सुख म्हणजे काय नेमक
कसं असत... कुठे भेटत?
बाजारात कुणी विकता का?
शेतात कुठल्या पिकत का ?
कुणालाच कस सापडत नाहि
का कुणातच ते अडकत नाहि?
ते पंख लाउन उडत का?.....
अथवा भूमीमधे दडत का?
कि श्रीमंता घरी ते वसतं ?
मग झोपड्यांत कोण हसत ?
सॆरभॆर कल्पना आणि
गॊंधळलेले प्रश्न....
अस्वस्थ मनाच्या गाभ-यात
कण्हतय कुणीस तिष्ण............
जळमट सारि झाडून
आत डोकावले तेव्हा कळल
मीच माझ्या सुखाला
तळघरात होत डांबल....
अहंकाराच्या दोरांनी
करकचून बांधल ज्याला
तेच सुख ...... ठाउक नव्हत
म्हणूनच कहर झाला....
आता सांगू का जे कळलय मला
हळूच तुमच्य़ा कानात....
कधी कधी तुम्हिहि बघत जा
डोकाउन आपल्या मनात......
कवी - सुमन
स्त्रोत: ओर्कुट