आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, August 02, 2007


खुपदा विचार छळतोः पाउस कधी कधी माणसासारखा का वागतो?
खुपदा हैराण होतोः पाउस मधेच मंबाजी सारखा का वागतो

कधी वाटते,पाउस दुःखाच्या डोळ्यातील आसवांची वाणी आहे
कधी वाटते,कवींच्या काळजांची ती रडणारी कहाणी आहे

खुपदा उदास होतो,पाउस वाढता अंधार वाहुन नेत नाही म्हणुन
खुपदा होतो डोळ्यांचाच पावसाळा रुसलेला पावसळा येत नाही म्हणुन....

खुपदा वाटते मातीलाच पुसावी आपली आणी पावसाची व्य़ंजक नाती...
खुपदा उत्तरेच वाहुन नेतो पाउस,फ़क्त प्रश्न ठेवतो आपल्या हाती

पावसाच्या कुशीतुन झाडांसोबत आपणही दुनियेत येतो
उधाणुन येणारया गाण्यात पावसाचाच आशय हेतावता असता

खुपदा कळत नाही आपण खुपदा पावसासारखेच का वागतो?
पाउसच सांगेल कदाचित,खुपदा आपण भरती का होतो...ओहोटी का होतो

एकदा मी प्रेमाला विचारले

एकदा मी प्रेमाला विचारले
कुठे कुठे तू असतोस रे?
प्रेम मला हसून म्हणाला..
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

जेव्हा तुला कोणी आवडतो..
मी क्षणात तुझ्या हृदयात शिरतो रे...
तू विचार फक्त माझाच करतो
कारण मी पूर्णपणे तुझाच असतो रे........
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

प्रेम तू कुणावरही कर....
मी तुला तिथेच दिसणार असतो रे....
तू प्रेम दुसर्याला जितके देशील...
त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो रे...
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

आयुष्य खरच खूप सुंदर आहे..
माझा हात सोडून देऊ नकोस रे......
जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार..
मी तुझ्याच हृदयात लपून असतो रे....

-- प्रेम
बालवाडी चे ते दिवस

अजुन आठ्वतो आहे
बालवाडीचा माझा पहिला दिवस
रडत कडत कसा तरी घालवलेला
घन्टा वाजल्या बरोबर
धावत जाउन आईला घट्ट धरुन
तिलाच जाब विचारलेला

आठवतात आमच्या खिरे बाई
गाणी, कविता सदा त्यान्च्या तोन्डी
ससा $$ ससा जसा कापुस पिन्जुन ठेवलाय जसा
म्हणुन स्वताच मारायच्या ऊडी

खेळ्णी आमच्या वर्गात खुप सारी
मी, शुभान्गी, आणि रवी
आमच्याच पाशी ठेवायचो सारी

आम्ही तिघे खुपच बदमाश
खोडी काढुन सगळ्यानची
काहिच केले नाही असे भासवून
असायचे तोन्डा वर बोट आणि हाताची घडी

गाणी आमचीही तोन्ड पाठ
बाई एक म्हणाल्या की
पुढची ओळ आमची एका तालात

बालवाडीचे ते दोन वर्ग
ती झाडे, ती फुले आठवतात सारी
अन अजून डोळे ओलावून
त्या दिवसान्ची मन आठवण क़री

......... ग़णेशा

Wednesday, August 01, 2007

चेहरयवार माझ्या हास्य आहे......

निस्तब्ध ज़हाले डोळे,
चेहर्यावर मात्र हस्या होते,
मरता मरता मला
जगण्याचे गुपित कळले होते.......

अश्रू ढाल नारे कोणी नव्हते,
चार खांदे ही माजवर रूसले होते,
कोपर्‍यात बेवारस पडताना,
जगाचे रहस्या कळले होते........

सुखा मागत होतो पण देवाने ते एकले नाही,
मरण मागताच हातचे काही राखले नाही,
अखेरच्या क्षणात शरीराच दान करून गेलो,
जन्मभर दान मागून,शेवटी दान करून गेलो

आत्मा साथ देत आहे,शरीर सोडून गेले,
जाता जाता मला बरच काही शिकवून गेल,
जीवनात दान करण्याचा आन्नद काही वेगळा आहे,
म्हणून मेलो जरी असलो तरी,,,चेहरयवार माझ्या हास्य आहे......

-- विध्याधर (डोंबिवली)
प्रेम एक सुखद अनुभव असतो,
निराकार दगडातील तो देव असतो,

प्रेम रक्तापलिकडील नवनात्याची अनूभूती असते,
पुन्हा पुन्हा जगण्यासाठीची ती शाश्वती असते,

प्रेम असाच आवडता एक विषय असतो,
लंगड्या वासराची जणु तो गाय असतो,

प्रेम महालातल्या मोकळीकीपलीकडील एक आपुलकी असते,
दाटीवाटीचीच एक झोपडी पण सगळ्यांत लाडकी असते,

प्रेम खमंग भज्यांचा दरवळ असतो,
बर्‍याच गोष्टींची तो एक मिसळ असतो,

प्रेम चांदीच्या ताटातील सोन्याची आमटी असते,
भावनांचीच तिजोरी पण पैशाविण मिळवायची असते,

प्रेम गळणार्‍या छत्रीतला एक कोपरा असतो,
दरवळून पावसात न्हाणारा तो मोगरा असतो,

प्रेम समजणार्‍यांसाठी न समजलेली एक अडचण असते,
प्रवाहात बिनधास्त वाहणार्‍या दगडाची ती सोबतीण असते,

प्रेम अविरत जळणारा एक दिवा असतो,
चटकाच तो एक पण सर्वांना हवा असतो......

सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण,
पाण्यात राहुन माश्याची मग भागत नाही तहान.

स्वप्न सत्त्यात आणता आणता दमछाक होते खुप,
वाटी-वाटीने ओतलं तरी कमीच पडतं तुप.

बायको-पोरांसाठी म्हणे चले हा खेळ,
पैसा आणुन ओतेन म्हणतो पण मागु नकाअ वेळ.

करिअर होतं जीवन मात्र,जगायवच जमेना तंत्र,
बापची ओळख मुलं सांगती पैसा छापायचं यंत्र.

चुकुन सुट्टी चेतलीच तर स्वत: पाहुणा स्वत:च्याच घरी,
दोन दिवस कौतुक होतं,नंतर डोकेदुखी सारी.

मुलच मग विचरु लगतात,का हो आजुन घरी?
त्यांचा ही दोष नसतो,त्यांना सवयच नसते ही न्यारी.

क्षणैक औदसींन्य येतं,मात्र पुन्हा सुरु होतं चक्र,
करिअर-करिअर दळण दळता,स्वास्थ्य होतं वक्र.

सोनेरी वेली वढत जातात,घरा भोवती चढलेल्या,
आतुन मात्र मातीच्या भींती कधीही न सारवलेल्य.

आयुश्याच्या संध्याकाळी मग एकदम जणवु लागत काही,
धावण्याच्या हाट्टापाई श्वासच मुळी घेतला नाही.

सगळ काही पहाता पहाता आरशात पाहण राहुन गेलं,
सुखाची तहान भागता भागता समाधान दुर वाहुन गेलं.

सुखाची तहान भागता भागता समाधान दुर वाहुन गेलं----

Tuesday, July 31, 2007

मला वाटतं माणूस आठवणींवर जगतो
वाटलं तेव्हा आठवून त्याना गोंजारत बसतो............

मग गोड आठवणी असल्या की खुद्कन हसून
क्षणिक आनंदात हरवून जातो...........

आठवणी ठेव्यासारख्या जपाव्यात मनाच्या कोपर्‍यात
कारण हा ठेवा हवा तेव्हा उलगाडू शकतो...........

आठवणिंपासून पाठ फिरवू नये कधीच
कारण या आठवणिंपासुनच बरच काही आपण शिकतो.......

कडू आठवणिंपासून परत ती चुक न करण्याचे धडे
तर गोड आठवणिंपासून आयुष्य आनंदात जगण्याची प्रेरणा घेतो......

म्हणून मला वाटतं आठवणींच्या कडू गोड रंगासोबत
आजचं सुंदर चित्र रंगवाव ...जगून पहावं आठवणींसोबत.....

.... सई(सुप्रिया पाटील)

का मी तिच्यावर जीव लावुन बसलो?????

प्रेमात फ़क्त असंख्य वेदनाच मिळतात
हे माहीत असुन नादानपणा करुन मी बसलो
का मी तिच्यावर जीव लावुन बसलो???

कदाचीत वेडा झालेलो मी
एका अनोळख्यासाठी मी
जवळच्यांना गमावुन बसलो
तिने दाखवलेलं प्रत्येक स्वप्न एक भास होतं
ती सगळी स्वप्ने मी खरी समजलो
का मी तिच्यावर जीव लावुन बसलो???

आधी प्रत्येक क्षण
माझ्या आयुष्याचा आनंदाच्या दिव्याने उजळलेला होता
का मी स्वत:च्या आसवांनी हा पेटता दिवा विझवुन बसलो
का मी तिच्यावर जीव लावुन बसलो????

-- सचिन काकडे

Monday, July 30, 2007

"तू होतीस तेव्हा"....

तू होतीस तेव्हा.....
तो चंद्रही चांदण्याचं लेणं लेऊन रोज रात्री सजत होता.
खिडकितून तुझं सौंदर्य चोरुन पाहण्यासाठी रात्र रात्र जागत होता.
पाऊसही तुझ्याच भेटिसाठी धरणीवर बरसत होता.
तुझ्या गालावर रेंगाळण्यासाठीच तो थेंब थेंब बनून तरसत होता.

तू गेलीस नि बघ, आपल्या नात्याच्या धरतीवर प्रेमाचा दुष्काळ पडलाय,
आता तर पाऊसही पडत नाही .
चंद्रही दडून बसला कुठे,
चांदण्यांच दर्शनही मला आता घडत नाही.

तू गेल्यापासून आसवांनीही माझी साथ सोडली.
सुख दुःखात समान साथ देणाऱ्या अश्रूंनीही साथ सोडावी
अशी सांग, माझ्याकडून गं काय चूक घडली।

तुझ्या साथीत थंडी नेहमीच गुलाबी वाटायची,
आता नुसताच बोचरा वारा असतो.
स्मृतीभ्रंश झाल्यापरी त्या गुलाबी आठवणींनाही
आता या शुष्क मनांत थारा नसतो.

तुझ्यासवे माझा प्रत्येक दिवस नवा होता.
तुझ्या प्रेमाचा नि सहवासाचा प्रत्येक क्षण मला पुनःपुन्हा हवा होता.

आता मात्र दिवसही वाटतो मला काळरात्र.
रोजंच ऊगवतो सूर्य माझ्यासाठी घेऊन न संपणारं हे काळोखाचं सत्र.
आता मात्र एकंच सांगणं आहे तुला.....
परत तू येऊ नको...
अर्ध्यावर सोडण्यासाठी माझा हात आता हाती तुझ्या घेऊ नको.

तुझ्याशिवाय आताशा जगायलाही मी शिकलोय.
हसू येत नाही ओठी पण,
मनावरचा घाव दाबून धरुन सर्वांसमोर खोटं खोटं हसायला मी शिकलोय.

येऊ नको परत, माझं नातं नव्यानं त्या आसवांशी जोडण्यासाठि.
शुष्क डोळ्यांनीच जगू दे आता ,
दाखवू नकोस स्वप्नं, एकत्र जगण्या मरण्याची परत एकदा मोडण्यासाठी....
दाखवू नकोस स्वप्नं, एकत्र जगण्या मरण्याची परत एकदा मोडण्यासाठी....

-- कुणाल.
कळत नाही कधी कधी

कळत नाही कधी कधी,
हे असे का होते?
मन कोणासाठी तरी,
एवढे वेडे का होते?

ज्याच्यासाठी हे वेडे होते,
त्याला ते माहितीही नसते,
मग आपल्याच मनाला,
हे असे का होते?

कधी स्वपनांच्या दुनियेत हरवते,
कधी जगाला ही विसरते,
कधी मोहाच्या चार क्षणांसाठी,
हे क्षण क्षण झुरते.

माहिती नाही अजुन हे,
असं किती दिवस चालणार?
स्वपनांच्या दुनियेतून अखेर हे,
माझं मन कधी बाहेर पडणार?

-- गायत्री
तु आहेस म्हणून ...

सखे, तु आहेस म्हणून ,
मी माझा आहे..
तुझ्या स्वप्ननगरीचा मी
एक प्रेमवेडा राजा आहे...

तु आहेस म्हणूनी मला,
इतक्या उंचावरून कोसळायला होतं..
तुझ्याच अंगावर मग मनसोक्त
हळूवार ओघळायला होतं

तु आहेस म्हणून मला,
कशाचिही भिती राहीली नाही..
तुझ्यासाठी मरणाचीसुध्दा
मी सीमारेषा पाहीली नाही..

तु आहेस म्हणूनी मला,
कष्टाची जाण झाली..
स्वत:च्या पायावर उभा राहुन.
अखेर माझी मान ताठ झाली..

तु आहेस म्हणून मला,
माझ्या जिवनात बहर दिसू लागला..
काटयाकुट्यांच्या माझ्या वाळवंटी जिवनात..
सुंगधीत फुलांचा कसा अखंड सडा पडू लागला..

तु आहेस माझ्यासोबत कायमची म्हणून,
आता जातीची बंधने विसरू लागलो..
प्रेमाला लफडं समजणार्‍या या समाजाला..
खरोखर प्रितीचा परिचय देवू लागलो..

तुझ्या या जिवनमरणाच्या साथीला,
माझा नेहमीच सलाम असेल..
आपुल्या या प्रेमाला वाईट समजणार्‍या
समाजाला माझा कायमचा राम राम असेल...

-- आ. आदित्य ...

पाहुणचार...

सोंगे सगळी संपून गेली; सरत तरी ही रातच नाही
अश्या प्रवासा शेवट कुठला; अजून जया सुरवातच नाही

जेव्हा होतो घेणारा मी; दोन करांनी घेतच गेलो
वेळ आली जेव्हा देण्याची; कळले मजला हातच नाही

शिशिरामध्येही गाणारा; कोकीळ होता एक खुळा
स्वप्न भंगले त्याचे आता; वसंतातही गातच नाही

काय करू मी पेटवले घर; उजेड गावाला देण्या
शोभेचे रे दिवे चहुकडे; आत तयांच्या वातच नाही

कितीक पडलो, रडलो, हरलो; तरी खुमखुमी आम्हा किती
"शहाणपणा" हा शब्द आमुच्या; शब्दांच्या कोशातच नाही

मार्ग निवडला तूच असा की; एकही पथछाया ती नसे
सर्वे ॠतूत्‌ पायांना चटके, केवळ ह्या ग्रीष्मातच नाही

आहे माझा पाहुणचारच; खास असा की काय करू
माझ्या घरी जे दुःख येतसे; परत कधी ते जातच नाही

आशिष्‌
मी कैकेयी....महाराणी कैकेयी
मीच ती, आजवर विवंचनेत जगणारी
आजवर उपेक्षीत नजरांना कवेत घेणारी
अयोध्या नगरीची, मीच
महाराणी कैकेयी

मी एकमेयाद्वीतीय
मझ्या नावाचा उल्लेखही नसतो कधी!
कुणीच बाप आपल्या लेकीचं नाव
चुकुनही कैकेयी ठेवत नाही
अशी एकली अभागी
मीच ती
महराणी कैकेयी.....

मी सगळ्यंच्याच नजरेतून उतरलेली
मनातून उतरलेली
आजीवन आरोप माझ्यावर
माझ्या कुव्यवहारचा..
अजून झेलणारी
मीच ती
महाराणी कैकेयी...

काय चुकलं माझंएक आई म्हणून
माझ्या मुलाला राज्याभिषेक घालाव हे?
का त्यासाठी श्रीरामानं वनवासात जावं हे?
शेवटी आई मुलांच भलं नाही पहणर तर कोण?
पण मुलांकडूनही प्रताडीत होणारी..
मीच ती
महाराणी कैकेयी

हो मी धाडलं रामाला वनवासात
माझे "वर" मागून घेतले मी
महारज दशरथांनीच दिले होते मला
माझं सामर्थ्य पाहून..कारण
युद्धात करांगुलीवर रथ चालवणारी
मीच होते..मीच ती
महाराणी कैकेयी...

मी रामायणाची रचैती
मीच घडवलं सारं रामायण
मीच धाडलं रामाला वनवासात....
का?...करण ते व्हायलाच हवं होतं

मीच धाडलं रामाला वनवासात..
परम भक्त हनुमंतासठी
नाहीतर कशी भेट झाली असती त्याची त्याच्य सदगुरुशी?
मी धाडलं रामाला वनवासात..
महाराज दशरथासाठी...
श्रावणबाळाच्या मातपित्यांचा पुत्रवियोगाच्या शापातून
कसे मुक्त झाले असते ते?
मी धाडलं रामाला वनवासात
शबरी साठी, शुर्पणखेसाठी
शबरीची बोरं कुणी चाखली असती?
कशी पावन झाली असती शुर्पणखा?
मी धाडलं रामाला वनवासात
सुगीवासाठी, वाली साठी
कसे सुटले असते त्यांचे प्रश्न?

मी धाडलं रामाला वनवासात
मरिचा साठी, रावणासाठी
भरतासाठी, ल़क्षमणासाठी
कसा मुक्त झाले असते मरिच अन रावण?
भरताचं बंधूप्रेम तरि कसं कळलं असतं श्रीरामाला?
अन लक्ष्मणाच्या हतून तरी ईशसेवा झाली असती?

मी धाडलं रामाला वनवासात
अनेकांच्या मोक्षासाठी
अनेकांच्या रक्षणासाठी
अनेकांच्या समाधानासाठी....
हो मीच ती...
रामयणाची "अज्ञात" रचैती
महाराणी कैकेयी...

आजवर मी केलेल्या कृत्यांमुळे
अवहेलनाच होत आलिये माझी
पण मी तरी काय करणार?
ही माझी नव्हे....
"त्याचीच" इच्छा होती...
मी तर "त्याची" सेवक
त्याच्यासाठी जगणारी
मीच ती
महाराणी कैकेयी....

तो जाणत होताच
माझ्याशीवय इतकं मोठं कृत्य
कुणी कुणिच करू शकत नाही..
आजन्म अपशब्द सहन करण्यचं सामर्थ्य
फ़क्त माझ्यातच....कारण
मीच ती..
महाराणी कैकेयी....

-- सुचि नाईक
अनवाणी चाललो तेव्हा

अनवाणी चाललो तेव्हा ,केला मी इतरांचा हेवा
मनात म्हटलं " साधी तरि चप्पल मला दे रे देवा"
....
पाय घातला चपलेत आणि वाटल आत जिंकलच जग
चप्पल मात्र जुनी पुराणी वाटु लागली लगेच मग
म्हटल "आतi नवीन हवी,सुन्दर आणि सुखदायी
तेवढं जर दिलंस देवा आणखी काही मागणार नाही"
...........
ते मिळलं मग वाटलं एक आता पुरत नाही
अजुन एक,अजुन एक हौस काही भागत नाही.
हे हवं ..ते ही हवं.. मिळवुन ना तर खेचुन घ्यावं
जगामधील सारं सुख माझ्या पायाखाली हवं
उरापोटी धावुन शेवटी, केलच सारं जमा भोवती
पर्वाच केली नाही जरी, तुटली सारी नाती-गोती
..........
सगळ्या सुखात आहे एकटा, निर्जीव भिंती, निर्जीव वाटा
ढिगभर चपलांमधे बुडुन गेलो आहे पुरता
...............
आता मात्र हाव नाही, खरंच सांगतो नको काही
चपला तर खुप आहेत, पाय मात्र उरले नाहित...


(या कवितेत-चप्पल हे क्षुल्लक भौतिक गरजांचे प्रतिक॥)

-- पद्मश्री चित्रे
शेवटची भेट...........

मला ती आज शेवटच भेटणार होती
दुख:शी भेट माझी आज तिथेच घडणार होती
आजचा दिवस सहज सरत होता
"अरे जरा दमानं" सांगितल तरी ऐकत नव्हता

तिला आज भेटुच नये असे वाटत होतं
मन माझं तिच्या निरोपाच्या
भयाने आतल्याआत तुटत होतं
पण पुन्हा तिचं ते मोहक रुप,
ते गहिरे डोळे मला दिसणार नव्हते
एकदाच शेवटच म्हणत
आज मन तिच्यासाथी हरणार होतं

कधी नव्हे ते आज पोहोचलो मी वेळेवर
नेहमी जिथे बसायचो बसलो
हात टेकवत त्या बाकावर
आज बागेतली गुलाबी फ़ुलं
मला काळी कुळकुळीत दिसत होती
पाखरांचे ते किलबीलणे मला विरह गाणी वाटत होती

अचानक बागेतलं वातावरण शांत झालं
"ही वादळापुर्वीची शांतत रे"!!
जणु मला इशा-याने सांगितल
हळु हळु काळे ढग जमु लागले
माझा हा विरह सोहळा पाहण्यास जणु ते आतुर झाले

तेवढ्यात ती आल्याची चाहुल लागली
तिने मला पाहताच लगबगीने पावलं टाकली
ती जवळ जवळ येत होती आणि पाऊशी सुरु झाला
सोबत त्याच्या विजाही कडाडु लागल्या

"आज तिच्या नजरेला नजर देउनच बोलणार"
मनात मी शपथ घेतली
पण ती समोर येताच माझ्याच
नजरेने माघार घेतली, नजर माझी भेदरली

ती शांत उभी होती
"उशीर का केलास"? मी विचारले
"अरे काम होतं जरासं!!" ती उत्तरली
बरं ठिक आहे म्हणत!! मी मान वळवली

का रे काय झाले ? तिने विचिरले
कुठे काय !! काही नाही ?
म्हणत मी तिच्या त्या प्रश्नाला टाळलं

"अछ्चा माझं लग्न ठरलय तो युएसए ला आहे"! तिने हसत सांगितल

माझं काय? मी झुरत विचारलं
अरे सॉरी घरातले तयार नव्ह्ते
मी तरी काय करु ?? सगळं गणितच चुकले
चल मी निघते म्हणत ती उठु लागली
पाठी न बघताच ती पुढे चालु लागली

नजर माझी तिच्या पाठमो-या
आकृतीकडे फ़क्त पाहत राहीली
हळु ह्ळु तिची ती आकॄती
माझ्या डोळयात फ़क्त भीजत राहीली
सोबत पावसाची सरही वाढु लागली
त्या पावसाच्या पाण्यात माझ्या
स्वप्नांची कागदी नाव बुडु लागली

सचिन काकडे [जुलै २८,२००७]

तू

लावण्य तू, सौंदर्य तू, विश्वास तू;
आयुष्यातिल अखंडित श्वास तू.

स्वर्गाच्या नगरीची आरास तू;
मोहरल्या कुसुमांत सुवास तू.

पौर्णिमेचे मोहक आकाश तू;
चंद्राचा मंद मंद प्रकाश तू.

अथांग सागरी लाटांची गाज तू;
किरणांचा सप्तरंगी साज तू.

वावरते सदा आसपास तू;
सत्य आहे की मनीचा भास तू?