आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, June 13, 2008

तुतु असतीस तर झाले असते
सखे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातुन
एक दिवाने नवथर गाणे


बकुळुच्या फुलापरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
आणि रंगानी केले असते
क्षितिजावर खिन्न रितेपण


पसरली असती छायांनी
चरणातली म्रूद्शामल मखमल
आणि शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसुन मिश्किल


तु असतीस तर झाले असते
आहे त्याहुन हे जग सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धुसर अंतर ...


.... कवि - मंगेश पाडगावकर


चांदण्याचे तळे


दिवस उगवतो आणि मावळतो
पण मनाला ते काहीच नको असते
ते बसून राहते तळ्याकाठी
एकटक डोळे लावून
त्या झळमळणा-या पाण्यावर...
त्यात खोल उतरलेल्या तारांगणावर
तहानलेल्या बालहरिणाने
पाण्यावर ओठ टेकून एकभान व्हावे तसे...


कधी ते फक्त चांदण्यांचे तळे असते
कधी सतारीच्या झाल्या’ त बिंदुमालेचे रूप घेते,
कधी कारंजे होऊन रंगतुषार नाचवित राहते
कधी आपल्या चांदण्या मेघावलीतून
शब्द होऊन झिरमिरते...


लाडक्या मनाचा हा छंद
मी फार जपते...


-- इंदिरा संत


Wednesday, June 11, 2008

काही विचार

बापाला दारिद्र्याचा वारसा मुलाला द्यायला आवडत नाही आणि मुलाला बापाकडुन समुपदेश घ्यायला आवडत नाही.
--व.पु.काळे

हाती शस्त्र घेणे कधीही वाईट होय, शत्रुन्शी लड़ायचे असेल तर त्याच्या तत्वांशी लढा
-- महात्मा गांधी

युध्दात तत्व नव्हे, तलवारी टिकातात व जिन्कतात . राष्ट्राच्या सीमा हया फक्त तलावारीनेच आखता येतात .तत्वान्नी नव्हे .
-- विर सावरकर

दुर्गुणांना अनेक रूपं धारण करता येतात आणि त्यांच्या मोहात पडावं इतकी ती आकर्षक असतात
--व.पु.काळे

बोलायला कुणी नसणं ह्या शोकांतिकेपेक्षा, आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहचणं ही शोकांतिका जास्ती भयाण.
--व.पु.काळे