केवढी मोठी आहे बाई आभाळाची पाटी!
चंद्र आणि चांदण्याची तरी होते दाटी
आभाळाच्या पाटीवर सूर्य आहे छान
चांदोमामा आमचा आहे गोरागोरापान
आभाळाच्या पाटीचा रंग निळा निळा..
कधी होतो पांढरा तर कधी काळा काळा!
अशी रंगीत आहे माझी आभाळाची पाटी,
सूर्य-चंद्र चांदण्यांची चित्रं काढण्यासाठी!
कधीतरी काळे ढग येतात बाई कुठून?
आभाळाची पाटी सगळी टाकतात बाई पुसून!