आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, February 07, 2008

नव्या definitions

आजच्या जगातील नव्या बुद्धाला प्राप्त झालेली नवी बोधि : ( new definitions)
1.लोकशाही जिन्दाबाद ( प्रत्येकाची स्वतंत्र हुकुम्शाही असू दया )
२.आपल्याला या योजनेवर पुन्हा विचार करावा लागेल : ( तुझी योजना चांगली आहे ; पण ती तुझी आहे ना !!!)
३.दुस्रया पक्षातुन आपल्या पक्षात आल्यास : ह्रदय परिवर्तन
उलट झाल्यास : गद्दार !
४.घाई करून चालत नाही ; सगल्या बाबिंचा विचार करावा लागतो. ( जाहीरनामा फ़क्त जाहीर करण्या पुरता असतो हे कळत नहीं का ? )
५.घाई करून चालत नाही ; सगल्या बाबिंचा विचार करावा लागतो. ( मी हरीश चन्द्र बनेन ; पण पहिला नाही ! )
६.अन्नाभौची एकसष्टी दणक्यात झालीच पाय्जे ! ( तुम्हाला नसला ; तरी खुर्चीला कंटाला आला आहे.)
७.हे पहा ssssss, तुमचे रक्त तरुण आहे. ( पांढरा केस देवासमान !)
8.भगत सिंगवर प्रेम करायचे ( म्हणजे गान्धिजिंचा द्वेष करायचा अणि चुकुनही एकासारखेही वागायच्या फंदात पडायचे नाही )
उगिच बोलायचे, उगिच हासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे

मधुन जमवायचे तेच ते चेहरे
मधुन वाऱ्यावरी घरच उधळायचे

चुकुन अपुली कधी हाक ऐकायची
मन पुन्हा बावरे धरुन बांधायचे

रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे

उगिच शोधायचे भास विजनातले
अटळ आयुष्य हे टळत टाळायचे

ह्या इथे ही तृषा कधि न भागायची
मीच पेल्यातुनी रिक्त सांडायचे!


गझलकार - सुरेश भट

Wednesday, February 06, 2008

एकटेच शब्द माझे
सोबतीला सूर नाही
दाटले डोळ्यांत अश्रू
पण आसवांचा पूर नाही

हाच आहे तो किनारा
येथेच होती भेट झाली
अन् संपली जेथे कहाणी
तोही पत्थर दूर नाही

तू जिथे असशील तेथे
पौर्णिमेचा चंद्र नांदो
आंधळ्या माझ्या नभाला
चांदण्यांचा नूर नाही

ही मेजवानी चालली
माझाच केला घात त्यांची
पंगतीला या बसावे
मी एव्हढा मजबूर नाही

रात्र त्यांची झिंगलेली
पण आत्मे अस्थिर झाले
शांत आहे झोप माझी
अंतरी काहूर नाही....

पाठ वळता वार करता,
अन् तरी हसता कसे?
वार होता पाय धरने
या दिलाचा दस्तुर नाही...

तू नको पुष्‍पांस वाहू
माझिया थडग्यावरी
थडग्यातला मृद गंध माझा
मी फुलांना आतुर नाही...

त्या तुझ्या नजरेत होता
तारकांचा जो सडा
त्या तारकांनी घात केला
अन् घाव ही अलवार नाही...

मी जरी निष्पराण झालो
आत्मा जागेल हा,
वार्‍यासवे हरवून जाण्या
तो कुणी कापूर नाही...

दाटले डोळ्यांत अश्रू
पण आसवांचा पूर नाही..

-सौमित्र साळुंखे.
कसे वाहते अंतरातून पाणी
फिरोनी त्याच वेदनेच्या दिशेने.
का बोलती ही सतारीतून गाणी.
मर्म तुझे भेदण्याच्या मिषेने.

तुझा ठाव नाही, मला गाव नाही.
तरी जोडले मी प्राक्तनाच्या रेषेने.
तुझा भाव पाही,तुझे घाव साही.
आठवू की विसरु मी कशा कशाने.

तुझी याद अशी मनी कोरलेली.
उफाळून येइ जराश्या नशेने.
वास्तवाची 'जाण' उरी फाटलेली.
गिळावे आवंढे कोरडया घशाने.

तुझा दोष नाही, मला होश नाही,
इथे साजरी 'तू' होते जल्लोषाने.
माझा रोष नाही,शब्द घोष नाही.
घूमू दे आभाळ 'मुक्या आक्रोशाने''......!!!!

-@ अरुण

आनंदाचा एक अश्रू ..
ओघळला डोळ्यातून
जेव्हा हळूच घेतलेस तू
मिठीत जवळ ओढून ..

ओठांनी तुझ्या टिपलास
जेव्हा अलगद तो थेंब
नव्हते अंतर जराही ..
दोन जीव जणू झाले एक

वाटले हा मोहक क्षण,
असाच इथे थांबून रहावा
नको आता तुझ्या माझ्यात..
पुन्हा कधी दुरावा

सहवासात तुझ्या फ़ुलली अशी
कोमेजलेली ही कळी,
अचानक एखाद्या रात्री जशी
बहरून यावी रातराणी ..

हरवूनी तुझ्या बाहूपाशात ..
झाले रे मी परिपूर्ण
जीवनास अर्थ लाभला माझ्या,
देऊनी तुला सर्वस्व !

--- श्वेता पोहनकर


डाग हा पडला

शुभ्र वसना वर डाग का पडला
तोच रंग फासुन त्याला
मग मी का झाकला
तोच रंग माझा झाला

ह्या रंगावर आता कोणताही रंग चढ्त नाही
लावला रंग माह्या काही सुटत नाही
ह्या रंगा पुढे ठरले सगळे रंग फिके
बुडाले आयुष्या काळोखा आता उठत नाही

काळोखालाच मग मी झाकुन टाकला
बदलला वेष घातला डगला
शुद्ध भाव मनी धरला
आज मला आत्म्यातच देव दिसला

www.baalkavi.blogspot.com

Tuesday, February 05, 2008

आधीच माझं आयुष्य म्हणजे
उत्साहात उजाडणारी पोर्णीमेची पहाट होती
तेव्हाचं तुझं माझं प्रेम म्हणजे
त्वेषात वाहणारी भरतीची लाट होती

सांग ना सखे ती लाट भरतीची
पुन्हा तशीच वाहील का ?
सांग ना सखे ती पहाट
पुन्हा माझ्या आयुष्यात येईल का?

तेव्हा तु एकाच शब्दातला
कोवळा विश्वास मला दिला होतास
कोंडलेल्या त्या मनातला सखे तु
मोकळा श्वास मला दिला होतास

आज तु दिलेल्या त्या कोवळ्या
विश्वासाची कसोटी आहे
कारण आज माझ्या
आयुष्याला श्वासांची ओहोटी आहे

सांग ना सखे तो मोकळा श्वास
माझं मन पुन्हा घेईल का ?
आता तुझ्या आठवणीच्या लहरींचा पदर
बघ कसा स्पर्शतो बेधडक मनाला

त्या आठवणींची भेदणारी नजर
सोसणारा सखे मीच तो खडक ओसाडलेला
ओसाडलेल्या त्या खडकावर अलगद पेमळ
लहरींचा हात तु पुन्हा फिरवशील का?

विस्कटलेल्या आठवणींचा निथळ शब्द
सांग ना सखे तु पुन्हा गिरवशील का?

——सचिन काकडे

स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर...

' वाहन काळजीपूर्वक चालवा... आम्ही वाट पाहू.'

*****

२. 'नो स्मोकिंग' झोनमध्ये...

' तुमच्या तोंडातून धूर येताना दिसला, तर तुम्हाला आग लागली आहे, असं गृहीत धरून आम्ही पुढची कारवाई करू.

******

३. बंगल्याच्या दारावरची पाटी...

' या बंगल्यातील सगळे रहिवासी शाकाहारी आहेत... फक्त आमचा कुत्रा सोडून.'

******

४. आणखी एका बंगल्यावरची पाटी...

' सेल्समनचे स्वागत. कुत्र्याचं अन्न (डॉग फूड) किती महाग झालंय हल्ली.'

******

५. आणखी एका बंगल्याच्या दारावरची पाटी...

' आम्ही आमच्या दारात येणाऱ्या दर तिसऱ्या सेल्समनला गोळी घालतो... दुसरा आत्ताच येऊन गेलाय.'

******

६. डोळ्यांच्या डॉक्टरच्या दारावरची पाटी...

' तुम्हाला जर हे लिहिलेले नीट वाचता येत नसेल, तर तुम्ही योग्य जागी आलेले आहात।'
तूच सारे बोल आता,
मी काहीच बोलत नाही......
हा-नाहीच्या पोरखेळात,
मी देखील डाव मांडत नाही

तूच सारे बोल आता,

मी काहीच बोलत नाही......

जस तु सांगशील
सगळं कदाचित तसंच होईल
तुझा प्रवाह सोडून
थोडसं मी वळण घेईणं,
पण सये प्रवाह, वळण बदलले तरी
पाणी मात्र बदलत नाही

तूच सारे बोल आता,

मी काहीच बोलत नाही......

मनाशी ठरवलंय आता
सगळ सगळ शब्दांत सांगायच
राहिलच काही बाकी तर
हातच राखून ठेवायच,
तू ही एक लक्षात ठेव
अबोलात जेव्हढा अर्थ असतो
तेवढा शब्दांत मात्र नाही

तूच सारे बोल आता,

मी काहीच बोलत नाही......

खरच मनाला विचार एकदा
प्रेम वैगेरे असं असत का काही,
मी सतावलाय माझ्याच मनाला
प्रेम काही गैर नाही,
अगं सगळ-सगळ समजतय,
मला किंवा तुला
भातुकळीच्या खेळामधले आपण
बाहुला-बाहुली देखील नाही

पण, तूच सारे बोल आता

मी काहीच बोलत नाही.....

कळुन चुकलय मला आता
ज्योतिश्य-वाल्यांचे पोपट देखील,
खरं कधीच बोलत नाही
दगडी- देह परिधान केलेला देव
नेमाने नमस्कार करणाय्राला देखील,
कधीच कौल देत नहीं
अगं ज्याला जे हव
त्याला ते कधीच मिळत नाही
मला तू हवीस,
पण तुला ही ते उमगत नाही,

तूच सारे बोल आता
मी काहीच बोलत नाही.....

पण, तूच सारे बोल आता
मी काहीच बोलत नाही.....

कवी,
अमित जाधव

Monday, February 04, 2008

तुझ्या गीताचे मी कीती सुर प्राशिले
तरी शब्द उभा ओठावरी तहानलेला
तुजसाठीच रचलेला मी खेळ सावल्यांचा
सावलीने सावळा तव श्रुंगार केला

गाव तुझेही सखे क्षीतीजापल्याडचे
तुझ्यासाठी प्रवास मी हळुवार केला
मज नव्हती तमा तेव्हाही उन्हाची
अन तु सावलीतही हाहाकार केला

पेटल्या जरी स्वरांच्या वक्षी दिपमाळा
तरी स्वप्नदेश माझा सखे अंधारलेला
मी न मागितला तुला कधी उजाळा?

तु दिलेस शब्द मी गीतांचा झंकार केला

चिरंतर दुख:चा मी बंदीवान झालो
गजाआड आसवाला मी यार केला
भय न आता मज नव्या वेदनांचे
मी जुन्या जखमांचा सत्कार केला

राग ना मला या हस-या मैफ़ीलीचा
हसुन आज पाहतो हातातलाच प्याला
दिवसामाजी बदलतो रंग प्याल्याचा
कुणी हा रंगाचा असा बाजार केला?

--सचिन काकडे