आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, February 01, 2008

आयुष्यात माझ्या माझे..
काहीच आता उरले नाही
दैवाने तुलाही आज..
माझ्यासाठी सोडले नाही!

जगतेय कुणासाठी मी..
हा मोठा प्रश्न पडलाय
अश्रुंचीच सोबत आहे मला..
जेव्हापासून तुझ्यावर जीव जडलाय!

सोडून गेलास तु मला..
डोळ्यात देऊन पाणी
कशी करू मी पुर्ण..
तुझविन माझी कहाणी!

उभी मी या टोकाला..
आजही पाहते वाट तुझी
नशीबाने माझ्या आता..
हीच जागा निवडलीय माझी!

सगळे विचारतात मला..
वाटते तो परत येईल तुला
ऍकताच हे मी स्तब्ध होते..
तुझे जाणेच मला कुठे कळले होते!

राधा तर मी कधीच नव्हते..
कशी मिळवेन प्रित तुझी
कळून चुकले आज मला..
मीरा बनाण्याची ही लायकी नाही माझी!

का असे हे आज
विपरीत घडले...?
सोडून सगळे मी
का तुझ्या प्रेमात पडले...?

-- प्राची घाग...
काय द्यावा हात हल्ली माणसांना
स्वार्थ दिसतो यात हल्ली माणसांना

राक्षसांची गरज नाही कलियुगाला
माणसे खातात हल्ली माणसांना

सहज केसाने गळा कापून जाती
सहज जमतो घात हल्ली माणसांना

पाहती दिड्‍.मूढ सारे साप-अजगर
टाकताना कात हल्ली माणसांना

पाहिजे सारेच ताबडतोब आणिक
पाहिजे फुकटात हल्ली माणसांना

भेट होते जालनावांचीच केवळ
चेहरे नसतात हल्ली माणसांना

'भृंग', देवांचे कसे होणार आता
माणसे भजतात हल्ली माणसांना

गझलकार - मिलिंद फणसे
शोधतो आहे सखे तूला
एकदा तरि भेटशील का?
प्रेमभरल्या नजरेने
मझ्या कडे पाहशीलका?

आयुष्याच्या वाटेवरती,
साथ मला देशील का?
खोल दरीत कोसळल्यावर
हात मला देशील का?

माझ्या एका हाकेने,
धावा तू करशील का?
प्रत्तेक क्षणी झुंजण्या साठी,
धैर्य मला देशील का?

वाटेवरल्या कळोखतही,
मझ्या सवे रहाशीलका?
सोसाट्याच्या वादळातही,
माझी सोबती होशील का?

मीच मला विसरल्यावर,
ओळख मझी देशील का?
शोधतो आहे सखे तूला,
एकदा तरी भेटशील का?

-- अमरीश भिलारे

Thursday, January 31, 2008

आज म्हटले चला, लिहू स्वतः वरच कविता

आज म्हटले चला, लिहू स्वतः वरच कविता...
कुठून सुरूवात करू? आणि काय गाऊ गाथा?..

स्वभावाबद्दल लिहू की लिहू केलेल्या चुकांवर...
सुखांवर भरभरून लिहू, की लिहू दुःखांवर?...

काय लिहावे कळेना, मन काही केल्या ऐकेना...
"मी ओळखलय मला खरच" हे काही पटेना....

कधी कधी मी कशी वागेन हे माहीत नसते...
इतरांसाठी कदाचित न पटलेलेही करत असते....

कधी कधी खूप वेडे-पिसे होते असे वागताना...
स्वतः च्या मनाचा गळा स्वतःच घोटताना....

असे मनाला समजावताना कित्ती हाल होतात...
आपलीच ही मने मग गेंड्याची साल ओढतात...

इतके सर्व करून स्वतःलाच शोधायचे असते....
जनसागरातून आपले वेगळेपण दाखवायचे असते....

पण हे जमते का सर्वांना?... कसले हो जमतेय...
स्वतःला सिद्ध करायला एका कवितेने काय होतेय?

--
रेणुका @ एक झोका....

पिंकी रे पिंकी
रंग तुझा गुलाबी कसा,
सबंध अंगावरी उमटला
मखमली ओठांचा ठसा...

पिंकी रे पिंकी
आवाज तुझा मंजूळ कसा,
सारेगमाच्या सुरातला
केवीलवाणा स्वभाव जसा...

पिंकी रे पिंकी,
अबोला तुझा असा रे कसा,
डोळ्यांच्या इशार्‍यातूनी
तु परीसंवाद साधतेस कसा...

पिंकी रे पिंकी
अल्लड रुसवा तुझा कसा रे असा,
नाकाचा शेंडा लाल जरी
तरी मनातला भाव प्रेमळ कसा...

पिंकी रे पिंकी
तुझा लाजवा असा रे कसा,
गोबर्‍या गालात तुझ्या
खळीचा मधाळ आस्वाद जसा...

पिंकी रे पिंकी,
जिव्हाळा तुझ्या मायेचा कसा,
दुश्मनालाही दृष्टांत घडून
जणू त्याने मैत्रीचा जपावा वसा...

पिंकी रे पिंकी
तुझा हा नखरा असा रे कसा,
घायाळ जीव या चिनूचा,
जसा पाण्याविन तडपतो एक चपळ मासा...

पिंकी रे पिंकी
ऐक ना गं जरा माझ थोडसं,
चल ना त्या अंगणातल्या वाळूत
बांधूया घरकूल आपलं छोटसं...

-- आ... आदित्य....
तू नसतेस तेव्हा...
तू नसतेस तेव्हा...
तुज़ असन माज्या जास्त जवळ येत
तुज़ हसन ,रुसन ,उठन, बसन ,
भांडंन सुधा मला व्याकुल करत
तरीही तू अधून मधून नसायला हवस
आणि अचांनक मागून येऊन अलगद
माज्यात सामाउन जायला हवस ...

रविद भांगे

Wednesday, January 30, 2008

लागेल थंडी बघ तुला.....
नको फिरुस अशी वा-यावर
नको सोडूस मोकळे केस......
नाही राहत मन माझे था-यावर

नको चालूस बिलगुनी मजला
पाहतात लोक सारे.....
म्हणतील काय चाललय बघा
सुटलेत प्रेमाचे वारे.....

म्हणतेस पाहूदेत लोकांना
जग सारे म्हणनारच......
मला जगाची पर्वा कशाला
मी तुला बिलगुन चालणारच.....

हातात धरून माझा हात
अशी पाहू नकोस एकटक......
ह्रदय दिलेय मी तुला
जाणवतेय का त्याची धकधक......

घायाळ होईन बघ मी......
नको सारखे देउस चुंबन गालावर
स्पर्श तुझा रेशमी......
लागेल मन डोलु तुझ्या तालावर

-- अमरीश अ. भिलारे

Tuesday, January 29, 2008

पहा पणती पेटली.
नार नवेली नटली.
मनी मनोरे मांडले.
सगे सोयरे सोडले.........

नथ नवरी नावरे.
सखा सवेचि सावरे.
सुख स्वप्नात साजीरे.
गोड गालांना गोजिरे.

स्वप्नी सुखाचा संसार.
भाळी भाग्याचा भ्रतार.
वेल व्रुक्षात वाढली.
फांदी फंदात फुटली.

भगे भ्रमाचा भोपळा.
सुटे सुखाचा सोहळा.
पहा प्राक्तन फुटले.
तिला ताटले तुटले.

नष्ट नामर्द नवरा
बाई बांधली बाजारा.
मद मस्तीत माजला.
लाख लिलाव लावला.

पोर पदर पसरी.
अश्रू ओघळे ओसरी.
आस अंतरी आटली.
दुष्टा दया न दाटली.

रात्र रात्रीती रडली.
पुन्हा पहाट पडली.
दोन दिवस दडले.
प्रश्न पोटाचे पडले.

मुर्ती मातीची मुडली.
कळी काळाने खुडली.
वात वा-याने विझली.
बाई बाजारी बसली...

......

पुन्हा पणती पेटली
नार नव्याने नटली.
मनी मनोरे मोडले.
सगे सोयरे सोडले.

-@ अरुण
मुखोट्यांनी घेतली एकदा दुखोट्याची सभा
खरा चेहरा अंधाराच्या आधाराने उभा

सभेपूर्वी उभे दोन मिनटं मौनासाठी
खरा आसुसलेला मौनव्रत सुटण्यासाठी

मुखोट्यांची दुखोट्याची सफ़ेद वस्त्रं भारी
खर्याला तर वस्त्रच नाही पंचाईतच सारी

गोड गोड स्तुती सुमनं होते सारे उधळत
खरा मात्र बसला होता कटू कारलं चघळत

"यांच्या वाचून सारं जग सुनं सुनं झालं "
ऐकून त्यांचं बोलणं याचं कुतुहल जागं झालं

हळू हळू कंटाळुन गर्दी लागली पांगू
संध्याकाळचे "बेत" जो तो लागला आता सांगू

खरा एक फ़ूल घेऊन फ़ोटोपाशी गेला
स्वतःचाच चेहरा बघून हादरुन पुरता गेला

मु"खोट्या"नी घेतली होती दु"खोट्या"ची सभा
खर्याला अंधाराचाही उरला नाही सुभा

- सुनिल सामंत

हर एक क्षणावर काळाचे राज्य आहे
तुमचं आणि त्याचं नातं अविभाज्य आहे

काळ म्हणा,नियती म्हणा, वा अजुन काही
थांबता,ठरल्या मार्गाने तो चालत राही
खेळू नका तयासंगे,फ़ारच तो व्रात्य आहे
हर एक क्षणावर...

क्षण सुटला हातून,परत तो येणे नाही
काळाची देण होती ती, परत तो देणे नाही
या खेळात त्याच्या आळशीपणा त्याज्य आहे
हर एक क्षणावर...

प्रसन्न असेल तर ,काळ झरझर सरतो
रागावला तर, तुम्हांस जर्जर करतो
क्षणात राजा , क्षणात भिकारी
क्षणात रया , क्षणात लाचारी
हाक प्रेमळ त्याची , शिवी मात्र अर्वाच्य आहे

हर एक क्षणावर काळाचे राज्य आहे
तुमचं आणि त्याचं नातं अविभाज्य आहे

-- अभिजित गलगलिकर
मी गुन्हे अक्षम्य केले ही खरी आहे व्यथा
त्यांसही तू माफ केले ही खरी आहे व्यथा

वाट मी चुकलो कितीदा, सांगती जे जे मला
काननी त्यांनीच नेले ही खरी आहे व्यथा

जुलुम आहे कोरडे हे वागणे, साकी, तुझे
त्यावरी हे रिक्त पेले ही खरी आहे व्यथा

लोकहो, पुसता कशाला प्रांत माझा कोणता
देश येथे फाटलेले ही खरी आहे व्यथा

जहर टीकेचे जनांच्या रिचवले असतेच मी
वाचल्यावाचून गेले ही खरी आहे व्यथा

गझलकार - मिलिंद फणसे
कोण माझे ? मी कुणाचा शोध घेतो?
जे संपले , मी तयाचा शोध घेतो

पेटलेल्या या उन्हांना सोसताना
माझिया मी सावलीचा शोध घेतो

कोरड्या या पापण्यांना ओल देण्या
आसवांच्या वाहण्याचा शोध घेतो

चांद राती साथ होती कैकदा तू
मी अताशा आठवांचा शोध घेतो

चोर होई रात माझ्या अंगणी या
मी दुपारी चांदण्यांचा शोध घेतो

हुंदक्याला जोर येतो सांगताना
मीच आता त्या यमाचा शोध घेतो

.....संदीप सुरळे

Monday, January 28, 2008

तारकांनी तुझ्या केसात
अलगद उतरूनी यावे
गुलाबी पाकळ्यांच्या भाराने
तुझ्या ओठांवर गुलाबी ठसे उमटावे..

असं तुझं रुप पाहताना
प्रिये मी हि आरसा व्हावे
तुझं माझ्यातलं अस्तित्व
तु माझ्याकडे एकटक होऊन
पापण्या लवत हळूवार पहावे...

मग वाटेल मला आरश्यातून या
मी वार्‍यामधे अल्लड होऊन
तुला पाठमोरी बिलगावे
शहारलेल्या तुझ्या देहकळीला
मिठीच्या शालीत घट्ट धरावे...

मग लाजेल तु ही अशी
कि मर्यादाही बेभान होतील
ओल्या केसातल्या चांदण्या
विस्कटून तुझ्या माझ्या देहावर सरकतील...

पाकळ्यांच्या भार चुरगळून
गुलाबी ओठांची मोहर
सजेल माझ्या गालावरी..
म्हणशील हा घे गुलाबी चंद्र
तुझ्या प्रीत खळीवरी...

तेवढ्यात ही शृंखला
जरा निवांत व्हावी,
मिलनाची सर बरसण्याआधी,
मर्यादेची लहर आपल्या श्वासात
अशीच दबा धरून बसावी....

---.. आ.. आदित्य..