दु:ख़
टांगेवाला बाबू भारी कणखर
उमर साठीची सफेदी डोईवर
तसाच वेषही साधा खरोखर
अंगी सदरा अन पायी धोतर
टांगा त्याचा हो फिरे चहूकडे
'सुदामा' त्याचे उमदे घोडे
हाती मग तो लगाम पकडे
सोडी तो त्याला जो जाईल जिकडे
बाबूचे जगणे कष्टाचे भारी
टाकूनी एका मुलाला पदरी
अर्धांगीनी गेलेली देवाघरी
एकटा बाबू परी जीव 'बबन्या'वरी
पण काळाने उलटा डाव टाकला
हसता खेळता पोर आजारी पडला
अन एक दिवस काळाच उगवला
बाबूचा 'बबन्या' देवाघरी गेला
बाबू हतबल झाला सैरभैर
तीळ तीळ तुटला बाप तो कणख़र
आसवांना नयनी ना खळ
बाबू झाला अस्थि-पंजर
दु:ख़ी बाबूचे दु:ख़च न्यारे
ना साथी ना सगे सोयरे
दु:ख़ सांगावे कोणाला रे
टांगा हाती परी ह्रदय दुखरे
मग प्रवाशालाच व्यथा कथन करी
हाकता टांगा बाबू सुरू करी
बर का मामा, काका ऐका तरी
बबन्या माझा गेला हो देवाघरी
दुर्लक्षूनी तिकडे प्रवाशी ओरडे
अरे अरे तू चालला कुणीकडे
लक्ष सारे तुझे गप्पा मारण्याकडे
न बोलता तू आधी पहा रस्त्याकडे
कुणी न त्याचे दु:ख़ ऐकले
कुणी न त्याचे ह्रदय जाणले
दु:ख़ ह्रदयातच सलत राहीले
विशाल शहरी फिरत राहीले
संध्या समयी मग घरी आल्यावर
थाप मारुनी घोड्याच्या पाठीवर
हात फ़िरवूनी त्या अश्वमुखावर
बाबू बोलला मग येवून गहीवर
बर का सुदाम्या ऐक तू तरी
सोन्या माझा गेला रे देवाघरी
नसेल कुणी का माझे भूवरी
तू माझा अन मीच तुझा परी
अश्रूंचे मग बांध हो फुटले
अश्वासाक्षी भावनाट्य घडले
मुके जनावर दुनिया बोले
परी झाले त्याचे डोळे ओले
अश्वा गळी बाबू पडला
हुंदके देऊन ढसढसा रडला
दु:ख़ाला त्या वाचा फुटली
एक दु:ख़ी कहाणी संपली
एक दु:ख़ी कहाणी संपली
कवी : अतुल दि. पाटिल
स्त्रोत : ओर्कुट
टांगेवाला बाबू भारी कणखर
उमर साठीची सफेदी डोईवर
तसाच वेषही साधा खरोखर
अंगी सदरा अन पायी धोतर
टांगा त्याचा हो फिरे चहूकडे
'सुदामा' त्याचे उमदे घोडे
हाती मग तो लगाम पकडे
सोडी तो त्याला जो जाईल जिकडे
बाबूचे जगणे कष्टाचे भारी
टाकूनी एका मुलाला पदरी
अर्धांगीनी गेलेली देवाघरी
एकटा बाबू परी जीव 'बबन्या'वरी
पण काळाने उलटा डाव टाकला
हसता खेळता पोर आजारी पडला
अन एक दिवस काळाच उगवला
बाबूचा 'बबन्या' देवाघरी गेला
बाबू हतबल झाला सैरभैर
तीळ तीळ तुटला बाप तो कणख़र
आसवांना नयनी ना खळ
बाबू झाला अस्थि-पंजर
दु:ख़ी बाबूचे दु:ख़च न्यारे
ना साथी ना सगे सोयरे
दु:ख़ सांगावे कोणाला रे
टांगा हाती परी ह्रदय दुखरे
मग प्रवाशालाच व्यथा कथन करी
हाकता टांगा बाबू सुरू करी
बर का मामा, काका ऐका तरी
बबन्या माझा गेला हो देवाघरी
दुर्लक्षूनी तिकडे प्रवाशी ओरडे
अरे अरे तू चालला कुणीकडे
लक्ष सारे तुझे गप्पा मारण्याकडे
न बोलता तू आधी पहा रस्त्याकडे
कुणी न त्याचे दु:ख़ ऐकले
कुणी न त्याचे ह्रदय जाणले
दु:ख़ ह्रदयातच सलत राहीले
विशाल शहरी फिरत राहीले
संध्या समयी मग घरी आल्यावर
थाप मारुनी घोड्याच्या पाठीवर
हात फ़िरवूनी त्या अश्वमुखावर
बाबू बोलला मग येवून गहीवर
बर का सुदाम्या ऐक तू तरी
सोन्या माझा गेला रे देवाघरी
नसेल कुणी का माझे भूवरी
तू माझा अन मीच तुझा परी
अश्रूंचे मग बांध हो फुटले
अश्वासाक्षी भावनाट्य घडले
मुके जनावर दुनिया बोले
परी झाले त्याचे डोळे ओले
अश्वा गळी बाबू पडला
हुंदके देऊन ढसढसा रडला
दु:ख़ाला त्या वाचा फुटली
एक दु:ख़ी कहाणी संपली
एक दु:ख़ी कहाणी संपली
कवी : अतुल दि. पाटिल
स्त्रोत : ओर्कुट