आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, March 28, 2008

आवडत्या ग्राफीटी

सावधान! पुढे चांगला रस्ता आहे.

भविष्यातील निर्णयांपेक्षा,
निर्णयांच्या भविष्यांचा विचार करा...

आश्वासन: दुसर्याचा श्वास थांबला, तरी करत राहण्याचे आसन.

स्वत: मेल्याशिवाय विम्याचे पैसे मिळत नाहीत.

सुखाच्या शोधात स्वातंञ गमावून बसणारा प्राणी : नवरा..

ड्रायव्हरची जांभई
प्रवाशांची झोप उडवते.

बायको आणी वादळातलं साम्य:
नंतरच्या उत्पाताचा आधी अंदाज येत नाही..

'संकट' एकटी-दुकटी येत नाहीत,
सासुसह माहेरचा बराच गोतावळा आणतात.

निष्क्रिय राहणं सग्ळ्यात अवघड काम.
एक दिवसाची सुटी मिळत नाही.

प्रत्येक अयशस्वी पुरुष (एखाद्या)
स्त्रीच्या मागे असतो.

काळजी 'करण्यापेक्षा'
काळजी 'घेणं' चांगलं!

रस्त्यावर उतरला नाहीत, तरी चालेल.
पण
'रस्त्यावर' येऊ नका, म्हणजे झाल!

लग्नात घोडयावर बसून वरात काढने म्हणजे "गाधवपणा"होय.

समोरचा आपल्याकडे सतत पाहतो आहे
हे त्याच्याकडे पहिल्याशिवाय कळत नाही

एकटा असताना घर खायला उठल की मी प्यायला बसतो.

जुन्या जालेल्या चपलांचा कंटाळा आला तर .....
तर मी देवळात जातो .....

Thursday, March 27, 2008

यु.के. चं वर्क-परमीट हाती आलं...
आणि आमचं घोडं थेम्समध्ये न्हालं!!

तेच टेकी काम पण इथे चौपट दाम,
हरखून जाती सारे आम्हीही हरखलो!
NRIs च्या त्या विलोभनीय यादीमध्ये,
सहज हळुवारपणे आम्हीही सरकलो!
आयुष्याचं आमच्या जणू सार्थक झालं,
आणि आमचं घोडं थेम्समध्ये न्हालं!!

कूकीज, मफ्फीन्स, ब्रेड आदी खुराक,
कॉर्नफ्लेक्स माझा आरोग्यवर्धक नाश्ता!
लंचसाठी असतो पिझ्झा किंवा बर्गर,
आणि डिन्नर म्हणजे बहुतांशी पास्ता!
आईच्या हातचं थालीपीठ दुर्मिळ झालं,
आणि आमचं घोडं थेम्समध्ये न्हालं!!

केसांचे स्पाईक्स व लोराईज जीन्स,
अस्सल ब्रिट शैलीत संभाषण करतो!
तरीही माझा तो गोरा शेजारी मात्र,
मला "देसी" या पदवीनेच संबोधितो!
मी नक्की कोण हे एक कोडंच झालं,
आणि आमचं घोडं थेम्समध्ये न्हालं!!

यु.के. चं वर्क-परमीट हाती आलं...
आणि आमचं घोडं थेम्समध्ये न्हालं!!

कवी: चंद्रजीत

Wednesday, March 26, 2008

कायम निष्क्रिय राहीली शेपूट
म्हणून शेवटी झडली म्हणतात
निरुपयोगीतेचा विलोप अटळ
मी नाही, निसर्ग नियम सांगतात

’उपयुक्तता’ हाच काय तो
निकष मनुष्यप्राणी जाणतात
तुमच्या आमच्या भाषेत
ज्याला ’युटीलीटी’ म्हणतात

प्रेम, आस्थासुद्धा दुर्दैवाने
खयाली पुलावच बनून रहातात
अगदी पाल्यच काय पण
पालकसुध्दा उपयुक्तता पहातात

मैत्री कसली घेऊन बसलात
तिथेही गणीतंच प्रभावी ठरतात
कोण कुणास किती उपयोगी
यावर पुढली समीकरणं ठरतात

कुठल्याच गोष्टी विनाकारण
कुणाला फ़ुकट मिळत नसतात
जितकी ज्याची उपयुक्तता
तसे गूण त्याला मिळत असतात

आपली उपयुक्तता गमावून
कुणी जर कुणावर विसंबतात
ज्या दिवशी ही ’युटीलीटी’
संपुष्टात, हिशेब तिथेच संपतात

त्यांच्या नशीबी बैलपोळा जे
आजही कुणाच्या जमीनी कसतात
’उपयुक्तता’ हीच सच्चाई
बाकी बोलायच्या गोष्टी असतात

शर्यतीत हरणाऱ्या घोड्याला
नाही का सरळ गोळ्या घालतात
निरुपयोगीतेचा विलोप अटळ
मी नाही, निसर्ग नियम सांगतात

---->> भूपेश
http://bhupesh4u.multiply.com/journal/item/104

Monday, March 24, 2008

मिस्टर अँड मिसेस बबन

मिस्टर अँड मिसेस बबन,
हे एक जोडपं भन्नाट होतं...
तिचं वजन सत्तरच्या वर,
तर त्याचं फक्त पन्नास होतं!

ती होती मस्त गुळाची ढेप,
बबन नुसताच काटकुळा ऊस...
मिस्कीलपणे त्यांच्या जोडीला,
लोकं म्हणती "उंदीर आणि घूस"!

एकदा तिने बबनला विचारलं,
माझी वाटते का रे तुला लाज?
हसून बबन म्हणाला तिला,
परत बोलू नको, बोललीस जे आज!

बारीक वा जाडी तू माझी आहेस,
तुझ्याशीच गुंफला प्रेमाचा धागा आहे...
कितीही आकार वाढला तुझा तरीही,
हृदयात मावशील एवढी जागा आहे!

उत्तर ऐकून ती फार सुखवली,
आनंदाने तिची हास्यलाली फुलली...
तुम्हाला वरलं हे माझं सौभाग्यचं आहे,
पुन्हा पुन्हा ती हे प्रेमाने बोलली!

मित्रांनो तुमच्यातही एक बबन आहे,
कदाचित झोपला असेल, त्याला जागवा...
आणि बायको कित्तीही वाढली तरीही,
बबनप्रमाणेच तिला प्रेमाने वागवा!
बबनप्रमाणेच तिला प्रेमाने वागवा!!

कवी: चंद्रजीत

माणसे नेहमी अशी का वागतात ????

माणसे नेहमी अशी का वागतात,
काही न जानता दुसरयाला दोषी का ठरवतात......

आपण बोललेले ते पापच का असते,
अन् दुसरयाने बोललेले ते माफच का असते.......

त्यांनी काहीही बोलले तरी ती मस्करीच असते,
आणि आपण काही बोलले तरी ते शापच असते.......

आपण नेहमी त्यांच्या सुखासाठी लढतो,
आणि ते मात्र नेहमी आपल्याला दुखानेच हरवतात.........

आपल्या डोळ्यात जरी त्यांच्यासाठी अश्रु असले,
तरी त्यांच्यासाठी ते फक्त पाणीच असते..........

असो आपण मात्र नेहमी त्यांच्यासाठी चांगलेच वागावे,
जरी त्यांनी विष दिले तरी ते आपण अमृत समजूनच घ्यावे.........

तरीही शेवटी हा प्रश्न उरतोच की........
माणसे नेहमी अशी का वागतात????

शब्द, कल्पना - अभिजीत महाडीक
आम्ही प्रेम करणारच, चोचीत चोच पडणारच
काहीही म्हणूदेत दुनिया सारी, आम्ही नव्याने लढणारच

लैला-मजनू, हीर-रांझा नव्या नव्याने पैदा होणार
कॉलेज कॅम्पस, चौपाटी, कट्टे सारे नव्या जोड्यांनी फुलणार
पुन्हा नव्याने येणार श्रावण, सारे नव्याने भिजणारच
गळ्यात गळे पडणारच, आम्ही प्रेम करणारच

झेड ब्रिज, दुर्गा टेकडी मिळेल तिकडे जात रहाणार
एकाच कपात चहा घोटणार, हातामध्ये हात पडणार
पोलीस मामा आलाच भिडायला, त्यालासुध्दा भिडणारच
ह्या वयात भुलणारच, आम्ही प्रेम करणारच

बाईकमागे खेटुन बसता, आमचा तोल सुटत जाणार
चौक असो, सिग्नल असो.. सारं काही तुटत जाणार
खड्डे येवोत, नको येवोत, मध्येच ब्रेक लागणारच
रुसवे-फुगवे घडणारच, आम्ही प्रेम करणारच

काहीही म्हणूदेत दुनिया सारी, आम्ही नव्याने लढणारच
चोचीत चोच पडणारच, आम्ही प्रेम करणारच

कवी: संतोष (कवितेतला)