आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, April 06, 2007

"नसती उठाठेव"

मोठे होते झाड वाकडे,
तिथे खेळती दोन माकडे
गंमत झाली भारी बाबा,
गंमत झाली भारी

खरखर खरखर सुतारकाका,
कापीत होते एक ओंडका
भुरभुर भुरभुर भुसा उडाला,
माकड मज्जा पाहू लागला

निम्मे लाकूड चिरुन झाले,
दुपार होता काम थांबले
पाचर ठोकून सुतार गेले,
खावयास भाकरी

माकड टुणकन खाली आले,
पाचर हलवूनी काढु लागले
शहाणे दुसरे त्यास बोलले,
धोक्याचे हे काम न आपुले

पहिले आपला हट्ट न सोडी,
जोर लावूनी पाचर काढी
फटित अडके शेपूट तेव्हा,
माकड हाका मारी

उठाठेव ही नसती सारी,
सुतार त्याला फटके मारी
म्हणून करावा विचार आधी,
नंतर कामे सारी

~:~ खोपा ~:~

"अरे खोप्यामंधी खोपा
सुगरनीचा चांगला
देखा पिलांसाठी तिनं
झोका झाडाले टांगला

पिलं निजली खोप्यांत
जसा झुलता बंगला
तिचा पिलांमधी जीव
जीव झाडाले टांगला

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा

तिची उलूशींच चोंच
तेच दात तेच ओठ
तुला दिले रे देवानं
दोन हात दहा बोटं"।


मराठी माणसाची दिनचर्या.....

मुख प्रक्षाळम दंतम घासम
कोलगेट हमाम बुडबुडभुशम
धिक तकवा तेलम टकलम
केशम नास्तिच अपि कंगवा फिरवम

पोटम पट्टम कच्चम आवळम
खिशस्य द्वि पेनम लावम
"वेळ झालाय ग चहा उकळम"
द्वारम आठवम किल्ली विसरम

किकम मारम घाम डबडबम
सिग्नल बघम आठ्या घालम
सहचालकस्य कुळम उध्दरम
अन्ती अष्टकाले ऒफिसम शिरम

खर्डे घासम डबा गिळम
चहा बरोबर धूम्रपानम
चार वाजता देई आळसम
पंच काले खुशीत दिसम

गॄहे सुखम सॊक्सम (Socksam) फेकम
पोह्यावरती तावम मारम
धिक तकवा तेलम टकलम
केशम नास्तिच अपि कंगवा फिरवम

भार्या मुलम बागम भेळम
रमतम गमतम चित्रपटम।~:~ आजचे विनोद ~:~

एकदा एक अमेरिकन जोडपं भारतात येतं. त्यांचा इथला पर्यटन मार्गदर्शक एक सरदारजी असतो. सरदारजीत्यांना ताजमहाल दाखवतो आणि सांगतो, "हा महाल बांधायला वर्षं लागली." अमेरिकन जोडपं म्हणतं, "अमेरिकेत हा वर्षांत बांधून झाला असता."
नंतर सरदारजी त्यांना लाल किल्ला दाखवतो आणि सांगतो," हा किल्ला वर्षांत बांधून झाला." अमेरिकन जोडपंम्हणतं, "अमेरिकेत हा वर्षात बांधून झाला असता"
हे ऐकून सरदारजी त्यांना धडा शिकवायचं ठरवतोतो त्यांना कुतुबमिनारापाशी घेऊन जातो. अमेरिकनविचारतात, "हे काय आहे?" सरदारजी म्हणतो, "मला काय माहित? काल तर इथे काहीच नव्हतं !!!!"एक सरदारजी दुस-या सरदारजीच्या कानात काय सांगतो की दुसरा सरदारजी जागेवरच मरतो !!!!!

ढिश्क्यांव !!!!मी आणि माझा एक मित्र एकदा Bike वरुन जात होतो ,आणि समोरुन शांतपणे सरळ जात असलेल्या Premier Padmini चालवत असलेल्या माणसाने अचानक उजवीकडे वळण घेतले,कुठलाही सिग्नल न देता !!! आणि आम्ही जाऊन त्याच्यावर धड्कलो,कुणाला काही लागल नाही पण...

आंम्ही : काय रे,वळवताना सिग्नल देता येत नाही का !!!
तो : काय राव तुम्ही !! अख्खी गाडी वळताना तुम्हाला दिसली नाही ,मग सिग्नल कसा दिसला असता !!!

आम्ही याव्रर अगदी निरुत्तर झालो॥


चौखुरे गुरुजींनी वर्गात कोडं घातलं , '' मुलांनो , आपल्या वर्गात २५ बाकडी आणि ५७ मुले , तर समोरच्या पेरूच्या झाडाला आंबे किती ?''
नन्या चटकन उत्तरला , '' बेचाळीस. ''
गुरुजी म्हणाले , '' कसं काय ?''
नन्या म्हणाला , '' कारण मी आज डब्यात पोहे आणलेले आहेत!!!! ''

विक्रेता--- साहेब हि मुंग्यांची पावडर घ्या ना.
नको, मुंग्यांना वाईट सवय लागेल.
?????
आज पावडर दिली तर उद्या लिपस्टिक मागतील।

एकदा दोन भुते गप्पा मारत असतात.
एक भूताने दुसर्य़ाला विचारले,"काय रे, या जगात माणसे असतील का"?
दुसरे भूत म्हणाले,"छे रे।अंधश्रध्दा".

सरदार !!
एक सरदारजी एका केळ्याच्या सालीकडे बघून म्हणतो, " शी यार, आज पुन्हा घसरून पडावं लागणार !!"


~:~ आकाश उजळले होते ~:~


~:~ रेशमाच्या रेघांनी ~:~

~:~ गाड़ी ~:~Thursday, April 05, 2007

~:~ प्रेम दिन ~:~~:~ स्वप्न ~:~
~:~ हे भलते अवघड असते ~:~

हे भलते अवघड असते..हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे...ते दुर दुर जाताना...
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यात अडवूण पाणी..हुंद्का रोखुनी कंठी...
तुम्ही केवीलवाणे हसता आणि तुम्हास नियती हसते...

तरी असतो पकडायाचा..हातात रुमाल गुलाबी..
वा-यावर फडकवताना..पायची चालती गाडी..

ती खिडकीतून बघणारी आणि स्वतः मध्ये रमलेली ...
गजरा माळावा इतके ..ती सहज 'अलवीदा' म्हणते ....

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू..
इतक्यात म्हणे ती - माझ्या कधी गावा येशील का तू ?
ती सहजच म्हणूनी जाते..मग सहजच हळवी होते..
गज-यातील दोन कळ्या अन हलकेच ओंजळीत देते..

कळते की गेली वेळ..ना आता सुट्णे गाठ..
आपल्याच मनातील स्वप्ने..घेऊन मिटावी मुठ..
ही मुठ उघडण्या पूर्वी..चल निघुया पाऊल म्हणते...
पण पाऊल निघण्यापूर्वी..गाडीच अचानक निघते..

परतीच्या वाटेवरती गुदमरुन जड पायांनी ..
ओठावर शीळ दीवाणी...बेफिकीर पण थरथरती..
पण क्षण क्षण .. वाढत असते..अंतर हे तुमच्या मधले..
मित्रांशी हसतांनाही...हे दु:ख चरचरत असते..

हे भलते अवघड असते॥हे भलते अवघड...


Wednesday, April 04, 2007

~:~ कशी नशिबाने थट्टा आज मांडली ~:~

~:~ जोडीदार ~:~~:~ भाउसाहेब ~:~Tuesday, April 03, 2007

~:~ वपुर्झा ~:~
~:~ मस्तानी ~:~~:~ आयुष्य ~:~
~:~ तुझ्या प्रेमात पडल्यापासुन ~:~

~:~ कणा ( विडंबन ) ~:~
Monday, April 02, 2007


शब्दांनाहि
कोडं पडाव

अशिहि काहि माणस असतात

किती आपलं भाग्य असत

जेव्हा ति आपली असतात


~:~ ढगाला लागली कळ ~:~
~:~ कुणीतरी असावं ~:~


~:~ हिशोब प्रेमाचा ~:~