आनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...
आजचा विशेष
मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे
-- आनंद काळे
बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.
Friday, April 13, 2007
जाईन दूर गावा
तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा.
पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यात अर्थ जावा.
शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.
देता कुणी दुरून नक्षत्रसे इशारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.
पेरुन जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.
तारांवरी पडावा केव्हा चुकून हातः
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.
तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा।
- आरती प्रभू
Thursday, April 12, 2007
Wednesday, April 11, 2007
कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
उगाचच रातभर जागायला हवे!
सुखासिन जगण्याची झाली जळमटे
जगणेच सारे पुरे झाडायला हवे !!
....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
.......
गारठ्यात फेकुनिया शाल, कानटोपी
कधीतरी थंडीलाच वाजायला हवे!
छोटे मोठे दिवे फुंकरिने मालवुन
कधीतरी सूर्यावर जळायला हवे!
....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
खोट्या खोट्या शृंगाराची लाली रंगवुन
कशासाठी सजायचे चापून चोपुन?
वाऱ्यावर उडवत पदर जिण्याचा
गाणे गुलछबु कधी म्हणायला हवे!
....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
भांड्यावर भांडे कधि भिडायला हवे
उगाचच सखिवर चिडायला हवे
मुखातुन तिच्यावर पाखडत आग
एकिकडे प्रेमगीत लिहायला हवे!
....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
विळीपरी कधि एक चंद्रकोर घ्यावी
हिरविशी स्वप्ने धारेधारेने चिरावी!
कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता
मनातून पूर्णबिंब तगायला हवे!
....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
मनातल्या माकडाशी हात मिळवुन
आचरावे कधितरी विचारावाचुन!
झाडापास झोंबुनिया हाति येता फळ
सहजपणाने ते ही फेकायला हवे!
....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
कधि राती लावुनिया नयनांचे दिवे
पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे!
शोधुनिया प्राणातले दुमडले पान
मग त्याने आपल्याला चाळायला हवे!!
....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
ढगळसा कोट, छडी, विजार तोकडी
भटक्याची चाल दैवासारखी फेंगडी!
जगण्याला यावी अशी विनोदाची जाण
हसताना पापण्यांनी भिजायला हवे!
....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
स्वतःला विकुन काय घेशिल विकत?
खरी खरी सुखे राजा, मिळती फुकट!
हपापुन बाजारात मागशिल किती?
स्वतःतच नवे काही शोधायला हवे!!
....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
तेच तेच पाणी आणि तीच तीच हवा!
आणि तुला बदलही कशासाठी हवा?
जुनेच अजुन, आहे रियाजावाचून!
गिळलेले आधी सारे पचायला ह वे!!
....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
नको बघु पाठीमागे, येईल कळुन
कितीतरी करायचे गेलेले राहुन!
नको करु त्रागा असा उद्याच्या दारात
स्वतःलाही कधि माफ करायला हवे!
....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
- संदीप खरे
तिला माझी एकही कविता कळत नाही
तिला माझी एकही कविता कळत नाही
माझ्याशी बोलायची,
रोज गोड हसायची,
कधी कधी माझी वाट बघत थांबायची....
दुसरी एकही मुलगी माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र माझी पाठ कधी सोडायची नाही....
तिच्या आयुष्यातल्या गमती ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता सारखी वाचायला मागायची....
एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत नाही
कवी :- प्रसाद सकट
तिला माझी एकही कविता कळत नाही
माझ्याशी बोलायची,
रोज गोड हसायची,
कधी कधी माझी वाट बघत थांबायची....
दुसरी एकही मुलगी माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र माझी पाठ कधी सोडायची नाही....
तिच्या आयुष्यातल्या गमती ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता सारखी वाचायला मागायची....
एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत नाही
कवी :- प्रसाद सकट
Tuesday, April 10, 2007
Monday, April 09, 2007
Subscribe to:
Posts (Atom)