आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, July 13, 2007

मला प्रेमात पडायचय

अमावस्या रात्री, मला चांदण पाहायचय,
आयुष्याच्या या वळणावर, मला प्रेमात पडायचय!!

कधी खळखळून हसणारी, कधी माझ्याकडे बघून हसणारी,
कधी गाल फुगवून बसनारी, अशी वेडी शोधायचीय,
दिवसभर तिला बघायचय, मला प्रेमात पडायचय!!

उगवणारा रवी का पौर्णिमेचा चंद्र,
टपरीतला कटींग, का CCD मधली कॉफी,
जोशींचा वडा का Domino’s मधला Pizza,
तीला समजायचय, मला प्रेमात पडायचय!!

उडना-या ओढणीचा ओझरता स्पर्श अनुभवायचाय,
गुलाबी ओठातून माझे नाव ऐकायचय,
स्पर्शाने गुलाबी होणारे तिचे गाल,
ती नजर स्मृतीत कैद करायचीय, मला प्रेमात पडायचय!!

धो धो पडणा-या पावसात, तिच्या छत्रीचा आसरा शोधायचाय,
माझ्या ह्रदयस्त मंदिरात, एक मुर्ती उभारायचीय,
मला हे जग विसरायचय, मला मी विसरायचय, मला प्रेमात पडायचय!!

विचारांचा सौंदर्य जिच्या अंगी,संस्काराचे लेणे जिच्या ठायी,
अम्रृतासम गोड जिची वाणी, भोळेपणा हा सहज स्वभाव,
असे एक मोहक चित्र साकारायचय, मला प्रेमात पडायचय!!

निर्सगाला रंग हवा,
फ़ूलालाही गंध हवा,
माणुसही एकटा कसा,
त्यालाही मैत्रीचा छंद हवा

घराच्या भिंती पडल्यावर
मला क्षितिज दिसायला लागलं
भांबावलेलं मन माझं
अलगद हसायला लागलं!!!

कितीही ठरवल
तरी शब्द पाझरत राहतात
मनात दाटलेल्या
आठवनींना डोळ्यावाटे गालांवर आणुन सोडतात

वळवाच्या पावसाच
गार्‍हान तुला सांगू तरी कसं
कधी कधी बरसायच त्यान
मग माझ क्षितीज कड भिजणार तरी कस

हे वयच असं असतं,
स्वंप:नामध्ये हरवुन जायचं,
कुणीतरी आपलं हि असेल,
म्हणत वाट पहायचं.


आतुर झाली आहे,
मी तुला भेटायला,
नुसतं स्वंप:नात नाही,
तर प्रत्यकक्षात बघायला.

येईल जेव्हा तो आयुष्यात माझ्या,
असेल क्षण तो कीती वेगळा,
गरजेल मेघ व पडतील धारा,
होतील जेव्हा अनावर भावना.



नेट्मेट - पहिली भेट ( आनंदी आनंदे)


आनंदीला आनंद म्हणे,
जाऊ नको तू ये ईकडे,
पाहू नको तू चोहीकडे,
आपण खाऊ हे चारोळे.

आनंदी लाडात म्हणे,
बाजुला आहेत 'कावळे',
बघुन त्यांना मी घाबरते,
कसे खाऊ मी हे चारोळे.

मी असता तू का घाबरते,
चल जाऊ आपण दुसरीकडे,
तिथे न तु त्यांना दीसे,
मग खाऊ आपण हे चारोळे.

नको नको आतां राहुंदे,
झाली वेळ आता मी निघते,
उद्या भेटु आपण मग तिकडे,
मग खाऊ हे चारोळे.

उद्या म्हणता दिवस सरले,
रोज नवीन तिचे बहाणे,
त्याचे त्यालाच कळून चूकले,
आपणच खाल्ले...... ते चारोळे!


-चैत.
तुझ्याविना माझी सगळी
वस्तीच बकाळ झाली..
विचार करता करता
न कळत सकाळ झाली॥

जीवन आणी जीणे यातले
आता कळाले अंतर...
काही तु येण्यापूर्वी....
काही तु गेल्या नंतर...!!!

तुझ्या घरावरून जाताना
हल्ली तिकडे नजर वळत नाही...
मनाचे ठीक आहे ग
पण आसवांना काहीच कळत नाही.........

तुझा विचार करणं
आता नकोसं वाटतं
अस म्हणून मन
माझं मलाच फ़सवतं

मला माहित नसलेलं दुःख
माझ्या मनात साठून आहे
बरेचदा मी विचार करतो
नक्की याचा ओघ कुठुन आहे

तुझे सुन्दर रुप ऐका
नजरेत मावत नाहि
म्हनुन तुला पुन्हा पुन्हा
पाहिल्या शिवाय मला राहवत नाहि

पाखरांना ठाउक असतं,
बाजारात गळा विकून आपलं खरं गाणं कधी गाता येत नाही!
सोन्याच्या पिंजर्याला पंख विकून
आभाळाच्या जवळ जाता येत नाही।


तुच आहेस गझल माझी

तुच आहेस गझल माझी श्रावणात नटलेली
तुच आहेस मेघांच्या सुरांत चिंबचिंब भिजलेली
तु आहेस रुदयातिल श्वासांची सुरेल तान
तुझ्या प्रत्येक अदांत आहे आहे माझ्या मनाचे गान


कधीकधी वाटतेस मला तु स्वप्नांतील भास
मात्र कधी भासतेस मला सत्यातील गोड आस
स्पर्श तुझा लाजरा जणु फुलला मोगरा
श्वासांच्या तुझा गंध जणु फुलतो निशीगंध


स्वप्नांतील अजोड सत्य तु हवीस तु हवीस तु
आज आहेस माझीच तु माझीच तु
ॠतुंच्यासारखी मज भासतेस तु
तरीही मला वाटते फक्त माझी गझल


तु एक स्वतःहा बनलेली गझल तु
"येते रे" म्हणताना आजही होतेस तशीच व्याकुळ तु
आणि मग जाताना रेंगाळतेस तु
ओल्या पापण्यांच्या कड्यांत आज माझ्या साठलीस तु
आजही आहे मी हरवलेला तिथेच
आणि माझ्यासोबत आजही आहेस तु


ओंकार(ओम)

Wednesday, July 11, 2007

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...


कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...


कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...


कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...


कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...


कधीतरी तू मला असं वचन देशील ?
पूढच्या जन्मी तरी माझी होशील ?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो
यातच मग मला समाधान असेल...

कोणी हे सांगितलय
तर कोणी ते सांगितलय
तुझ्याबद्दल नशिबा
मी बरंच काही ऐकलयं
माहीत असुनही तुझ्याबद्दल
सारं काही
कोणी तुला ओळखु शकलं नाही

तु जुळवतोस ह्रुदयांना
आणि वेगळही तुच करतोस
देतोस तु ते
मनाला भुलवणारं अवखळ हसु
आणि हे आसुही तुच देतोस

कोणी हे सहन केलयं
तर कोणी ते सहन केलयं
तुझ्यामुळेच नशीबा
दुख: प्रत्येकाने सहन केलयं
माहीत असुनही
तुझ्याबद्दल सारं काही
कोणी तुला ओळखु शकलं नाही

तुझ्या मनातली गुपितं
कोणाला कळु शकली नाही
तुझ्या बदलत्या रुप-रंगाला
कोणीच ओळखु शकलं नाही

कोणाला हे मिळतयं
तर कोणाला ते मिळतयं
तुझ्या या खेळात
जे हवं तेच कधी मिळत नाही
माहीत असुनही
तुझ्याबद्दल सारं काही

कोणी तुला ओळखु शकलं नाही
कोणी तुला ओळखु शकलं नाही

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय


गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप... मध्येच माघार घेऊ नकोस......

आई.....

पहिला शब्द जो मी उच्चारला,
पहिला घास जीने मला भरवला,
हाताचे बोट पकडून जीने मला चालवले,
आजारी असताना जीने रात्रंदिवस काढले.

आठवतय मला,
चूकल्यावर धपाटा घातलेला,
भूक लागली आहे सांगताच,
खाऊचा डब्बा पुढे केलेला.

अनेकदा तिने,
जेवणासाठि थांबायचे,
आणि मी मात्र न सांगताच,
बाहेरून खाऊन यायचे.

कधी कधी रागाच्या भरात,
उलटहि बोललोय,
आणि मग चूक समजल्यावर,
ढसा ढसा रडलोय.

तिने सुद्धा माझे बोलणे,
कधीच मनावर नाहि घेतले,
मागाहून घालवलेले माझे अश्रू,
पदराने पुसून टाकले.

माझी स्तुती करताना,
ती कधीच थांबत नाहि,
अन माझा मोठेपणा सांगतान ,
तिच्या आनंदाला पारावर ऊरत नाहि.

माझा विचार करणे,
तिने कधिच सोडले नाहि,
माझ्यावर प्रेम करण्याला,
कधीच अंत नाही.

मी सुद्धा ठरवले आहे,
तिला नेहमी खुश ठेवायचे,
कितीहि काहि झाले तरी,
तिला नाहि दुखवायचे.

आईची महानता सांगायला,
शब्द कधीच पूरणार नाहि,
तिचे उपकार फ़ेडायला,
सात जन्म सुद्धा शक्य नाहि.

देवाकडे एकच मागणे,
भरपूर आयुश्य लाभो तिला,
माझ्या प्रत्येक जन्मी,
तिचाच गर्भ दे मजला

Tuesday, July 10, 2007

माझ्या स्वप्नाच्या निशेत,
खरोखर तुझीच नशा आहे..
कल्पनेच्या विश्वातही तुझ्याविना..
माझ्या एकटेपणाची काय दशा आहे..

किनारेसुद्धा किती शांत शांत आहे,
तुझ्या सहवासाविना लाटा सुद्धा निवांत आहे..
वर चांदण्याचा हिरमोड सुद्धा किती भकास आहे..
सांग सखे तुझ्या येण्याला अज़ून कितीसा अवकाश आहे..

मनात माझ्या काहुर माजले..
सुर माझ्या प्रेमाच बघ कसे हे विस्कटले..
अन डोळ्यात माझ्या अश्रुंचे डोह साठले..
सांग सखे सांग ठिणगीविना हे माळरान कसे गं पेटले..

नाही संवाद नाही आस्वाद..
तरीही हा आहे हा अर्थविना वादविवाद..
का सहन करावे हे दु:ख असह्याचे..
कानी गुमजतो फक्त विरहाचा शंखनाद..

का समजत नाही हे सारे,
का लागले तुला, मृगज़ळाचे वारे..
का निघालीस सोडूनी अशी मला..
अन का उध्वस्त केलेस माझ्या जिवनाचे संगीत सारे?

प्रश्न माझे हे असे,तुला उदास करतील..
मनात तुझ्या द्वेष निर्माण करतील..
तरीही तुझा द्वेष मला मान्य आहे..
पण तु एकदातरी परत ये माझ्यासाठी..
का सोडूनी चालली आपूल्या जिवनाच्या रेशीमगाठी....

तरी पण मन माझे तुझ्याकडेच धावते,
तुझ्या वाटेकडे उगाच आस लावते..
एकदा तरी मागे वळूनी बघ सखे जरा..
सखे अजूनही मी तिथेच आहे..

---- आ॥ आदित्य..

आठवणीतला पाऊस

आठवणीतला पाऊस
न विसरता येणारा
प्राजक्ताच्या सड्यावर
जसं हलकंच दंव विसावणारं

लहानपणीचा पाऊस
खोट्या नाण्याचं आमिष देवून
त्याला धो धो बरसायला लावणं
फ़ेर धरून त्याच्याबरोबर
मलाच नाचायला लावणारा
आईचा धपाटा खाऊनही
पुन्हा खुणावणारा

पाऊस आता थोडा शहाणा झालेला
शाळेभोवती तळं करून
आम्हाला हक्काची सुट्टी देणारा..
दप्तर घरी टाकून
कागदाच्या नावेबरॊबर रमणारा...
एकमेकांवर पाणी उडवत मज्जा करणारा...

तोही एक पाऊसच होता
कॉलेजकट्ट्यावरचा...
टपरीवरची वाफ़ाळलेली चहा पीत
उगीच खाणाखुणा करण्याचा...
का कुणास ठाऊक हा पाऊस भिजवायचा
आम्हालाच आपली छत्री बंद करायला लावायचा

असा ही एक पाऊस आहे...
तुला मला जवळ आणणारा...
पहिला पावसाचा गंध
आसमंतात पसरणारा...

एकाच छत्रीतून चालणारे तू मी
पाऊस कसा आपल्यापुरता असायचा
कितीही बरसला तरीही
आपल्यासाठीच छत्रीवरच्या थेंबातला

पाऊस असाच वेडा थोडा थोडा
आपल्या भॆटीला धावत येणारा...
तुझ्या माझ्या प्रणयाला
मंद धूंद करणारा
ओल्या ओल्या ऋतूत
ओलाचिंब करणारा
भिजलेल्या वृक्षाला एक ओलीचिंब वेल बिलगलेली...

२६ जुलै नंतरचा पाऊस
आता नकोसा वाटणारा.....
आठवण आली तरी अंगावर
शहारा आणणारा.
आठवते ती रात्रं
"पावसा" तुझ्यामुळे घरा बाहेर काढलेली.
सेल फोन हातात असूनही
सगळ्याच जगाशी संपर्काची तार तुटलेली

पाहिलंय तुला रात्रं न दिवस
अंगात आल्यासारखं कोसळताना
कुणाची तमा न बाळगता...
बास पोटभरुन तू बरसताना.

पाहिलंय मी माझ्यासमोर
कितीतरी घरंदारं उध्वस्थ होताना
लहानग्यांना असंच वाहून जाताना...

अनुभवलंय मी तुला
तुझ्या त्या रुद्र रुपांत....
आठवतं मला घरी जायला
करावी लागलेली तुझ्याशी झटपट...
खरं सांगू तेंव्हा तुझ्यापेक्षा जोराने
बरसले होते माझे अश्रू.....

विसरायचं ठरवूनही कसं रे मी तुझं भीषण रुप विसरु

तू असा असतानाही
दिसला आहे मला माणूसकिचा झरा

मद्तीचा हात करत होते पुढे एकमेकांस, वाहून गेला संसार जरी सारा....

तुला असं अनुभवल्यावर
आता भीती वाटते पावसा तुझी...
फेर धरत नाहि मी तुला पाहून
आनंद तर होतच नाहि
कधी तू रुद्ररुपात येशील ह्याचा
आता भरवसा नाहि...

स्वाती
या कवितेस मज्या मैत्रिनिचा प्रतिसाद आसा आला

नको रे मना बोल ते नवऱ्याचे
असे की जणू भाला छातीत टोचे
त्याच्या या जिव्हा कोण घाले लगाम
अशा वीरांगनांना हजारो सलाम

अशा नवऱ्याला कसा आवरावा
भ्रष्ट हा विचार कसा सावरावा
कुणी थोर तो काय सांगेल युक्ति
तया पावलांची शिरी लावू माती

कसा जिवघेणा अघोरी हा त्रास
सुखाचा ठरे त्यापरी स्वर्गवास
विधि सांगते नीट ध्यानी धरावे
मरावे परि लग्न ना हे करावे.



Monday, July 09, 2007

हे राष्ट्र देवतांचे

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

योगदान : देवेंद्र
रुपेरी वाळूत, माडांच्या बनात

रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना
रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना
बनात ये ना, जवळ घे ना
चंदेरी चाहूल, लावित प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना

बेधुंद आज आसमंत सारा
कुंजात गात मंद धुंद वारा
दाटे उरी प्रिया तुझा इशारा
देहा वरी फुले असा शहारा
तुझा इशारा, असा शहारा

लाजेत आज ही फुले नहाती
गाली अनार प्रीत गीत गाती
तू ये निशा अशी करे पुकारा
दे ये प्रिया मला तुझा निवारा
तुझा निवारा, तुझा निवारा

योगदान : देवेंद्र
ऐरणीच्या देवा

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे


लेऊ लेणं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं
जीणं होऊ आबरुचं, धनी मातूर माझ्या देवा, वाघावानी असू दे

लक्षीमीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली
इडा पीडा जाईल, आली किरपा तुझी भात्यातल्या सूरां संग गाऊ दे

सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली बुरी
घावं बसंल घावावरी, सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊ दे

योगदान : देवेंद्र

अरे मनमोहना
अरे मनमोहना
कळली देवा तुला, राधिका रे राधिका
कळली राधिका रे, कळल्या गोपिका
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही

सात सुरांवर तनमन नाचे
तालावरती मधुबन नाचे
एक अबोली होती फुलली
तिच्याकडे नजर तुझी वळली नाही

धुंद सुगंधी यमुना लहरी
उजळून आली गोकुळ नगरी
जीवन माझे अंधाराचे
काळी काळी रात कधी टळली नाही

उन्हात काया, मनात छाया
कशी समजावू वेडी माया
युग युग सरले, डोळे भरले
आशेची कळी कधी फुलली नाही

योगदान : देवेंद्र

अशी पाखरे येती

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती

चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजूनी जाय उजळूनी, काळोखाच्या राती

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती

हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातील समयीमधूनी, अजून जळती वाती

कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती

योगदान - देवेंद्र
आपल्या काळात इमारतींची उंची वाढली
पण माणूसकीची कमी झाली का ?
रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरूंद झाली का ?
खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली
घरं मोठी पण कुटुंब छोटी..
सुखसोयी पुष्कळ , पण वेळ दुर्मिळ झाला
पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग
माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले
तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या
औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं
मालकीची भाषा वाढली ,मूल्यांची कमी झाली
आपण बोलतो फार...प्रेम क्वचित करतो.. आणि तिरस्कार सहज करतो
राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं
आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली , पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही
आपण भले चंद्रावर आलो गेलो
पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही
बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत
पण आतल्या हरण्याचं काय ?
हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा
पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय ?
आपली आवक वाढली पण नियत कमी झाली
संख्या वाढली पण गुणवत्ता घसरली
हा काळ उंच माणसांचा पण खुज्या व्यक्तीमत्वांचा
उदंड फायद्याचा पण उथळ नात्यांचा
जागतीक शांततेच्या गप्पांचा
पण घरातल्या युद्धांचा
मोकळा वेळ हाताशी पण त्यातली गंमत गेलेली
विविध खाद्यप्रकार पण त्यातली सत्व गेलेली
दोन मिळवती माणसं पण त्यांचे घटस्फोट वाढलेले
घरं नटली पण घरकुलं दुभंगली
दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेलं
पण कोठीची खोली रिकामीच
हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवणारं तंत्रज्ञान आज आहे
पण आज आहे तुमचं स्वातंत्र्यही
या पत्राकडे लक्ष
देण्याचं किंवा न देण्याचं
यातलं काही वाटलं तर बदला किंवा विसरून जा

कवी : दलाई लामा
अनुवाद : शोभा भागवत
कळले आता घराघरातुन;
नागमोडीचा जिना कशाला,
एक लाडके नाव ठेऊनी;
हळूच जवळी ओढायाला.

जिना असावा अरूंद थोडा;
चढण असावी अंमळ अवघड,
कळूनही नच जिथे कळावी;
अंधारातील अधीर धडधड.

मूक असाव्या सर्व पाय-या;
कठडाही सोशिक असावा,
अंगलगीच्या आधारास्तव;
चुकून कोठे पाय फसावा.

वळणावरती बळजोरीची;
वसुली अपुली द्यावी घ्यावी,
मात्र छतातच सोय पाहूनी;
चुकचुकणारी पाल असावी.

जिना असावा असाच अंधा;
कधी न कळावी त्याला चोरी,
जिना असावा मित्र इमानी;
कधी न करावी चहाडखोरी.

मी तर म्हणतो - स्वर्गाच्याही;
सोपानाला वळण असावे,
पॄथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे...

कवी: वसंत बापट

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय....
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Assignment copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं.............

कवितांची डायरी तयार केली


मी तुझ्याकडे पाहील्यावर
पहीली पायरी पार केली
मोजक्या क्षणांचं गाठोड बांधून
कवितांची डायरी तयार केली

मी तुझ्याकडे पाहील्यावर
पुढची पायरी पार केली
आभाळाला पंखात समावून
क्षितीजा पलीकडे घार केली

मी तुझ्याकडे पाहील्यावर
पुढची पायरी पार केली
स्वप्नांत तुझ्या स्मृती साठवून
वास्तवात चित्र हजार केली

रोज तुझ्याकडे पहायचो
एक नवी पायरी पार करायचो
मुकेपणीच पण, कितींदा
तुला एक एक क्षणी वरायचो

खरी पायरी पार करताना
मी हतबल, असमर्थ ठरलो
त्या उंची वरून घसरलो
जिथे फक्त व्यर्थ उरलो

आता पार करण्यासाठी
एकही पायरी उरली नाही
फाटक्या डायरीतील एकही ओळ
प्रत्येकक्षात उतरली नाही

ती रंगवलेली सारी चित्रं
तशीच कोरी राहून गेली
माझ्या निरागस डोळ्यातून ती
शेवटी बेरंगच वाहून गेली

आज त्या साऱ्या पायऱ्या
दाटून आल्या माझ्या गळ्याशी
तुझ्या डोळ्यात शेवटचं पाहीलं
मी पडलेलो अगदी तळाशी

@सनिल पांगे