्कड (!?), ड्रिल (!!!) अशी वाट्टेल ती अवजारं (आणि हत्यारं) असतात. दात काढायचा असेल तर एक माणूस आपलं डोकं पकडुन ठेवणार आणि डॉक्टर भिंतितुन खिळा उपटावा तसा पक्कडिने आपला दात उपटणार असलं महाभयंकर दृश्य बघायला मिळते. दर दोन मिनिटांनी कसल्याशा पिचकारीने तोंडात पाणि मारुन आपल्याला चुळ भरायला सांगतात. इथे प्रसग काय, हे सांगतात काय, काही विचारू नका. दातातल्या फटी बुजवायला ते ज्या कौशल्याने सिमेंट भरतात की त्याची तुलना एखाद्या गवंड्याशीच होऊ शकते. फरक एवढाच की सिमेंट सरळ बसले आहे की नाही ते बघायला हे आपल्या तोंडात कोळंबा सोडत नाहीत.

या सगळ्याव्यतिरीक्त आजकाल एक नवीन प्रकार प्रचारात आहे, Overall Checkup, किंवा संपू्र्ण तपासणी. त्यात हजारेक प्रकारच्या चाचण्या असतात, आणि प्रत्येक चाचणासाठी हे लोक आपलं रक्त शोषतात, अक्षरशः !
त्या रक्तपिपासु लोकांचा तर कथाच निराळी. मी एकदा अशा चाचणीसाठी एका ठिकाणी गेलो होतो. तिथल्या माणसाने फार उत्साहाने एक इंजेक्शन माझ्या दंडाच्या खालच्या भागात खुपसलं. बराच वेळ त्यात काही येईचना.

तो - "काय हो, तुमच्या शरिरात रक्ताची फारच कमतरता दिसते! .. हॅ हॅ हॅ"

मी - "तुमच्यासारख्या ड्रॅक्युलाकडे सारखं जाउन दुसरं काय होणार? अजुन फार तर एक-दोन वेळा टिकेन, त्यानंतर भुसा भरुन प्राणिसंग्रहालयातच ठेवायची वेळ येणार आहे."

माझ्याकडुन अशा उत्तराची अपेक्षा नसल्याने तो थोडा वरमला. चौकशीअंती असं कळलं की तो डॉक्टर नविन होता आणि त्याला माझी नसंच सापडत नव्हती. ते ऐकल्यावर शेजारच्या सिनियर डॉक्टरनी त्याला शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या ह्या प्रयोगाचा गिनीपीग मीच! त्या गुरू-शिष्यांचा प्रेमळ संवाद चालु असेपर्य़ंत सुई साझ्या अंगात खुपसलेलीच होती. त्यानंतर, पलंगाखाली गेलेली गोष्ट काढायला त्याखाली हात घतल्यावर काहीही दिसत नसतांना आपण ज्या प्रकारे वाट्टेल तसा हात फिरवुन चाचपडुन बघतो, तसा तो त्या इंजेक्शनची सुई माझ्या अंगात इकडे तिकडे खुपसुन बघत होता. माझ्या नशीबाने ती नस एकदाची सापडली आणि माझं वजन थोडं कमी करुन तो निघुन गेला.

हे सगळे अनुभव घेतल्यावर तर हाडाचे, मेंदुचे, ह्रदयाचे मोठमोठे डॉक्टर काय करत असतिल याची कल्पनाही न केलेली बरी. या सगळ्यातुन तारुन न्यायला देवाने एकच गोष्ट आपल्याला दिली आहे, ती म्हणजे संयम आणि कदाचित त्यामुळेच रुग्णाला इंग्रजीत पेशंट असं म्हणत असावेत. नुसती लक्षणं ऐकुन आणि नाडी तपासुन योग्य औषघ देणारे, हलक्या हाताने इंजेख्शन देणारे डॉक्टर पत्रिकेतच असाबे लागतात. हे भाग्य फार थोड्या पुण्यावानांना मिळतं. बाकी आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी संतांनी भविष्य जाणुन आधीच सोय करुन ठेवलेली आहे,

आलिया भोगासी, असावे सादर!

--प्रतीक्षा

Tuesday, July 03, 2007

पावसाच्या धुंद सरी,
सुगंध मातीचा दरवळलेला
साथ होती फक्त तुझीच,
सोबत निसर्ग हिरवळलेला.

तो पाऊसही गेला नि सहवासही,
हा पावसाळा एकांताचा होता.
निसर्ग तसाच नटलेला पण,
सोबतीला फक्त स्पर्श तुझ्या शब्दांचा.

ते शब्द तुझ्या वचनातले,
पावसात होते पुसून निघाले.
नशिबाबरोबर तुही पाठ फिरवलीस,
वचन फक्त मीच निभावले.

आता हा एकांत माझा,
साद तुला देत आहे.
उन्मत्तलेला हा वाराही,
स्पर्शून तुला येत आहे.

तो स्पर्श तुझ्या शब्दांचा,
डोळ्यांत आजही दाटून येतो.
चेहर्यावर ओघळणारा पाऊसच
फक्त, अश्रू माझे वाटून घेतो।


डाव्या हाताने जेव्हा केलेस केस बाजूला
हृदयाचा ठोकाच क्षणभर हेलकावला
जणु चांदण्या रातीला
चंद्र नभातुन डोकावला
चोरलेस तु माझे काळीज
त्या पहिल्या भेटीला
खरच सांगू का तेव्हा
माझा जीवही माझा न राहिला

तो चांद रातीचा, गंध मातीचा
का असा नवा वाटला
ना कळे मलाही मनात कोणता
हा भाव अनामिक दाटला

मला नाही याचे दुःख की तु मला विसरलीस
पण राहून राहून एवढेच वाटते की
कोणासाठी तु असा माझ्याशी
हा जिवघेणा खेळ खेळलीस

खरच मला जाणुन घ्यायचय
आता माझ्या या शेवटच्या क्षणाला
शेवटच्या त्या भेटीमध्ये माझ्या हातुन
तु तुझा हात मनापासून सोडवला होतास का

तुझ्या त्या पहिल्या स्पर्शाने
मी अंग अंग शहारलो
सांग सये मला तेव्हा
मी माझा कितीसा राहीलो


दोन पाखरं काही वेळ एका फांदीवर बसून चिवचिवली म्हणून काही त्यांची घरटी एक होत नसतात.

केंव्हातरी आपणासोबतचं पाखरू फांदीवरून उडून जातं.
आपल्याला वाटत असतं ते आपल्यासोबतच आहे, कारण आपली नजर समोरच्या विस्तृत आकाशाकडे असते.

पण तेंव्हाच त्या आकाशात उडताना आपणास पाहणारं त्या फांदीवरती कोणी नाही हे समजल्यानंतर,

ते आकाशही त्या फांदीपुढे नगण्य वाटू लागतं..
आणि इच्छा होते परतण्याची...


मनात ओळी येतात..


रात्र नाही तुही नाही चंद्र नाही सोबती
तु दिलेल्या मोगर्‍याचा गंध नाही सोबती
सांग या तारांगणातून मी मला रमवू कसा
तारका न्याहाळण्याचा छंद नाही सोबती..

वरील चारोळी ही लोकमत ' मैत्र ' (वॅलेंटाइन विशेषांक २००७) यातून वाचलेली॥लेखक अज्ञात
फुलांनाही तू जवळ करू नकोस
भरोसा नाही त्यांचा मनाचा
चुकून स्पर्श करशील ओठांनी, पण
फायदा घेतील ते तुझ्या भोळेपणाचा

वाटतं सर्वांच्या देखत तुला
स्वत:चं करावं सन्मानानं
आणि अलगद तुझ्या नावापुढे
माझ्या आडनावानं शिरावं अभिमानानं

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली
तर जिवनात दुःख उरलं नसतं
दुःखचं जर उरलं नसतं
तर सुख कोणाला कळलं असतं

-- सनिल पांगे

एक प्रवास मैत्रीचा
एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा ..

एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत- नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा...!!"

पाखरे परत येतील


पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.

होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.

झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.

आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.

सुधीर......
http://marathikavita1.blogspot.com
साला काय असतात ना ही नाती
काही मनापासुन जोडलेली
तरं काही सहज तोडलेली........

काही जिवाभावने जपलेली
तर काही नुस्तीच नावापुरती उरलेली........

काही नितळ प्रेमासाठी जगलेली
तर काही बांन्डगुळासारखी दुस-याच्या जिवावर वाढलेली........

काही बिनधास्त सगळ्यांसमोर मांडलेली
तर काही भितीपोटी गुपितासारखी लपवलेली........

काही मैत्रीच नाव दिलेली
तर काही त्याहीपुढील प्रेमाचा गाव असलेली........

काहि ओझ्यासारखी वाहीलेली
तर काही आठवणींच्या ओलाव्यासारखी जपलेली........

काहि नकळत मनाशी जुळलेली
तर काही स्वत:च अस्तिवच हरवलेली........

काहि नुस्तीच नावपुरती ठेवलेली
तर काही उराशी जिवापाड सांभाळलेली........

काहि मनसोक्त एकमेकांसोबत बागडलेली
तर काही मान-अपमानाच्या ओझ्याखाली दबलेली........

काही मोत्याहुन अनमोल ठरलेली
तर काही भंगारासारखी विकाया काढलेली........

साला काय असतात ना ही नाती
काही मनापासुन जोडलेली
तरं काही सहज तोडलेली........

@सचिन काकडे
आधुनिकतेच्या वाटेवर धावत्या
आजकालच्या या माणसाकडे
पाहुन वाटतंय की
आता तर सगळी काळजीच मिटलीये..............

चंद्र-सुर्याची आता
गरज आहे कोणाला
जेव्हा ईथे "वेळ" स्वत:च
घड्याळ्याच्या काट्यावर चालु लागलीये.......

आईच्या दुधाचं मोल
कसं कळेल कोणाला
जेव्हा ईथे आजकालची पोरं
पावडरच्या दुधावरही वाढु लागलीयेत.......

"मर्यादेचा अर्थ काय" ?
हे कसं माहित असेल कोणाला
जेव्हा ईथे आजकालची पोरं-पोरी
प्रेमाच्या नावाखाली नको-नको ते चाळे करु लागलीयेत........

महाभारत वाचायची आता
गरजंच कशाला....
आजकालच्या प्रत्येक
घरात महाभारतातली सगळी पात्र सापडू लागलीयेत........

अजुन एक आता तरं
हनीमुनलाही जायची गरजं नाही
आजकाल "टेस्ट-ट्युब" ने
पण पोरं होऊ लागलीयेत............

आधुनिकतेच्या वाटेवर धावत्या
आजकालच्या या माणसाकडे
पाहुन वाटतंय की
आता तर सगळी काळजीच मिटलीये..............

@सचिन काकडे
राधा ही बावरी हरीची

रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी llधृ.ll

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरूनि श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गूज प्रीतीचे गाणे सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll१ll

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळति
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरपून जाई
हा चंद्र-चांदणे ढगाआडुनि प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी !!!

Monday, July 02, 2007

मी तिच्यात नव्हतो


मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती॥