आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, August 10, 2007

ओठावरती नाव तुझे अन डोळ्यासमोरी तुझे धुके,
कधी बोलते एकट्यात मी कधी राहते प्रेम मुके

कधी ओघळतो ओठांवरुनी आठवणींचा थेंब तुझा,
सरसर सरसर फुले पालवे सगळ्यांत असूनी एकांत सुका

पुन्हा मागते तुझी मिठी अन पुन्हा मागते स्पर्श तुझा,
मी हरवून जावे तुझ्या कुशीतच तू द्यायला येना सखा.


देशील कां तू साथ मला, जीवनभर अशी?
ठेविन मी सुखात तुला, घेतो शपथ अशी...

जीवनरथाचे एक चाक मी होईन.
भार दुज्या चाकाचा मीच वाहीन.
ठेवशील कं हृदयात मला,जीवनभर अशी?
देशील कां तू साथ मला, जीवनभर अशी?

तुझ्या दुःखद क्षणांचा होईन भागिदार मी,
तव सर्व कामांत होईन हो मदतनीस मी,
लाभेल कां तुझी संगत मला,जीवनभर अशी?
देशील कां तू साथ मला, जीवनभर अशी?

तुझिया डोळ्यांतील प्रत्येक स्वप्न होईन मी,
तुझे स्वप्न सत्यात उतरवून दाखवीन मी ,
माझा जाणशिल कां तू मला,जीवनभर अशी?
देशील कां तू साथ मला, जीवनभर अशी?


आत्ताचं कलयुग़ी प्रेम... (बोधकवीता)

पुर्वी प्रेमपत्रांची काय वाट पाहीली जात असे..
आता मात्र पोरा-पोरींच्या कानाला फक्त मोबाईलच दिसे..

आधी एकमेकांची वाट बघण्यात चांगल वाटायचं..
आता मात्र २ मिनीटे उशीर झाला तरी रूसून घर गाठायचं..

तळ्याकाठच्या भेटीत प्रतिबिंब पाहात तासनतास घालवायचे..
आता मात्र मल्टिप्लेक्सच्या झगमगाटात तिच्याकडे कमी अन दुसर्‍याकडेच पहायचे..

जत्रेला चाललो म्हणून कधी नव्हे तो भेटण्याचा बहाणा मिळायचा..
आता मात्र रोज रोज शॉपिंगच्या बहाण्याणे टवाळक्या मारत फिरायाचे..

शाळेमधलं प्रेम वहीच्या त्या चुरगळलेल्या गुलाबातून दिसायचे..
कॉलेजात मात्र रोज रोज नविन गुलाब चक्क पायाखाळी तुडवायचे..

पुर्वीच्या प्रेमात वचनांत जिवाची पर्वा केली जात न्हवती..
आता मात्र रोज एक वचन मोडण्यासाठीच दिली जायची...

"प्रेम" या शब्दात ईश्वर आहे असं पुर्वी सांगायचे..
आता या शब्दाला स्वार्थासाठीच पणाला लावायचे..

पुर्वी पावसात तिच्यासोबत भिजताना लाजेचा पदर आडवा असायचा..
आता मात्र लाज सोडून मर्यादा ओलांडायचा कार्यक्रमच का असायचा..

पुर्वी मिठीत येताना किती बहाणे ऐकावे लागायचे..
आता मात्र जवळ येण्याचे नियम मजा म्हणून मोडतच रहायचे..

प्रेमाचं नात्यात रुपांतरण होताना मोठ्यांची मर्जी संभाळली जात होती..
आता मात्र सर्रास तोडले जातात त्या नात्यांच्या माळेतील मोती..

ही अशी प्रेमाची उलटी लक्तरे चव्हाट्यावर का यायला लागली..?
तुम्हीच सांगा आता, कलयुगाची झळ प्रेमाच्या फुलाला कशी हो लागली..

---- आ.. आदित्य...
एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्षणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्षणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा
इथे हळुच येवुन विसावलाय...एक प्रवास

धो धो पडण्याऱ्या पावसाचा थेंब..
मनाला ओला करत होता...
कुढेतरी नकळत मनात तो
आठवणींच्या गाठी बांधत होता...

नव्याने तो नवं नातं जोडत होता

कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........

काळोख्याच्या रस्त्यावरती तेव्हा.
दोन् जिवांचा प्रवास चालु होता.
तु मला नि मी तुला आधर देत्
मार्ग् मात्र निघत होता...

आयुष्यालाच् नवा मार्ग् मिळत होता
कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........


चिंब चिंब कोसळण्याऱ्या सरी
अन् सोसाट्यची थंडी
थर् थर् वारा कापत होता
सामसुम् त्या मंदिरामध्ये फक्त
आपल्याच टाळ्यांचा गजर होत होता

काहिहि नसताना काहितरी ऋनानुबंध होता

कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........
असे किती वेळा
तु माझ्यावर् अन् मी तुझावर् राग् धरला होता
किती जरी अबोला धराला तरी...
शब्द ओठांवरचा बोलकाच् होता...

असा कोणताच् क्शण् वगळता येणारा नव्हता ...

कारण...
तो पाऊस तुझा माझा होता........
एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल.
एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल

शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.

मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे

मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे

मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो

Thursday, August 09, 2007

एका गृहस्थाला सपाटून भूक लागली , म्हणून तो हॉटेल शोधत होता.तेवढ्यात त्याला पाटी दिसली.
त्यावर लिहिलं होतं , ' जेवणाची उत्तम सोय '
जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .
एकावर लिहिलं होतं ' शाकाहारी '
तर दुसर्‍यावर ' मांसाहारी '
तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये आणखी दोन हॉल होते.
डावीकडे पाटी होती , ' भारतीय बैठक '
तर उजवीकडे , ' डायनिंग टेबल '
तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.एकावर पाटी होती 'रोख' तर दुसर्‍यावर 'उधार'
तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला.
वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली.तो अचंबीत झाला .त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच त्याला खिजवायला ,
'फुकट्या , मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच आहे। हॉटेल नाही.'


एक वेड्यांचं हॉस्पिटल असतं. त्याला ३ मजले असतात. पहिल्या मजल्यावरील वेड्यांची खासियत अशी असते की त्यांना कुठलाही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर ते "हो" असंच देतात. दुसऱ्या मजल्यावरील वेडे काहीही विचारल्यावर "नाही" असेच उत्तर देतात. तिसऱ्या मजल्यावरील वेड्यांची तर तऱ्हाच वेगळी. त्यांना काहीही विचारले तर ते उत्तरच देत नाहीत.
काय....................कळला का जोक?????????????
.
..
...
....
.....
उत्तर "हो" असेल तर तुम्ही पहिल्या मजल्यावरचे वेडे....
उत्तर "नाही" असेल तर तुम्ही दुसऱ्या मजल्यावरचे वेडे...
थांबा.... काहीच उत्तर देनार नसाल तरी हुरळून जाऊ नका.......तिसरा मजला खास तुमच्यासाठीच राखून ठेवला आहे।
स्वगत म्हणजे मनातल्या मनात.
विवाहाची आमंत्रणपत्रिका आल्यावर आपण हळूच "आहेर आणू नये" हे वाक्य बघतो व सर्वानी फुकटचे जेवण हादडायला जायचं असं एका सेकंदात मनात ठरवितो, तशागत.
ऎकणारा समोरच्याचे खोटेच कौतुक करत असतो.
पण मनातल्या मनात काय म्हणतो ते पुढे पहाच.

बोलणारा(उघड):(आनंदाने)साहेब पेढे घ्या. ८ वर्षांनी पोर झालं. मुलगा झाला साहेब.
ऎकणारा(मनात):(मग एवढी वर्षे काय करत होतास?)

बोलणारा(उघड):साहेब ही माझी पत्नी सोनाली.
ऎकणारा(मनात):(मग एवढे दिवस तुझ्याबरोबर फिरत होती ती कोण?)

बोलणारा(उघड):साहेब मुलगा १०वीच्या बोर्डात ५वा आला.
ऎकणारा(मनात):(तो शेवटी का येईना मला काय करायचे?)

बोलणारा(उघड):विवाहाचं आमंत्रण द्यायला आलोय, सरोजशी लग्न ठरलंय.
ऎकणारा(मनात):(च्यायला, एवढे दिवस तर ती दिन्याबरोबर फिरत होती.)

बोलणारा(उघड):साहेब बढती मिळाली, उद्या पार्टी ठेवली आहे.
ऎकणारा(मनात):(एवढी वर्षे चमचेगिरी केली त्याचा फायदा झाला म्हणायचा.)

बोलणारा(उघड):ही माझी बायको, पल्लवी
ऎकणारा(मनात):(ह्या माकडाला मस्त चिकनी बायको मिळाली. मजा आहे साल्याची.)

बोलणारा(उघड):हे फोटोंचे अल्बम पाहात बसा.
ऎकणारा(मनात):(आग लावा त्या अल्बम्सना, वैताग साला.)

बोलणारा(उघड):साहेब मला उद्या सुटी मिळेल का?
ऎकणारा(मनात):(अरे?उद्या तर मला तुझ्या बायकोला पिक्चरला घेऊन जायचे होते.)

बोलणारा(उघड):साहेब आपल्या रेश्मा मॅडम आज येणार नाहीत असा त्यांचा फोन आला होता.
ऎकणारा(मनात):(कशी येणार?काल संध्याकाळी तर मी तिला जोश्याबरोबर बागेत रेडहॅण्ड पकडले होते.)

बोलणारा(उघड):साहेब त्या सुंदर बाई आपल्या ऑफिसमधे का आल्या होत्या?
ऎकणारा(मनात):(तुला कशाला पाहीजेत त्या नसत्या चांभारचौकशा?)

बोलणारा(उघड):साहेब देव्याच्या कृपेने एकदाचा माझा मुलगा पास झाला.
ऎकणारा(मनात):(मग काय गावभर पेढे वाटू?)

बोलणारा(उघड):साहेब आज मी नवीन हिरो होंडा मोटर सायकल विकत घेतली
ऎकणारा(मनात):(बाकीचे काय फुकट घेतात की काय शिंच्या?)

बोलणारा(उघड):साहेब ५ वर्षे झाली, आता तरी माझं प्रमोशन करा की?
ऎकणारा(मनात):(लेका तुझं प्रमोशन म्हणजे माझी जागा आहे। ती तुला कशी देऊ?)

मज भेटले ते सारे श्रावण कोरडे होते
अन पाहिले मी जे ते स्वप्न भंगले होते

अपराध ना आठवतो मज होता काय घडला
गेलो जिथे मी त्यांनी काटे पेरले होते

नशिब फ़ुटके भेट तुझी न माझी उशिराच झाली
तुज भेटलो मी जेव्हा मज मरण भेटले होते

मज पाहण्या जळताना गाव असा लोटला होता
त्यांना उब दिली माझे जेव्हा सरण पेटले होते

कल्पनांचा पूर आता ओसरलाय
आता मला कविता सुचत नाहीत
शब्दच जणू काही हरवलेत माझे
कवितेत ते कुठेच दिसत नाहीत.

कवितेसाठी पुन्हां हा बाधं
या धरणाचा तुटावा लागेल
पुन्हां कल्पनांना पाण्यात वाहत
माझ्याकडे यावं लागेल.

कवितेसाठी पुन्हां माझ्या
पापण्यानां ओल व्हांव लागेल
ओघळल्यावर आसवे माझी
विचारंना त्यात भिजावं लागेल.

भिजण्याच्या भीतीने मग
माझेशब्दही माझ्याकडे परत येतील
आल्यावर पूर कल्पनांचा मग
कविताही माझ्या ओसरीला येतील....

-- पल्लवी खोट
भगवंताचे अधिष्ठान म्हणजे काय? - सुनील चिंचोलकर

श्रीमद् दासबोधामध्ये विसाव्या दशकात एक मौलिक ओवी येऊन जाते. समर्थ म्हणतात-

' सार्मथ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे।
परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे।।

या ओवीचा आजपर्यंत उपयोग कमी आणि दुरुपयोगच जास्त झाला आहे. याचे कारण या ओवीचे नेमके मर्म समजावून घेतले गेले नाही. वर्तमान युगात चळवळ हा शब्द अत्यंत लोकप्रिय झाला आहे. त्यात सार्मथ्य शब्द दादागिरी या अर्थाने वापरला जातो. याचा अर्थ चळवळीच्या नावाखाली माणसांनी वाटेल तो गोंधळ घालावा आणि त्याला भगवंताचे अधिष्ठान ठेवावे , असा अर्थ लोक लावतात. लोकांची भगवंताच्या अधिष्ठानाची कल्पनादेखील फार उथळ असते. देवाचा फोटो असला, देवाची पूजा केली म्हणजे भगवंताचे अधिष्ठान झाले. ही ओवी नीट समजावून न घेतल्यामुळे फार मोठा गोंधळ झाला आहे.

गणेशोत्सवाला गणपतीचे अधिष्ठान असते, याचा अर्थ गणेश मंडळाची सर्व चळवळ गणपतीच्या अधिष्ठानाखाली चालते. आता गणपतीपुढे अचकटविचकट चित्रपट गीते लावणे, मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे किंवा रात्री दोन-दोन वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावून नागरिकांना हैराण करणे या सर्व गोष्टी भगवंताच्या अधिष्ठानानेच होत असतात काय? मिर्झा राजे जयसिंग भगवान शंकराची पूजा केल्याखेरीज पाणीदेखील पीत नसे. शिवाजी महाराजांविरुद्ध लढण्यात यश यावे म्हणून त्याने एक यज्ञदेखील केला होता. याचा अर्थ मिर्झा राजांच्या चळवळीला भगवंताचे अधिष्ठान होते असे म्हणणार का? साताऱ्याचा अजिंक्यतारा प्रयत्न करूनही औरंगजेबाला मिळत नव्हता. १७०० साली त्या किल्ल्याजवळील खिंडीतल्या गणपतीला औरंगजेबाने गणेश याग केला. त्यानंतर त्याला किल्ला जिंकण्यात यश आले. या लढाईला भगवंताचे अधिष्ठान होते असे म्हणणार का? ज्या ब्रह्मावृंदाने हा गणेशयाग केला त्यांना तुम्ही पवित्र मानणार का? या सगळ्या प्रश्ानंची उत्तरे फार गंभीर आहेत. भगवंताचे अधिष्ठान हा शब्दप्रयोग एवढ्या सैल पद्धतीने वापरून चालणार नाही. त्यासाठी कर्माचा हेतू तपासावा लागेल. स्वामी विवेकानंद म्हणत असत- 'माणसे कर्माची फळं भोगत नाहीत तर त्या पाठीमागच्या हेतूंची फळे भोगतात.'

भगवंताचे अधिष्ठान ठरविताना कोणत्याही चळवळीचे हेतू तपासावे लागतील आणि परिणामांचे मूल्यमापन करावे लागेल. मिर्झा राजांची धामिर्कता दांभिक होती किंवा औरंगजेबाचा यज्ञ ही शुद्ध लबाडी होती. मिर्झा राजेंनी शिवाजी महाराजांच्या मुलुखातील अनेक गावे बेचिराख करून हजारो संसार उद्ध्वस्त केले. ज्या औरंगजेबाने शेकडो मंदिरे पाडली आणि हजारो मूतीर् फोडल्या, त्याला यज्ञ करण्याचा नैतिक अधिकार असूच शकत नाही. शिवछत्रपतींनी लढाईपूवीर् कुठे यज्ञ-याग केल्याची नोंद नाही. मात्र आपल्या सैनिकांना आज्ञा केली- 'तुम्ही रयतेस रंजीस आणू नका. रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नका. तुम्हास जे साहित्य लागेल ते बाजारातून विकत आणा.' महाराजांना जो पराक्रम करायचा होता तो त्यांनी मैदानात लढणाऱ्या शत्रूसमोर केला. त्यांनी एकही मोहिमेत सामान्य प्रजाजनांना त्रास दिला नाही. उलट महाराजांचे सैन्य पाहताच कुणी घाबरून पळू लागले तर ते सैन्यच लोकांना प्रेमाने दिलासा देत होते. पुढे पुढे तर महाराजांचे सैन्य आहे हे कळले म्हणजे लोक रांंगोळ्या काढून स्वागत करू लागले. आदिलशाही आणि बादशाही मुलखातील नागरिक आपला प्रदेश शिवाजी महाराजांनी जिंकून घ्यावा आणि स्वराज्याशी जोडावा म्हणून भगवंताला प्रार्थना करीत. महाराजांची चळवळ ही शुद्ध होती; कारण त्याला नैतिकतेचे अधिष्ठान होते. भगवंताचे अधिष्ठान म्हणजे नैतिकतेचे अधिष्ठान.

या ओवीतील पाहिजे हा शब्द असायला हवे (२ड्डठ्ठह्लद्गस्त्र) अशा अर्थाने नाही तर पाहिजे याचा अर्थ 'पाहायला शिका' असा होतो. ओवीचा अचूक अर्थ पुढीलप्रमाणे सांगता येईल-'या जगात जिथे जिथे हालचाल दिसते तिथे तिथे सार्मथ्य आहे. आपल्याला हे सार्मथ्य हालचाल करणाऱ्या जीवाचे आहे असे वाटते. मात्र ते सार्मथ्य म्हणजे भगवंताची शक्ती आहे हे पाहायला शिका.' पंखा, फ्रीज, हीटर या सर्वांमध्ये सार्मथ्याची चळवळ आहे. पण वीज नसेल तर ही उपकरणं काम करू शकतील का? ज्याप्रमाणे ही सर्व उपकरणे विजेच्या अधिष्ठानावर काम करतात त्याप्रमाणे जीवाची सगळी कमेर् भगवंताच्या सत्तेवर चालू असतात. चळवळ म्हणजे हालचाल आणि अधिष्ठान म्हणजे सत्ता. तात्पर्य, ही ओवी पूर्ण आध्यात्मिक आहे. सामाजिक अथवा राजकीय चळवळीसाठी शुद्ध हेतूने तिचा वापर होणार असल्यास समर्थ त्या भक्ताला क्षमा करतील. मात्र स्वार्थासाठी कोणी ही ओवी वापरेल तर तो अक्षम्य अपराध ठरेल.

- सुनील चिंचोलकर

Wednesday, August 08, 2007

आठवते तुला ती पहीली भेट

आठवते तुला ती पहीली भेट
माझ्या सारखंचं तुझंही झालं होतं
नेमकं काय बोलायचं
एक अनामिक ओझंही आलं होतं

आठवते तुला ती पहीली भेट
तुझ्या डोळ्यात रहस्य दडलेलं
सात जन्माचं नातं
मी पहील्या नजरेतचं अनूभवलेलं

आठवते तुला ती पहीली भेट
किती गोडवा दाटलेला
दिवस तो अमेचा होता
तरी पाडवा वाटलेला

आठवते तुला ती पहीली भेट
भावनांच्या चांदण्याने भरलेली
एका चंद्राने अलगद एका
चांदनीला मिठीत धरलेली

आठवते तुला ती पहीली भेट
भावनांनी कशी गर्दी केलेली
गर्दीत हरवताना कळलचं नव्हतं
रात्र कुठे अर्धी गेलेली

आठवते तुला ती पहीली भेट
दाटून आलेला चांदण्यांचा पहारा
अंतर दोघात होतं तरीही
चढत गेलेला देहाचा पारा

आठवते तुला ती पहीली भेट
किती हायसं वाटलेलं भावनांना
कवटाळलं होतं एकमेकांच्या
विचारांनी विचारांना

आठवते तुला ती पहीली भेट
मुक्या भावनांचं एक तळ साचलं होतं
दोघही तसे अज्ञानच होतो, तरीही
एकमेकांच अंतर्मन वाचलं होतं

@सनिल पांगे
पावसातले रासमिलन...

तिचा अनुभव :-

उबदार श्वास माझे तुझ्या मानेवर फुललले..
तुझ्याच गळामिठित मग मी स्वत:च विरघळलेले..
स्पर्शाची उधळण तुझी मला थेंबाला जाणवत होती..
कोसळणार्‍या पावसापेक्षा मी तुझ्या लाजरसातच न्हाहत होती..
जलधारा देहावरूनी ओघळत तुझ्या ओठांवर स्थिरावत होत्या..
त्या अल्हाद गुदगुल्या मला शहारे आणत होत्या..
तुझं ते हरवंलेल रुप पाहुनी..
मी हि माझी क्षितीज तुझ्या मिठीत मुक्त केली..
पावसाची ती एक अनोखी आठवण म्हणून..
माझ्या ह्रिदयाची सारीच पाझरे तुझ्यावर रित केली...
अनोखा संगम त्या वर्षाविहाराचा घडी-घडीला आनंद वाढवत होता,
कुठला पाऊस अन कुठलं प्रेम आता फरक तरी कुठे जाणवत होता?

त्याचा अनुभव.. :-

तुझ्या केसांच्या बटा अन साडिचे ओले काठ..
माझी उत्कंठा प्रेमपर्वताच्या शिगेला पोहचवतं होत्या..
शरीरावरच्या बारीक लवांना खरोखर..
वार्‍यासवे डोलायला प्रेरीत करत होत्या...
तुझ्या हातांचे स्पर्श माझ्या सदर्‍यावर जाणवत होते..
तुला मिठीत घेताना माझ्या हातांना तुझ्या कमरेचे ऐकमेव स्थान होते..
तुला जवळ खेचताच तू डोळे मिटूनी
मनातल्या मनात पावसाचे आभार मानलेस..
अन अलगद माझ्या ओठांचे आधार आपलेसे करून घेतलेस..
अन मग सुरु झाले ते पावसातले रासमिलन..
सारे काही अजब घडले अन सफल ते प्रेमजिवन..

--- आ.. आदित्य...
एकदा पावसाला म्हटलं मी...

एकदा पावसाला म्हटलं मी...
" तु माझ्या घरी ये
आपण दोघं खुप खुप खेळु
पहिल्या पावसाचा गंध घेत दोघंही मातीत लोळु
तु माझ्यावर बरसुन घे खुप खुप
मला खुप भिजायचयं
तुझ्याशिवाय कोण माझं?
तुझ्याबरोबरच मला जगायचयं......"
पाउस म्हणाला....
" भिजण्यासाठी तुझ्या पापण्यांचा पूर तुला पुरेसा आहे
त्याच्यापुढे मित्रा मीच 'जरासा' आहे
आणी जगायचं म्हणत असशील तर...
मलाच माझा भरवसा नाही
मी ही तुझ्याचसारखा...
माझाही कुठला गाव असा नाही..."

-- प्रभास गुप्ते

तू पोशाक आहेस तुझ्या आत्म्याचा

तो उतरला त्याचा जीना
मला वर नेण्यासाठी
मी दोन्ही हात पसरले
त्याला कवेत घेण्यासाठी

अचंबीत झाला पाहून मला
क्षणभर थोडा दचकलाही
माझा स्वागत सोहळा पाहून
पेचक्या आवाजात पचकलाही

म्हणाला......

तुला काय मी एक मित्र वाटतो?
का तू आहेस पुर्ण वेडा
का घेत नाहिस धसका माझा
दिसत नाही का माझा रेडा

अरे मी तुझा शेवट आहे
प्रत्येकाला मी एकदाच भेटतो
तू पोशाक आहेस तुझ्या आत्म्याचा
मी फक्त पोशाक नेण्याचं काम करतो

मी उत्तरलो.......

तुझं भय मी का बाळगू
आयुष्याचं तूच एकमेव सत्य चित्र आहेस
नाहीतर स्वार्थापायी जमणारी नाती गोती
तू एकदाच भेटतोस तरी खरा मित्र आहेस

गहिवरून आलं माझं बोलणं ऐकून
मैत्रीच्या सूरात मग तो म्हणाला
तुझ्यासारखा मित्र या धरतीवर, तर मग
का देह माझा परलोक जन्मला

मी म्हणालो चल उठ मित्रा
लॉंड्रीवाल्याचं काम तू कर आधी
आपल्या मैत्रीची आज न उद्या
बांधतील त्रिलोकी समाधी

....सनिल पांगे
आठवतो आपला श्वास जसा
एकमेकांत मिसळला होता
भर दुपारच्या रखरखत्या ऊन्हात
कसा चांदण्यांचा पाऊस कोसळला होता

वाटलं नव्हतं ह्रुदय तुटलं तर
इतकं दुःख सोसावं लागेल
आज पर्यंत श्वासांनी मला, पण
यापुढे त्यांना पोसावं लागेल

तुझ्या आठवणींच्या साखर झोपेत
माझी कालची रात्र गोडव्यात सरली
पुर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायचं, पण
काल स्वप्नांनीच मनात जत्रा भरली

'प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि ऊच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो

तुझ्या डोळ्यातील इवलासा अश्रू
मला समुद्राहून खोल वटला
कारण मीचं होतो म्हणून
माझ्या डोळ्यात समुद्र दाटला

माझं दुःख बघवलं नाही
म्हणून एक ढग रडत होता
तुमचं आपलं काहीतरीचं
म्हणे तेंव्हा पाऊस पडत होता

**सनिल पांगे***

Tuesday, August 07, 2007












सावळी मि
सावळे हे रुप माझे
सावळीच काया
सावलीही माझी
सावळीच आहे

सजवते आहे
सावळ्या तनुला
सावळ्या या गालावर
आज रक्तिमा आहे

सावळेच नभ सारे
जलधारा बरसतात्
सावळ्याच संध्याकाळी
सोबतीला असतात

सावळेच आहेत
द्रुष्टीतील दोन सखे
सावळ्या त्या सख्यांमुळे
दुनियेत रंग आहे

जगाच्या या सर्व छटा
सावळ्याच भासतात
भिजुन आज मी गेले
सावळ्या या रंगात

रंगावर जाऊ नका
मन निरंकार आहे
जरी सावळी मी
मन शुध्द माझे आहे

असे हे सावळे रुप माझे
सावळीच काया
सावलीही आज माझी
सावळीच आहे

-- स्नेहा

Monday, August 06, 2007

कधी कधी खुप आनन्द देतं
न मागताही सुख देतं,
पण अच्यानक हासता हासता रडवतं
आयुष्य...हे असंच असतं...?

आपण बरंच काही ठरवतो
आयुष्याचे आराखडे बांधतो
पण एका वळणांवर सगळ काही थांबतं
आयुष्य...हे असंच असतं...?

भुतकाळातल्या गोड आठवणी
वेड मन आठवत रहातं
पण त्या मनाला फ़सवुन रडवतं
आयुष्य...हे असंच असतं...?

सुखाबरोंबरच दु:खहीं देतं
कधीही भरुन न येणां-या
भळभळणां-या जखमाहीं देतं
आयुष्य...हे असंच असतं...?

आयुष्यात खुप काही मिळतं
त्यातल बरंच काही नको असतं
पण जे हवं असतं तेच मिळत नसतं
आयुष्य...हे असंच असतं...?