आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, January 18, 2008

काहितरी वेगळ करायचय........
ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय
पाणवठा जरी गढुळ असला तरी
पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.

काहितरी वेगळ करायचय........
आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय
पानांच्या जाळीवर बसुन उडायचय
मिटलेल्या श्वासांना आता
अस्तित्वातात आणायचय.

काहितरी वेगळ करायचय........
स्वप्नांच्या देशात भटकायचय
प्रयोगानिशी शोधायचय
भवनेच्या पंखात बळ घेऊन
पुन्हा मायदेशी परतायचय.

काहितरी वेगळ करायचय........
चिखलातल्या कमळाला फुलवायचय
सुकलेल्या फुलांना जगवायचय
माती रुक्ष असलि तरी
मातीतल्या माणसांसाठी जगायचय.

काहितरी वेगळ करायचय........
एक स्वप्न उराशी बाळगायचय
काहि वेगळ करता नाहि आलं तरि
माणसातल्या माणूसकीला मात्र जपायचय ....

-- अद्न्यात

वहीचं पान फाडताना
कोणताच विचार केला नव्हता
नंतर कळलं उरलेल्या पानांचा
एक आधार गेला होता
- अद्न्यात

झाडाच्या ओल्या जख्मां
कुणालाही कळत नाही
म्हणून सरणावर
ओली लाकडं जळत नाही
- गोवर्धन भोसले

प्रेम म्हणजे काय रे
दुधावरची साय रे
आपुलकीची उब मिळता
सहज उतू जाय रे
- प्रसाद कुलकर्णी

जगण्याचे बळ देते
रोज तुझे हास्य मला
तुझ्या एका हास्यास्तव
लाख चुका माफ तुला
- प्रसाद कुलकर्णी

आहे माझ्याकडे शक्ती
सर्व काही सोसायला
तरीही वाटतं हवं होतं
कुणीतरी डोळे पुसायला
- अद्न्यात

शेजारच्या गावी तमाशा आहे
पाय ठेवायला जागा नाही
आपल्या गावी किर्तन आहे
ऐकायला एकही जागा नाही
- काशिनाथ भारंबे

आयुष्य देतानाच तो त्यातनं
सुख वजा करून घेतो
नंतर सुखाच आमिष दाखवून
स्वतःची पुजा करून घेतो
- प्रसाद कुलकर्णी

मला लुटण्याचे
लाखो प्रकार झाले
ते चोर आज
सावकार झाले
- गोवर्धन भोसले

तू फुलांची बरसात केलीस
नेमकी परक्याच्या झोळीत
मी मात्र बहराला मुकले
जीवनाच्या या पानझडीत
- आकाशानंद

रेड्यानं वेद गायले
म्हणून ज्ञानेश्वराला इथे पुजतात
ज्ञानेश्वरीपेक्षा
इथे चमत्कारच रुजतात
- चंद्रशेखर गोखले

तक्रार ही नाही की
चंद्र आत डोकावतो
पण त्याचं बघून चोंबडा
प्राजक्तही सोकावतो
- चंद्रशेखर गोखले

कोरडे जे शेत आहे ओलित झाले पाहिजे
मुक्या जीवांचे दु:ख या बोलीत आले पाहिजे !
छते ऊन्हाची नांदते जीव पोळती
उफ़ाट्याच्या वाहणा पायामधूनी घालती
दाह त्यांच्या वेदनांचे, ठेवित गेले पाहिजे....!
आभाळ अंतरातले सोसतांना फ़ाटलेले
अश्रू डोळ्यातले गाळतांना गाठलेले
महापूरांना बांधाया,बांध घालीत गेले पाहिजे....!
नांगरल्या शेतापरी काळीज दु:ख साहते
घरे सुगीचे डोलता, स्वप्न हिरवे पाहिजे
अर्थ या स्वप्नातही पेरीत गेले पाहिजे
...कोरडे जे शेत आहे॥!

***विठ्ठल वाघ

Thursday, January 17, 2008

आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे

दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या
कॉलेज canteenच्या कटींगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे

कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
A\C Coneference roomsमध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी, कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODCमध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक Software प्रोफेशनल आहे

सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो-तो projectमध्ये बिझी ज़ालाय
भुला भटका missed call आता महाग झालाय
forwards आणि chain mailsमध्ये खुषालीची मैल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे

दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो
सेलेब्रेशन्स,पार्टीज साठी pizza hutchaचा रस्ता गाठतो
vegie crust, paporonie कसले कसले फ्लेवर्स मागवतो
पण pocket moneyसाठवून केलेल्या partyची मजा ह्यात शोधत आहे
कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे

बरेच दिवस झाले इथे हैदराबादला येऊन
सुरुवातीला होमसिक वाटले, आता घेतलीये सवय करून
आमच्या जुहु चौपाटीची जागा एथे हुसेन सागर ने घेतली
बॅंगलुर, मैसोर हैदराबादच्या गर्दीत माझी मुंबई मात्र हरवली
निदान पुणे पोस्टिंग मिळावे म्हणून प्रयत्न करतो आहे
कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे

रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
"आता कधी येशील?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे

खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
officeमधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहे
कारण शेवटी मी एक.....

-- अभिजित

मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु..

मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु
तिख्खट आहे की दुधाची साय सांगु

वसंतासम सोनेरी रुप सजलेलं सांगु
अस्मानी डोळ्यांत स्वप्न भिजलेलं सांगु

तिचं रुसणं,हळुच गालात हसणं सांगु
वेडं वेडेपण सांगु की कोवळेपण सांगु

अल्लडपणाचा तिच्या काय कहर सांगु
की आईसारखी मायेची करडी नजर सांगु

इवल्याशा गोष्टीनी ओलावणारे डोळे सांगु
भरल्या डोळ्यानी हसणारे ध्यान खुळे सांगु

आमच्या यारीदोस्तीला नसलेली हद्द सांगु
सहज राखली जाणारी एक सरहद्द सांगु

अखंड गप्पांमधे क्षण किती हरवलेले सांगु
तिजमुळे अबोल माझे शब्द खुललेले सांगु

सगळ्याहून न्य्रारी पण गोड तिची रीत सांगु
असा नमुना लाखात एकच, हे गुपित सांगु ...

--- अभिजित गलगलीकर
-मनातलं आभाळ-

खिडकीबाहेर उठून पाहिलं सकाळी
तर दाटून आले होते ढग;
जणु माझ्या मनातलंच आभाळ भरून आलय-
आसु ढाळतंय सारं जग.

जेंव्हा मलुल हवेचा
स्पर्श झाला ओलासा,
माझ्या खिन्न मनाला
मिळाला थोडा दिलासा.

जाऊन बसलो टेकडीवर,
मनातल्या आभाळाला वाट मोकळी करून दिली,
टपटपणार्या पावसात
माझी आसवंही मिसळून गेली.

तासाभरानी थांबला पाऊस,
मी मान वर करून पाहिलं;
-सोनेरी ऊन, प्रसन्न इन्द्रधनुष्य, हसणारं गवत...
माझ्या मनातलं आभाळ मात्र तसंच भरून राहिलं.

मग आला लक्षात माझा वेडेपणा-

माझ्यासारख्या क्षुल्लक माणसासाठी
काही विशेष घडत नसतं,
एकटाच असतो तो,
त्याच्याबरोबर जग रडत नसतं!

...मुकाट परतलो घरी,
पण मनाशी ठरवलं काही,
माझ्या मनातलं आभाळ मलाच दूर करावं लागेल
दुसरं कोणी येणार नाही!!

--केदार

मी पाहते

मी पाहते सुर्याला उगवताना
आणी एका आंधळ्या माणसाला सूर्या कड़े तोंड करुन
आपुल्या चेहर्‍यावर प्रकाश अनुभवताना

मी पाहते लोकाना ज्योतिषा कड़े हात दाखवताना
आणी हात नसले तरी ही पूर्ण पणे
यशस्वी झालेल्या माणसाला

मी पाहते लोकाना सारखी धावपळ करताना
आणी पाय नसलेल्या माणसाला हाताने गाड़ी सरकवत
पैसे मागताना

मी पाहते खिडकितुन पाउस पडताना
अणी समोर एका तुटक्या झोपडित मुलाना
आपले पदरात लपवून सांभाळणार्‍या आई ला

मी पहाते म्हातार्‍या जोडप्याला हात धरून चालताना
आणि त्यांच्या फ़ार मोठ्या झालेल्या मुलाला
त्यांना वृद्धाश्रमात सोडताना.

मी पहाते पार्टीत सांड लवंड करणार्‍या लोकांना
आणि बाहेर उष्ट्या ताटातून
अन्नचे दाणे वेचत फ़िरणार्‍या मुलांना

मी पहाते लोकांना दिवाळित खुप फ़टाके जाळताना
आणि दुसर्‍या दिवशी बारुदाच्या राखेतून
न जळालेले फ़टाके शोधत असणार्‍या मुलांना

मी पाहते कुत्र्याच्या पिल्लाला मोटारीत फ़िरताना
आणि कोपर्‍यात पडलेल्या कचर्‍याच्या पेटीत
एका तान्ह्या बाळाला रडताना

मी पहाते मुलांना थाटात शाळेत जाताना
आणि बाहेर बसलेल्या एका मुलाला
बुट पॉलिश करताना

मी पहाते लोकांना रॅलित नारे देताना
आणि काम न झाल्यावर
त्याच मंत्र्याना शिव्या देताना

मी पहाते आई बापाना थाटात मुलीचं लग्न करताना
आणि त्याच मुलीला
पैशापायी सासरी जळताना

-- लता
आता तुला सगळं जुनं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं तुझ्या
गालावर पडणारी खळी...
तुला मात्र तुझं हसणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं तुझे
ते तिखट अश्रू...
तुला मात्र तुझं रडणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं आपण
एकदा पावसात भिजलो होतो...
तुला मात्र तो पाऊस
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं दिलं होतं
गुलाबाचं फ़ुल...
तुला मात्र त्याचा रंग
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं तु
एकदा रुसली होतीस...
तुला मात्र माझं रागवणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं आपण
खुप भाडायचो...
तुला मात्र माझं भाडंण
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

आता तुला सगळं जुनं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

-मयुर वाकचौरे
क्षण निरोपाचा येता
अश्रू दाटती नयनी
आठव या घराचा
भाव ओथंबले मनी

लाभले आशिष थोरांचे
कुठे ठेवू तो सौख्य-ठेवा
मागणे एक त्यांना
कधी विसर व्हावा

सखे, मैत्र माझे
सदा सर्वदा सांगाती
क्षण सुखाचा, दु:खाचा
पाठी उभे माझ्यासाठी

सान पावलांनी काही
उतरती रे मनात
बंधू भगिनींचे प्रेम
सदा राहील अंतरात

मागणे एक तुम्हा
नका देऊ हो अंतर
राहूदे सदा असाच
मायेचा पाझर

-- सोनाली

Wednesday, January 16, 2008

असंही प्रेम असतं!!


अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....

काय करु? काहीच सुचतं नव्हतं...

उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....

गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....

थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....

थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'...

म्हणजे माझ्याच वयाची असेल!

कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?

आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?

मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...

तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....

मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'

तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'

मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'

तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! आठवडे उरले आहेत फक्त!'

मी चकीत झालो!

विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'

तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'

.......मी निशब्द....

असंही प्रेम असतं!!


- निरज कुलकर्णी.
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही,
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही |

जन्मभर अश्रुस माझ्या शिकविलेस नाना बहाणे,
सोंग पण फ़सव्या जीण्याचे, शेवटी शिकलोच नाही |

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो,
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही |

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळीले मी,
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही |

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे,
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही |

वाटले मज गुणगुणावे ओठही पण जाहले तिऱ्हाईत,
सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही |

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा,
लोक मज दिसले अचानक, मी कुठे दिसलोच नाही |

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही,
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही |

कवी - सुरेश भट

आई, पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहीलं नव्हतं तरी
नऊ महीने श्वास स्वर्गात घेतला

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील

@सनिल पांगे

पुण्याचे ट्रॅफिक...नाम॑जूर

चाल : नाम॑जूर
अर्थातच स॑दीप खरे या॑ची माफी मागून....

जपत जना॑ना कार हाकणे - नाम॑जूर
लाल दिव्याला उगा था॑बणे - नाम॑जूर
मी ठरवावी दिशा वाहत्या ट्रॅफिकची,
वन-वे म्हणून दुरुन जाणे - नाम॑जूर ||

मला फालतू ह्या फलका॑चा जाच नको
कुठे कसेही वळण्यावरती टाच नको
था॑बवितो मी गाडी जिथे मज ईच्छा
जागा बघुनी पार्किग करणे - नाम॑जूर ||

रस्त्या॑वरच्या अपघाता॑ना कारण मी
वेगासाठी देह ठेवतो तारण मी
भले हाडा॑चा होवो सा-या चक्काचूर
मज शिस्तीचे थिटे बहाणे - नाम॑जूर ||

पडणे-झडणे भा॑डण-त॑टे रोज घडे
स॑धीसाधू लाचार मामू मध्ये पडे
'रोख' जरासे तिथेच द्यावे अन जावे
चौकीला नेणे गा-हाणे - नाम॑जूर ||

(मी गर्दीला ह्या शाप मानले नाही
अन नियम तोडणे पाप मानले नाही
खड्डा ज्यावर एकही पडला नाही,
असा पथ मी अद्याप पाहिला नाही)

नो-ए॑ट्री अन स्पीड लिमिट्स ही दूर बरी
मिळता जागा घुसण्याची ही ओढ खरी
परदेशा॑तून नियम पाळणे मज समजे
पण नियमा॑ना इथे पाळणे - नाम॑जूर..नाम॑जूर ||
=============================

-- मिलिंद छत्रे
http://milindchhatre.blogspot.com/

कोणी विचारा मला "मी जगतो कसा?"
मी म्हणेन पावातल्या वड्याजसा
स्वदिष्ट, रुचकर, खमन्ग असा
पोटभर खा वट्टेलतसा

जरी असेल मी पावात दाबलेल
चटणी, मिरचीनी तिखट केलेला
उकडुन, तळुन, शिजवुन काढलेल
तरीही चिन्च आणी गुळात बुडलेला

मज विचारा मी इतका चवदार कसा?
मी म्हणेन त्यासाठी आधी कूकर मधे बसा
मग उकळत्या तेलात पोहुन घ्या जरासा
आणी पावच्या दाढेत जाउन बसा

समजू नका मजवरी देव कोपला
बघा खजुरही वाळवन्टी जन्मला
जो कोणी आगीतुन नाही निघाला
कुन्दनाची सर कधी नाही येणार त्याला

-- याज्ञवलक्य

वणवा..

घर बांधण्यासाठी
आयुष्य वेचतो आम्ही..
वस्त्या जाळताना
विचार करत नाही..

सामान्य माणसांच्या
होतात कत्तली येथे..
आजही भाषणातून
माणूसकी जपली जाते.

शब्दांच्या ठिणग्यांनी ..
लावतात आग काही
आगीस धग देते..
तेल आपलेच काही..

वणवा होऊन जाते
एकांकिका कुणाची
इतिहास लिहून घेतोय
शोकांतिका जगाची..

आनंद माने
('आनंद' या शब्दाविन जगणे अशक्य.... तुम्हालाही )

मला आता मरायचय
पूरत मला जळायच
जगण आता पूरे झाल
खरच मला मरायचय
सरनावर जळताना
सार काही पहायचय

कोणाचे अश्रू खरे
कुणाचे आहेत बूरे
कोन सुखी कोण दुखी
आता ओळखायचय
मला मरायचय
मला मरायचय......

मरण्याआधी मी वेदनेने
ओरडेन थोडा विव्हळेन
पाणी मागेन...... शेवटच
कोणाच्या ओन्जळीत कीती अश्रू
हृदयात सागर कीती अफाट
मला सार पहायचय
म्हणून मला मरायचय
मला मरायचय.....

मेल्यानंतर नरक तर
नक्किच मिळेल मला
स्वर्गातल सुख नको आहे मला
नरकातल दुख भोगायचय
भूत होऊन काहीना
मला खूप छळायचय
मला मरायचय
मला मरायचय.....

मन माझ भरल्यानन्तर मला
स्वर्ग-नरकाच्या वेशीवर बसायचय
मग कोण कीती खेचत
मला बघायचय
तीथेही दिसतील मला
माझेच काही सोबती
मी कसा होतो, कोण होतो
सार मला विचारायचय
मला मरायचय
खरच मला मरायचय.....

हूश........आता खरच थकलो
जगताना भंगलो
मरणानंतर रंगलो
आता शेवटच.. अगदी शेवटच
एकच स्वप्न पहायचय
थोड मला आता
गूढ झोपायचय

-- अमोल

Monday, January 14, 2008

पुन्हा पावसाची वाट पहाते आहे - अस्मिता

पुन्हा पावसाची वाट पहाते आहे

खिडकीतून बाहेरचा पाऊस पाहिला की मला तुच आठवतोस
माझ्यासाठी प्रश्न घेउन समुद्रकिनाऱ्यावर उभा असतोस

श्रावणातला तो पाऊस नि समुद्राच्या खळाळत्या लाटा
क्शितिज पहाणारी मी नि माझ्या विखुरलेल्या बटा

माझ्या समोरच्या त्या द्रुष्यात तू माझा हात हातात घेतोस
"आयुष्य तुझ्यसोबतच जगायचय मला" असे आश्वासन त्या स्पर्शातून देतोस

माझ्यासमोरच मळभभरली दुपार हळुवार उजळत जाते
नवीन स्वप्नान्चे कारन्जे माझ्या मनात नाचत रहाते

त्या अपेक्शा त्या आशा मला माझ्या डोळ्यात दिसतात
मझ्यावतीने उत्तर देणारे समुद्राचे हुन्कार घुमतात

पाऊस थाम्बतो, वारा भिरभिरतो, मी पुन्हा वास्तवात येते,
सगळी स्वप्ने खरी करणाऱ्या तुझ्या बाहुन्चा आधार घेते

ती रेशीमभेट, ती दुपार, रोमारोमात फुलते आहे,
तुझ्या छातीवर डोके ठेवून मी पुन्हा पावसाची वाट पहाते आहे