आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, February 22, 2008

अखिल भारतीय तळीराम संघटनेचा ठराव

यापुढे सर्व कार्यालयांत मद्यपानास परवानगी आणि प्रोत्साहन देण्यात यावे, अशी संघटनेने (अतिशय प्रयत्नपूर्वक शुद्धीवर राहून आणि अडखळत्या शब्दांतही एकमुखाने) केलेली मागणी आहे.

कारणे

१. अशी परवानगी मिळाल्यास कार्यालयांतली उपस्थिती वाढेल.

२. कामामुळे येणारा तणाव कामावर असतानाच कमी करता येईल.

३. कार्यालयीन व्यवहारात प्रामाणिकपणा येईल.

४. पगार कमी आहेत, अशा तक्रारींचे प्रमाण कमी होईल.

५. लंच टाइम, टी टाइमच्या निमित्ताने कार्यालयातून कर्मचारी तास न् तास बाहेर असतात, ते कमी होईल.

६.वाईट जॉबमध्येही कर्मचाऱ्याला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल.

७. कर्मचाऱ्यांचे सुट्या घेण्याचे प्रमाण घटेल.

८. सर्वांना आपले सहकारी छान-देखणे दिसू लागतील.

९. कॅण्टीनचे अन्नही चविष्ट वाटू लागेल.

१०. कामावर कुणीही काहीही चूक केली, तरी ती सगळेच पटकन विसरून जातील.

-- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2799929.cms

कोणे एके वेळा। विसु झाला खुळा।
करावया गेला। भाषांतर॥

अभंग तुक्याचे । करी विंग्रजीत।
दूध पीतपीत । वाघिणीचे ॥

तुका म्हणे आता। रहावे उगीच।
पहावी बरीच । मजा त्याची॥

इवल्या मुंगीची । होते आता ऍन्ट ।
झाली अंडरपॅन्ट । लंगोटीची ॥

झाला हा नाठाळ। कोण विदुषक?।
"ब्रिंग मी अ स्टिक"। तुका सेज ॥

कवी - विसुनाना
दोघी
.
मला ती रोज सकाळी,
नऊ-सहाच्या लोकलला दिसायची.
नाजूक कोवळी नीटस सावळी.
गळ्यात काळी पोत बांधलेली.

हातामध्ये दुकान घेऊन फिरणारी.
पिना, रबर, टिकल्या, कानांतली
सगळं कसं रंगीबेरंगी.
ही एवढी ओझी लीलया वागवायची.

पाठीवरती आणखीन एक झोळी,
बाहेरुन गोल मुटकुळ्यासारखी दिसणारी.
कधीतरी त्यात हालचाल जाणवायची.
तिचा बाळ झोपायचा एवढ्या आवाजातही!!

मी तिला निरखत रहायचे नेहमी.
तिचं बोलण, तिच्या चपळ हालचाली,
गिर्‍हाइकाशी बोलतानाची मधाळ आर्जवी वाणी.
आणि सखी बरोबर अगम्य खिटपीट करणारी.

..............

तिला मी दिसायचे समोर.
दारात उभी रहाणारी
एका खांद्याला पर्स, दुसर्‍या हातात पिशवी,
हातात पेपर किंवा मासिकाची घडी धरलेली.

गर्दीत मिळालेला एकांत जगू पहाणारी.
तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजायची
मग फोन काढून बोलणारी मी,
ऑफिसमध्ये पोहचण्याआधीच कामे सुरू व्हायची.

एकमेकींना निरखताना कधीतरी
दोघींची नजरानजर झाली
अन एकमेकींकडे पाहून
ओळखीचं हसलो दोघी.

-- स्वाती फडणीस

Thursday, February 21, 2008

डॉक्टर विक्रमराव चक्रम यांच्या दवाखान्यात शिरीष आणि मुग्धा हे नवपरिणीत जोडपं गेलं ते मुग्धाला दिवस गेले आहेत, याची खात्री करण्यासाठी. आइनस्टाइनसारखे केस पिंजारलेल्या, चेहऱ्यावर वेडसर छटा असलेल्या डॉक्टरांनी तपासण्या करून मुग्धाच्या गरोदर असण्यावर शिक्कामोर्तब केलं आणि मग तिच्या पोटावर खरोखरचं शिक्कामोर्तब केलं... म्हणजे चक्क एक शिक्काच मारला तिच्या पोटावर आणि लगेच पुढच्या पेशंटला बोलावून यांना रफादफा करून टाकलं.

चक्रावलेल्या शिरीषने घरी आल्यावर मोठं भिंग घेऊन मुग्धाच्या पोटावरचा मजकूर वाचला. तिथे लिहिलं होतं, ''हा मजकूर सूक्ष्मदर्शकाशिवाय वाचता येऊ लागला की पुढच्या चेकअपसाठी दवाखान्यात या!!!!''
*****
हॉटेलच्या रिसेप्शन डेस्कवरचा फोन वाजला, ''हॅलो, ताबडतोब नवव्या मजल्यावर या. माझी बायको खिडकीतून उडी मारून आत्महत्या करायचा प्रयत्न करतेय...''

'' साहेब, त्यात आम्ही काय करणार?'' डेस्कवरचा खडूस क्लार्क खेकसला.

'' काय करणार म्हणजे! अहो, त्या खिडकीचं दार घट्ट बसलंय... उघडत नाहीये खिडकी!!!!''
*****

प्रेम वगैरे फार गोंधळाचा प्रकार असतो हो.

आता प्रेमाचा उमाळा येऊन एकांतात तुम्ही छोकरीला सांगता की ती फार सुंदर दिसतेय...

...

... आणि नंतर काय करता?

लाइट घालवता!!!!

*****


पाटीर्त तुम्ही दारू पीत आहात. तीन-साडेतीन पेग झालेले आहेत. अशात अचानक प्रकृतीत बिघाड होतो. या बिघाडाची लक्षणे काय असतात आणि त्यातून काय रोगनिदान होते, पाहा!

१.लक्षण : तुमचे पाय थंड पडतात आणि घाम सुटल्यासारखे वाटते.
निदान : तुमचा ग्लास तिरपा झाला आहे आणि बर्फगार दारू तुमच्या बुटावर सांडून आत शिरली आहे.
उपाय : ग्लासचे तोंड वरच्या बाजूला येईल, अशा रीतीने तो धरण्याचा प्रयत्न करा.

२.लक्षण : तुमच्या समोरच्या भिंतीवर झुंबर, ट्युबलाइट, दिवे दिसत आहेत.
निदान : तुम्ही टाइट होऊन कम्प्लीट आडवे झाले आहात आणि तुमच्यासमोर आहे ती भिंत नसून छत आहे.
उपाय : कमरेच्या वरच्या भागाला प्रयत्नपूर्वक ९० अंशाच्या कोनात आणा. कशाचा तरी आधार शोधून सरळ उभे होण्याचा प्रयत्न करा.

३.लक्षण : जमीन अंधुक अंधुक दिसू लागली आहे.
निदान : तुम्ही रिकाम्या ग्लासातून जमिनीकडे पाहताय.
उपाय : सोप्पा... ताबडतोब ग्लास भरून घ्या


सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण ।।

व्हावे एव्हढे लहान
सारी मने कळों यावी,
असा लागावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी ।।

फक्त मोठी असो छाती
सारे दुःख मापायला
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायला ।।

राहो बनून आभाळ
माझा शेवटला श्वास
मना मनात उरो
फक्त प्रेमाचा सुवास

कवी: अद्न्यात

Wednesday, February 20, 2008

संध्याकाळच्या प्रहरी आठवण येते मावळत्या सुर्याची
पहाटेच्या प्रहरी आठवण येते उगवत्या सुर्याची
या दॊघांच्यामध्ये येते ती दुपार
तीची का नाही आठवण येते कुणाला
प्रत्येक ठीकाणी उगवत्या आणि मावळत्या सुर्याची साक्ष ठेवतात
मात्र रणरणत्या दुपारला सर्वच कसे विसरतात

-- लिना फडणीस
का कधी कधी ..................... ????????

का कधी कधी जवळचीच माणसं इतकी कठोरपणे वागतात ?

सुखाची फ़ुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर ...
तरी ते मात्र आपल्याला, दुःखाच्या काट्यांवर चालायला लावतात !

हसवत ठेवले जरी आपण नेहमी त्यांना ...
तरी ते मात्र नेहमी आपल्या डोळ्यांना अश्रूच देतात !

सोबत केली त्यांच्या गरजेच्या वेळी आपण ...
तरी ते मात्र आपल्याला एकटं सोडून निघून जातात !

आपण त्यांच्या आठवणीत रात्रंदिवस झुरलो तरीही ...
ते मात्र आपल्याला विसरून सुखाने जगतात !

का कधी कधी जवळचीच माणसं इतकी कठोरपणे वागतात

कवी: अद्न्यात

Tuesday, February 19, 2008

सगळे सुविचार हे
फळ्यावरच चांगले दिसतात
आचरणात आणायचं म्हटलं की
डोईजड होऊ लागतात
....................................................................................................
पाहिली आहेत माणसं मी
खरं आयुष्य जगणारी
समाज गेला चुलीत
असं काहीसं म्हणणारी
........................................................................................................
पंखातल बळ बघुनच
आता झेप घ्यायचं ठरवलय..
गाठता येनाऱ्या क्षितिजाच्या
दिशेनेच उडायचं ठरवलयं...

--आनंद काळे

Monday, February 18, 2008

आसवांच्या पावसाला हाक देतो
आठवांच्या पाखराला हाक देतो

गायली तू माझिया गझलेस जेथे
मी पुन्हा त्या मैफलीला हाक देतो

काय होते सांग नाते आपले ते?
कोण माझे मी कुणाला हाक देतो?

गाव माझा दूर ना, मी दूर आहे
थांबलेल्या पावलाला हाक देतो

रात होता, मी गर्द काळोख होतो
एकटा मी हुंदक्याला हाक देतो

वाटते की आवरावा हा पसारा
संपताना संपण्याला हाक देतो?

शब्द - संदीप सुरळे

एकदा एका झुरळाला
असह्य झाले झुरळपण
त्याने फुलपाखरू होण्याचा
मनामधे केला पण

विविध रंगांनी आपले
पंख त्याने रंगवले
फुलांवर दिमाखात
तेही मिरवू लागले

फुलपाखरामध्ये फिरला
पाहिल्या विविध छटा
पण थोड्याच वेळात
झाला एकटा एकटा

त्याला समजणारे
तिथे कोणीच नव्हते
फुलपाखरांचे सगले
संदर्भ वेगले होते

ओशाळला बिचारा
परत फिरला माघारी
मित्रांनी केली होती
स्वागताची तैयारी

बगिचा रिटर्न झुरळ
म्हणून मित्रांचे स्वागत
ग्रहण करत बिलगला
सगळ्यांना धावत धावत

मनापासून म्हनाला
मित्रांनो मी चुकलो
आपल्याच वेडात ख-या
झुरळपणाला मुकलो

आता एक चांगले
झुरळ व्हायचे ठरवलेय
स्वतःच्या अस्तित्वाला
आता मी ओळखलय

तुषार जोशी, नागपूर
माझ्या मनाला मी सांगु कीती?
हा सावल्यांचाच छंद आहे....
तु असा अंतरी का सैरावतो?
हा कातराचाच बंध आहे....

किरणे स्वरांची रंगात न्हाली
कैसी ही तळमळ हृदयात झाली
तिचा भास अजुनी ओलाच कैसा?
हा आसवांचाच रंग आहे....

कळी चांदण्यांची करती ईशारे
मार्गात काटे फ़ुलविती पिसारे
तुझा चांद ऎसा का धुंदावलेला?
हा चांदण्यांचाच गंध आहे....

सरी आठवांच्या बरसुन गेल्या
पापण्या दिशांच्या ओलावलेल्या
कैसे या क्षीतीजाने सावरावे?
आवाज सरींचाच मंद आहे....

--सचिन काकडे[फ़ेबृवारी १५,२००७]
फ़क्त तुझ्यासाठीच "हा खेळ सावल्यांचा"