आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, June 14, 2007

" आठवतं तुला...
त्या अनोळखी रस्त्यांवरून
तू माझ्याबरोबर यायचास
मदत म्हणून..
आज सारे रस्ते ओळखीचे झालेत
म्हणून तू अनोळखी व्हावं
असं थोडीच आहे?

मला रस्तेच हवे असते
तर कसेही शोधले असते
त्यासाठी कुणाच्या
ओळखीची गरज नव्हती
मला तुझी मदत नको,
सोबत हवी होती..."

तो उत्तरला,
"आठवतं तुला .....
तू दबकत चालत जायचीस
त्या रस्त्यावरच्या फुलांना
दुखवू नये म्हणून..
तुझा क्षणिक स्पर्शही
त्यांना पुरेसा झाला असता...
माझ्या प्रेमाचं सार्थक करण्यासाठी.

तुला कधी समजलंच नाही
ती मीच अंथरली होती...तुझ्यासाठी.
ज्या स्वप्नांना तू अस्पर्श सोडून गेलीस
आपली नाहीत समजून
तुला कधी उमजलंच नाही
ती फक्त तुझीच होती म्हणून...."

Wednesday, June 13, 2007

आपल्या वाटा वेगळ्या........

पुन्हा पावलांनी माघार घेतली
आज ते वळण ओलांडताना
होरपळून गेलेल भावनांच घरट
उभं राहता राहता कलांडताना

हात गच्च बांधुन मी उभा राहिलो
पण डोळ्यांना कोन सांगायच
हरवलेल्या स्वप्नांच दान
पुन्हा फ़ाटकया झोळीत मागायच

ती दुरुनच मला दिसली अन्
मी पाठ फ़िरुउन चालायला लागलो
हरवलेल भान आणी तुडूंबभरलेले डोळे
दुर शांत रस्याशी मी एकटाच बोलायला लागलो

मला मुळीच घरटं बांधायच न्हवत
भावनांच्या पोकळ वाश्यावर
विस्कटलेल्या आयुष्यच्य
आर्ध्याकच्च्या नकाशावर

वाट तुझी वेगळी माझी वेगली
आपल दुःख आपणच भोगायच
कुणी काटे देवो वा बकुळ् फ़ुलं
आपण सलगीनच वागायच


पाऊस असा कसा आज बरसुन गेला
अनामिक हूरहूर एक, मनात माझ्या रुजवुन गेला

कधि इवल्याशा छत्रिचा आडोसाही खुप होता
आज घरात माझ्याच, पाऊस मला भिजवुन गेला

अगणित थेंब याचे कधि मीच झेलले होते
आज का मग पाऊस हा, मज तरसुन गेला?

कातरवेळ आजची अशी सरींनी वेढुन आली
थेंब प्रत्येक,प्रत्येक सरीचा, मज खिजवुन गेला

ओढ ही कसली मनास माझ्या? ना कळे
ढग आठवांचा, मनात एक गरजुन गेला
रिमझिम धून, आभाळ भरुन
रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ?

मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून

गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुन

वार्‍यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्‍यात आता, सुरात तुला मी कवळून

Tuesday, June 12, 2007

तिच्याशी भांडताना नकळत,
मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!
तिच्या गालचे अश्रू पुसत,
रागच माझा फितूर होत !!।

जवळिकी पेक्षा दुरावाच
मला अधिक आवडतो
कारण आपल्या प्रेमाची वीण
तोच अधिक घट्ट करतो

तुला भेटायला येताना
चुकून छत्री विसरले
ढग तरी किती चावट
नेमके तेव्हाच बरसले

तुझ्यावर किती ही राग आला तरी
मला रागावता येत नाही
तुझ्याच बाबतीत असं का होतं
मला सांगता येत नाही

तू असाच समोर बसून रहा
मला तुला डोळे भरून पहायचंय
या अबोल, शांत क्षणाला
क्षणभर अनुभवून पहायचंय

आता सवयीचं झालंय मला
मी निघताना तुझं माझ्या डोळ्यात पाहणं
आणि त्या नजरेनं जखडून
माझं सवयीनं काही क्षण रेंगाळणं

प्रेमात 'पडलं' तरी
स्वतःला सावरता आलं पाहिजे
किती ही बेलगाम झालं तरी
मनाला आवरता आलं पाहिजे

हल्ली का कुणास ठाऊक
पण मी वेड्या सारखी वागते
आकाशातल्या चांदण्या निरखत
उगीचच रात्रभर जागते



तू आणि तुझे बोलणे
शब्द जमीनीवर सांडले
पक्षी होऊन कानांनी माझ्या
सारे पटापटा टिपले.

तू आणि तुझे बोलणे
कधी मऊ कधी अलगद
मोर पिसार गालावरुन
जसा फिरावा सहज.

तू आणि तुझे बोलणे
फक्त डोळ्यांनी
मग भांडावे माझ्या डोळ्यांशी
माझा कानांनी.

तू आणि तुझे बोलणे
संगीताचा नवा तरंग
मन माझे वेडे
त्यावर नाचण्यात दंग.

तू आणि तुझे बोलणे
कधी लाडीक कधी हट्टी
हॄदयाची होते मग
माझ्या मनाशी कट्टी.

तू आणि तुझे बोलण
माझ्यावर रागावले
त्या दिवशी कान माझे
कायमचे हरवले.

तू आणि तुझे बोलणे
आता फक्त आठवण
बडबडणार्‍यांच्या दुनियेत
माझी शब्दांसाठीची वणवण.
पाऊस येता असेच होते
तुझ्यासाठी मन पिसेच होते

भरून येता घनात वादळ
तुझाच आठव मनात केवळ

अशी लकाके वीज नभावर
तुझ्या हसूचा भास...क्षणभर

पाऊस येता मन बावरते
सुसाटते, तुजसाठी धावते

पाऊस होतो तुझीच चाहूल
सरीसरींतून तुझेच पाऊल

पाऊस गातो तुझेच गाणे
मनी छेडतो तुझे तराणे

पाऊस सरतो मला भिजवूनी
ओढ तुझी तन्मनी रुजवूनी

सांग प्रिये तू होशील ना सर
तशी लाघवी, तशीच सुंदर

अंगांगी जाशील का भिनवूनी
तव श्वासांचे ते अमृतस्वर!

मनं माझ तुझसाठी वेडं का......?

आज बरसत्या पावसासवे हे
भंयकर वादळ का ......?

आयुष्यभर तुझ्यासवे जगण्याच
स्वप्न आज असे तुटल का......?

तुझ्या प्रेमला मुकलोय तरी तु माझीच आहे
हा व्यर्थ भास का ......?

पानावरच्या दवासारखी तुझी साथ
जिवनात माझ्या क्षणभंगुर का......?

तु दिलेल्या वेदना मनाच्या प्रत्येक कोप-यात्त पसरल्यावरही
अजुनही हे मन तुझ्यासाठी वेड का......?

तु विसरलीस मला हे माहीत असुनही
माझ हे मन तुझ्या आठवणीत बैचैन का......?

भंगलेल्या स्वप्नालाच पुर्ण करायचयं
हे वेड स्वप्न उराशी बाळगुन का......?

तुझ्या मनापर्यंत पोहोचल्यावरही
माझ्या मनाचा कागद कोरा का......?

जिला माझ्या भावनाच कळल्या ना कधी
तिलाच प्रत्येक शब्दातुन मांडतो का......?

सगळे संपले असतानाही
तु माझीच होशिल हा व्यर्थ भास का......?

नेहमी स्वत:ला तुझ्या डोळ्यात शोधन्याच्या प्रयत्न करणा-या
माझ्या या डोळ्यात आज आसवांची माळ का......?

आयुष्यभर जीवनाच कोडं सोडवणा-याला
आपल्या जिवा ऎवजी त्या कोड्याचच महत्व का......?

तु परत येणार नाही ही जाणिव असतानाही
हा जीव जायचा थांबला का......?

सरणावर झोपल्यावरही मनात मझ्या
तुझ्या सवे जगायची इच्छा का......?

मनं माझ तुझसाठी वेडं का......?
सुगंधाने ज्याच्या, गंधित होई पहाट,

शुभ्र फुलांच्या वर्षावाने, न्हाऊनी गेली वाट,

ओंजळीत कुसुमे घेता, मन मोहरुनी जातं,

परड्यांत बहरला आहे, तो एक पारिजात


भल्या पहाटे माझी आई, फुले करंडीत वेचूनी घेई

हलकेच हवेची झुळुक, झाडाला छेडूनी येई,

नाजुकश्या त्या स्पर्शाने, प्राजक्त शहारूनी जाई

पडणाऱ्या त्या कुसुमांनी, भिजूनी गेली आई


दूर टेकडीमागे जो सूर्य दडला होता,

त्याने तिरप्या नजरेने प्राजक्त देखिला होता,

त्या अवखळ सौंदर्यावर तो सूर्य भाळला होता,

अनभिद्न पारिजात उगाच नटला होता.


दुपार होऊन जाता, रवी डोईवरती आला,

उद्देश तयाच्या मनीचा, प्राजक्ता उशिरा गमला

चहूबाजूंनी त्याच्यावर, किरणांचा हल्ला झाला

प्रखर रवीच्या तेजाने, पारिजात लुटुनी नेला


सांजवेळ ती येता, चंद्र साथीला होता,

लुटलेल्या प्राजक्ताला, तोची दिलासा होता

क्षितिजावर उमटली होती, सोनेरी तांबूस छ्टा

तो एक पारिजात, परड्यांत बहरला होता
कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्‌यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना।।।

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळिमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना,
गुलाबाची फुलं दोन।।।

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फुलं दोन।।।

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझीतुझी तुझ्यातुझ्या तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्‌यातून
जातानाही पायभर मखमल ना,
गुलाबाची फुलं दोन।।।

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया अबोलीची फुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरु दे ना वारा गुदमरु दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना,

गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्‌यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना।।।

-- संदीप खरे
ह्या खांद्यावर डोकं ठेवून तिला रडावंसं वाटावं .
काँलेजनंतर मागे थांबून सोबत बसावंसं वाटावं .

ज्या स्वप्नांमधे माझ्या सगळ्या रात्री जागतात .
त्या स्वप्नांमधे हरवून तिलाही जागावंसं वाटावं .

माझे आसू पुसून तिनं आमच्या सुखात हसावं .
कधीतरी वाटतं यार, आपलंही कुणीतरी असावं..!

छोट्या छोट्या गोष्टींमधे खोटं खोटं चिडावं .
पण, भेटीनंतर निघते म्हणताना तिचं पाऊल अडावं .

बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा ,
तिनं माझ्या प्रेमात अगदी आकंठ बुडावं .

ह्या छोट्याश्या स्वप्नानं एकदाच खरं व्हावं .
नेहमीच वाटतं यार, आपलंही कुणी असावं..!