देवबाप्पा देवबाप्पा मला मोदक दे ना
मम्मी गेली बाजारात तुही हळूच घे ना
पप्पा गेले ऑफिसात दीदी गेली कोलेजात
दादा तर सिमाबरोबर फिरत असेल पार्कात
घरात आत्ता नाही कोणी एकच मला दे ना
मम्मी गेली बाजारात तुही हळूच घे ना
अभ्यास असतो खूप नसते कधी सुट्टी
तुही फ़क्त ५ दिवस नंतर करतोस कट्टी
बघ ना जरा माझ्याकडे आत्ताच फक्त दे ना
मम्मी गेली बाजारात तुही हळूच घे ना
तुझी बाबा खूप मजा सारखे पाहुणे येतात
कोणीतरी काहीतरी सारखा खाऊ देतात
मला सुद्धा त्यातला एकच मोदक दे ना
मम्मी गेली बाजारात तुही हळूच घे ना
-- अमरीश अ. भिलारे
मम्मी गेली बाजारात तुही हळूच घे ना
पप्पा गेले ऑफिसात दीदी गेली कोलेजात
दादा तर सिमाबरोबर फिरत असेल पार्कात
घरात आत्ता नाही कोणी एकच मला दे ना
मम्मी गेली बाजारात तुही हळूच घे ना
अभ्यास असतो खूप नसते कधी सुट्टी
तुही फ़क्त ५ दिवस नंतर करतोस कट्टी
बघ ना जरा माझ्याकडे आत्ताच फक्त दे ना
मम्मी गेली बाजारात तुही हळूच घे ना
तुझी बाबा खूप मजा सारखे पाहुणे येतात
कोणीतरी काहीतरी सारखा खाऊ देतात
मला सुद्धा त्यातला एकच मोदक दे ना
मम्मी गेली बाजारात तुही हळूच घे ना
-- अमरीश अ. भिलारे