एकदा हास तु, एकदा हास तु,
हसत माझा मला परत दे श्वास तु || ध्रु ||
ऐक आतातरी पुस ही आसवे
बोल माझ्या सवे बैस माझ्यासवे
का तुझा जाळिशी व्यर्थ मधुमास तु
हसत माझा मला परत दे श्वास तु || १ ||
वेदनेला कुणी हाक मारु नये,
भेटलेल्या सुखा दुर सारु नये,
विसर ही काळजी विसरुनी आभास तु,
हसत माझा मला परत दे श्वास तु || २ ||
एकटे मी तुला आठवावे किती,
गीत वेडे तुझे गुणगुणावे किती,
दे जरासा तुझा मधुर सहवास तु,
हसत माझा मला परत दे श्वास तु || ३ ||
-- सुरेश भट
हसत माझा मला परत दे श्वास तु || ध्रु ||
ऐक आतातरी पुस ही आसवे
बोल माझ्या सवे बैस माझ्यासवे
का तुझा जाळिशी व्यर्थ मधुमास तु
हसत माझा मला परत दे श्वास तु || १ ||
वेदनेला कुणी हाक मारु नये,
भेटलेल्या सुखा दुर सारु नये,
विसर ही काळजी विसरुनी आभास तु,
हसत माझा मला परत दे श्वास तु || २ ||
एकटे मी तुला आठवावे किती,
गीत वेडे तुझे गुणगुणावे किती,
दे जरासा तुझा मधुर सहवास तु,
हसत माझा मला परत दे श्वास तु || ३ ||
-- सुरेश भट