आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, November 01, 2007

तुझी आठवण येताच माझ्या मनाची
हालत हि त्या वाती सारखी झाली होती
जीच्या दिव्यातले तेल संपले होते
तरी जगण्याची धडपड चालू होती.

Wednesday, October 31, 2007

एकदा एक नवरा बायको फिरायला जातात चालता चालता नवरा मागे राहतो. तो काहि तरी रस्त्यावर पडलेले असतो ते उचलतो. बायको "काय झाले?" म्हनून विचारती परंतू त्याचा चेहरा पडलेला असतो .
तो म्हणतो "कही नाही झाले. आज काल लोक थुन्कताना सुद्धा एक रुपयाच्या कोइनची आकारत थुन्कतात !!!!
तुझी आठवण
नित्य नवा अनुभव आहे,
कधी उसळणारं वादळतर
कधी अळवावरच पाणी आह
--सानिका (सोनाली वैद्य।)

कसं सांगू तुला, काय वाटतं मला?
तुला तरी कळतंय का, काय झालंय मला?
माझंच मन मला विचारतंय, माझं बरोबर आहे का चुकतंय?
माझं मलाच कळत नाही, तुला तरी कशी सांगणार वेड्या?

असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून,
पुन्हा आपल्यावरच रागवणार..

याच आश्रुंचा मग
दिसलाय मला तळा साठताना
तुला सोडून निघाल्यानंतर
पाहिलाय त्याना कडेलोट होताना

तुझी आठवण येताच माझ्या मनाची
हालत हि त्या वाती सारखी झाली होती
जीच्या दिव्यातले तेल संपले होते
तरी जगण्याची धडपड चालू होती।

सकाळी सकाळी
मिशरीने दात घासत,
तुला गोठ्यात शेण काढताना
चोरून पहाया लय मजा यायची...

भिताडावरुन टांग टाकून
तुला चुलीच्या म्होरं
थपा थपा भाकरी थापताना
चकण्या डोळ्यानी पहाया लय मजा यायची...

शाळंत जाता जाता
तुझ्या मागं उभा राहुन
तुझ्या डोकस्याच्या शेंड्या
घडी घडी वढाया लय मजा यायची...

शाळंत आलं की
त्या खडुस मास्तराला डिवचत
तुझ्याकडं बघतं बघतं
त्याला वाकुल्या दाखवाया लय मजा यायची..

सांजच्यापारी शाळा सुटली
कि म्हशीच्या पाठीवर
तुला न्यार बसवून
म्हशीला पळवाया लय मजा यायची...

वाटत चिचाच्या झाडाखाली
थांबवून तुला चिचा खायची
लय भारी हावूस होती..
तुझ्यासाठी शेंड्यावर चढाया लय मजा यायची..

रातीला झोपायची आंगणात
आयशीच्या मायाळू कुशीत
हळूच सपरावर बसून
तुझ्यासाठी बासरी वाजवाया लय मजा यायची..

आता न्हाय ती मजा
अन न्हाय मी तुझा तो राज्या
आता म्या तुझा होनार दादल्या
अन वाजल आपल्या लग्नाचा ढोलीबाजा...

-- आ.. आदित्य...

Monday, October 29, 2007

कधी अचानक असे काय होते...
माझे मलाच कळत नाही.
मृगजळामागे धावत राहतो,
जे कधिही कुणाला मिळत नाही!

ऑटोत बसल्यावर टॅक्सी दिसते...
आणि विमानाचे स्वप्न पाहतो
उन्हात अनवाणी चालणाऱ्याकडे,
नजर कधी का बरं वळत नाही?

सारे मिळाले तरीही मन अशांत...
अजून भूक शमली नाही इतक्यात
क्षितिजाला स्पर्श करण्याचे स्वप्न,
किती फोल आहे हे उमजत नाही!

इतरांच्या यशाची इर्ष्या करतो...
तिथे पोहोचण्याची फक्त इच्छा करतो
पण सर्वांअंती हे कळू लागते मला की,
माझी हस्तरेषा त्यांच्याशी जुळत नाही!

मृगजळामागे धावत राहतो,
जे कधिही कुणाला मिळत नाही!

कवी : अद्न्यात
ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.....
नक्कीच ही कविता चॉकलेट पेक्षा गोड असेल.......!!


मनात्ल्या मनात वाह म्हणून दाद देशिल......
सांग न माला..........खरच का कधीतरी माझी होशिल.....!!


ठाउक आहे मला काय चाललय तुझ्या मनात.......
फक्त एकदाच मन घटट करून.......सांगशील का ग माझ्या कानात.......!!


वाट पाहिन तुझ्या उत्तराची........खात्री आहे मला तुझा होकार असेल.......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......!!

कवी: अद्न्यात