माझी पापणी सांगते
गोड स्वप्नांची कहाणी
माझ्या ओठांशी खेळती
शब्द शब्दांतून गाणी
झुंजु मुंजु माझे हसू
सदाफ़ुलीची आरास
माझा सुगंध वाटते
कळी मोगर्याची वेणी
माझं मन झुळझुळ
झरा मधाळ गोडीचा
थेंब थेंबातून वसे
शिरशिरी झिणझिणी
विनापरांची मी परी
तनु माझि जलपरी
माझ्या तनुला जाळते
खुळे खळाळते पाणी
येशी अवेळीच असा
कसा रुसून बसशी
समजवू कसे तुला
तुझी भलती मागणी
गोड स्वप्नांची कहाणी
माझ्या ओठांशी खेळती
शब्द शब्दांतून गाणी
झुंजु मुंजु माझे हसू
सदाफ़ुलीची आरास
माझा सुगंध वाटते
कळी मोगर्याची वेणी
माझं मन झुळझुळ
झरा मधाळ गोडीचा
थेंब थेंबातून वसे
शिरशिरी झिणझिणी
विनापरांची मी परी
तनु माझि जलपरी
माझ्या तनुला जाळते
खुळे खळाळते पाणी
येशी अवेळीच असा
कसा रुसून बसशी
समजवू कसे तुला
तुझी भलती मागणी
-- संदीप खरे