आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Saturday, April 24, 2010

वपुर्झा

"मी तुझ्याकडे आत्ता सरळ सरळ बघतोय.
बाकीचेही बघताहेत. तुला पुरुषांच्या 
नजरेची, बघण्याची चिड नाही का येत?"

"का यावी? मी स्विमिंग ड्रेसमध्ये असताना
पुरुष बघणारच. त्यांनी बघावं म्हणून मी इथं
येत नाही. इट इज पार्ट ऑफ द गेम! पुरुष
पाहणारच. स्वाभाविक गोष्टींवर चिडण्यात
अर्थच नसतो. भंगे जमावेत म्ह्णून कमळ
फुलत नाही, आणि एखादं कमळ पकडायचं
असं ठरवून भुंगे भ्रमण करीत नाहीत. फुलणं
हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्याचा धर्म.
जाणकारांनी, रसिकांनी कमळाकडे पाहावं,
भुंग्याकडे पाहावं आणि फुलावं कसं आणि 
भुलावं कसं हे शिकावं."

-वपुर्झा