आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, September 28, 2007

ओळखलत का मुलीँनो मला !!!!

ओळखलत का मुलीँनो मला
'गुलाबासह' आला कोणी,
केस होते सलमानसारखे
कानात होती त्याच्यासारखी बाळी

क्षणभर बसला
नंतर हसला
बोलला शर्ट काढुन
’ काल तुझा भाऊ भेटला
गेला बरगड्या तोडुन,

गाढवाला मारल्यासारख
खालुन- वरुन चोपल
रिकाम्या हाती जाईल कसा
अँतर्वस्त्र तेवढे वाचल!!

चपले कडे हात जाताच
तावा - तावात बोललो,
चप्पल,बुट नको मुळी
फ़क्त ड्रेस तेवढा पाढवा!!

मोडुन पडली प्रेम स्टोरी
तरी मोडला नाही चाळा
एखादी ’ बीन भावाची ’ पोरगी असेल तर...
तेवढ नक्की कळवा....

-- तुषार

पुल - काही सहित्यिक भोग ....

स्थळ - पुणे शहरातील एक बस-स्टॉप
पात्रे - ‘खडूस’ ह्या शब्दाखेरीज दुसरा कुठला शब्द सुचु नये असे सत्तरीतले एक गृहस्थ.

मी त्यांच्या बाजूस जाऊन रांग लावतो. आश्चर्य म्हणजे रांग नाही. आम्ही दोघेच. काही वेळ ते गॄहस्थ आम्हाला खालपासून वरपर्यंत न्याहाळतात. आम्ही समोरच्या करंडे टेलर्सचे मि. करांडे एका लठ्ठ गॄहस्थाच्या पोटाचे माप घेत असल्याचे सुखद दृष्य पाहण्याचा बहाणा करतो. इतक्यात कानावर आवाज.

मी उपाख्य गाजी गणेश जोशी. दशभुजा गणपतीचे देऊळ कुठे आहे अहो?
मी. काही कल्पना नाही बुवा.
गा.ग.जो. पुण्यातच राहता ना? (त्यावरून ते पुण्यात राहतात हे लक्षात आले.)
मी. हो.
गा.ग.जो. किती वर्षे?
मी. बरीच.
गा.ग.जो. काय व्यवसाय?
मी. पुस्तकं वगैरे लिहितो.
गा.ग.जो. म्हणजे साहित्यिक! आणि तरी तुम्हाला साधा दशभुजा गणपती ठाऊक नाही.
मी. आपण कुठल्या गावचे?
गा.ग.जो. मी कशाला कुठल्या गावाहून येतोय. इथच जगलो इथंच मरणार.
मी. (कधी? हा प्रश्न गाळून) इथेच मरणार कशावरून.
गा.ग.जो. दशभुजा गणपती ठौक नाही ते सरळ सांगा. माझ्या मरणाची कशाला काळजी करताय? मी मेल्यावर काही तुम्हाला खांद्याला बोलावणार नाही.
मी. खांद्याची आमंत्रणं मृतांच्या सहीनं कधी जाऊ लागली?
गा.ग.जो. हे पहा! तुम्ही साहित्यिक आसल्याने भाषाप्रभुत्त्व हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे मानू नका. मीही पुण्याचाच आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. पुण्यात राहून
साहित्यिक म्हणवणाऱ्या माणसाला दशभुजा गणपतीचे मंदिर ठाऊक नाही ती तुमची समाजाविषयीची आस्था. उद्या शनवरवाडा कुठे असतो विचाराल. परवा पर्वतीचा पत्ता पुसाल.
मी. तुम्हाल तरी ठाऊक आहे का दशभुजा गणपती?
गा.ग.जो. हो आहे मग.
मी. मग कशाला विचारताय?
गा.ग.जो. तुम्हाला माहित आहे का नाही हे पडताळायला.
मी. पण माझा दशभुजा गणपतीशी काय संबंध?
गा.ग.जो. सांगतो. ‘पुणे शहरातील ढासळती धर्मव्यवस्था’ ह्या विषयावर लेखनमाला लिहितोय मी. इथं सकाळी सात पसून उभा अहे. बेचाळीस लोकांत फक्त एक दशभुजा गणपती ठाऊक असणारा निघाला. ते पण त्याचे दुकान आहे मंदिरासमोर म्हणून. आत कधी दर्शनाला गेला नाही म्हणे.
मी. म्हणजे दशभुजा गणपती पत्त्यापुरता.
गा.ग.जो. अहो हीच तर आपली ट्रॅजेडी. देव फक्त पुत्त्यापुरता. एकदा आम्ही विचारलं ‘डॉ. मंजुळाबाई सपाते प्रसूतिगृह ’ कुठी आहे? तर तो गृहस्थ म्हणाला, ‘सोमण मारुतिच्या देवळापुढे’. अरे काही सारासारविवेकबुद्धी? निदान प्रसूतिसाठी तरी मारुती वापरू नका.
मी. खरं आहे.
गा.ग.जो. साहित्यिक म्हणून देवळात जाणं तुम्ही आपलं कर्तव्य मानत नाही तर!
मी. (देवावर भार घालून) मानतो तर!
गा.ग.जो. मग जाता का?
मी. दशभुजाला नाही जात.
गा.ग.जो. आय एम नाट पर्टिक्युलर अबाऊट धिस गणपती ऍट ऑल. (रिटायर म्हातारा भडकला की पुण्याच्या इंग्रजीत फुटतो). एनी टेम्पल फॉर द्याट म्याटर. रोज जाता?
मी. (देवा क्षमा कर. खोटं बोलू नये ह्या गांधीवचनाला मी शाळेत कंपासपेटीत लपवलेलं. ती कंपासपेटी नववीच्या घटक चाचणीत हरवली.) हो म्हणजे रोज म्हणायला हरकत नाही.
गा.ग.जो. मला होय किंवा नाहीचा रकाना भरायचाय.
मी. हो! (फर्गिव मी ओह लॉर्ड! पण तसं हे खोटं नाही हा. रोज रात्री गुडकुले विठूबाच्या देवळात काणे भटजी, दाजीबा टेलर, सोपानराव न्हावी सॉरी हेयरड्रेसर... म्याट्रिक केलेला न्हावी ना म्हणून... आणि मी वरच्या नगारखान्यात रमी खेळतो. एक पैसा शंभर प्वाईंट. मागल्या आषाढी कार्तिकीला गल्ला जास्त जमला नाही म्हणून जिंकाणारा काणे भटजी प्वाईंट वाढवा म्हणाला. आम्ही ऎकत नाही.)
गा.ग.जो. सरळ हो सांगा ना.
मी. हो. आता धर्मावर श्रद्धा नाही ठेवायची ती काय म्युनिसिपाल्टी, जिल्हाबोर्डवाले अन महाराष्ट्र महामंडळ परिवहनाच्या एस.टीं.वर ठेवायची?
गा.ग.जो. वाक्याशेवटी प्रशन्चिन्ह नको. पूर्णविराम द्या हो.
मी. (मुकाट्याने) हो.
गा.ग.जो. आता सांगा धर्मावर तुमची श्रद्धा आहे?
मी. यथेच्छ आहे. धर्म नसता तर दसरा दिवाळी नारळी पौर्णिमा नसत्या, पुरणपोळी, लाडू नसते. इतकच काय सत्यनारायण नसता तर शेराला सव्वाशेर चाचपत तुपाचा शीरा खायला मिळाला नसता.
गा.ग.जो. तो शीरा नसतो. प्रसाद असतो.
मी. सत्यानारायणाला खारीक वाटता येणारा नाहीत. प्रसाद म्हणूनसुद्धा. माफ करा पण तुम्ही छुपे कम्युनिस्ट दिसता. (माझं आपलं काहितरीच)
गा.ग.जो. मी कम्युनिस्ट! दशभुजा गणपती तुम्हाला ठाऊक नसताना मी कम्युनिस्ट!
मी. असं तर मग सांगा झोपाळू नरसोबाचं देऊळ कुठे आहे सांगाल (२ कोटी देवात आज मी एक जन्मला)
गा.ग.जो. झोपाळू नरसोबा! प्रथमच ऎकतोय!
मी. जाऊ द्या मी नास्तिकांशी बोलत नसतो. सत्यनारायणाला खारका वाटायला निघालेत (माझाच
डाव उलटून). उद्या गोकुळाष्टमीला केक वाटाल.
गा.ग.जो. हे तुम्ही कुणाला सांगाताहात.
मी. तुमच्या शिवाय दुसरं कोण आहे इकडे? सॉरी, दुसरं कुणी नाही. पूर्णविराम.
गा.ग.जो. आपला कहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही कुठे राहता?
मी. (इथे खरी कसोटी आहे. डीटेलवार पत्ते सांगण्यात आपल्यासारखा हातखंडा कुणाचा नाही) तुम्हाल झोपाळू नरसोबा ठाऊक नाही. रेडेकर तालीम टाऊक असेल...
गा.ग.जो. ती कुठेशी आली?
मी. रविवारात. घाणेकरांच्या कोळशाच्या वखारीला लागून.
गा.ग.जो. काढीन शोधून. घाणेकर तालीम.
मी. घाणेकर तालीम नाही. वखार. त्यालालागून रेडेकर तालीम. रस्ते पाड्यावरनं खाली या सरळ (येथे हवा तसा अर्थ घ्यावा). त्यांना विचारा पापडवाले बेंद्रे कुठे राहतात ते. बेंद्रांच्या वाड्यावरनं गल्ली जाते. तिच्या टोकाला माशेलकर खाणावळ. तिथे वडे चांगले मिळतात. एका वड्याचे ६ पैशे. त्यांना विचारा संपतराव लॉंंड्री. ५ पैशे एका विजारीचे. पुणं भरपूर महाग झालंय हो.
गा.ग.जो. जरा सावकाश सांगा हो. मी लिहून घेतोय. आता कुठे कापडवाल्या बेंद्रांकडे आलोय.
मी. कापडवाल्या बेंद्रे नाही. पापडवाले बेंद्रे. तिथे सोवळ्यातले पापड मिळतात. ४ पैशे एक डझन. आमच्या सौ जास्त चांगले पापड बनवतात पण. बेंद्रांना विचारा माशेलकर खाणावळ व पुढे संपतराव लौंड्री. ते भोरफ्यांचा वाडा दाखवतील.
गा.ग.जो. अहो अहो जरा सावकाश सांगा. माझं लिहून झालं नाहीये.
मी. सावकाश कसं सांगू? बस आली म्हणजे.
गा.ग.जो. ती कशी येणार?
मी. म्हणजे?
गा.ग.जो. हा स्टॉप क्यान्सल झालाय.
मी. काय म्हणता.
गा.ग.जो. हो मग. पंधरा दिवासांपासून हा वनवे झालाय. म्हशींना ही ह्या बाजूने प्रवेश बंद मग बस कशी येईल.
मी. मग मघापसून का नाही सांगितलंत.
गा.ग.जो. अरे व्वा! मग तुम्ही थांबला असतात का? आणि काय हो साहित्यिक असून तुम्हाला गावातले वनवे माहित नाहीत? कमाल आहे! नाव काय तुमचं?
मी. (स्वतःचे नवे बारसे साजरे करत) गोविंद गोपाळ दहिभाते.
गा.ग.जो. आजच हे नाव ऎकतोय.
मी. मी पण! (गा.ग.जो. शुद्धीवर आहेत की बेशुद्ध पडले हे मागे ना पहाता मी सटकतो. काही भोग दैवावर टाकून सुटतच नाही हो.)

--- पु.ल.देशपांडे
कधी न साजरा केला कोणी
असा हा वाढदिवसाचा क्षण..
सारं काही लक्षात असूनही..
का केले मी विसरण्याचे एक वेडेपण..

ती नेहमीच विचारायची मला
कधी रे आहे माझा वाढदिवस..
मी म्हणायचो पुन्हा एकदा सांग मला..
विसरलो आहे मी असं समज..

ती चिडायची रागवायची..
थोडीशी नाराज होऊन माझ्याशी भांडायची..
पण मी तीच्यासमोर चेहरा पाडला की
ती मग मला परत एकदा ती तारीख सांगायची..

बरेच दिवस उलटून गेले..
तिच्या सुखाचे क्षण करीब आले..
अन परत तीने मला विचारलं एकदा..
म्हणाली माझा वाढदिवस तुझ्या लक्षात असेल बहूदा..

मी आपलं जरास डोक खाजवलं..
थोडंस गप्प अन मन थोडं भुतकाळात घालवल..
नाही आठवत म्हणून मान खाली घालून
तीला मिठीत सावरलं

पण ही वेळ खरोखरी खरोखर..
माझ्यासाठी नव्हतीच मुळी..
नकळत मी खूडली तीच्या एवलूष्या
अपेक्षांची सुंदर सुगंधीत कळी..

तीच्या सहनशीलतेचा पारा
लवारसासारखा उफाळत होता..
माझा आपलं पुन्हा एकदा कोणता बहाणा
या ज़ुळवा जुळवीचा खेळ चालू होता..

अखेर तीने माझ्यावरच्या रागाचे मोन तोडले
तिचे अंगारे बाण माझ्यावर सोडले..
मी गपचूप ऐकून घेतले..
अन डोळे घट्ट आपले मिटून घेतले..

तीने अखेर मला काहीच सांगितले नाही..
मीही तिला हट्ट केला नाही...
मग आला तो दिस जवळ
जो माझ्या ह्रिदयात कोरला होता..

तिने मात्र माझ्या शुभेच्छांचा रस्ताच सोडला होता..
अन मी मात्र तोच रस्ता फुलांनी सजवला होता..
अन अखेर मी त्या दिवशी तीला तोच आंनद दिला..
शुभेच्छांचा भरभरून वर्षाव ह्स्त नक्षत्र होऊन केला..

तीला खुप अस्वथ वाटलं अन
अचानक अश्रुंच आभाळ तिच्या डोळ्यात फाटलं..
जवळ घेवूनी मी तिला गालावर ओठांचा स्पर्श केला..
अन मग तो भरून आलेला पाऊस कुठेच्या कुठे पळून गेला,,

तिच्याकडे हसत हसत मी तिला म्हणालो..
ये, अपून का स्टाईल हैं !
बस मुझे इस कदर दिवाना कर दें
वोह सिर्फ ओर सिर्फ तुम्हारे ओठोंकी स्माईल हैं !

--- आ.. आदित्य...
स्वप्न

भीती तिला प्रणयात कोणी पाहील याची वाटते
येवूनही स्वप्नी माझ्या हेच तिजला वाटते

म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात ह्या आले तुझ्या
सारेच पण आहेत बाई भोवती जागे तुझ्या

जाणते सर्वांस यांना मी ही नव्हते साधी तशी
स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तशी

भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे
स्वप्नातही अपुल्या स्वत:च्या हाय ती नव्हती तिथे

त्रास ऐशा अप्सरेला हाच असतो सारखा
नेतो तिला उचलून जो तो आपुल्याच स्वप्नी सारखा

ऐकिले दुसर्‍या कुणाच्या स्वप्नात ती आहे तिथे
बोलाविले नव्हते तरीही धावुनी गेलो तिथे

आता तरी दुर्दैव वाटे नकीच माझे संपले
पोचण्या आधीच ते ही स्वप्न सारे संपले

- भाऊसाहेब पाटणकर

तुझं आपलं नेहमीचंच
खुप उशीर झालायं मला आता जाऊदे..
अरे, एवढी काय घाई तुझी ?
मला जरा तुला डोळे भरून तरी पाहूदेत..

सारं काही घडतयं तुझ्या मनासारखं
तरीपण तुझं लक्ष कुठे धावतयं?
जरा निश्चिंत हो थोडावेळ ,
बघ ते गवताचं पातं कसं वार्‍यासंगे निवांत डोलतयं

किनार्‍यावर पावलांच्या मुद्रा
तुला नेहमीच उमटवायच्या असतात..
पण घाईच्या चालण्यात तिथं फक्त
पुसटं खुणा ज्या लाटाही उध्वस्त करून टाकतात..

आडोष्याला जाताना कशीबशी तयार होतेस..
लाजत लाजत झाडामागे तोंड लपवून उभी राहतेस..
जरा कुठे मिठीत घ्यायला पुढे सरसावलो तर
बस, बस मला कसंतरी होतयं म्हणून पळ काढतेस..

एवढं प्रेम आपुलं ऐकमेकांवरचं पण
बसस्टापवर दोन प्रांताचे नमुने आहोत असे दाखवते
अन मग खिडकीच्याजवळ बसून
माझ्याच खांद्यावर डोकं ठेवून निजतेस..

माझ्या खिशात नसते दमडी..
तेव्हा तुला काहीनाकाही हवे असते..
आता आपल्या प्रेस्टीजचा प्रश्न..मग काय,
तुझ्यासाठी लाईटबीलाची रक्कम संपलेली असते..

सिनेमाला गेल्यावर मला जरा आंनद होतो..
अंधारलेल्या कोपर्‍यात तो खाजगी क्षण येतो..
पण तिथेही तुझा चालूच असतं..
पण खांद्यावर डोकं ठेवून लक्ष फक्त पडद्यावर असतं..

आता जरा थोडी मोठी झाल्यासारखी वाटलीस,
म्हणून तुला पुन्हा त्या झाडामागे नेलं
अन आपल्या आयुष्यातलं पहीलं चुबंन करुन,
तुला विचारलं काय वाटलं सखे तुला?

तु ढकलून म्हणालीस...

"बावळट, बघ माझी लाली खराब केलीस , अजिबात अक्कलच नाही तुला.."

--- आ.. आदित्य..

Thursday, September 27, 2007

असा मी माझा स्वत:तच रमतो
तुझ्या साठी मी एकलाच जगतो

विचारांच्या भोवर्‍यात निर्झर हा
किनारा त्याचा उपराच ठरतो

वसंतात श्रुंगारुदे निसर्गाला
ग्रिष्मात वृक्ष ओंडकाच दिसतो

पांघरुनी चांद नभात तारका
भास्कर त्याला परकाच ठरतो

नेत्राती तुझ्या प्रतिबिंबित कोणी
ह्रद्यच्या गावी वेगळाच असतो

---- गणेशा
नात्याची वीण घट्ट असु नये.
उगीच नात्यात जास्त फसु नये.
सुटताना वीण जर तुटलेच धागे
हसतिल सारे, आपण रुसु नये.

नात्यातल्या नात्यांचा नात्यांनाही विसर होतो.
जीवाभावाचे नाते सोडून कुणी पसार होतो.
टिकलेले असे सांगा कोणते शाश्वत नाते,
जिथे नात्याच्याही जिवावर कुणी उदार होतो .

नात्यांना माणसाने जोडु नये,
जोडलेच तर ते तोडु नये,
विसरलात माणसांना तरी चालते......
पण नात्यांना कधी सोडू नये.


नात्यात कुणाच्या माझेही एक 'नाव' असेल.
स्वप्नात कुणाच्या माझाही एक् 'गाव' असेल.
नसेल ते नाते जन्मांतरीचे जरी....
काळजात एखाद्या माझाही एक 'ठाव' असेल.

एका नात्याचे रेशीम कोंदण असेल
काळजावर माझ्या 'एक गोंदण' असेल.
घेईन मी श्वास अखेरचा जेंव्हा ,
तेच मला शेवटचे 'आंदण' असेल........ !!!

---@अरुण

Wednesday, September 26, 2007

येशील ना पुन्हा सखे आशेची बरसणारी
पोरकी सर अलगद बोंटावर धरायला
तुझ्याच आठवणीत ओघळणारा थेंब
ओंजळीत धरुन स्वप्नांच लहानसं तळ करायला

-- सचिन काकडे

बोलावसच वाटत नाही
तु जवळ असताना...
वाटत तुच सगळा ओळखावस
मी नुसत हसताना

माझ्या हृदयात फक्त
तुझ्यासाठीच जागा आहे
आपल्याला नात्यात बांधणारा
प्रेमाचा एकच धागा आहे

प्रेमाला कोणतीही उपमा
अतिशयोक्तीच ठरेल
तुझ्या माझ्यातल्या विश्वासानेच
मात्र प्रेमाचा घडा भरेल

प्रेम या अडिच अक्षरात
ब्रम्हांडाएवढं सुख असतं लपलेलं
दोन जीवांनी त्यात सृष्टीतलं
नाजुक बंधन असतं जपलेलं

विरोधकांना नेहमी
प्रेमाचा विसर पडलेला असतो
कारण त्यांच्या बरोबर कधी
तसा प्रसंगच घडलेला नसतो


असच कधीतरी अस्वस्थ व्हायला होत
मन आठवणींच्या जगात वावरायला लागत

का येतात सर्व जुन्या आठवणी
करतात अवस्था मनाची जीवघेणी

अनावर झाल जर त्या पेलवण
ठरवल जात विसरावे ते क्षण

तरीपण ......

असच कधीतरी अस्वस्थ व्हायला होत
मन आठवणींच्या जगात वावरायला लागत

का अडकून राहतो आपण भूतकाळात
अवघड जात रमायला वर्तमानकाळात

आयुष्य म्हणजे आहे वळणांची वाट
कधी उतरण तर कधी घाट

तरीपण ......

असच कधीतरी अस्वस्थ व्हायला होत
मन आठवणींच्या जगात वावरायला लागत

परतून आल्यावर पुन्हा ठरवल जात
त्या जगात पुन्हा जायच नाही

किती काही झाल तरी
परतुन मागे पहायच नाही

तरीपण ......

असच कधीतरी अस्वस्थ व्हायला होत
मन आठवणींच्या जगात वावरायला लागत

असच कधीतरी अस्वस्थ व्हायला होत
मन आठवणींच्या जगात वावरायला लागत ....

-- आरती सुदाम कदम
चमकत्या मोहनीसह
साथ होती चांदण्याची
तरी का मला स्वप्न
मनातली तुटलेलीच दिसली ?
सगळ काही केलं
तरी ईछ्चा आकांक्षाची
घडी का नेहमी
मला सुटलेलीच दिसली ?

बरसात्या थेंबात गारव्यासाह
साथ होती सरींची
तरी कशी गं सखे
त्यात तुला माझी
ओघळ्णारी आसवं दिसली ?
गरज होती भिजताना
मला तुझ्या उबदार मिठीची
पण त्याक्षणी नकोशी वाटणारी
सहानभुती तेव्हा तुझ्या नजरेत दिसली.......

सगळेच सांगायचे की
"नशा" ही सवय चुकीची
पण तुझ्या प्रत्येक अदेची
नशा माझ्या मनावर चढताना दिसली
सखे, जाताना तुझ्या त्या
नजरेच अबोलपण पाहताना
तुझ्या नशील्या डोळ्यांतली धुंद
तेव्हा मला उतरताना दिसली.............
तेव्हा मला उतरताना दिसली...............

-- सचिन काकडे
...हा निरर्थ सर्व खेळ !

एकसारखा तुझा विचार मी करू किती ?
एकसारखा तुलाच सांग मी स्मरू किती ?

दूर दूर एकटीच दुःख साहतेस तू...
...आणि आपल्या व्यथेत चूर राहतेस तू
हे स्मरून लोचनात आसवे भरू किती ?

सारखा तुझ्यामुळेच मी उदास राहतो
तू जरी न यायचीस़; वाट मात्र पाहतो
या अशा मनःस्थितीत सांग वावरू किती ?

एकसारखी तुझीच खंत बाळगायची...
हीच, एवढीच रीत जाहली जगायची
सांग तू, तिथून सांग, धीर मी धरू किती ?

एकटेच आठवांत मी तुझ्या जळायचे...
अन् तुला कधी कधी कधी न हे कळायचे
भोवतालच्या जगात मी खुळा ठरू किती ?

वाटते, फुलापरी तुला जपायला हवे
वाटते, तुला कधी मिळू नयेत आसवे
व्यर्थ या विवंचनेत रोज मी मरू किती ?

गुंतलोच का तुझ्यात, वाटते कधी कधी
आर्त वेदना उरात दाटते कधी कधी
सैरभैर या मनास सांग आवरू किती ?

राहते मनातल्या मनात सर्व शेवटी
मी इथेच एकटा नि तू तिथेच एकटी
भावना मुक्या, अबोल सांग आवरू किती ?

वाटते, अखेर सर्व सर्व व्यर्थ व्यर्थ का ?
यायचा न जीवनास या कधीच अर्थ का ?
हा निरर्थ सर्व खेळ ! त्यात मी हरू किती ?

-- प्रदीप कुलकर्णी
ये गो ये मैना
जणु चांदव्यानं दिलं तुला रूपाचं आंदण,
त्याच चांदव्याचं सखे तुझ्या कपाळी गोंदण.

जिणं चढणीचा घाट माझी निखा-याची वाट,
माझ्या भाजल्या पाऊला तुझ्या प्रीतीच चंदन.

आता तुझीच ग आस सखे झाली माझे श्वास,
आणि तुझी खुळी प्रीत माझ्या हृदयी स्पंदन.

तुझी सपनेच सारी नाही पापण्यांत नीज,
माझ्यासवे रातभर काल जागलं चांदणं.

आता जगतात कोणी नाही माझ्यापरी धनी,
तुझी प्रीत कोहिनूर.. तिला मनाचे कोंदण…

योगदान : रेशमा
दोन वेडी पाखरं
रोज खिडकीत भेटायची..
चिमणी चिमणी प्रीत त्यांची
आभाळाला खेटायची..

चिमण्या चिमणीचे चिमणेसे रुसणे,
चिमुकली समजूत.. चिमणेसे हसणे..
चिमण्या प्रीतीची चिमणी कविता
खिडकीत माझ्या फुलायची…

चिमण्या प्रीतीचे रंग निराळे,
चिमण्या चोचींतले चिमुकले चाळे..
चिमण्या दोघांची चिमणी कहाणी,
जणू परीकथाच वाटायची........

योगदान : रेशमा
अबोल ती , तिचे डोळे खूप बोलायचे..
मनातले गंधाळले गूज खोलायचे..

ओठी असे कुठलेसे जादूभरे गाणे ?
स्वरांसवे तिच्या सारे रान डोलायचे..

हसण्याची सर तिच्या भुरभुरताना,
हळूच एक पाखरु थेंब झेलायचे..

कोवळ्याशा पंखांची कोवळीशी परी ती,
पंख तिचे आभाळाचे स्वप्न पेलायचे॥

कवी : अद्न्यात
रानभर आभासांचे धुके दाटले,
पापण्यांशी आठवांचे दव साठले..

अवचित पाय-यांशी हसली चाहूल,
क्षणभर..आलीस तू उगा वाटले..

मनातून बेभानशी घुमे धून वेडी,
सुरांसवे भांडताना शब्द फाटले..

तुला भरारण्या आता कशी साद घालू ?
नभ दावूनी तू माझे पंख छाटले..

-- मुकुंद भालेराव

बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.......
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.....
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.....
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही......
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.....
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही....
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.....

कवी : अद्न्यात

Tuesday, September 25, 2007

~:~ दिसला बाई दिसला ~:~


Monday, September 24, 2007

झाले आता पुरे ते
जगणे झाले सुरे ते

सांगू कसे नि कुणास
माझे भले बुरे ते

संशयित जगास कळणार
कसे खोटे खरे ते

तहाण थोडीच भागणार
अश्रूं सारेच खारे ते

भाग्य लिहायला घेतलं
ठेवलं त्याने अधुरे ते

जिवनाच्या रंग भरताना
स्केचचं राहीले अपुरे ते

एक जात सारे सरडे
माझे सगे सोयरे ते

@सनिल पांगे

ही रातही अडखळते
अवसान सगळे उसने
स्पर्शात एका गळते,
ओठांत सावर सजणा,
ही रातही अडखळते.

श्वासांत बागा फुलती,
मी अंगभर दरवळते,
जागून घे रे सगळी,
ही रातही अडखळते.

नजरेत थोडे कळते,
मौनात उरलेसुरले,
बघ चंद्र मग पाघळतो,
ही रातही अडखळते.

मोहरत काया अवघी
या चांदण्या विरघळती,
दवथेंब पानांवरती,
ही रातही अडखळते.

गुंतून पडले सगळे
वळणांत धागे बघ या,
डोळ्यांत अन ती मिटता,
ही रातही अडखळते

--च्क्रपाणि
तू पहाटस्वप्नांत स्फुरलेली स्वप्नधून,
तू निरभ्र नभात हसलेली चंद्रखूण,
तू हिरवळ ओली, तू चातक बोली,
तू गीत अरुवार कोकिळ कंठातून..

तू सोनेरी उन्हात झरलेली सर वेडी,
तू बासुरी मधल्या हळव्या स्वरांची गोडी,
तू सुरेल राग, तू स्वप्निल जाग,
तू श्वासांमधली अस्वस्थता थोडी थोडी..

तू स्वच्छंद बेबंद उसळती मुग्ध लाट,
तू प्राजक्तफुलांच्या सड्यात भिजली वाट,
तू रेशीम अंग, तू प्रीतीचा रंग,
तू गच्च धुक्याच्या मिठीतला नदीकाठ..

तू लाजून मिटली अल्लडशी चाफेकळी,
तू हस-या तान्हुल्याच्या गालावरली खळी,
तू चांदणनक्षी, तू वेल्हाळपक्षी,
तू हुरहुर अनामिक जागे जी सांजवेळी…।

-- मुकुंद भालेराव
आयुष्य तेच आहे
बागडता यायला हवं
नशीब आपल्या हाती नसलं
तरी उडता यायला हवं

शेवटी आयुष्य तेच आहे
तुझ्यासाठी पोळले हात होते
काही थेंबही का मग
तुझ्या डोळ्यातल्या ढगात नव्हते

शेवटी आयुष्य तेच आहे
रोज भरारी घेतो मी नवी
कधीतरी ह्या बोडक्या झाडाला
फुटेल एक कोवळी पालवी

शेवटी आयुष्य तेच आहे
कुठवर मी हा गाडा ओढणार
एकएक करत शेवटी
चाक निखळून पडनार

शेवटी आयुष्य तेच आहे
मी आवरतोय माझाच पसारा
चला गड्यांनो निघतो आता
संपला श्वासांचा खेळ सारा

शेवटी आयुष्य तेच आहे
देहाची भाजणी चाललीय
थबकलेल्या श्वांसाची ती
शेवटची मोजणी चाललीय

-- कुमार
ही कोण स्वप्नात दिसली
ही कोण हृदयात ठसली
नभ झाले मज ठेंगणे हे
मम जीवनी प्रीत वसली ।ध्रु।१

गं प्रिये ... ... ...


दर वळणावरी जीवनाच्या
गात गाणे पहा मी निघालो
भान माझे कुठे काय सांगू
पायऱ्यांशी२ न रमता निघालो ।१।

ही कोण स्वप्नात दिसली ...

आज सजल्यात साऱ्या दिशा या
वाटते खोलले स्वर्गदारा
रूप झालेय माझे पहाता
मजवरी रोखल्या सर्व नजरा ।२।

ही कोण स्वप्नात दिसली ...

मृत्यु येतो जरीही तनूला
मृत्यु आत्म्यास या येत नाही
दीप्त राही सदाकाळ प्रीती
नष्ट दीप्ती तिची होत नाही ।३।

ही कोण स्वप्नात दिसली ...

-- टवाळ
जीवनाची गाडी चालविण्यासाठी
दोन चाके असावी लागतात
माझी जीवन गाडी चालविण्यासाठी
एक चाक बनशील का?

सुख आणि दु:ख या
एकाच नाण्याच्या दोन बाजु
या दोन्ही वेळी नाण्यासारखा
अजोड राहशील का?

चुका माणसाकडुन होतातच
त्यातुनच तो शिकत असतो
आयुष्यात माझ्याकडुन चुक झाली
तर प्रेमाने समजावुन सांगशील का?

एकमेकाच्या साथीशिवाय
आयुष्यात मजा येत नाही
हे आयुष्य सुंदर बनविण्यासाठी
शेवटपर्यंत बरोबर राहशील का?

न मागता मिळण्यात जो आनंद असतो
तो मागुन मिळण्यात नाही
आजन्म तुझ्या प्रेमाच्या साथीशिवाय
मी अजुन काही मागत नाही

मी अजुन काही मागत नाही.......

--आरती सुदाम कदम

हे प्रेम नक्की काय आहे

आमची पहीली भेट
ती किती लाजली होती
ते लाजणं डोळ्यात भरून
माझी रात्र गाजली होती

काय सांगू स्वप्नं कशी
रात्रभर छेडत बसायची
दिवसही स्वप्नां खातिर
रात्रीचं वस्त्र नेसायची

मग तीलाच भेटायची ओढ
मनात सतत जागायची
तीची प्रत्येक आठवण माझ्या
अंगोपंगी बिलगायची

हे प्रेम नक्की काय आहे
ओळखणं कठीण होऊन बसतं
बुद्धीने श्रेष्ट काय कनिष्ट काय
प्रत्येकाचं मन शेवटी फसतं

-----मराठी बाणा
मला सजवण्या मागे, तुमचा काय बेत आहे
माझ्या शरीराचा कोणता, अर्थ अभिप्रेत आहे

फुल होऊन आतास, कुठे मी फुलू पाहतो
कोण चार खांद्यावरुन, मला असं नेत आहे

कधी ज्यांच्यासाठी मी, त्यांची दूनिया होतो
मला एकटं सोडताना, ते कोणत्या दुनियेत आहे

आजवर प्रत्येकाला, मी आधारच देत आलो
मग का माझा भार, असा लाकडावर येत आहे

ज्यांच्या पोटापाण्यासाठी, मी वणवण फिरलो
मज भोवती घालून प्रदकक्षीणा, पाणी पाजत आहे

तेवलो मी ज्यांच्यासाठी, प्रकाश मिळावा म्हणून
पुन्हा जाळून मला, अग्नीलाच अग्नी देत आहे

मला नाही पटलं माझ्याच आप्तेष्टांचं वागणं
सरणावरून उठलो, तर म्हणे मी भूतप्रेत आहे

@सनिल पांगे
आहे बरेच काही सांगायला मला

आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!

ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
(झाला उशीर थोडा वाचायला मला)

असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला?

का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला

भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!

हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला?


—चित्तरंजन