आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, January 24, 2008

तिने दिलेल्या दोन जखमा
एक ओठावर दुसरी काळजात होती
पहीली कधीच सुकुन गेली
दुसरी मात्र कीचांळत होती........

खरतर यात चुक तीची नाही
मीच चुक करून फ़सलो
ती ओठावर असायची
मी काळजात रोवुन बसलो........

आता आयुष्य सरतय
जखमांवर फ़ुंकर घालण्यात
आठवणीच मीठ चोळल की
स्वप्नं डोळ्यातून ओघळतात ...........

मी विसरायचा प्रयन्त करतोय
पण जखंमा काही भरत नाही
तीला जिवनातून वजा केल्यावर
शिल्लक काहीच उरत नाही ..........

सुधीर ...
जख्मान्चे ओझे जरी ताज़ेच होते.
शब्द का माज़े तरी साधेच होते

असा शोभिवंत गुन्हा तूच केला,
जे मिळाले घाव,ते माज़ेच होते.

पहा थोडी जाळली व्यथा हळू मी,
मनी त्यांच्या आजही काटेच होते.

चरीत्रि त्यांच्या खोटेपणा कसा हा,
आत्मा निजीली, तरी जागेच होते.

मशाली जाळीती तारे,!चांद राती,
मलाही ते जाळाया, आलेच होते.

सर्व होते बोलणारे, सर्व षन्ढ,
आता या देशी फक्तची वाजेच होते.

निशब्द(देव)
मनुष्य प्राणी..हाचि एकला..
शरीराच्या जो..पल्याड गेला.

पेम,आपुलकी..नाते गोते..
अन्य जीवांना..हे ना असते.

करुणेपायी.. भुकेल्यास तो..
घास आपुला..काढुन देतो.

पुरुष त्यातला.. बलशाली तन.
वाही ओझी.. अन कोरड मन.

स्त्री कोमल मृदु.. हळवी थोडी.
तिच्या कारणे.. घरास गोडी.

वाटे परी तिज.. कमतरता ही.
पुरुषापरी ती.. बनण्या पाही.

गुणास आपुल्या.. अवगुण समजे.
पुरुष वेगळा.. तिज ना ऊमजे.

नव-मानव हर.. तिने घडविला.
जमेल का हो.. हे पुरुषाला ?

क्षमा, शांती.. करुणा तिजपाशी.
अलग गुणांचि.. मुर्ति खाशी.

पुरुष- प्रकृती.. यांचे नाते..
स्त्री-पुरुषातुन.. तेच प्रकटते.

श्रेष्ठ-कनिष्ठ.. नाहीच कोणी.
स्वधर्म आपुला.. आपण जाणी.

-- अहं ब्रह्मास्मि

Wednesday, January 23, 2008

जीव की प्राण तु माझा, श्वासात मला घेशील
विरघळून माझ्या प्रीतरसात .. एकरुप मला होशील..

मी सर पावसाची श्रावणात सरसरलेली
तेव्हा ओघळताना अलवार , देह वलयाचा होशील...

नाचेल मी धुंद बेधुंद गाण्यात तुझ्या
तेव्हा मज चेतना द्यावया, सोबतीचा नटराज तू होशील...

स्वप्नात सजेन मी , परीसमान शृंगारेल मी
तेव्हा माझे मलाच लाजवाया, आरसा तू होशील...

बोचर्‍या गुलाबी थंडीत, झूळूक लहरी होईन मी
तेव्हा मज सावराया, उबदार शाल मिठीची तु होशील...

तेल चित्रात तवंग त्या रंगाचे होईन मी,
तेव्हा मला बोटांनी रेखाटून,चित्रकार तु माझा होशील ?

जाउदेत राया आता नको आधार ह्या शब्दांचा,
पुरे झाला खेळ भावनांचा, सोडून जग कल्पनेचे अस्तित्व माझे होशील.. ?

-- आ.. आदित्य..

Tuesday, January 22, 2008

लग्नानंतर नव-याला जेव्हा
नावाने मारली हाक
बाया बापड्यानी सासरच्या
मुरडले तेव्हा नाक

शिकवले काही नाही म्हणे
हिला आईच्या घरी
नवराही बायको अशी
चालवून घेतो बरी..?

माहेरच्या संस्कारांपुढे
पडलं होतं प्रश्न चिन्ह..??
ऐकून ते सारे आरोप
मन झालं होतं सुन्न

काही झालं तरी मला मात्र
अजिबात नव्हते झुकायचे
सखा-प्रियकर झालेल्याला
नवरा नव्हते बनवायचे

एक काकू म्हणाली मला
पती असतो परमेश्वर..
एकेरीचा उल्लेख करताना
थोडातरी विचार कर

ठीक म्हटलं.. मान्य काकू..
नवरा माझा देव आहे..
देवाचाही उच्चार पण
एकेरीच ना सदैव आहे..?

तेव्हापासून काकू माझ्याशी
थोडं अंतर ठेवूनच वागत असतात
"श्रीधर"पंताना मात्र "श्री" म्हणत
काकू म्हणे हल्ली लाजत असतात...
.
-- सौ. अनुराधा सचिन म्हापणकर
तसा चंद्र राहिला, तशी रात राहिली
अजूनही तशीच तू तनामनात राहिली

अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा
अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली

शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे
मधुर चोरटी मिठी तुझी स्वरात राहिली

कधी कधी हवेत ह्या तुझाच स्पर्श जाणवे
फिरून सावली तुझी जशी घरात राहिली

पुसून लोचने जिथे तुझा निरोप घेतला
अजून ती मनात ह्या तुझी वरात राहिली


कवी - डॉ. श्रीकृष्ण राऊत

Monday, January 21, 2008

तीचा न माझा ३६चा आकडा

तसा तीचा न माझा
३६ चाच आकडा होता,
स्वभावच नाही तर
जग़ण्याचा मार्गच वाकडा होता...

तीला आवडायचं नेहमी
फुलावरचं फुलपाखरू व्हायला,
मला छान वाटायच
भ्रमर होऊन तीला छेडायला...

ति नेहमी म्हणायची
झुळूक होईन मी मना सुखावणारी,
मी व्हायचो वादळाची भयानता
तीच्या मनाशी घोंगावणारी...

तीचा प्रवास नेहमीचा
खडतरातून यशाकडे जाणारा..
मी व्हायचो आडवा फाटा
तीच्या वाटेला गोंधळात टाकणारा..

तीचं घर तीच्यासारखंच
सुंदर भावनेला जपणारं,
त्याभोवती माझं कुंपण
प्रवेशाला नेहमीच आडवणारं...

ती होती भारीचं स्वप्नाळू
स्वप्नात नेहमीच सौंदर्यात सजायची,
माझी सुद्धा मजल नेहमीच
स्वप्नाना आडवणार्‍या "जाग" मधे असायची...

वर्षानुवर्षाचा ३६चा आकडा,
जणू कसाकाय बदलला..
१२ वर्षाच्या एका तपानतंर
तो चक्क प्रेमात पडला..

आता ९१च्या आकड्यात
आम्ही एकत्र जगतो आहे..
३६च्या आकड्याची आठवण काढून,
उगाच कधीतरी खोटं खोटचं भांडतो आहे...

--- आ॥ आदित्य...

तुझ्या ओठावरला हा नक्षत्र.....

निलपरी तु अस्मानीची
जन्मजात तु रुप-श्रीमंत
अन,देखणॆ तुझे लावण्य जणु
चांदण्यानी भरलेला आसमंत

कसले भाव, अन कसले शब्द
तुझ्या डॊळ्यात हरवते सारे
भोवतालीचे रानही भुलविते
तुझ्या रुपाचे हे गंध वारे

कोवळॆ तुझे हे रुप पाहुन
हृदयास बसती असंख्य पीळ
अन, मखमली खंजीर जणु
तुझ्या ऒठावरला हा तीळ

वेळ काढुन चित्रकाराने सखे
चितारलेय तुझे अमुर्त चित्र
करी घायाळ भल्याभल्यांना
तुझ्या ओठावरला हा नक्षत्र

-सचिन काकडे

मन:स्ताप ही अवस्था अटळ. पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर... तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्ही तुकडे जागच्या जागी राहतात.त्यातून पाणी पिता आलं नाही तर त्यात फ़ुलं ठेवता येतात. ---व.पु.काळे

लेखकाच्या संदेशावर जग बदललं असतं तर समर्थांच्या मनाच्या श्लोकानंतर कोणत्याच वाड:मयाची, साहित्याची निर्मीती झाली नसती. -------- व.पु.काळे