आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, May 11, 2007

तिला म्हणालो,मला आजकाल झोप येत नाही
काय करु, तुझी आठवण मला झोपूच देत नाही
क्षणभर विलम्ब न करता तिने तिची पर्स उघडली
झोपेची गोळी काढून,माझ्या हातावरती दिली.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो, माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे.
रक्ताच्या प्रत्येक थेंबास, तुझ्या प्रेमाचा रंग आहे.
ती म्हणाली,धीर धर अजुन थोडासाच उशीर आहे.
उद्या आमच्या रुग्नालयात मोफ़त रक्ततपासणी शिबीर आहे.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो, तुझ्यासाठी काहीही करु शकतो.
माझ ह्रुदय काढून, तुझ्या हाती धरु शकतो.
त्याक्षणी ती उठली,आणि आत निघून गेली.
माघारी येताना हाती"डिसेक्शन बोक्स"घेवून आली.
..... मित्रांनो अशी ही, माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच मला लागली.
तिने तिची ओढणी,माझ्या पायावरती बांधली.
नजरेस नजर मिळवून माझ्या,हळूच ती म्हणाली.
पडलास तू,पण जखम माझ्या काळजावरती झाली.
.......... तर माझी ही केस अशी आहे.
एक एम.बी.बी.एस. माझी प्रेयसी आहे

Wednesday, May 09, 2007

मराठ मोळी आई..

आपली मराठ मोळी आई म्हणजे एक मजेदार, प्रेमळ, अस रसायन आहे
*आई तुम्हाला दोन वेळां सल्ला देते. एक तुम्हाला हवा असतो त्या वेळी,व तुम्हाला नको असतो त्या वेळी सुध्धा·
*आई हि अशी एकच व्यक्ति आहे, जिला तुमच्या बद्दल, तुम्हाला तुमच्या बद्दल माहित आहे त्या पेक्षा ज्यास्त माहित असत.
*एखाद्या वेळी एखादी गोष्ट जर तुम्हाला माहीति नसेल,व आइला तुम्हि ती तिला विचारली अन जरी तिला ति माहीति नसली तरी ति, गोष्ट माहीति असल्यासारखी ठोकुन देते.
*आई जीतकी चांगली तितके मुंले वाया जाण्याच्या संभावना जादा
*अरे पावसांची चिन्हें आहेत रेनकोट घेउन जा अस ती म्हणते, तुम्हि नेहमी पणे,दुर्लक्ष करता, अन मधे कुठेंतरी नेमका तुम्हाला पाउस गाठ्तो.
* तुम्ही एखादी गोष्ट विसरला, तर ति तुमच्या साऱ्या चुकांची तुम्हाला आठ्वण करून देइल ज्यामुळें तुम्ही ति चुक परत करणार नाहीत.
*तुमच्या साऱ्या गोष्टीवर टीका करण्याचा तिला ह्क्क आहे,जरी त्यातली एखादी गोष्ट तुम्ही केली नसली तरी सुध्धा.
*आई च्या जेवणाला नावे ठेवण्याची चुक करु नका[मेल्या बाहेरच शिळ पाक घाण तेलातल मीटक्या मारत खाशील.]
* आई शी कधीच खोट बोलु नका अन जरी प्रयत्न केला तरी निश्चीत पकडलें जाताल·
*जस जस तुमच वय वाढत जात तस तस एखाद्या लहान मुलासारख तुम्हि तिच्याशी वागायला लागता·
*पैशांची कडकी असते, तिला पैसें मागा ति पैसे देइल अन,तुम्ही पैसे कसे उधळता या वर लेक्चरपण देइल·
*तुम्ही कीतिहि चुका करा, ति हजार वेळा तुम्हाला त्याची आठवण करुन देइल, पण मनांत कधीच ठेवणार नाही·
*तुम्ही एखादी गोष्ट केल्यानंतर[आधी नाही], ती आणखी कशी चांगली करता आली असती हे फक्त तिच सांगु शकते.
*तुमची आई कीतिही गरीब कींवा अशीक्षीत असो ति तुमच्या पेक्षा नेहमीच मोठी आसते.
*एखादी गोष्ट तुम्ही केली तर ति आणखी कशी चांगली करता येइल ते ती तुम्हाला सांगेल ,पण जर तीनें केली अन जर तुम्ही सांगायला गेला तर ती म्हणेंल, मग तुच का नाही करत.
*तुम्ही कितिही चांगला विनोद केला तरी तिला तो विनोद नेहमीच वाह्यात वाटतो.
*आइ काम संपवुन जरा बसली कि मुलाला भुक लागते.
*तुम्हि मोठ होउन नांव काढाव इतकच तिला वाटत असत.
सुविचार

पैसा हेच सर्वस्व नव्हे... ... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!!

प्राण्यांवर प्रेम करा... ... ते किती चविष्ट असतात!!!

पाणी वाचवा... ... बीअर प्या!!!

शेजाऱ्यावर प्रेम करा... ... पकडले जाऊ नका म्हणजे झालं!!!

मित्र बिस्किटांसारखे असतात... ...' हक से माँगो!'

गर्लफ्रेंड्स कोल्डड्रिंकसारख्या असतात... ...' ये दिल माँगे मोअर!'

आणि बायको औषधासारखी असते... ...' बस एक ही काफी है!'
मॉडर्न अभंगवाणी
शेजाऱ्याच्या घरी असावा पेपर । तोचि वाचावा न खर्चिता स्वधन ॥
पेपरसंगे ग्राह्य दूध वाटि एक । साखरेजोडि तेहि मागावे ॥
संगणकतज्ञ होशिलही तू । विठुमाझा करिल चमत्कार ॥
फक्त परीक्षेअंती निकाल । केटि न लागु द्यावी ॥
महाविद्यालय प्रस्थाने जीन्स अन टि-शर्ट । जेतुके फाटके तेतुके स्टायलिश ॥
ओळखावा एक कन्यकांचा जमाव । पाहावे प्रत्येकीस सांगोपांग ॥
किकेटी असावी भल्यांची भरती । करावे कसे बुकी-फिक्सिंगचे उच्चाटन? ॥
किंतु तयांच्याच चरणी मिळे धन । ऑस्ट्रेलिया मागे मीही लावतो ॥
स्टेशनी होता बळाबळी । करावी सुंदोपसुन्दी जरूर ॥
किंतु दिसता पुष्ट गृहस्थ । व्हावे मूक मार्गस्थ,
विन्या म्हणे ॥
जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपले ॥
तोचि राजकारणी ओळखावा । मतदान उपरांति विसरावा ॥
साक्षात्कार - विन्याबुवा
लहानपण देगा देवा । हाति लॉलिपॉपच हवा ॥
चिप्स, चॉकोलेट अन कार्टून्स । जीव सत्कारणी रमावा ॥
व्हावा सख्यासोबतींचा संग । सोमरसाचा मिळावा ब्रह्मानंद ॥
ऎकावे विन्याचे अभंग । आनंदाचे डोही आनंद तरंग ॥