पिरेम-बिरेम हाये साराच डाव नशिबाचा
पोट्ट्यामांग पोट्टी दिसली का मन मावलं झुरे
अवंदा ऊरकुनच टाकाच अता धिर नाई धरे
म्या म्हणलं बापाले मले लगन कराचं हाये
तिकडं तसबी भात खाऊन पोट भरत नाये
मायले म्हणलं चाल व तुही सुन पाव्हाले जाउ
माय म्हणे पयले तुच जा, मंग आम्ही येऊ
पकडलं दोस्ताले अन मंग ईचार केला पक्का
पयलीच पाह्यली अन मारला तिच्यावर शिक्का
घरी आलो पेढे घेउन म्हणलं सुन भेटली तुम्हाले
बाप म्हणे हे त पहलीच व्हये आणखीन जा पाव्हाले
अता तुम्हीच सांगा राव असं कोणी करते का?
एक फिट वाटल्यावर दुसरीकडे कोणी जाते का?
बापाले म्हणलं आता तुम्हीच पोरी पाव्हा
पसंदच पडली एखांदी त साखरपुड्यालेच बलवा
शंभर पाह्यता पाह्यता बापाची लिस्टच संपली
अता मातर माय डोसक्यावर हात मारुन बसली
दोस्तान मंग उपाय सांगतला, तु मनोगतावर जाय
तुले पायजेन तश्शीच का मालुम तिथं भेटुन जाय
हाये कोणी इथं जिले माह्यासारखा नवरा पायजेन
लेवता न्हाई आलं तरी 'मनोगत' गावता आलं पायजेन
-- मनोगताच्या सौजैन्याने