आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, July 27, 2007

तिच ती माझी

--विराज

कॉलेजात जाताना, पहिल्यांदाच ती मला भेटली

लाल रंगाच्या कड्यांमध्ये, तिची कळी अधिकच खुलली

बहिण बरोबर असतानाही, मी तिच्याकडे बघत बसलो

काय, कसे कूणास ठाऊक? मी तिच्या प्रेमात पडलो।

दिवसातून किती वेळा, तिचं माझ्या बिल्डिंगजवळून जाणं

आणि जेव्हा जेव्हा चान्स मिळेल, तेव्हा तेव्हा माझ तिला बघणं

हळु हळु तिलाही, माझं प्रेम उमगलं;

मग तिची जवळीक वाढून, आमचं प्रेम जुळलं

एकमेकांच्या साथीत आम्ही कोठे कोठे नाही फिरलो

स्टेशनपासून बिल्डिंगपर्यंत, येता जाता तिच्या कुशीतच शिरलो

तिच्याबरोबर पालथं घातल, जयराजनगर, योगीनगर;

अगदि सोडलासुद्धा नाही, रोड चंदावरकर.

कधी-कधी मात्र, ति वेळेवर नाही यायची

बिल्डिंगखाली फेऱ्याघालून, आम्ही मात्र तिची वाट बघायची

मग उशीरा आल्यावर, तिचं लांबुनच दिलगिरी व्यक्त करणं

आणि माझं मोठ्या मनानं, हसतं तिला माफ करणं .

माझ्यासारखेच तिची वाट बघणारे होते अनेकजण

कारण तिही तशीच होती; साधी,भाव न खाणारी आयटम नंबर वन

म्हणून कॉलेजसंपेपर्यत तिच्याबरोबर फिरायचो

तिच्या हातात हात घालून, तिला फुलासारखे जपायचो.

कॉलेज संपल्यावरही ती सदैव राहते आठवत

मला पाहून लांबूनच, डोळ्यांनी ती असे खुणवत

तिचं मनमोहक रुप अजुनही काळजात ठेवतो

म्हणूनच तिला विसरायचं ठरवतो आणि नेमके तेच विसरतो.

जॉब मिळाल्यानंतर मात्र, माझ्या मनात कायम असेल भिती

आपल्या दोघांच्या भेटी, होतील की नाही दिवसराती

कारण माझ्या वेळेचं भान तू राखशील कशी?

तरीहि कठिणचं आहे, तुला सोडून जाणं दुसऱ्यापाशी.

भेटी झाल्या तरी, ह्रदयावर तुझं प्रतिबिंब कायमचं कोरलेलं

मनाच्या एका कोपऱ्यात, तूझं नाव सदैव जपलेलं

तिचं नाव सांगू की नको, मला लाज वाटते

पण प्रेमचं ते, कोणावरही केलं तरीहि लपत नसते.

म्हणूनच ठरवलं तिचं नाव सांगून टाकायचं

झालं ते झालं, आता नाही घाबरायचं

तिच माझी बिल्डिंगखाली येणारी सखी सवंगडी

तिच ती १६ क्रमांकाची बस, पोस्ट ऑफिस ते चिकूवाडी.

चूक

एक सुंदरी सलूनमधल्या खुर्चीवरती भल्या दुपारी
येउन बसली अगदी अलगद, सोडून केस तिचे सोनेरी

मिटून चष्मा काळा बसली पायावरती पाय चढवुनी
वेध घेतला भोवतालचा एक दोनदा मान वळवुनी

नजर झुकवुनी पदर सारखा करून झाला मग हाताने
जणू पंखाची पिसे सारखी करावी कोण्या पक्षाने

केस कापले अनेकदा पण समाधान काही लाभेना
आरशामध्ये बघून झाले पण जीवाला चैन पडेना

म्हणतील सख्या किती कापले केस अता मी कैसे जावे -
काय करावे आता याचे बाईंना कैसे उमजावे?

तोच चलाखी करून न्हावी चूक लपवी लावे गंगावन
रूप नवे पाहून स्वतःचे अन सुंदरी झाली पावन

अधीरतेने हर्षभराने स्पर्धेला अवतरली यक्षिणी
आणि तिच्या केसात अचानक चुकून घुसली एक पक्षिणी

महिला मंडळा मधली जेव्हा संपली स्पर्धा नटण्याची
चिमणीची चिंता कायमची होती मिटलेली घरट्याची

-केशवसुमार

मराठी विनोद
रेल्वेतून प्रवास करताना, श्रीपतराव मोठ्या दिलगिरीने सहप्रवाश्याला म्हणाले, "मला कमी ऐकु येतं एवढं मला ठाउक होतं परंतु आता तर असं वाटतयं की मी ठार बहिराच झालोय, कारण तुम्ही मगाच पासुन बोलत आहात त्यतिल अवाक्षरही मला ऐकु येत नाहीए"। सहप्रवासी गणपतराव म्हणाले, "आपला गैरसमज झालाय. मी बोलत नव्हतो तर चुईंगम खात होतो!"

तिंबूनाना आणि विमलाबाई फ़िरायला गेले होते. वाटेत एका दुकानाबाहेरील पाटिकडे विमलाबाईंच लक्ष गेलं आणि त्या आनंदाने नाचायला लागल्या. कारण त्या पाटीवर लिहलं होतं,

बनारस साडी १० रु.
रेशमी साडी ५ रु.
सुती साडी २ रु.

विमलाबाई तंबूनानांना म्हणाल्या, "आहो लवकर शंभर रुपये द्या. आपण भरपुर साड्या घेऊया!"
तंबूनाना वैतागुन म्हणाले," मुर्ख आहेस! अग ती लाँड्री आहे! साड्यांचे दुकान नाही."

बाई ः एका शेतात आठ बकऱ्या होत्या त्यापैकी चार बकऱ्या कुंपणावरुन ऊड्या मारुन रस्त्यावर गेल्या तर शेतात कीती राहिल्या?
वर्गातला शेतकऱ्याचा मुलगा ः एकही नाही.
बाई ः नाहि कसं? मागे काही उरतीलचं.
शेतकऱ्याचा मुलगा ः बाई तुम्हाला गणित माहीती असेल परंतु बकऱ्यांची माहिती नाही

चिमणराव तक्रार गुदरण्यासाठी पोलिस ठाण्यावर गेले.
म्हणाले, मी जंगलातुन प्रवास करताना माझ्याजवळचे पैसे, घड्याळ, सोन्याची साखळी, इतके सगळे सामान चोरट्यांनी पळवले"
"पण साहेब, मला वाटतं तुमच्याजवळ पिस्तुल होतं." अधिकारी म्हणाला.
"नशिब ते त्यांना सापडलं नाहि।" चिमणराव उत्तरले!

एक महिला आपल्या पाच वर्षिय मुलाला घेउन डॉक्टरांकडे गेली. तपासून झाल्यावर डॉक्टरांनी त्याला विचारलं, "बाळं, तुला नाक किंवा कानाचा काही त्रास होतो का?"
नाक पुसुन बाळ उत्तरला, "हो ना! गंजीफ़्रॉक घालताना काढ्ताना फ़ारच त्रास होतो!!"

एकदा एक माणुस दुकानात गेला व दुकानदारास म्हणाला-
"काय हो, काल मी तुमच्याकडुन जे डाग घालवायचं औषध घेउन गेलो......" त्यावर दुकानदार म्हणाला "मग आणखि काही हवं आहे का?"
"हो त्या औषधाचे डाग घालवण्याचं औषध हवं आहे।" तो माणूस म्हणाला

एकदा श्री. बोडसे दुकानात गेले व म्हणाले "मी काल तुमच्याकडून जो डबा घेउन गेलो तो उघडायचा कसा ते कळतच नाहीए." त्यावर दुकानदार म्हणाला " डबा कसा उघडायचा याचं पत्रक डब्यातंच आहे."

एकदा एक इन्स्पेक्टर गाडीत शिरला. समोर पाहतो तर एक हवालदार उठून उभा राहिलेला. इन्स्पेक्टर म्हणाला, "अरे अरे उठायची गरज नाही. बसलास तरी चालेल." असे दोन-तीन वेळा झाल्यावर शेवटी तो हवालदार म्हणाला, " साहेब माझं स्टेशन कधीच गेलं. आता तरी मला उतरु द्या.

भूक

एक कावळी भल्या दुपारी सळसळणाऱ्या झापेवरती
येउन बसली अगदी अलगद, सोडून सोनसळी भटकंती

पंख घेतले मिटून आणि स्थिरावली ती पाय जुळवुनी
वेध घेतला भोवतालचा एक दोनदा मान वळवुनी

पंखांवरची पिसे सारखी करूनही झाली चोचीने
जणू पदर सांभाळून घ्यावा चटकन कोण्या नवयुवतीने

चोच घासली अनेकदा पण समाधान काही लाभेना
झावळ्यांवरी धुसफूस केली तरी जीवाला चैन पडेना

असतील पिल्ले किती भुकेली दोन घास घेऊनच जावे -
याच्याविपरीत दुसरे काही आईला कैसे उमजावे?

तोच खुणावत सोबत आला धूप-फुलांचा सुवास जोवर
दिसे तिला खालीच ठेवले पान कुणीसे मांडुन तोवर

अधीरतेने हर्षभराने खाली झेपावली तत्क्षणी
पिल्लांसाठी दोन घास घेऊन दूर पातली पक्षीणी

घाटावरती संपत आली स्पर्धा आताशा रडण्याची
लोकांना किंचितशी चिंता होती पिंडाला शिवण्याची

-नीलहंस

Thursday, July 26, 2007

तिचं व्याधी, तेचं दुःखं रोज मी स्मरु किती?
ह्या तडफ़णारया जिवाला रोज मी रोखू किती?

तेच तारे,तेच आकाश रोज मी पाहू किती?
तिचं रात्र,त्या काळोखात रोज मी जागू किती?

त्याचं वाटा,तेचं रानं रोज मी हिंडू किती?
तिचं झाडे,तेचं काटे रोज मी चालू किती?

तोच समुद्र, त्याच लाटा रोज मी झेलू किती?
ह्या बुडणारया मनाला रोज मी सावरु किती?

त्याच कळा,त्याच जखमा रोज मी सांगू किती?
ह्या घायाळ जिवाला रोज-रोज मी पोसू किती?

(कल्पेश फोंडेकर)
२५-७-०७
नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.

जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे

आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे

नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे.

सुधीर ........
मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?

खूप अडखळीची आहे वाट ही
कधी काट्यांवरी पडेल टाच ही
धडपडताना ह्या खडतर वाटेवर
सांग हात मला तु देशील ना ?

तुझ्या प्रितीचा आहे ध्यास मला
तुझ्या भेटीची आहे आस मला
कधी एकटेपणाचा होईल भास मला
सांग साथ मला तु देशील ना ?

कधी रागवेन मी तुझ्यावरती
कधी भांडेन मी तुझ्या संगती
कधी येईल दडपण या मनावरती
सांग कुशीत मला तु घेशील ना ?

मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?

~ सुधीर

तो क्षण निघून गेला

तो क्षण निघून गेला मी पाहतच राहीलो
बोलायच खुप होत पण निशब्द झाहलो
सारे शब्द जणू रानोमाळ पळून गेले माझे
ओठ उघडलेच नाही डोळ्यात विरघळत राहीलो.

तु समोर होतीस मी कोपरा शोधत रहीलो
तु वळून पाहत होतीस मी वळत राहीलो
आज कळाल कीती कठीण असत प्रेम
काही सपंवुन गेले मी सुरु करण्यात राहीलो.

तुझे डोळे बोलत होते मी पपण्यांत राहीलो
तुझे इशारे खुणवत होते मी बघण्यात राहीलो
कोणीही त्या संधीच सोन केल असत आज
मी 'सोन्या' सोन्यासाठी संधी शोधत राहीलो.

वेळ जात राहीली मी आज वाहत राहीलो
मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीलो
तु माझ्या काळजात सामावुन गेलीस सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीलो।

तो रस्ता मला पाहून आज हसला
म्हणाला प्रेमात बिचारा फ़सला
हो ती हवा आजही तिथेच होती
नेहमी तुझे केस विसकटणारी

तो गाडयाचां गलकाही तिथे होता
रोज तुझ्या माझ्या वादंवर हसणारा
त्या वळणाने मला आवाज दिला खरा
पण आज मी मागे वळून पाहीलच नाही

रोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्या
आज कोणी माझ्याकडे पाहीलच नाही
आज किमंत कळाली तुझ्या सोबतीची मला
आज सारखं चुकल्या सारखं वाटत होत

पावले चालत होती पण वाट संपेनाच माझी
आज एक युदध हरल्या सारख वाटत होत
आज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकच
रोज दोघं असतात पण आज हा एकच

उत्तर होत जरी एकटाच असलो तरी
तुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीला
पण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरज
असतेच ना सागराच्या भरती आहोटीला...

~ सुधीर
मनातले शब्द मनातच राहून गेले...
तीला बोलावलं भेटायला, ठरवलं सारे सांगून टाकायचे,
पण ती आली मैत्रिणी सोबत, अन काही बोलताच नाही आले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...

हिम्मत साठवली आणि केले तीला SMS,
पण अर्धवटच वाचून ते Delete तीने केले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...

लिहित बसलो रात्रभर, वाटल सांगावं कवितेतून तीला सारं,
पण ती समोर येता सारे शब्दच विसरून गेले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...

भेटली एकटी बस-स्टॉपवर ती, वाटलं संधी चांगली आहे,
पण अचनक तिने "हा मझा बॉय-फ्रेंड" असे इंट्रोड्युस "त्याला" केले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...

तरी वाटलं डोळ्यातले अश्रू सांगतील तिला सारं,
पण ती येई पर्यंत ते ही पावसाच्या पाण्यात वाहून गेले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले

मन चांदण्यात न्हावुन निघते

आशेच्या पावासाळी सरीने
डोळ्यातले स्वप्न मग चिंब भिजते

माझ्या मनातल्या कोरया कॅनवास वर
तुझं चित्र मग आपोआपच उमटते

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
जणु श्रावणातली पहीली सर बरसते

तुझ्या आठवणींच्या सरीने
कोमेजलेल्या या मनाच्या रोपाला
मग नवी पालवी फ़ुटते

रात्रीच्या गर्द काळोखी
मन चांदण्यात न्हावुन निघते

~ सचिन ~

Wednesday, July 25, 2007

कशाची आठवण ठेवायचीये
कुठली गोष्ट विसरायचीये
कोणाला मनातलं सांगायचाय
कोणापासुन सगळ लपवायचय
अवघड आहे एखादा निर्णय घेणं……
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं……

कधी आवाज द्यायचा
कधी निशब्द व्हायचय
कधी रडता रडता हसणं
तर कधी हसता हसता रडणं
अवघड आहे एखादा निर्णय घेणं……
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं……

कुठे मार्ग बदलायचाय
कुठुन आल्यापावली परतायचय
अवघड आहे एखादा निर्णय घेणं……
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं……

गीत माझे सूर तू छेड यारा...
सूरात तुझ्या सूर माझा...
शब्दांस माझ्या शब्द तू जोड यारा...

ही रात्र काजळी पुन्हा ढळून जाईल...
तू हास आज...
हासणे तुझे वाटे गोड यारा...

भरवसा उद्याचा सांग कुणी कुणासा द्यावा?
तू घे जगुन आज
बंधने सारीच तोड यारा

तू हो कवडसा सुखाचा तुझ्याचसाठी
दु:खे पडद्यामागे लपलेले
दूर त्यांना तू सोड यारा....

निघुन गेलो जरी कधि मी
राहील शब्दांच्या रुपाने सदा
नाते शब्दांशी माझ्या तू जोड यारा...

~संदिप सुराले ~
मी एकटा आहे ...
एकटाच राहणार आहे मित्रांशी गप्पा मारताना,
संवाद स्वतःशीच साधणार आहे...
लोकाचांत असूनही ... वेगळा राहणार आहे मदत करणारे खूप आहेत ...
समजून घेणारे कमी मैत्री करणारे खूप आहेत
पण साथ देणारे कमी म्हणूनच .........
मी एकटा आहे ... एकटाच राहणार आहे

सचिन काकडे
चंदनाचे जीवनच असं असते,
नेहमी दुस-यासाठी झिजायचे असते
स्वत: मरत असला तरी,
लोकांसाठी जगायचे असते
नात्यांच्या बंधाचेही असंच काहीसं असतं
नको असलेली काही नाती
आयुष्यभर वागवावी लागतात,
आणि मनात जपलेले काही बंध
आयुष्यभर अबोलच राहतात........

मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधी
मी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.

सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले
मी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.

तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्या
मी बसलो बाजार मांडून , तीने भाव माझा ना विचारला कधी.

आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याची
मी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.

सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या
मी जगलो काजवा होऊन , तीला उजेड माझा ना दिसला कधी.

आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठी
मी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.

मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी
मी जळालो पाखरु बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी.

मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावी
मी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.

आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापा
मी चाललो स्वप्न मोडुन , तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी

ओळ अशी,ओळ तशी...
ओळ अशी,ओळ तशी...

एखादी ओळ,
चंद्राची कोर होते,
एखादी ओळ,
नाचणारा मोर होते,

एखादी ओळ,
चढणीचा घाट असते,
एखादी ओळ,
ठुमकणारी वाट असते

एखादी ओळ,
स्वतःशीच लाजुन हासते,
एखादी ओळ,
हळुच आपले डोळे पुसते

एखादी ओळ,
केशरी जंतरमंतर असते,
एखादी ओळ,
दोघातलं अंतर असते,

एखादी ओळ,
फ़ुलपाखरा मागे धावते,
एखादी ओळ,
अंधारत दिवा लावते,

एखादी ओळ,
सरींमधे चिंब भिजते,
एखादी ओळ,
आपलेच प्रतिबिंब बनते

एकटीच या चांदण्याराती.........

आयुश्याच्या वळणावरती
कशी रे जडली तुझ्यावर प्रीती
लाजुन तुज आठ्वत बसते मी
एकटीच या चांदण्याराती.........

काही दिवसांपुर्वीचे अपरीचीत आपण
लगेच कसे ओलखीचे झालो
वाटसरु आपण वेगळेवेगळे
आता सहजिवनाचे सोबती झालो......

निरगस तुझे बोलके डोळे
वेड मजसी लाउन गेले
भिडता नजर एकमेंकाशी
पापण्यानी स्वत:स जुळवुन दिले.....

मनमोकळा तुझा हसरा स्वभाव
जिवास मझ्या खुप भावला
समजणेच न मला आता
मज लळा तुजा कसा लगला ???

देशील न साथ मज मरणोत्तर सुध्धा?
वचन मागते मी प्राणप्रीया
आता इच्छा दटते एकच उरी
म्रुत्युही आता तव कुशीत यावा.......

मनू.......
कहाणी ही एका वेडया मनाची....................

वाळुवर बनवलेली
दोन घरं मी स्वत:ची
एक ते लाटेत कोलमडलं
आणि दुसरं ते वाहुण गेलं
काय दोष द्यावा त्या लाटेला ?
वाळुवर घर बनवणं
ही गोष्ट्च मुळ चुकीची
कहाणी ही एका वेडया मनाची....................


श्रावणात बहर आला
अख्या रानाला पण
एक कळीही ना
उमलली माझ्या अंगणाला
माझ्या अंगणात होते
हिच चुक का त्या रोपांची
कहाणी ही एका वेडया मनाची....................


चमकत्या त्या वस्तुला
मी नेहमीच सोनं मानलं
समजाऊनही न बदलली
नितीमत्ता माझी
हाव होती तेव्हा मला
त्या चमकत्या सोन्याची
कहाणी ही एका वेडया मनाची....................


आता सगळं संपलय,
उठलाय सगळा बाजार
जडलाय मनाला
एकटेपणाचा भयंकर आजार
डोळ्यात माझ्या डोलतेय
मजेत आता माळ आसवांची
कहाणी ही एका वेडया मनाची....................


पाहतोय मी वाट एक
नवी सकाळ उजाडण्याची
पण आता घाई नाही करणार
नवा बाजार मांड्ण्याची
आणि आता वाट पाहणार
नाही कुणाच्या वाटही साथीची
कहाणी ही एका वेडया मनाची....................


सचिन काकडे [जुलै २४,२००७]

गीत माझे सूर तू छेड यारा...
सूरात तुझ्या सूर माझा...
शब्दांस माझ्या शब्द तू जोड यारा...

ही रात्र काजळी पुन्हा ढळून जाईल...
तू हास आज...
हासणे तुझे वाटे गोड यारा...

भरवसा उद्याचा सांग कुणी कुणासा द्यावा?
तू घे जगुन आज
बंधने सारीच तोड यारा

तू हो कवडसा सुखाचा तुझ्याचसाठी
दु:खे पडद्यामागे लपलेले
दूर त्यांना तू सोड यारा....

निघुन गेलो जरी कधि मी
राहील शब्दांच्या रुपाने सदा
नाते शब्दांशी माझ्या तू जोड यारा...
~संदिप सुराले ~

Monday, July 23, 2007

वार्‍यावरती गंध पसरला, नाते मनाचे,
मातीमध्ये दरवळणारे, हे गाव माझे,
जल्लोष आहे आता उधाणलेला,
स्वर धुंद झाला मनी छेडलेला,
शहारलेला, उधाणलेला, कसे सावरावे ?

स्वप्नातले गाव माझ्यापुढे;
दिवसाचा पक्षी अलगद उडे;
थंडीच्या पदरावरती; चिमणी ही चिवचिवणारी;
झाडात लपले सगेसोयरे;
हा गाव माझा जुन्या आठवांचा;
लाटात हस-या या वाहत्या नदीचा;
ढगात उरले पाऊसगाणे कसे साठवावे ?

हातातले हात; मन बावरे;
खडकाची माया कशी पाझरे;
भेटीच्या ओढीसाठी श्वासांचे सुंदर ढलपे;
शब्दांना कळले हे गाणे नवे;
ही वेळ आहे मला गोंदणारी;
ही धुंद नाती गंधावणारी;
पुन्हा एकदा; ऊन भेटता कसे आवरावे ?

आठवणी तुझ्या... जणू पावसाच्या सरी,
धुंद होते त्या सरींमध्ये चिंब चिंब भिजुनी !

आठवणी तुझ्या... जणू इंद्रधनू सप्तरंगी,
प्रत्येक रंगात तुझ्या जाते मी रंगूनी !

आठवणी तुझ्या... जसा हा निसर्ग हिरवा,
हवाहवासा वाटतो तुझ्या प्रितीचा गारवा !

आठवणी तुझ्या... म्हणजे झुळझुळ वाहणारी नदी,
तुषार प्रितीचे तुझ्या झेलते मी अंगावरी !

आठवणी तुझ्या... म्हणजे काळे काळे ढग,
दाटून आले की... वाहू लागते अश्रूंची सर !!!!

गालावरी खळी डोळ्यात धुंदि
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो एका ईशा-याची
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे

कोणताहा मौसम मस्त रंगाचा
तुझ्यासवे माझ्या जिवनी आला
सुने सुने होते किती मन माझे
आज तेच वाटे धूंद मधुशाला
जगण्याची मज आता कळते मजा
नाहि मी कोणाचा आहे तुझा
सांगतो मी खरे खुरे तुझ्यासाठी जीव झुरे मन माझे थरारे
कधी तूझ्या पुढे-पुढे कधी तुझ्या मागे-मागे करतो मी ईशारे
ए जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे

तुझ्या पापण्यांच्य़ा सावलीखाली
मला जिंदगीही घेऊनी आली
तुझ्या चाहुलीची धुन आनंदि
अंतरास माझ्या छेडूनी गेली
जगण्याची मज आता येई मजा
तू माझे जिवन तू माझी दिशा
आता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगीरी हुर-हुर का जिवाला
बोल आता तरी काहि तरी भेट आता कुठे तरी कसला हा अबोला
ए जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे

भावना मनाच्या कोणा न कळल्या .............
शब्द बांधील ती प्रेम गुपिते
मी मुद्दामच नव्हती खोलली
उगवत्या मनाच्या स्वप्नांची
जणु ईच्छाच होती मावळली

तुझ्या आठवणीत तेव्हा
प्रत्येक रात्र मी जागवली
तुझ्या बरोबरच्या प्रत्येक
क्षणाला न विसरण्याची शपथ मी दिली

अविस्मरणीय त्या क्षणात आता
असहनीयशी वेदनाच फ़क्त ऊरली
त्या वेदनेची लहर मनाच्या
अंतरी खोलवर पोहोचली

आनंदाच्या गावची वेस जणू
आता खुप मागे राहीली
वाटतय ती भाग्यलक्ष्मी जणु
माझ्यावर कायमचीच रागवली

सहन मी एकट्यानेच केलं
तुझी सोबत जरी नसली
मन बिचांर एकटच जळांल
तुझी आठवण जेव्हा जेव्हा पेटुन उठली

मातीत फुलले गाणे
आकाश गोजिरवाणे
अंतरात पावसाच्या
दडलेले गुढ उखाणे

प्राणात उसळते लाट
अंधार साठला दाट
परी वेड ते प्रकाशाचे
शोधून काढते वाट

घेऊन हिरवे श्वास
ओल्या मनाचि आस
उमटतेच नाजुक नक्षी
तोडुन सारे पाश

झळकती तुरे डौलाने
त्या देवाच्या कौलाने
हरखुन पहातच रहाती
या सृष्टीला नवलाने

इमुकले मौन सळसळते
वार्याशी नाते जुळते
होताच स्पर्श तयाचा
कोवळी कळी हुळहुळते

भरभरुन जीवन जगणे
असण्यातच केवळ रमणे
रंगांचे गंधित गाणे
हळुवारपणे गुणगुणणे

एक ’ भेट ’ काय टळली..

पहायचे होते मला..
तुझ्या डोळ्यांत , माझे प्रतिबिंब..
पहायचे राहून गेले..

ऐकायचे होते मला..
तुझ्या आवाजात , माझे नाव..
ऐकायचे राहून गेले..

अनुभवायचे होते मला..
तुझ्या श्वासांत , माझे श्वास..
अनुभवायचे राहून गेले..

तुला पाहणे, तुला ऐकणे, तुला अनुभवणे....राहून गेले....

भेटीचे तर होते................फक्त बहाणे ,
मजसाठी तर झाले असते ते , ’ जगणे ’..

तुझ्या डोळ्यांच्या तेजात ,
उजळले असते लक्ष दीप , माझ्या नेत्रांत
जे तेवत राहिले असते , उदास अंधा-या रस्त्यांत..

तुझ्या श्वासांच्या सुगंधात ,
फुलले असते संजीवन प्राण , माझ्या श्वासांत
जे भरत राहिले असते जीवन , श्वास रोखणा-या क्षणांत..

तुझ्या आवाजाच्या मारव्यात ,
गुंजले असते मधुर गीत , माझ्या आत्म्यात
जे देत राहिले असते साद , भग्न एकाकी आयुष्यात..

पण, पण....

एक ’ भेट ’ काय टळली..
अन ' जगायचे ' राहून गेले..

' तुझ्याबरोबर ' जगायचे राहून गेले..

- स्वप्ना
दिवेलागणीच्या वेळी !
नको तेच ते का स्मरते...दिवेलागणीच्या वेळी !तुझ्या आठवांना भरते...दिवेलागणीच्या वेळी !
जणू होत आहे चकवा...फिरे काळ एका जागी...पुढे वेळ कोठे सरते...दिवेलागणीच्या वेळी ?
- पडू लागता कायमचा जसा गाव मागे मागे...कुणी पोर डोळे भरते...दिवेलागणीच्या वेळी !
मला एकट्याला बघुनी म्हणे चांदणी एकाकी...तुझा हात मीही धरते...दिवेलागणीच्या वेळी ! !
तुला आठवे का पहिली तिची भेट एकाएकी...?मनी काय हे मोहरते...दिवेलागणीच्या वेळी ?
कुणी येत नाही...मन हे तरीही प्रतीक्षा वेडी -- कशाला कुणाची करते...दिवेलागणीच्या वेळी ?
सुचेनाच काही अगदी...सुचेनाच काही काही...कशाचे न काही ठरते...दिवेलागणीच्या वेळी !
क्षणी या रिकाम्या, परक्या कुठे मी मनाला नेऊ ?उदासी घरी वावरते...दिवेलागणीच्या वेळी !
कुणी दूर का आळवते तिथे मारव्याच्या ताना...?इथे दुःख माझे झरते...दिवेलागणीच्या वेळी !
अशी आर्तता, कातरता कळावी कुणाला माझी ?...मुकी वेदना हंबरते...दिवेलागणीच्या वेळी !
हसू आण ओठांवरती, जरी पापण्या या ओल्या...तुझे तूच घे आवरते...दिवेलागणीच्या वेळी !
- प्रदीप कुलकर्णी