आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, May 04, 2007

कधी कधी कविता करावसं वाटतं

कधी कधी खुप,
कविता करावसं वाटतं

कुणीतरी म्हणाले....
ते काही इतकं सोपं नसतं.......
कविता करायला आधी
प्रेमात पडावं लागतं
एकदा प्रेमात पडलं की
बरोबर सगळं सुचतं जातं

कुणीतरी म्हणाले...
तेही इतकं सोपं नसतं
प्रेमात पडायला आधी
स्वतःला विसरावं लागतं
स्वतःला विसरुन जाताना
आठवणीचं माहोल जमु लागतं

कुणीतरी म्हणाले..
स्वतःला विसरायला आधी
कुणीतरी आठवावं लागतं
कुणाला तरी आठवायला
थोडस दुर जावं लागतं

कुणीतरी म्हणाले..
दुर जाण्यासाठी आधी
खुप जवळ यावं लागतं
खुप जवळ येण्यासाठी
विश्वासाचा नातं असावं लागतं

कुणीतरी म्हणाले..
विश्वासाचं नातं असण्यासाठी
मनाशी मन जुळावं लागतं
मनाशी मन जुळताना
जुळवुन घेणं शिकावं लागतं

कुणीतरी म्हणाले..
जुळवुन घेणं शिकण्यासाठी
स्वतःला तटस्थपणे पारखावं लागतं
स्वतःला पारखण्यासाठी
कवी व्हावं लागतं

कुणीतरी म्हणाले..
कवी होण्यासाठी आधी
आतुन काव्य स्फुटावं लागतं
आतुन काव्य स्फुटल्यावरच
कविता करावंसं वाटतं

कुणातरी म्हणाले....
तेही इतकं सोपं नसतं
~:~ आयुष्य ~:~

हे आयुष्य अस का असत?
आज असत तर उद्या नसत....

कधी ते मजेत चालत असत
कधी मजेची सजा बनुन जात
हे आयुष्य अस का असत?
आज असत तर उद्या नसत....

कोणी रात्री चन्द्र पाहून झोपतो
सकाळचा सूर्य पाहायला मात्र नसतो
हे आयुष्य अस का असत?
आज असत तर उद्या नसत....

घरचे आवरुन कामावर निघुन जातो
परतीचा रस्ता तो कसा काय चुकतो?
हे आयुष्य अस का असत?
आज असत तर उद्या नसत....

नवपालवी फ़ुटताना दुष्ट भ्रमर येतो
एका क्षणात सर्वस्वी नाश करुन जातो
हे आयुष्य अस का असत?
आज असत तर उद्या नसत....

फ़ुल कितीही गुणी अन सुन्दर असल
तरी फ़ान्दीवरुन त्याला उतरावच लगत
अन माणसाच्या मनात नसताना
या जगातून जावच लागत
हे आयुष्य असच असत?
आज असत तर उद्या नसत....
या जगात नाही दुसरे
प्रेमाहुन निर्मळ नाते...
पण हेच नाते क्षणात आपुले
जिवन विस्कटून जाते
या नात्याला व्याख्या नाही
थोर सांगून गेले बरे
मात्र ते फार सुंदर असते!
हे विधान आहे खरे.
केव्हातरी मी हि केले होते,
जिवापाड प्रेम एकावर
.......पण, माझ्या प्रेमाला त्याचा नकार आहे आजवर.
मला दु:ख नाही त्याच्यानकारार्थी उत्तराचे..
दु:ख वाटते ते त्याच्या प्रेमाच्या व्याख्येतल्या
वासना आणि निव्वळ टाईमपास या शब्दांचे....
त्याला नाही कळला,
माझ्या एकतर्फी प्रेमाचा अर्थ...
त्याच्यासाठी वेचलेले प्रेमाचे अनमोल क्षण,
ते सारे गेले व्यर्थ.
मी त्याच्यावर आजही
मनापासून प्रेम करते,
मनातले प्रेमभाव,कवितेच्या रुपात वाहते.
कळेल त्याला माझ्या एकतर्फी प्रेमाची व्यथा जेव्हा!
फार वेळ झाली असेल...कारण, मी असेन देवाघरी तेव्हा!

Wednesday, May 02, 2007

~:~ तिघे नाहि चौघे ~:~

~:~ काही माणसं ~:~~:~ मागुन मिळत नाहि ~:~~:~ असं का होतं ~:~
Tuesday, May 01, 2007

मला लागली कुणाची उचकि

Monday, April 30, 2007

मृगजळाच्या प्रदेशातून परत येतांना
अंगभर हसू मिरवत आणतो मी तुझं…
आणि आश्चर्य वाटत राहतं
माझ्या कल्पनांना चैतन्य देणाऱ्या
या मृगजळाचं...

माझ्या हाकेला तुझी उत्तरं
मीच दिली आहेत तिथे...
आणि तुला आश्चर्य वाटेल
इतकी ती तुझीच आहेत...

लखकन चमकलेली वीज
कुठे संपते आणि कुठे पाण्यात शिरते
नाहीच कळत..
तशीच तू आणि तुझे भास,
आणि मग मीही एक मृगजळ…प्रत्येकाच्या मनात एक कवी लपलेला असतो,
व्यक्त करण्याचा रस्ता मात्र मनातच वळलेला असतो !!!

सांगता येत नाही असे नाही,
पण उगाचच अबोल राहतात.....
प्रत्येकजण ईथे फक्त,
मनातच गात राहतात...
भावना व्यक्त करायला........ईथे जो तो बुजतो !! पण प्रत्येकाच्या मनात.......

बहुतेकांना जमत नाही,
शब्दांच गाठोडं बांधायला.........
खुप खुप वेळ लागतो,
दोन ओळी सुध्धा मांडायला........
निराश होवुन कंटाळुन तो पुढे न लीहिता खचतो !! पण प्रत्येकाच्या मनात........

जरी ज़मली कवीता पुर्ण,
तरी दाद थोडी मिळायला हवी............
थोडा पाउसही चालेल त्याला,
पण मनात "बि" रुजायला हवी...........
एकदा का तो मनातुन बहरला की अमॄत होवुन बरसतो !!
कारण.......प्रत्येकाच्या मनात एक कवी लपलेला असतो..............