केव्हा तरी असा, साज तुझा थांबलेला
तुटल्या तारा तरी, सूर तुझा रेंगाळलेला ।शब्द थांबले ओठी, जल राहीले नेत्री
स्वर तुझा मायेचा, काळजात दाटलेला ।सोळा शृंगार माझे, दर्पणी या राहीले
वेणीतील मरवा, तुझ्या श्वासानेच गंधाळलेला ।मैफिल संपता जासी, निः संग होउनी तु
सैरभैर तुझ्यासाठी, जीव माझा व्याकूळलेला ।काटा रुते तुझ्या पायी, कळ माझ्या काळजात
उंबऱ्यात या माझा, पाय कसा थांबलेला ।-- मनीषा
आनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...
आजचा विशेष
मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे
-- आनंद काळे
बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.
Friday, December 07, 2007
मनात भरते प्रेमाची घागर.....
कुठून तरी मग येते लाट.....
किनारा होतो भुई सपाट.....
ओहोटी भरती येतच राहते.....
आपला किनारा चाचपुन पाहते.....
कधी कधी येते लाट किनारी......
तर कधी दूर दूर आत घेउन जाते....
भरतीच्या वेळी स्वतःला सांभाळायचं.....
आलेल्या लाटेवरती तरंगत राहायचं.....
ओहोटी आली की पुन्हा तेच......
भरतीची वाट पाहत झुरत राहायचं.....
किना-याने ठेवावी एकच आस......
न धरावा सारखा भरतीचा ध्यास......
अथांग सागर घेउन येईल लाट......
पुन्हा होईल मग किनारा भुई सपाट......
पुन्हा होईल मग किनारा भुई सपाट......!!
........अमरीश अ. भिलारे
पेटत्या वणव्यातही घरकूल आम्ही थाटतो
चालतो काट्यांत अन वाणे फुलांची वाटतो
वेदनांना घाबरूनी प्रेम का होते कुठे?
दुःख अमुचे पाहुनी गहिवर सुखाला दाटतो....
वाटते, येथे जगायाची न अपुली लायकी
काय मैफीलीस या रुचणार अपुली गायकी!
गूढ या मंचावरी अदृष्य पडदे शेकडो
नायकाचे सोंग काढुन वावरे खलनायकी...
....
का अश्या साध्याच गोष्टी कठीण आता जाहल्या
साद प्रतिसादात या भिंती उभ्या का राहिल्या?
संशयाची आरशी चढली कशी डोळ्यांवरी?
भरवश्याच्या राहिल्या ना आपल्याही सावल्या.....
....
कसे सांगू कुणी मधुमास होते फुलविले
कुणी सुखवीत दळ एकेक कळिला खुलविले
अता गंधावरी ज्या भ्रमर येती धावुनी
कुणी श्वासांत अत्तर जीवघेणे शिंपले....
....
श्वास येतो.. श्वास जातो.. चालते हे ह्रदयही
एकट्याने चालण्याची होत जाते सवयही
भेटलो नव्हतोच जेव्हा, काय मी जगलेच नव्हते?
का अता ही शांतता येऊन एकांती भिवविते?
....
खुळ्या नदीचे सारे जीवन
निळ्या सागरी गेले वाहुन
अथांग झाले अवघे जीवन
विराग सुंदर अनुरागाहुन
....
ज्यात गवसली खरी मुक्तता
असे कसे घातलेस बंधन
तुझ्यावरी वाटते रुसावे
आणि स्वतःशी होते भांडण
...
तोच पडतो प्रश्न वारंवार की हे का असे?
सरळमार्गी चालणा-याचे जगी होते हसे
फूल जे जे वेचण्या जावे, निघे ते कागदी
हात जोडावे तिथे पाषाण निर्मम का दिसे?
--स्वाती आंबोळे
एक होता विदुषक.....
एक होता विदुषक,
सगळ्यांना खूप हसवायचा,
मनावरचा ताण,
चूटकि सरशी घालवयचा.
एक होता विदुषक,
खूप मेहनत करायचा,
लोकांचे दु:ख दूर करण्यास,
सदैव धडपडायचा.
एक होता विदुषक,
स्वता:चं दु:ख विसरायचा,
दूस-यांच्या दु:खांना,
आपलसं करायचा.
एक होता विदुषक,
कधीच नाहि रागवायचा,
लोकांच्या हिणवण्याला,
हसत हसत स्वीकारायचा.
एक होता विदुषक,
एकदा खूप दुखावला,
दु:खाचा सागर,
त्याच्यावर ओढवला.
लोकांना हसवणे,
त्याचे कमी झाले,
अन लोकांनीहि त्यच्याकडे जाणे,
हळू हळू बंद केले.
एक होता विदुषक,
एकटाच पडलेला,
ह्या स्वार्थी लोकांनी,
त्याला दु:खात ढकललेला.
खूप आक्रोश केला,
पण कोणी नाहि आले,
शेवटच्या घटका मोजताना,
त्याला जुने दिवस आठवले.
लोकांना हसवण्यासाठि,
जीवाचा आटापिटा करायचो,
इकडे-तिकडे भटकत,
पोटासाठि झगडायचो.
एक होता विदुषक,
असाच निघून गेला,
लोकांच्या मनात मात्र,
घर करून बसला.
एक होता विदुषक.......
---निलेश लोटणकर
ती असावी मनात
आणी सतत विचारात
आठवण कधी आली तर
यावी समोर क्षणात
कधी रुसणारी कोपरयात
कधी हसणारी गालात
स्वच्छन्द बागडणारी आणी कधी
मला ठेवणारी भानात
थोडी भिजणारी पावसात
कधी लाजणारी उगाच
हळवी व्हावी केव्हातरी
आणी अल्लड कधी वागण्यात
अशीच यावी आयुष्यात
होउन एक नवी पहाट
दवबिन्दुसम निरागस ती अन्
तशीच रहावी माझ्या मनात...
कवी: अद्न्यात
Thursday, December 06, 2007
गेलेले क्षण आठवतं होती...
तिच्या प्रत्येक अश्रुमध्ये त्याची
प्रतिमा होती...
तिच्या प्रत्येक हाकेत
त्याची दिशा होती...
सुर्याकडे तिच बघणं थांबत नव्हतं.
सांज होत आली...
त्याची वाट पहाता पहाता...
पणं तो काही दिसतं नव्हता.
सुर्य बुडून गेला...ति अशीच उभी तिथे!
सारखं घड्याळाकडे पहायची....एकटक!
सुर्य बूडून गेला होता कधीचं...
घड्याळही चालत होतं...पणं
तिचे गळणारे अश्रु थांबले होते...
हे तिला कळतं नव्हतं.
-- कल्पेश फोंडेकर
सारेच तुझ्याकडे विसरून देहभान..
तु ना लाजतेस छान, म्हणून तर बघ कसे ते
मत्सराने सळसळते लाजाळूचे पान...
तु ना दिसतेस छान, म्हणून तर बघ कसा तो
आरसा माझ चित्र किती सुंदर म्हणून उंचावतो मान..
तु ना चालतेस छान , म्हणून तर बघ कसे त्या
वाटा फुलून जातात अन सजते हिरवाईने ते माळरान..
तु ना गातेस छान , म्हणून तर बघ कसे
दंग झाले ते बिरजू,तानसेन विसरून सारे सुरांचे तान..
तु ना नाचतेस छान, म्हणून तर बघ कसे ते
म्हणतात तुला तु तर नटराजाची नर्तिका महान..
तु ना खरोखरचं माझीच शान , ये माझ्या मिठीत म्हणजे..
म्हणजे अपुर्णातला मी होईल पुर्ण अन येईन माझ्या जगण्याला यशाचे उधाण..
-- आ.. आदित्य...
Wednesday, December 05, 2007
सावळी ती तुझी काया
आणि पसरलेला तो सुगंध,
पहाटेच्य त्या गुलाबी प्रहरा
मन होऊन गेले धुंद
खुप त्रास होतो मला
जिव कासावीस होऊन जातो
ओळखीचा कुणी समोरुन
जेव्हा ओळख न दाखवता निघुन जातो
काही चुका मी केल्या
मला त्या मान्य आहेत
पण तुलाही मी उमगलो नाही
यातही का चुक माझीच आहे?
-- आनंद काळे (तुमचा आनंद)
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...
तिच्या चेहरयाला चन्द्र म्हणण्याची
त्याची सवय काही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरीही
त्याने जीद्द सोड्लेली नसते
तिच्या सॊन्दर्य़ाचे गुणगाण करण्याचा छन्दच जणू त्याला जड्लेला असतो
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...
पान-टपरी वाल्याकडे त्याची अगदी महिनो-महीने उधारी असते
तरी तिच्यासाठी चन्द्र आणण्याची त्याची एक पायावर तयारी असते
तिच्यासथि काहिही करण्याचा निर्धार, त्याच्या मनात खोल्वर दड्लेला असतो
कारण नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो........
तिच्यासाठी गुलाब तोड्ताना तो
कधी काट्यान्ची तमा बाळगत नाही
आणि ती; सोबत असेपर्यन्त त्याला,
दुखः कधीच उमगत नाही,
तिच्या क्षणभर दुराव्यानेही, तो दुखः सागरात बुडालेला असतो
कारण नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो...........
-- विशाखा
प्रेमात तुज़या,या निशब्दाचे शब्द कमी पडले
दुखच्या वाटेवरती सुख कमी पडले
केले ना ना शब्दाचे वार तू माजवारी,
माज़या कतलेसाठी तुज़े हाटियर कमी पडले
होते ग! माज़या ओठांवरही स्मित आधी कधी,
आता मला हसण्याचे भास कमी पडले
न समजू शकलीस या निशब्दला कधी तू,
कदाचित,माज़ेच प्रेम कमी पडले
तुला दोष का म्हणून द्यावे,खरतर,
तुज़ा एक होकार एकण्यासाठी माज़ेच श्वास कमी पडले
कवी: अद्न्यात
Tuesday, December 04, 2007
दोन चाके असावी लागतात
माझी जीवन गाडी चालविण्यासाठी
एक चाक बनशील का?
सुख आणि दु:ख या
एकाच नाण्याच्या दोन बाजु
या दोन्ही वेळी नाण्यासारखा
अजोड राहशील का?
चुका माणसाकडुन होतातच
त्यातुनच तो शिकत असतो
आयुष्यात माझ्याकडुन चुक झाली
तर प्रेमाने समजावुन सांगशील का?
एकमेकाच्या साथीशिवाय
आयुष्यात मजा येत नाही
हे आयुष्य सुंदर बनविण्यासाठी
शेवटपर्यंत बरोबर राहशील का?
न मागता मिळण्यात जो आनंद असतो
तो मागुन मिळण्यात नाही
आजन्म तुझ्या प्रेमाच्या साथीशिवाय
मी अजुन काही मागत नाही
कवी: अद्न्यात
ज्याला सगळेचजण झेलुन घेतात
प्रेम म्हणजे मरण असतं
ज्याच्यासोबत सगळेचजण खेळुन घेतात
जगुन घ्यावे तुझ्याचसाठी
असेच मजला वाटे गं
वाट तुझी मखमली व्हावी
मिळोत मजला काटे गं
तू म्हणतेस की तुझ्या मनात माझ्यासाठी
आभाळाएवढं प्रेम दाटतं
अह! तुझ्या प्रेमापुढं सये
मला आभाळचं ठेंगणं वाटतं
सळ्सळ्ती पाने उधणत्या लाटा
तुज्या आठवनीचा तेवढाच मोठा वाटा
पाण्यातलं चांदणं सुंदर असतं
तसच मनातलं चांदणसुध्दा सुंदर असतं
पण ते ओळखता आलं पाहिजे
त्यात मनसोक्त नाहता आलं पाहिजे
कोणी गेलं म्हणुन आपण
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं,
जगायचा असतो प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं.
आठवणींच्या वाटांवरुन
आपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं,
आभाळापर्यत पोहचता येत नसतं कधी
त्याला खाली खेचायचं असतं.
कसं ही असलं आयुष्यं आपलं
मनापासुन जगायचं असतं,
कोणी गेलं म्हणुन उगाच
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं.
दिवस तुझा नसेलही,रात्र तुझीच असेल
त्या रात्रीला नवं स्वप्न मागायचं असतं,
तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं.
कोणी गेलं म्हणुन........
पावसाच्या सरी सगळ्यांसाठी असतात ...
पण मनात भरून आलेले ढग आपलेच असतात !
मनातलं वादळ कोणालाच दिसत नाही ,
बरसणाऱ्या अश्रूंच्या सरी फ़क्त आपल्याच असतात !!!
दोन क्षणांची ओळख
दोन क्षणांची मैत्री
मला का वाटली
कोणीतरी सोबत असल्याची खात्री
प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........
हे प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........
तुझ्याशी खुप खुप बोलावेसे वाटते...........
पण शब्द चुकण्याची भीती वाटते............
तुझ्या खुप खुप जवळ यावेसे वाटते.........
पण विरहाची भीती वाटते.....................
तुझ्या सोबत चालावेसे वाटते.................
पण रस्ता चुकण्याची भीती वाटते............
तुझ्या नजरेला नजर द्यावीशी वाटते.....
पण पापण्या मिटण्याची भीती वाटते......
तुला बाहुपाशात घ्यावेसे वाटते.......
पण मिठी चुकण्याची भीती वाटते.....
Monday, December 03, 2007
नाही सांगता येणार
सौंदर्य तुझं कवितेच्या मर्यादेत
नाही व्यक्त करता येणार
तुझ्याकडे एकटक पाहीले की
आठवतो तो सागर किनारा
मऊ मऊ रेतीत
तुझ्या हास्याच्या असंख्या लाटा फेसाळणार्या
तुझ्या चेहर्यावरचे सप्तरंग
पाहता पाहता मी नेहमीच दंग
सोबतीस तेव्हा मग तुझ्याच आठवणीचे
मनास सुखावून जाई अनोखे तरंग
तुझे ते रेशमी केस,
झालर जणू मखमलीची
मग वाटते घ्यावे तुला मिठीत अन
चोरावी गुलाबी खळी तुझ्या गालावरची...
तव डोळ्यात नजर जाते,
अन तुझी नजर झुकवून मलाच पाहते,
अन पुन्हा एकदा तु स्पर्शात माझ्या
तुझ्या गुलाबी ओठांची किनार
का उगाच घट्ट दातांखाली लपवून ठेवते...
-- आ.. आदित्य...
भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये!
साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!
कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख;
किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठी तरी परत ये!
महागाई फार वाढली, अश्रुही संपले माझे;
पुन्हा एकदा फक्त, मला रडवण्यासाठी तरी परत ये!
मी वेडा, मी मूर्ख, मी बावळट, मी अक्कलशून्य;
तू तुझा समजूतदारपणा दाखवण्यासाठी तरी परत ये!
थोडीतरी कर, माझ्या प्रेमाची किंमत तू;
कवडीमोल भासले तर, भीक घालण्यासाठी तरी परत ये!
तुझ्या आठवणींत झुरुन, मन माझे खाक झाले;
या नश्वर देहाला, आग देण्यासाठी तरी परत
-- मयूर..
तू विसरु शकशिल का?
ते गोड क्षण,
माझं हळवं मन;
तुझी अखंड बडबड,
आणि माझं नि:शब्द मौन.
तू कसं विसरु शकतेस?
तूझं मुग्धपणे हसणं,
हसताना मोहक दिसणं;
तुला डोळ्यात साठवताना,
माझं भान हरपणं.
तू कसं विसरु शकतेस?
तुझं ते अलगदपणे माझ्या मिठीत शिरणं,
घरची आठवण काढुन उगाच मुसमुसणं;
तुझ्या हळवेपणाला मझ्यात समावुन घेताना,
माझं तुझी समजुत काढणं.
तू कसं विसरु शकतेस?
आपलं ते चांदण्यांखाली जागणं,
तुटलेला तारा पाहुन तुझं देवाकडे काहितरी मागणं;
जन्म-जन्मांच्या साथीची आण घेताना,
तुझा हात माझ्या हातात गुंफणं.
तू कसं विसरु शकतेस?
माझं ते तुझ्यासाठीचं तळमळणं,
तुझ्या स्वप्नांसाठी निद्रेची आराधना करणं;
तरीही नेहमी तुझ्या विचारात गढुन,
माझं रात्र रात्र जागणं.
तू कसं विसरु शकतेस?
तू कसं विसरु शकतेस;
माझं प्रेम,
माझ्या भावना,
माझं मन,
माझ्या वेदना.
सांग, तू विसरु शकशिल का?
-- मयूर .....
तुला चिडवायची
चिडवल्यावर तुझ्या रुसन्याची
रुसून गालातल्या गलत हसण्याची
तुझे माझे ना एकायची सवय झाली आहे
तुझे बरोबर आता ना जमायची सवय झाली आहे
तुझ्या बरोबर मुद्दे मांडता मांडता
थोडे गुद्दे खानायची पण सवय झाली आहे
आता तुझ्यविणा जगायची सवय झाली आहे
आठवून आठवून विसरायची सवय झाली आहे
डोळ्यानं तू आहेस असे समजून फसायची सवय झाली आहे
अश्रू मुखवट्या आड ठेऊन हसायची सवय झाली आहे
-- कुडाळ विजय
प्रतिबिंब मनाचे मांडताना....
कागदालाही रडू फ़ुटले आज
माझे दु:ख वाटताना.....
दिवसा उजेडात स्वत:ला सावरताना...
सायंकाळी सुर्य अस्ताला जाताना...
अश्रुही अपुरे पडलेत आता
काळजाची आग विझवताना....
तुझ्या सोबत हसताना....
एखादा अश्रु पुसताना....
हर-एक क्षण जातो आता
आठवणीची राख गोळा करताना...
भावना तुला सांगताना...
मन मोकळे करताना....
बधिर मात्र तु झाली होतीस
माझा अंत पाहताना....
---- हर्षल पाटील
आणि मग डोक्याला ताप आहे
आल्या तश्या किती तरी पोरी आयुष्यात
तपस्या भंग करायची काय कोणाची टाप आहे
पण काय सांगू मित्रांनो
ह्याच मुली वर मेनकेची छाप आहे
निम्म्या झोपेत बरळतो ,दचकून जागतो
भरला अंगाला नुसता काप आहे
इकडे तिकडे चोहिकडे दिसे ती
हा काय प्रेमाचा मला शाप आहे
शेवटी भेटलो एकदा प्रियतमेला
आळावले मी माझ्या तिलोत्मेला
पळवून न्यायला निम्म्या रात्री गेलो धीर धरून
तर दारात उभे तिचे आई बाप आहे
आज नांदतो आहे आम्ही सुखाने पण काय सांगू
स्वप्नातच काय दिवसा पण तिचा मला ताप आहे
-- कुडळ विजय