आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, January 11, 2008

नुकतास मी
नदीवर जाऊन आलो
डोळ्यात साठलेलं एक तळं
अगदी थेंब थेंब पिळून आलो

वेळ होती ती किर्र रात्रीची
तरी नदीला भरती आली
तिलाच कळले नाही
कोणाची वेदना वरती आली

बांध तोडून काठाचा
ती गावभर फिरू लागली
माझा शोध घेण्यासाठी
हरेक घरात शिरू लागली

तिला ही पहायचं होते
कोणाचे इतके दु:खी घर होते
मीही नित्य मिसळते सागराशी
पण कुठे त्याची पातळी वर येते

माझ्या घरापाशी ती येताच
एक थेंब माझ्या डोळ्यातून गळाला
मी वाहिलेल्या तळयातील अवशेषांशी
माझा गळलेला थेंब जुळाला

ओळखलं तिने मला
जागच्या जागी ती स्तब्द झाली
नजर माझ्याशी मिळताचं
स्व:तास म्हणू लागली अभागी

म्हणाली,

आजवर माझा समज होता
जगातली सर्वात दु:खी मीच आहे
पण, तुझ्याशी मापल्यावर कळलं
माझे दु:ख किती कमीच आहे

रोज स्व:तास बुडवते सागरात
पण कधी कुठे फरक पडला
तू एकदाच दु:ख जाहीर केलसं
माझ्या अंतकर्णातून पूर आला

मी म्हणालो.....

आपल्याहून सुखी जणांकडे पाहीलं
की आपणास आपण दु:खी वाटतो
आपल्याहून दु:खी जणांकडे पाहण्याचा
आपण प्रयत्नच कुठे करतो

जोपर्यंत ही वृत्ती बदलत नाही
तोपर्यंत हे असचं चालणार
सुख-समाधानात नांदणाराही
मी दु:खी आहे असचं बोलणार

@सनिल पांगे
माझा प्रत्येक निवांत क्षण तसा
तुझ्याच आठवणींनी सजलेला
मनाचा प्रत्येक कोपरा तसा, तुझ्या
आठवणींच्या दवबिंदुत भिजलेला

कसा दोष तसा देऊ मी तुला
तसं तुझं काहीच चुकलं नाही
पण मी तरी सांग काय करू
पापण्यांवरचं पाणी सुकलं नाही

तू परत येणार नाहीस हे
मला केव्हाच कळलं आहे
हे मन पण तुझ्यासारखंच
त्यानेही मला छळल आहे

-- अद्न्यात चारोळीकार
सुखसमाधानाचे पुर्णविराम फार कमी असतात,

निरुत्तर संतापाचे प्रश्नचिन्हच जास्त जमतात.

कधी हास्याच्या श्रावणसरी बरसतात,

तर कधी अश्रुंचे महापुर लोटतात.

कुणाचे काही हरवते, कुणाला काही गवसते,

कुणाचे कुठे तुटते, कुणाचे कुठे जुळते.

कुणाला मिळते पोर्णिमेची शीतल छाया,

कुणाला मिळतो अमावस्येचा दाट काळोख.

कधी असतो गोंगाट, कधी स्मशान शांतता,

प्रत्येकाच्या आयुष्याची निराळीच वार्ता.

तरीही प्रत्येकाला हा निबंध लिहावाच लागतो-

कारण "देवबाप्पाच्या" शाळेत जाब द्यावा लागतो.


सखी मृणाल

Thursday, January 10, 2008

अंगणीच्या रातराणीचा गंध
पिसाच मज करतो आहे
तुझ्या पहिल्या कटाक्षाचा क्षण
पुन्हा पुन्हा मला स्मरतो आहे
...................................................................................................
वेड लागलय मला
शब्दांबरोबर खेळन्याच
खेळता खेळता स्वत:ला
त्या दोन ओळींमध्ये लपवायच
..................................................................
तू जवळी असावीस
आणि चांदणी रात असावी
मी घ्यावे तुला मिठीत
आणि चांदण्यांची बरसात व्हावी

................................
-- आनंद काळे

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!

कवी: अद्न्यात

प्रत्येकाची खिडकीही मुक्त असतेच असं नाही...
तिलाही गज असतात कधी कधी
गजातून आत येइल तेवढाच आपला वारा आणि तेवढाच आपला प्रकाश
पाउसही निसटुन जातो या गजांवरुन..
या खिडकीतुन आपला चेहरा दिसतो दुभंगलेला
समोरच्याचाही तसाच!
प्रत्येक गोष्ट तशी दुभंगलेलीच!
बाहेर डोकावताही नाही येत या गजांमुळे..
अणि या गजांना तरी रहायचं असतं का या खिडकीत?
इतकं सगळं झेलून गंजून जातात बिचारे
कोंडमारा असह्य होउन ते करत रहातात आकांत
मारतात आर्त हाका
कुणीही न ऐकण्यासाठी!

-- रुचा

Wednesday, January 09, 2008

शब्दाला शब्द जोडले की झाली कविता
वाक्याला वाक्य भिड़ले की झाली कविता
मनाशी मन जूळले की झाली कविता
आकाशी रंग उधळले की झाली कविता
मनाताल्या भावना व्यक्त केल्या की झाली कविता
शेवटी काय...
कवि मनाला जागें केले की झाली कविता

--अद्न्यात

ओर्कुट वरील एका थ्रेडमधल्या चारोळ्या....

सुरेल स्वप्नात तू दिसावा...
अंत अशा स्वप्नाचा कधी न व्हावा..
जाग येता पहाटेस गुलाबी..
समोरी माझ्या तुच दिसावा..

आज माझी मीच
मला ओळखु येईना..
प्रतिबिंब ही आरशातले..
मज प्रतिसाद देईना..

वाट दाराशी आली..
पण तो आला नाही..
ढग अंगणात येऊन देखील.
पाऊस बरसला नाही..

आज नक्की येइल
हेच मनाशी घोकतेय..
पण आभाळही मेलं सारखं
मुसळधार पाऊस ओकतेय..

तिच्याबरोबर माझं
कधीसुध्दा पटत नाही..
अन तरीसुद्धा तिच्याविना
मला थोडेदेखील करमत नाही

मी पाहिली तिला
ती एकटी नदिकाठी बसलेली,
मनात आठवणींचा पूर
अन डोळ्यात आसवे साचलेली

चांदरातीला त्या तुझी
सये सय येऊन गेली
नशेत बुडालेलो मी तुझ्या
त्या नशेची चव चाखून गेली...

पायवाट ती निसरडी..
पोरी जपुन चाल जरा
वेडीवाकडी वळणं इथं
रस्ता कोणताच नाही खरा

तुझ्यापासुन दूर जाताना
मी माझा उरलेला नसतो
तुझ्या आठवणींच्या तळाशी
कुठेतरी गुदमरलेला असतो

मन नाही लागत कशातच
तुला भेटायला येताना
फ़ुलं न पाखरही अस्वस्थ होतात
मी तुझ्यापासुन दूर जाताना

मन किती वेडं होतं
तू येताना दिसलीस की
मन किती खुळं होतं
तु आसपास नसलीस की

आज फ़ुलांना बहर आहे
जगण्यात नवा सुगंध आहे..
टिपुन घे रे राजसा लवकरी..
ओठावरी जो मकरंद आहे..

Tuesday, January 08, 2008

स्वप्नांच्या झऱ्यातून तुझं
रोज, नित्य, नवं दर्शन घडतं
प्रत्यकक्षात ते फुल ओंजळीत
कधी, कुठे का पडतं?

कधी वाटलं तू अशी असशील
कधी वाटलं तू तशी
स्वप्नांची ही थट्टा रोज रात्री
माझ्याच राशीला अशी कशी

स्वप्नांतली ती भुलवनारी परी
प्रत्येकक्षात मात्र टाळतं असते
तीला शोढण्यात मग माझी नजर
प्रत्यकक्षातल्या परींना न्याहळत असते

प्रत्येक परींमध्ये मला हमखास
तीची थोडी झलकं दिसते
पुन्हा रात्री त्या झलकेचं
अवचित सर्वत्र फलकं दिसते

स्वप्नं शेवटी स्वप्नचं असतातं
आपण मनसोक्त वाहून जातो
काही क्षण त्या चांदण्यात
चिंबचिंब न्हाहून जातो

कधी वाटतं स्वप्नं ही
वात्सवाची पुकार असते
एखादी घटना घडते, म्हणूनच
स्वप्नं वात्सवाचं आकार घेते

तसं स्वप्नं पडतात म्हणूनचं
जिवनात थोडा आनंद विरघळतो
काही क्षण का होईना
श्वासात थोडा गंध दरवळतो

तरीही स्वप्नाला शेवटी
आपण स्वप्नचं राहू द्यावं
ते प्रत्यकक्षात नाही उतरलं तरी
फक्त ओठांवर गाऊ द्यावं


....सारांश


सारीचं स्वप्नं जशीच्या तशी
प्रत्यकक्षात साकारता येत नाही
पण, काही स्वप्न खरी ठरतील
ही संभावनाही नकारता येत नही

-- सनिल पांगे

खूप जवळ वाटणारा तु... आज दूर भासलास....
रडले मी.... असा अनोळखी हसलास....
तुझी रे मी कोण???
कि उगा समांतर रेषेशी सांधते कोन.....
माझ्यातल्या वादळाला .....तुच एक घर....
भिजते तुझ्यातच माझी.... वेडी सर....

तुझ्या ओंजळीत चेहरा लपवायचा आहे....
अश्रूंना तोच एक मार्ग मोकळा आहे...
टिपू नकोस भिजबिंदू निदान....
वाहू दिले असतेस.... फक्त बेभान...

तेव्हढेच मागणे आज आहे...
जगणे माझे त्या क्षणासाठीच बहुधा आहे...
भेटशील.... न भेटशील.... निदान स्वप्नात तरी ये...
क्षितिजाच्या पल्याड राहून नुसता आश्वास दे...

बघ... नाहीतर तुलाही येईल आठवण माझी....
साद घालशील तेव्हा....पण...पण...

परतून मी येणार नाही....
परतून मी येणार नाही.....

------ चैताली.
नेहमीच कसं हसवायचं…??
नेहमीच कसं हसवायचं…??
तूच सांग देवा असं किती दिवस चालायचं…
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…??

समोरचा तो हसला………… ….नव्हे!
हसवण्यावर माझ्या फसला!!
त्याच्या समोर रडलोच् तर…
हसवणाराच् मी कसला…

माणसांच्या या गर्दीमध्ये स्वतःला मात्र विसरायचं…
दू:ख दाबून ओठांमध्ये , त्यांतच हसून दाखवायचं
पण …. श्वास जड होतो जेव्हा—…तेव्हा रे काय करायचं???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…!!!

मी रडू लागलो जेव्हा …
ते मात्र हसत होते…
कारण, माझ्या रडण्यामधले
व्यंगच त्यांना दिसत होते…

मनातलं सर्व मनातच ठेवून, हसून मग मी दाखवायचं,..
शिषीरा नंतर येतो वसंत…….स्वप्नंच् फक्त पहायचं
पण; ……..ह्रूदयातच ढग दाटून येतो….तेव्हा रे काय करायचं….???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…!!!

कवी : अद्न्यात

Monday, January 07, 2008

मनातले शब्द........

मनातले शब्द मनातच राहून गेले...
तीला बोलावलं भेटायला, ठरवलं सारे सांगून टाकायचे,
पण ती आली मैत्रिणी सोबत, अन काही बोलताच नाही आले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...

हिम्मत साठवली आणि केले तीला SMS,
पण अर्धवटच वाचून ते Delete तीने केले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...

लिहित बसलो रात्रभर, वाटल सांगावं कवितेतून तीला सारं,
पण ती समोर येता सारे शब्दच विसरून गेले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...

भेटली एकटी बस-स्टॉपवर ती, वाटलं संधी चांगली आहे,
पण अचनक तिने "हा मझा बॉय-फ्रेंड" असे इंट्रोड्युस "त्याला" केले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...

तरी वाटलं डोळ्यातले अश्रू सांगतील तिला सारं,
पण ती येई पर्यंत ते ही पावसाच्या पाण्यात वाहून गेले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले

अमोल..........
चल दुरवर सखे
माझ्या स्वप्ननगरीत,
मंद वारा वाहतो जिथे,
कवेत घेवून तृण हरीत..

नभगार सरी
कोसळतात तुषारपरी,
छेडतील तुला त्या मग
कान्हाच्या खोड्यांपरी...

एक सुंदर वाडा,
अन अंगणात फुलांचा सडा,
तुला फिरवाया मग,
सजेल इंद्राचाच तो शुभ्र घोडा..

कधी वाटलं तुला
झुलायचं आहे तर,
तिथे चाफ्याच्या फांदीला,
वेलींच्या झुलाचे बस्तान सुंदर...

अंघोळीला तुझी होईल
रोज कमळाच्या तळ्यात,
माळीन फुलांच्या कळ्या
तुझ्याच रेशमी केसात...

जिथे असेल गवताचे कुंपण,
अन गर्द वृक्षाची छाया,
वसून तिथे मग सखे
आपोआप उजळेल तुझी कृष्णवर्णी काया..

मग मलाही तो
मोह आवरेलच कसा,
सोबत तुझ्या मग सखे,
शोभेल मी राजसा शोभेल राजसा..

-- आ.. आदित्य...
तुझे पाठिवरून घसरणारे हात
माझे शरीर थरथरलेले
सुसाट वार मुसळधार पाउस
दुर कशी राहू मन बावरलेले

ओठांवर ओठ दाबलेस तू
नसांतून रक्त उसळलेले
एखादि विज चमकुन
मग आकाशिचे मेघ कोसळलेले

तुझा स्पर्श अधिरतेने भिजलेला
माझ्या लाजळु पापण्यांचे...डोळे मिटलेले
स्पर्श होताच लाजाळुला
सर्व पानांना तिने सिमटलेले

श्वासात श्वास गुंतुन .... कळेणा
माझा हात तुझ्या केसात गेलेला
आकाशात धुंद उडणारा पक्षी
पिंजर्‍यात कधी गुंतलेला

तुझ्या उबदार मिठीत
माझ्या अंगी वणवा पेट्लेला
दगडावर दग़ड आपटुन.......थिंगीने
उभ्या रानी भडका घेतलेला

दोन ह्र्दय दोन शरिर ....जरी
आज एक होउन एक जिव झालेला
एवढ्या अथांग सागरी ....जणु
संथ नदिने शिरकाव केलेला

ओल्या मस्तीत आपल्या
भान ना उरले वेळेचे
बाहेर पाउसही ....केव्हाच थांबला
थंड वारे उरले मदनाचे....
थंड वारे उरले मदनाचे....

-- स्मिता