आभाळ भरुन आलं
म्हणुन मी पण बरसलो
तर लोकं म्हणतात,
वेडाच आहे...!
...
पण,
कुणीतरी बरसावं
म्हणुन तर आभाळ भरुन येतं
हेच लोकांना कळतंच नाही...!
...
पावसाची नवी नवी रुपं
डोळ्यांत साठवायची तर
मनात, आत साठलेला पाउस
बाहेर काढुन नको टाकायला...?
...
ह्या आणि अशाच काही विचारात
मी खिडकीत विसावतो
आभाळाकडे न पहाताही मनात
सात क्षणात सात मात्रा उमटु लागतात...
...
मनासोबत रुपक डोळ्यातही फेर धरतो...
आणि, त्याचा एक एक तुकडा
माझ्या गालांवर विसावु लागतो...
...
आता मात्र लोकं म्हणु लागतात,
आभाळ भरुन आलं की
हा वेडा बरसतो...
डोळ्यांतुन... लेखणीतुन...
कधी प्रत्यक्ष... कधी रुपकात्मक...!
कवी - महेश घाटपांडे