आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.
Showing posts with label चारोळी. Show all posts
Showing posts with label चारोळी. Show all posts

Wednesday, October 15, 2008

तुला पाहुनी

तुला पाहुनी ... (नज़्म)

तुला पाहुनी जीव सांडतो
कळत नकळतच ...
तुला पाहुनि श्वास थाम्बतो
कळत नकळतच ...

मनात उठते उधाण वारे
पुन्हा एकदा...
अन् पाउस जातो शिंपून अत्तर
कळत नकळतच


-- महेश घाटपांडे

Wednesday, February 27, 2008

कधीतरी शिकुन घे, तु
शब्दांमधला अर्थ उलगडायला,
मग बघ, तुला पण नाही जमायचं
डोळ्यांपासुन आसवांना अलग करायला .!!!...

खरचं मन जे विचार करतं
प्रत्येकक्षात कधी घडत नाही
जे भाग्याला मान्य असतं
तसं स्वप्नही आपल्याला पडत नाही

वाटणी झाली तर ते पाप कसं
सुखानं वेगळं नांदणं शाप कसं
भिंती मनाच्या असतात
एकत्र असणं प्रेमाचं माप कसं

चारोळीकार: अद्न्यात


Tuesday, February 19, 2008

सगळे सुविचार हे
फळ्यावरच चांगले दिसतात
आचरणात आणायचं म्हटलं की
डोईजड होऊ लागतात
....................................................................................................
पाहिली आहेत माणसं मी
खरं आयुष्य जगणारी
समाज गेला चुलीत
असं काहीसं म्हणणारी
........................................................................................................
पंखातल बळ बघुनच
आता झेप घ्यायचं ठरवलय..
गाठता येनाऱ्या क्षितिजाच्या
दिशेनेच उडायचं ठरवलयं...

--आनंद काळे

Friday, January 18, 2008

वहीचं पान फाडताना
कोणताच विचार केला नव्हता
नंतर कळलं उरलेल्या पानांचा
एक आधार गेला होता
- अद्न्यात

झाडाच्या ओल्या जख्मां
कुणालाही कळत नाही
म्हणून सरणावर
ओली लाकडं जळत नाही
- गोवर्धन भोसले

प्रेम म्हणजे काय रे
दुधावरची साय रे
आपुलकीची उब मिळता
सहज उतू जाय रे
- प्रसाद कुलकर्णी

जगण्याचे बळ देते
रोज तुझे हास्य मला
तुझ्या एका हास्यास्तव
लाख चुका माफ तुला
- प्रसाद कुलकर्णी

आहे माझ्याकडे शक्ती
सर्व काही सोसायला
तरीही वाटतं हवं होतं
कुणीतरी डोळे पुसायला
- अद्न्यात

शेजारच्या गावी तमाशा आहे
पाय ठेवायला जागा नाही
आपल्या गावी किर्तन आहे
ऐकायला एकही जागा नाही
- काशिनाथ भारंबे

आयुष्य देतानाच तो त्यातनं
सुख वजा करून घेतो
नंतर सुखाच आमिष दाखवून
स्वतःची पुजा करून घेतो
- प्रसाद कुलकर्णी

मला लुटण्याचे
लाखो प्रकार झाले
ते चोर आज
सावकार झाले
- गोवर्धन भोसले

तू फुलांची बरसात केलीस
नेमकी परक्याच्या झोळीत
मी मात्र बहराला मुकले
जीवनाच्या या पानझडीत
- आकाशानंद

रेड्यानं वेद गायले
म्हणून ज्ञानेश्वराला इथे पुजतात
ज्ञानेश्वरीपेक्षा
इथे चमत्कारच रुजतात
- चंद्रशेखर गोखले

तक्रार ही नाही की
चंद्र आत डोकावतो
पण त्याचं बघून चोंबडा
प्राजक्तही सोकावतो
- चंद्रशेखर गोखले

Friday, January 11, 2008

माझा प्रत्येक निवांत क्षण तसा
तुझ्याच आठवणींनी सजलेला
मनाचा प्रत्येक कोपरा तसा, तुझ्या
आठवणींच्या दवबिंदुत भिजलेला

कसा दोष तसा देऊ मी तुला
तसं तुझं काहीच चुकलं नाही
पण मी तरी सांग काय करू
पापण्यांवरचं पाणी सुकलं नाही

तू परत येणार नाहीस हे
मला केव्हाच कळलं आहे
हे मन पण तुझ्यासारखंच
त्यानेही मला छळल आहे

-- अद्न्यात चारोळीकार

Thursday, January 10, 2008

अंगणीच्या रातराणीचा गंध
पिसाच मज करतो आहे
तुझ्या पहिल्या कटाक्षाचा क्षण
पुन्हा पुन्हा मला स्मरतो आहे
...................................................................................................
वेड लागलय मला
शब्दांबरोबर खेळन्याच
खेळता खेळता स्वत:ला
त्या दोन ओळींमध्ये लपवायच
..................................................................
तू जवळी असावीस
आणि चांदणी रात असावी
मी घ्यावे तुला मिठीत
आणि चांदण्यांची बरसात व्हावी

................................
-- आनंद काळे

Wednesday, January 09, 2008

ओर्कुट वरील एका थ्रेडमधल्या चारोळ्या....

सुरेल स्वप्नात तू दिसावा...
अंत अशा स्वप्नाचा कधी न व्हावा..
जाग येता पहाटेस गुलाबी..
समोरी माझ्या तुच दिसावा..

आज माझी मीच
मला ओळखु येईना..
प्रतिबिंब ही आरशातले..
मज प्रतिसाद देईना..

वाट दाराशी आली..
पण तो आला नाही..
ढग अंगणात येऊन देखील.
पाऊस बरसला नाही..

आज नक्की येइल
हेच मनाशी घोकतेय..
पण आभाळही मेलं सारखं
मुसळधार पाऊस ओकतेय..

तिच्याबरोबर माझं
कधीसुध्दा पटत नाही..
अन तरीसुद्धा तिच्याविना
मला थोडेदेखील करमत नाही

मी पाहिली तिला
ती एकटी नदिकाठी बसलेली,
मनात आठवणींचा पूर
अन डोळ्यात आसवे साचलेली

चांदरातीला त्या तुझी
सये सय येऊन गेली
नशेत बुडालेलो मी तुझ्या
त्या नशेची चव चाखून गेली...

पायवाट ती निसरडी..
पोरी जपुन चाल जरा
वेडीवाकडी वळणं इथं
रस्ता कोणताच नाही खरा

तुझ्यापासुन दूर जाताना
मी माझा उरलेला नसतो
तुझ्या आठवणींच्या तळाशी
कुठेतरी गुदमरलेला असतो

मन नाही लागत कशातच
तुला भेटायला येताना
फ़ुलं न पाखरही अस्वस्थ होतात
मी तुझ्यापासुन दूर जाताना

मन किती वेडं होतं
तू येताना दिसलीस की
मन किती खुळं होतं
तु आसपास नसलीस की

आज फ़ुलांना बहर आहे
जगण्यात नवा सुगंध आहे..
टिपुन घे रे राजसा लवकरी..
ओठावरी जो मकरंद आहे..

Thursday, December 20, 2007

झळा न सोसनार्यांन्ना

सावलीची किंमत कळत नाही

इतरांच्या दुखात बुडल्याशिवाय

आपली हिंमत कळत नाही

-- अद्न्यात चरोळिकार

Monday, December 17, 2007

स्थळ लागत नाही काळ लागत नाही

तुझी आठवण यायला वेळ लागत नाही

कित्ती स्वतःमध्ये तू गुंतून गेलीस बघ

मी जळतोय पण तुला झळ लागत नाही !!"

-- अद्न्यात चारोळिकार

Thursday, December 13, 2007

एक चारोळी बनवली आणि मैत्रिणीला पाठवली....
तिच्या आणि माझ्यामधला " एक संवाद" बघा कसा वाटतो ते.. ;-)

मी : बंद पापण्यांमागे
तुझाच चेहरा असावा
नको कोणतेच बंधन
नको कोणताच दुरावा

ती : वाह वाह
ती : सांभाळुन रहा मित्रा,
ईथे दुखाशी मैत्रि आहे,
मी प्रत्यक्षात अनुभवल तो रस्ता,
आता तुही त्याचा यात्री आहे

मी: परिणामाची येथे तमा कुणाला आहे
या वाटसरूला वाट न संपावी अशी आस आहे
मी : तुही वेडी आहेस सखे
आनंदाला दुखाची भिती दाखवत आहेस...
ज्याने दुसऱ्यान्ना हसवले
त्याला तु अश्रूंची भिती दाखवत आहेस...

ती: ईथे कुणाला दुखाची आवड आहे
पण प्रेमानेच केली दुखाची निवड आहे

मी : प्रेम कधिच फ़सत नाही
आपणच प्रेमात फ़सतो
क्षनभराच्य आकर्षनाला
प्रेमाचे नाव देउन बसतो
मी : तुज्या अनुभवाला
तु नियम मानत आहेस
जरा नियमाच्या चौकडीतून बाहेर पड
अजुन तुला खुप काही अनुभवायचे आहे

ती : प्रेम य शब्दाचा अर्थ मी काय घ्यावा ,
मी केले तो घ्यावा, कि तुला दिसतोय तो घ्यावा

मी : प्रेम म्हनजे काय
हे मलाही माहित नाही
पण त्याचा पाया विश्वास आहे
हेच कुणाला पटत नाही
मी : एका नजरे मधेच जेव्हा
तुला ज्याच्यावर विश्वास बसतो
तोच तुझा खरा जोडीदार
आणि तोच तुझा खरा सखा असतो

ती : नाईस

मी : माहित आहे कधी कधी
आपलाच पाय घसरतो
पण लक्षात ठेव
तोल न सांभळनारे आपणच असतो

ती : बस झाले
ती : नाहितर तुला आवार्ड द्यावा लागेल

Wednesday, December 12, 2007

बंद पापण्यांमागे
तुझाच चेहरा असावा
नको कश्याचेच बंधन
नको कोणताच दुरावा
- आनंद काळे

Tuesday, December 11, 2007

माझ्या डोळ्यात नीट बघं
तूझा प्रत्येक क्षण आवर्जून हिरवळेल
अलगद मग पापण्या मीट
एक स्वप्न हळूच येवून कुरवाळेल

प्रेमात पडलेल्या प्रत्येकाच
विश्वचं काही रम्य असतं
तुझं काय, माझं काय
तिचही विश्व साम्य असतं

विणलं मन मनाशी तर,
नात्याचं जाळं पसरणारचं
जिथे प्रेमाचा उतार असेल
तिथे भावना ह्या घसरणारचं

ज्यांना यातनाची फिकीर असते
ते प्रेम काय खाक करतात
जे दूर बसती किनाऱ्यावर
ते प्रेमाचीच राख करतात

-- सनिल पांगे
एकदा माझ्या परी , मजला जगावे वाटते ;
अन्य ना दुसरे कोणी , मज 'मीच' व्हावे वाटते !
केवढ्याला घेतलास , हा तुझा चेहरा नवा ?
त्याच बाजारामध्ये , मलाही जावे वाटते !!!

- संदीप खरे
प्रिय आईस

पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहीलं नव्हतं तरी
नऊ महीने श्वास स्वर्गात घेतला
-- सनिल पांगे

Friday, December 07, 2007

पेटत्या वणव्यातही घरकूल आम्ही थाटतो
चालतो काट्यांत अन वाणे फुलांची वाटतो
वेदनांना घाबरूनी प्रेम का होते कुठे?
दुःख अमुचे पाहुनी गहिवर सुखाला दाटतो....

....

वाटते, येथे जगायाची न अपुली लायकी
काय मैफीलीस या रुचणार अपुली गायकी!
गूढ या मंचावरी अदृष्य पडदे शेकडो
नायकाचे सोंग काढुन वावरे खलनायकी...
....

का अश्या साध्याच गोष्टी कठीण आता जाहल्या
साद प्रतिसादात या भिंती उभ्या का राहिल्या?
संशयाची आरशी चढली कशी डोळ्यांवरी?
भरवश्याच्या राहिल्या ना आपल्याही सावल्या.....
....

कसे सांगू कुणी मधुमास होते फुलविले
कुणी सुखवीत दळ एकेक कळिला खुलविले
अता गंधावरी ज्या भ्रमर येती धावुनी
कुणी श्वासांत अत्तर जीवघेणे शिंपले....
....

श्वास येतो.. श्वास जातो.. चालते हे ह्रदयही
एकट्याने चालण्याची होत जाते सवयही
भेटलो नव्हतोच जेव्हा, काय मी जगलेच नव्हते?
का अता ही शांतता येऊन एकांती भिवविते?
....

खुळ्या नदीचे सारे जीवन
निळ्या सागरी गेले वाहुन
अथांग झाले अवघे जीवन
विराग सुंदर अनुरागाहुन
....

ज्यात गवसली खरी मुक्तता
असे कसे घातलेस बंधन
तुझ्यावरी वाटते रुसावे
आणि स्वतःशी होते भांडण
...

तोच पडतो प्रश्न वारंवार की हे का असे?
सरळमार्गी चालणा-याचे जगी होते हसे
फूल जे जे वेचण्या जावे, निघे ते कागदी
हात जोडावे तिथे पाषाण निर्मम का दिसे?

--स्वाती आंबोळे

Wednesday, December 05, 2007


मी तुझ्याबरोबर खेळतो

तेच मुळी हरण्यासाठी
तुझ्या गालावरल्या खळीत
हसु भरण्यासाठी!

Tuesday, December 04, 2007

वैभव सारंगच्या प्रोफाइल मधून भेटलेले

प्रेम म्हणजे शांत वादळ असतं
ज्याला सगळेचजण झेलुन घेतात
प्रेम म्हणजे मरण असतं
ज्याच्यासोबत सगळेचजण खेळुन घेतात

जगुन घ्यावे तुझ्याचसाठी
असेच मजला वाटे गं
वाट तुझी मखमली व्हावी
मिळोत मजला काटे गं

तू म्हणतेस की तुझ्या मनात माझ्यासाठी
आभाळाएवढं प्रेम दाटतं
अह! तुझ्या प्रेमापुढं सये
मला आभाळचं ठेंगणं वाटतं

सळ्सळ्ती पाने उधणत्या लाटा
तुज्या आठवनीचा तेवढाच मोठा वाटा

पाण्यातलं चांदणं सुंदर असतं
तसच मनातलं चांदणसुध्दा सुंदर असतं
पण ते ओळखता आलं पाहिजे
त्यात मनसोक्त नाहता आलं पाहिजे

कोणी गेलं म्हणुन आपण
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं,
जगायचा असतो प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं.

आठवणींच्या वाटांवरुन
आपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं,
आभाळापर्यत पोहचता येत नसतं कधी
त्याला खाली खेचायचं असतं.

कसं ही असलं आयुष्यं आपलं
मनापासुन जगायचं असतं,
कोणी गेलं म्हणुन उगाच
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं.

दिवस तुझा नसेलही,रात्र तुझीच असेल
त्या रात्रीला नवं स्वप्न मागायचं असतं,
तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं.

कोणी गेलं म्हणुन........


पावसाच्या सरी सगळ्यांसाठी असतात ...
पण मनात भरून आलेले ढग आपलेच असतात !
मनातलं वादळ कोणालाच दिसत नाही ,
बरसणाऱ्या अश्रूंच्या सरी फ़क्त आपल्याच असतात !!!


दोन क्षणांची ओळख
दोन क्षणांची मैत्री
मला का वाटली
कोणीतरी सोबत असल्याची खात्री


प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........
हे प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........

तुझ्याशी खुप खुप बोलावेसे वाटते...........
पण शब्द चुकण्याची भीती वाटते............

तुझ्या खुप खुप जवळ यावेसे वाटते.........
पण विरहाची भीती वाटते.....................

तुझ्या सोबत चालावेसे वाटते.................
पण रस्ता चुकण्याची भीती वाटते............

तुझ्या नजरेला नजर द्यावीशी वाटते.....
पण पापण्या मिटण्याची भीती वाटते......

तुला बाहुपाशात घ्यावेसे वाटते.......
पण मिठी चुकण्याची भीती वाटते.....

Thursday, November 29, 2007

चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोर
नेहली फक्त तु असतेस,
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,
पण हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस!
-- अद्न्यात चारोळिकार

Wednesday, November 28, 2007

महेश जाधवच्या चारोळ्या

माझ्या घराला मी
कधीच कुलुप लावित नाही
घर तर दुःखानेच भरलय
आणि दुःख कोणचं चोरत नाही

सभोवतालचा अंधार दूर करण्यासाठी
मी वणवा होऊन पेटलो
काही काळ अंधार दूर झाला ही
मी मात्र कायमचा विझलो

कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो

आयुष्यावर मी
कधीच काही लिहित नाही
आयुष्य म्हणजे नक्की काय
हेच मला माहीत नाही

दुसर्याचे अश्रु पाहून
मी आता बेचैन होत नाही
मी किती ही रडलो तरी
अश्रु कोणी पुसत नाही

प्रेमाचा खरा अर्थ
माणसाला कुठे कळ्तो
त्याचा स्वार्थ साधला की
तो दुसर्या प्रेमाकडे वळतो

लबाड दुनियेत एक
लबाडी मी ही शिकलो आहे
दुःखी आयुष्याच्या पुस्तकावर
सुखाचं लेबल चिटकवलं आहे

डोळ्यात अश्रू दाटले कि
मी लगेच एकांत शोधतो
भरुन आलेल्या आभाळाला
मनसोक्त बरसु देतो
.....................................................................................................
शब्द अनमोल आहेत
ती जपून वापरायची असतात
फ़ळ्यावरील पुसता येतात
मनातील मात्र कायम राहतात
........................................................................................
तुझ्यासाठी रोजच मी
चारोळी लिह्ण्याचं ठरवतो
पण तुझी आठवण येते
आणि हातच लिहायचा थांबतो.
...................................................................................

आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसू लागलो
खोटं खोटं हसताना
कळलेच नाही कधी रडू लागलो
........................................................................
तुझ्या मिठीतील सुखं
पचवायचं राहून गेलं
तू कायम मिठीत रहा हे
सुचवायचं राहून गेलं
............................................................
आठवतं का तुला
तुझं मला पाहुन लाजनं
आणि डोळ्यांच्या कोणातून
हळुच मला पहाणं
............................

- महेश जाधव