आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, December 27, 2007

तहानेलेला वाटसरु मी
अंगणी तुझ्या विसावलेलो
क्षणभराच्या तुझ्या सोबतीने
भरऊन्हात मी सुखावलेलो

तुझ्या नजरेच्या स्पर्शाने
मन माझे शहारलेले
साथ मी मागताच तुला
ओठ तुझे थरारलेले

अधांतरीचे उत्तर तुझे
दुरवर नक्षात्रांत गेले
नकाराच्या एका शब्दाने
अंगण सारे शांत केले

मागे फ़िरण्यास माझी
जड झाली पावले
लाजणारे ते आधीचे
डोळॆ तुझे पाणावले

मागे वळत्या पावलांचा
आवाज तुझ्या हुंदक्यात विरला
पाठ फ़िरताच माझ्याही डोळ्यांनी
बरसुन मुका आकांत केला

"न लागो तुझ्या आयुष्यास
आंच माझ्या आसवांची
जन्मभरी तु सुखात रहावे"
शब्दभेट ही या पांथस्थाची.......

-- सचिन काकडे
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे
क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे

गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा
टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे

वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे

होतो जयजयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे

-- संत तुकाराम

Wednesday, December 26, 2007

तुझ्या सोबतीचं "गुपित" आज मला कळतयं....

हे संध्याकाळचं ऊन
ही सावल्यांची खुण
अन, कातरात घुमती
तुझ्या आठवांची धुन

सखे, आज मला हे सारं काही छळतयं....
तुझ्या सोबतीचं "गुपित" आज मला कळतयं....

माझ्या काळजातला श्वास
या चांद्ण्यांचा भास
अन, अधांरात जागती
तुझ्या स्वप्नाची आस

सखे, आज हे सारं काही सरतयं....
तुझ्या सोबतीचं "गुपित" आज मला कळतयं....

निळ्या सरोवराचा काठ
हिरवं रान घनदाट
अन, तुझ्या हदयी पोहोचती
वेड्या शब्दांची पायवाट

सखे, आज हे सारं काही हरवतयं....
तुझ्या सोबतीचं "गुपित" आज मला कळतयं....

किरणांचा उधाणता हर्ष
सांजेचा सावळा उत्कर्ष
अन, को-या मनात उतरता
तुझ्या आठवणीचा स्पर्श

सखे, आज हे सारं काही ढळतयं....
तुझ्या सोबतीचं "गुपित" आज मला कळतयं....

भिजल्या डोळ्यातला भाव
ओल्या आसवांचा गाव
अन, कवितेपुरतंच राहीलेलं
कागदावरचं तुझं नाव

रोज माझ्या सोबतीला एवढंच फ़क्त उरतयं..
तुझ्या सोबतीचं "गुपित" आज मला कळतयं....

-- सचिन काकडे
सुर न्हाईले आज मौनात माझ्या..
गीत गाईले आज मी मुक्याने....
हरवता कसा मी कुठे मी कळेना..
वाट दाविली मग मजला धुक्याने....

मनगटात माझ्या पुरा जोर होता..
अखंड पीळदार बळकट दोर होता....
अडकलो जीवनाच्या खोल गर्तेत जेव्हा..
मार्ग दाविला मग मला संकटाने....

रानीवनी कुठेही फिरलो मी कसाही..
माझी कुठेही पण थांबली वाट नाही....
खुल्या आसंमतात कधी गुदमरुन जाता..
खुणावले मग मला पिंजर्याने....

आडोशात होतो सदा सावलीच्या..
प्रासाद कधी तर कधी झोपडीच्या....
झळा लागता मला थंड गारव्याच्या..
दिली सावली मग मजला उन्हाने....

घेऊनि जगलो स्वप्ने "कलंदर" मी उरी..
झटलो करण्यास ती सारी मी पुरी....
घोट अश्रुंचे कधी मी प्यावयास मुकता..
दिले चार अश्रु मजला सुखाने....

तसा सदाच मी पावसात फिरलो..
कधी नाचलो तर कधी थेंब प्यालो....
ठेवुनि कोरडे मज जाता वृष्टी अति..
मला चिंब केले कोरड्या पावसाने....

घेतले श्वास मी जणु सारे शेवटचे..
क्षण मौल्यवानी ते नव्हते फुकटचे....
दर्शन होताच करता अभिवादन मी यमाला..
मला बक्षिले मग स्वत: नि - यमाने....

असा मी तसा मी कसाही राहतो..
तिमिरातही मी तेजालाच पाहतो....
कधी थांबता चालणाराच रस्ता..
पुन्हा दाविली मज वाट पावलाने....

वाहतो "कलंदर" मी नेहेमी प्रवाही
थांबतो रस्ता पण प्रवास चालुच राही
घेतो जरी उत्तुंग भरार्या आकाशात..
मजला फार प्यारा पिंजर्यातीलही एकांत..

---योगेश जोशी.

पाथरवट

भरलेल्या धुळीत खेळतात,
पाथरवटाच्या पोरी...
सारखेच झगे दोघींचे,
बनवलेले...फाडून नऊवारी !

बापाच्या दंडाचा ताईत,
फुगलेली नस जपतो...
घावावर बसती घाव,
घाम् पाप्ण्यांनी टिपतो !

सुकलेली कारभारीण,
ओटित वंशाचा दिवा...
लव्कर पेटली वात...
लई उपकार टुझे देवा !

वाहणारे, डोळे - प्यासे ओठ,
पदराशी झगडतो तान्हा...
फुटंलया नशिब तर,
कसा फुटावा पान्हा !

रस्त्याच्या पल्ल्याड एक ,
चिंचा, बोरं, कैरीचा ठेला...
तापलेल्या उन्हात....भैय्या,
विकतो ...'बरफ का गोला ' !

पोरी लागल्या रडू,
काही खायला मागती...
बापाचं त्वांड बी कडू,
महिना अखेरीला -- का.........पैकं झाडाला लागती !

दोन - पाच रुपये मोजत,
बाप गेला पलिकडे...
येताना जोरात,
एक येस्टी त्याला भिडे !

आक्रोश आकांत फक्त,
विखुरल्या बोरं अन् चिंचा...
सर्वत्र पसरले रक्त,
यात पोरींचा बा कंचा ?

मालकाच्या बंगल्या बाहेर,
उकिडव्या तिघी बसल्या त्या...
हिशोब साडे सत्तावीस दिवसांचा,
"मुकादम्............. बाईचा अंगठा घ्या !!!"

-- मंदार

Monday, December 24, 2007

सये उधाण वार्‍यात तू,
तेव्हा तुझ्या गंधात मी,
रेशमाच्या मखमालीत तू
तेव्हा तुझ्या अतूट बंधनात मी...

नभाच्या निळाईत सजतेस तू
तेव्हा गोंजारलेल्या कापसी पिंजात मी,
ओल्या ओल्या सरींच्या श्रावणात तू
तेव्हा घन काळ्या सावळ्या नभात मी...

हिमालयाच्या उंच शिखरात तू
तेव्हा तुझ्या पायथ्याला पुजलेल्या हिमनगात मी,
गंगेच्या उथळ पाण्यात पवित्र तू
तेव्हा तुझ्यात तरंगणार्‍या निर्माल्यात मी..

संतवाणीच्या अभंगात सदा उच्चारलेली तू,
तेव्हा टाळ्मृदुंगाच्या नादात मी,
ईश्वराच्या देऊळी विराजमान तू
तेव्हा तुझ्या आशिर्वादाच्या फुलात मी...

गुलाबाच्या पाकळी ओठात तू
तेव्हा गुलाबी मधाच्या किनारीवर मी,
योवनाच्या लाजरसात भिजलेली तू
तेव्हा मदनाच्या गहर्‍या देहस्पर्शात मी...

श्वासांच्या तडजोडीत व्यस्त तू
तेव्हा अखंड स्पंदनात मी,
जिवनात माझ्या बहरलेली तू
तेव्हा सोबत तुझ्या सये..
हरी बावरा मी , हरी बावरा मी...

--- आ.. आदित्य...
नयन नक्षत्रांचे चाळे बघता बघता
तुला निट निरखता आलेच नाहि.

ऒठांत उष्ण अधर फोडी घेता घेता
हनुवटी वरचा तिळ दिसलाच नाहि.

न्याहळता नजरेने काचोळी तले यौवन
तोल संभाळता आलाच नाहि

मेंदिची केशरी नक्षी बघता बघता
बिल्वरी चुडा बघितलाच नाहि

मोकळे दाट केस छेडता छेडता
गंध ग्लानी आलि समजले नाहि

गात्रांतुन ओसंडणारे लावण्य बघता
तुझे सोळा श्रुंगार बघितलेच नाहि

झेलता कटाक्ष,लावण्य सुंदरी तुझा
भंगलो, मी, एकसंध रहाता आले नाहि.

मंत्रमुग्ध झालो ,लाघवि बोलणे ऎकता ऎकता
सांगावयाचे तुला, ते सांगता आलेच नाहि..

-- अविनाश कुलकर्णी

Friday, December 21, 2007

तुझ्याशी फोन वर बोलताना
माझी मी न राहते.
कधी नजर झुकवुन,
तर कधी स्वप्नील नजरेने,
तुझेच ऐकत राहते.

तुझ्याशी फोन वर बोलताना,
पडतो माझाच मला विसर.
हा तुझ्या बोलण्याचा,
कि तुझ्या प्रेमाचा असर?

तुझ्याशी फोने वर बोलताना,
जग का धुंद होते?
तुझ्या प्रेमाच्या वर्षावाने,
मी ओली चिंब होते.

तुझ्याशी फोन वर बोलताना,
वेळेचे उरत नाही भान.
वाटते बोलणे संपुच नये,
हि कुठली ओढ? हि कुठली तहाण?

तुझ्याशी फोन वर बोलताना...

~प्रशांत रेडकर

Thursday, December 20, 2007

झळा न सोसनार्यांन्ना

सावलीची किंमत कळत नाही

इतरांच्या दुखात बुडल्याशिवाय

आपली हिंमत कळत नाही

-- अद्न्यात चरोळिकार
एकरूप

प्रिय तुज्या प्रेमात,
मुक्य जाल्या भावना.
शब्दही साथ देत नव्हता
जग्य जाल्या वेदना

दुखला कुरावालाताना
सुखही दिसत नव्हते
तुजी आठावन येताच
अश्रु मात्र ढलत होते

जीत तुज आस्तित्वा
तिथच मला बर वातात
अग्नित उभ राहून सूधा
मन मज शांत राहत

सुख काय दुख काय
शेवटी एकरुपच असत ....

कवी: अद्न्यात
का पुन्हा पुन्हा मी शोधते
त्या भुत काळातल्या वाटा.
का दु:ख्ख करुन घेते.
जेंव्हा पायी रुततो काटा

बसता अशा कातर वेळी
कानी कोण गुणगुणे गाणी?
झोंबताना ह्या कोवळ्या तनुस
कोण करते भलतिच मागणी?

ज्याने ह्रुदयास पीडा दिली
तोच कसा ह्रुदयी बसला?
कोवळ्या मम तनुस छेडुन
यौवन कसे जागवुन गेला.

कसा मी विसरु त्याला
तो मम रोम रोमात भिनला
सारखा तो आठवतो का?
जो जखमा देवुन गेला

तुझि लागलेली हि आस
हा भास कि आभास आहे
तु आता माझा नाहि
हे मज का उमगत नाहि?

केंव्हा सरेल ति माझी
काळरात्र घनघोर अंधारी?
कधि उजाडणार मम जिवनी
ति पहाट सोनेरी?

काय सांगु काय बोलु
मन माझे था~यावर नाहि
दाटुन येते निर नयनि
लिहिताना अधुरी प्रेम कहाणी

-- अविनाश...
मी तुला स्वीकारलं ते तुझ्या वलायासहित स्वीकारलं. माणसाच्या स्वभावतली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही. एखाद्या क्षणी एखादी भावना अनावर होते. का? ह्याचं कारण ज्याचं त्याच्याजवळ नसतं.भावनांचे तिढे आपण बुद्धीने सोडवायला बघतो आणि बुद्धिवादानं कठोर प्रश्न सोडवायचे असतात. तिथं आपण भावनेचा घोळ घालतो ही सगळी झापडच.

***व.पु.काळे
माज्यावरही कोणीतरी
पावसाच्या सरीप्रमाने
बेभान होवून कोसाळाव,
मला सोडून जाताना
निदान एकदातरी वळून पाहाव.

वळून पाहताना त्याचे
नयन ओलेचिब व्ह्वावे,
अन त्याच आसवांच्या पावसात
मी मनासोक्ता न्हावे.

मी त्याच्यासमोर असताना
तो माज्यावर भालावा,
पण मी जेव्हा अस्तित्वात नसेन,
त्यावेळि त्याने माज्यासाठी
निदान एकतरी आश्रु गाळावा ।

कवि: अद्न्यात

Tuesday, December 18, 2007

अफाट आकाश
हिरवी धरती
पुनवेची रात
सागर-भरती
पाचूंची लकेर
कुरणाच्या ओठी
प्रकाशाचा गर्भ
जलवंती-पोटी
अखंड नूतन मला ही धरित्री
आनंदयात्री मी आनंदयात्री

मेघांच्या उत्सवीं
जाहलों उन्मन
दवांत तीर्थांचे
घेतलें दर्शन
दूर क्षितिजाची
निळी भुलावण
पाशांविण मला
ठेवी खिळवून
अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री

हलके कढून
कंटक पायींचे
स्वरांत विणिले
सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा
केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें
पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.

-- मंगेश पाडगांवकर

Monday, December 17, 2007

स्थळ लागत नाही काळ लागत नाही

तुझी आठवण यायला वेळ लागत नाही

कित्ती स्वतःमध्ये तू गुंतून गेलीस बघ

मी जळतोय पण तुला झळ लागत नाही !!"

-- अद्न्यात चारोळिकार
एक होता विदुषक , नाव त्याचं लक्ष्या..

शांतेचं कार्ट चालू आहे
हा बसला ज्याच्यावर ठपका
मग,चल रे लक्ष्या मुंबईला म्हणत
धुमधडाका ज्याने केला..

हसवलं त्यानं जगाला
बोलक्या डोळ्यांनी,मिश्किल हास्याने
अफलातून बोलांनी,चुलबुल्या स्वभावाने
मोहवलं त्यानं मनाला..

शुभ बोल ना-या म्हणत
सा-यांनी त्याच्यापुढे रगडला माथा
पण त्यानं धांगडधिंगा करत
गडबड घोटाळ्याचा शेजार नाही सोडला..

दे दणादण करत
मारलं त्यानं खलनायकांना
प्रेम करुया खुल्लमखुल्ला म्हणतं
जिंकलं त्यानं प्रेमिकांना..

नायिकेच्या बापापुढे करे तो थरथराट
बनवा बनवी करणा-यांसाठी असे तो खतरनाक
बचतीचे धडे देणारा होता तो चिकट नवरा
बहिणीसाठी विघ्नहर , हाच सूनबाईचा भाऊ होता..

रंगत संगतीनं ह्याच्या जो तो रंगलेला
मस्करीने त्याच्या रसिक झपाटलेला..

पण नियतीने कथेचा सापळा असा रचला
धडाकेबाज विदूषकाचा रोल तिनं काटला..

पण, बजरंगाची कमाल बघा
नियतीलाही बेट्याने हरवला..

अरे,रडवून ' जाईल ' तो विदूषक कसला ?

पडद्यावरून मनात उतरुन..

मनमुराद हसवत सर्वांना
लक्ष्या तर अमर झालेला..

लक्ष्या अमर झालेला..

कवयत्री: स्वप्ना

नियतीचं माणसाला काही सुखांना पारखं करते,तेव्हा तिथे इलाजच नसतो.पण, त्याहीपेक्षा, माणुस जेव्हा दुसर्‍या माणसाचं आयुष्य वैराण करतो त्याचं शल्य जास्त.

सर्वात जिवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी, हा!

परमेश्वराने माणसाला दोन गोष्टी बहाल केल्या . दोन हात आणि एक मन. माणसाने बेदम कष्ट करावेत आणि उदंड प्रेम करावं. उदंड प्रेम करणारी माणसं कशाचीच गँरंटी
मागत नाहीत. माणसाने हे प्रेम करायची शक्ती घालविली म्हणुन आता नियातिसुध्दा कसलीच गँरंटी
देत नाही. संतांच उदंड प्रेम परमेश्वरावर असतं. म्हणुन संत कसलीच हमी मागत नाहीत.
ते निर्भय असतात.

-- व.पु.काळे
एकटीच मी रडते आहे, अश्रुंसाठी नयन कशाला?
जगायचेच जर एकट्याने,अश्रुंची तरी साथ कशाला?

तुझा चेहरा,तुझे अस्तीत्व अन् तुझा भास
भेटशील तु वा दुसरे कुणी,याचा आज विचार कशाला?

दुःख माझ्या आयुष्याची कधी रुसली ना रडली
साथ मज मिळेल वा न मिळेल,याची आज चिंता कशाला?

प्रेमाचा जर अंशूच नव्हता तुझ्या मनात
तर, तुझ्या ओठांवर माझ्या नावाचे शब्द कशाला?

कवी: अद्न्यात


एकदा लग्न झालं की , आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असा
वाटण्याची जागा मग,
मूल
झालं की...
मोठं
घर झालं की...
अशा
अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .
दरम्यानच्या
काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो.
मुलांच्या
वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.
आपला
नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की ...
आपल्या
दाराशी एक गाडी आली की ...
आपल्याला
मनाजोगी सुटी मिळाली की...
निवृत्त
झालो की ...
आपलं
आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो .
खरं
असंय, की आनंदात असण्यासाठी , सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्žचय करायचा हेच बरं नाही का ?
जगायला
- खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये , असंच बराच काळ वाटत राहतं.
पण
, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्žवासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं.... आणि अगदी शेवटी कळतं , की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.

या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,
आनंदाकडे
जाणारा कोणताही मार्ग नाही .
आनंद
हाच एक महामार्ग आहे.
म्हणून
प्रत्येक क्षण साजरा करा.

शाळा
सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून... शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी ... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी ... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी ... आपण थांबून राहिलेले असतो. एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते . पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा.

आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्žनांची उत्तरं द्या पाहू -
- जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू.
- गेल्या पाच वर्षांत विश्žवसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत?
- या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील?
- गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का ?

हं
! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण, असं वाटलं नसलं तरी, या प्रश्ž नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का?
टाळ्यांचा
कडकडाट हवेत विरून जातो.
पदकं
आणि चषक धूळ खात पडतात.
जेत्यांचाही
लवकरच विसर पडतो.

आता
या चार प्रश्ž नांची उत्तरं द्या पाहू -
- तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.
- तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील ?
- आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?
- तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं .

क्षणभर
विचार करा.
आयुष्य
अगदी छोटं आहे. ुम्ही कोणत्या यादीत असाल? काही अंदाज लागतोय ?
मी
सांगतो.
जगप्रसिद्ध
व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये . पण, हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं, त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे ....
आता
एक गोष्ट.
काही
वर्षांपूर्वीची . सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.
पिस्तुलाचा
आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं.
धावता
धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला.
त्याच्या
रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले .
सारे
मागे फिरले... सारे जण...
"डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, "" आता बरं वाटतंय ?'' .
मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले .
ते
दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले . उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता ...
त्यावेळी
तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात . का?
कुठेतरी
आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते .
आयुष्यातली
सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं . त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.

शक्य तितक्या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल . कदाचित इतरांचंही...

दुसरी
मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. नाही का?

-- एक वृत्तापत्रतिल एक लेख

Friday, December 14, 2007

वाटा ...(गझल)

आता कोणास कधी कळतात वाटा
वेड्या कोठून कश्या वळतात वाटा.

एकाकी आयुष्य ठेवुन आठवांना
सोडूनी हात कधी पळतात वाटा.

पाहीले मी , सरणावर स्वंप्न होते
जाळूनी स्वंप्न अश्या जळतात वाटा.

पाहूनी त्या वळणावर आसवांना,
काळोखाआड कधी गळतात वाटा.

कोणी बोले दुनिया तर गोल आहे
फ़ीरूनी गोल कुठे मिळतात वाटा?

तीही सोडून मला वळनात गेली
तीच्या वाचून मला छळतात वाटा.

हो येथेच सुरवात , इथेच अंत
(कीती प्रवास असे गिळतात वाटा.)

सुधीर मुलिक ......
http://kavyalay.blogspot.com
http://marathikavita1.blogspot.com


एवढच........

लग्नाच्या त्या मंदावत तुला एकदा तरी पहायच होत
वधूचं ते सुन्दर रुप मनामध्धे जपायचं होत
जशील तिथे सुखि रहा एवढच फक्त सानगायचं होत!!

आयुष्यातले चार क्षण सोबत आपन जगलो होतो
कधी हसत कधी रडत सोबत आपण चाललो होतो
ते क्षण आता विसरूण जा एवढच फक्त सानगायचं होत
लग्नाच्या त्या मांडवत तुला एकदा तरी पहायच होत!!

आठवतं का? झाडाखाली रोज आपन भेटायचो
आयूष्याचे सुन्दर स्वप्न सोबत आपन रंगवायचो
ते स्वप्न सगळे पुसून टाक एवढच फक्त सांगायच होतं
लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदातरी पहायंच होतं!!

आठवतका तुला तू नेहमीच रुसायचीस
मी विनोद करताच खळखळून हसयचीस्
अस रुसनं आता सोडुन दे एवढच फक्त सांगायच होतं
लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदातरी पहायंच होतं!!

नेहमीच प्रेमाने तू रजा माला म्हनायचीस
आपण दोघे रजा रानी हेच गीत गायचीस्
हा रजा आता वीसरुन जा एवढच फक्त सांगायच होतं
लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदातरी पहायंच होतं!!

भेट्लो नहीं तुला तर दिवसभर रडायचीस्
रडतना सुद्धा तू कीती सुन्दर दीसायचीस
असं रुसन आता सोडून दे एवढच फक्त सांगायच होतं
लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदातरी पहायंच होतं!!

समूद्राकाठी फिरन्याचा नेहेमीच हट्ट करायचीस
किनार्यावर रेतीमध्धे लहान होवून खेळायचीस्
असे हट्ट आता सोडून डे एवढच फक्त सांगायच होतं
लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदातरी पहायंच होतं!!

खांद्यावरती डोक थेवून तासन तास बसायचीस्
माझ्याकडे बघून मग लटकच हसायचीस
ते क्षण आता विसरूण जा एवढच फक्त सानगायचं होत
लग्नाच्या त्या मांडवत तुला एकदा तरी पहायच होत!!

आज तू पत्नी झालीस उद्या तू आई होशील
हळूहळू नवी नाती आता तू गुंफ़त जाशील
संसारात स्वतहाला रमवून घे एवढच फक्त सानगायचं होत
लग्नाच्या त्या मांडवत तुला एकदा तरी पहायच होत!!

उमेश ....

Thursday, December 13, 2007

तो सुंदर लाजरा मुखडा,
ते नयन चेटकी, जादुंचे ग
रसाळ ओठांची महिरप,
आत, दतपंक्ती कि मोती ग?

केश संभार घनदाट
त्यात तारुण्य बेफाट,
उतरली भु तळी रंभा की अप्सरा
वळती तुझकडे वारंवार की नजरा.


गोरेपान सुकुमार कोवळे हात
भरलास रंगीबेरंगी बांगड्याचा चुडा
वर ते मोहक खट्याळ हसणे,
पडे जणु शुभ्र चांदण्याचा सडा

लांब रेशमी कुंतळ काळे
ओल्या अधराचे चंचल चाळें
मोहक नयनांच्या त्या कोंदणी
उमलली जणु शुक्राची चांदणी

-- अविनाश
एक चारोळी बनवली आणि मैत्रिणीला पाठवली....
तिच्या आणि माझ्यामधला " एक संवाद" बघा कसा वाटतो ते.. ;-)

मी : बंद पापण्यांमागे
तुझाच चेहरा असावा
नको कोणतेच बंधन
नको कोणताच दुरावा

ती : वाह वाह
ती : सांभाळुन रहा मित्रा,
ईथे दुखाशी मैत्रि आहे,
मी प्रत्यक्षात अनुभवल तो रस्ता,
आता तुही त्याचा यात्री आहे

मी: परिणामाची येथे तमा कुणाला आहे
या वाटसरूला वाट न संपावी अशी आस आहे
मी : तुही वेडी आहेस सखे
आनंदाला दुखाची भिती दाखवत आहेस...
ज्याने दुसऱ्यान्ना हसवले
त्याला तु अश्रूंची भिती दाखवत आहेस...

ती: ईथे कुणाला दुखाची आवड आहे
पण प्रेमानेच केली दुखाची निवड आहे

मी : प्रेम कधिच फ़सत नाही
आपणच प्रेमात फ़सतो
क्षनभराच्य आकर्षनाला
प्रेमाचे नाव देउन बसतो
मी : तुज्या अनुभवाला
तु नियम मानत आहेस
जरा नियमाच्या चौकडीतून बाहेर पड
अजुन तुला खुप काही अनुभवायचे आहे

ती : प्रेम य शब्दाचा अर्थ मी काय घ्यावा ,
मी केले तो घ्यावा, कि तुला दिसतोय तो घ्यावा

मी : प्रेम म्हनजे काय
हे मलाही माहित नाही
पण त्याचा पाया विश्वास आहे
हेच कुणाला पटत नाही
मी : एका नजरे मधेच जेव्हा
तुला ज्याच्यावर विश्वास बसतो
तोच तुझा खरा जोडीदार
आणि तोच तुझा खरा सखा असतो

ती : नाईस

मी : माहित आहे कधी कधी
आपलाच पाय घसरतो
पण लक्षात ठेव
तोल न सांभळनारे आपणच असतो

ती : बस झाले
ती : नाहितर तुला आवार्ड द्यावा लागेल

Wednesday, December 12, 2007

बंद पापण्यांमागे
तुझाच चेहरा असावा
नको कश्याचेच बंधन
नको कोणताच दुरावा
- आनंद काळे

Tuesday, December 11, 2007

का कुणास ठाऊक
मन फ़ार उदास झालंय
तुझी आठवण का येत नाहि
याचा विचार करण्यात गुंतून पडलंय

का कुणास ठाऊक
नेहमी आपल्याला वाटेल तसं का होत नाही
कदाचित मीच कुठेतरी
कमी पडतोय असे तर नाही

का कुणास ठाऊक
सुख मिळाल्यानंतर लगेच दुख: का येते
उमलले फूल लगेच
कोमेजून का जाते

का कुणास ठाऊक
कुठे तरी दूर जावेसे वाटतयं
ह्या क्षणभंगूर जीवनातुन
स्वप्नात रमावेसे वटतयं

का कुणास ठाऊक
लिहायला काहीच सुचत का नाही
माझ्या विचारांन्ना शब्दांचा
आधार का मिळत नाहि

का कुणास ठाऊक......
का कुणास ठाऊक......

कवी: अद्न्यात
योगदान : स्वाती पवार
चमत्कारावर माझा विश्वास नाही
मी त्याच्या भरवशावर जगतेय
माझ्या स्वप्नातला सखा अचानक
मला साक्षात भेटलेला बघतेय

मनापासून तुझी कशी झाले यावर
सहज कुणाचा विश्वास बसेल का?
माझ्यासारखे सोनेरी भाग्य घेऊन
या जगात कुणी तरी असेल का?

तुझ्या विचारात दिवस आणि रात्र
आताशा चिंब चिंब भीजलेली असते
दिवस असे मस्त छान जात आहेत
की मला वेळेचे मुळी भानच नसते

चमत्कारावर माझा विश्वास नाही
मी त्याच्या भरवशावर जगतेय
तुझ्या विचारात तुझ्या स्वनात
न्हाऊन अगदी नखशिखांत सजतेय

-- तुषार जोशी, नागपूर
काल तू भेटलीस
वळवाच्या सरीपरी,
पण इवलूष्या वेळेत
तु केलीस जादू खरी

तुझ्या नजरेच्या खेळात
मी नशीला होत होतो,
तुझ्याकडे पाहता पाहता
मी तुझाच होत होतो,

थोडा वेळ वाटलं
विसरावं सार काही
अन तुच असावीस
माझ्या दाही दिशेलाही

कधी न भेटलेलो आपण
काल पहील्यांदाच भेटलो,
भेट झाल्यावर मनात आले
की आपण यापुर्वीही कित्येकदा भेटलो..

तु तशी सावळीच
पण तरी रुप तुझं
अबोलीच्या गर्द रंगाच्या
मोहक कळीचच..

थोडया वेळातच नजरा,
ऐकमेकांना मुजरा घालून गेल्या,
अन पुन्हा परत भेटण्याचा
एक मर्जिचा अल्विदा करून गेल्या..

-- आ. आदित्य...

तु....

तु निघुन गेलीस
कळलेच नाही जाताना
जगच बदलेल माझे
कळले नाही तुझ्याकडे बघून हसताना....

रडू नकोस उगीच
चांगले नाही ते जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना....

आभाळं भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना...

अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना...

झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना..

माहीत नाही पुन्हा कधी भेटु
वेगळ्या रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना....

विषय शोधावे लागतील आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील का गं
पुन्हा एकत्र असताना...

शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना..

सोन्यासारखा संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना....

कवी: अद्न्यात

गुंजलेच होते नाद आठवांचे
की समोर ही सांज आली
छेडतच होतो सुर सावल्यांचे
की समोर ही सांज आली

मनाच्या अथांग सरोवरातल्या
तरंगांचा आकार मोडीत
विसरत तुला निघालोच होतो
की समोर ही सांज आली

किरणांच्या मागोमाग जाताना
घरटी विसरली काही पाखरं
मार्ग त्यांस दावितच होतो
की समोर ही सांज आली

क्षितीजाच्या भयाने जडलेली
अबोल नजर ही पावलावरी
बोलण्यास ती सरसावतच होती
की समोर ही सांज आली

एकटाच पडलेला सखे
कालचा प्याला हा शब्दांचा
विसळुनी त्यास घेतच होतो
की समोर ही सांज आली

-- सचिन काकडे

चिखलफेक

हसून हसून तिची पुरेवाट झाली होती. चिखलात पडलेल्या अरविंदाची अवस्था पाहून ते स्वाभाविकही होते.
खरी गम्मत त्या दोघांना पाहणाऱ्यांची झाली होती. लोकांना दिसत होते दोन काळया कुट्ट चिखलाने
माखलेल्या आकृत्या. निशाचे हसणे अजुनही थांबलेले नव्हते. खरे तर ती काय कमी माखलेली नव्हती.

कॉलेजच्या पहिल्या तासापासून अरविंद निशाला पाहून पहिल्या बघण्यातच खल्लास झाला होता. मग कोणतीही
निशाशी बोलण्याची संधी त्याने सोडली नाही. निशा आता त्यांच्या गटातली झाली होती. केमेस्ट्री प्रॅक्टीकल्स,
छोटे मोटे ट्रेक्स, कधी कधी एखादे सुट्सुटीत हॉटेल अशे त्यांच्या गटाचे सांस्कृतिक कार्यक्रम मजेत पार पडत
होते. निशा सगळ्यांशीच छान वागत असे. पण अरविंदच्या मनातले विषेश तिला काय ठाऊक नव्हते.

अनिकेतला जेव्हा सांगितले तेव्हा तो उडालाच. म्हणाला अरविंद "काय सांगतोस काय? खरंच की काय?"
"नाही मी चित्रपट काढायला घेतलाय आणि तुला नवा प्लाट ऐकवत होतो", अरविंद चिडून म्हणाला.
"अरे रागावतोस काय! चेष्टा केली रे मी", अनिकेत बोलू लागला, "तुला काय वाटले, मांजर डोळे बंद
करून दूध प्यायली म्हणजे कुणाला कळत नाही, अरे तुझे तोंड ती दिसली की जे उघडते आ वासून ते ती
दृष्टीआड होईतो बंदच होत नाही माहित आहे".


"ए ते तोंड वगैरे अतिरंजित वर्णन आहे बर", आता अरविंद मारायच्या पावित्र्यात अनिकेत कडे सरसावत
होता, आणि तो अनिकेतला एक गुद्दा घालणार तेव्हड्यात अनिकेत निसटला आणि पळता पळता म्हणतो काय
"एक जरी गुद्दा बसला ना विंद्या तर कालेजच्या कॅन्टीन मध्ये जाऊन डरकाळी फोडेन की ऐका हो ऐका,
अरविंद शेट यांना प्रेमरोग जडला असून...", अनिकेत पुढे काही म्हणणार इतक्यात त्याला अरविंदाचे
आर्जवी डोळ्यांनी, अगतिक चेहऱ्याने आणि दोन्ही हातांनी नमस्कार मुद्रा करून त्याच्या कडे बघणे दिसले आणि
त्याचे शब्द मधेच अडकले.
"अरे अरे, काय यार आता काय रडणार आहेस की काय?", प्रेमात पडल्यावर माणूस हळवा होत हे ऐकले
होते पण पाहवत नाही रे गड्या.
"मग काय, इथे माझे प्राण जायची वेळ आलीय, तिला कसे सांगावे काय कळत नाहीये आणि तुला चेष्टा
सुचतेय", अरविंद एव्हडूसं तोंड करून म्हणाला.
"ए, तुला राजेश ठाऊक आहे", अनिकेत ला काहितरी नविन आठवल्यासारखे अरविंदाकडे बघून त्याने
विचारले.
"तो, प्रणिताला गटवणारा, तो उंचसा राजेश", अरविंदाला आठवणे फार कठिण नव्हते, कारण प्रणिता
कॉलेजची तारका होती.
"हो रे तोच, माझ्याशी बोललाय एक दोनदा. प्रेमाच्या बाबतीत बाप माणूस आहे बेटा. अरे
व.पु.काळेंच्या पुस्तकातले उतारे घडाघडा म्हणतो रे बोलता बोलता. एकदा त्याला विचारू की सल्ला काय
करता येईल ते. बघ आज संध्याकाळीच भेटू तू म्हणशील तर", या एका वाक्यात अनिकेतने मिटींग
मनातच निश्चित देखील करून टाकली होती आणि अरविंद मानेने हो देऊन मोकळा पण झाला कारण त्याच्या
हृदयाची जखम खोल होत चालली होती.

कॉलेजमध्ये प्रवेश करतांना आज अरविंदाची स्वारी जाम खुश्शीत होती. आज राजेश ला भेटायचे होते ना
संध्याकाळी. नेहमीप्रमाणे अरविंद, निशा, अनिकेत, पायल, सुधा सगळे स्कुटर स्टॅन्ड वर भेटून एकत्र
कॉलेजात प्रवेश करत होते. थट्टा मस्करी नेहेमी प्रमाणे चाललेली होतीच. पण अनिकेतच्या डोळ्यात
मिश्किल भाव होते. तो सारखा सारखा अरविंदा कडे पाहून हसत होता. अरविंदला सगळे कळत होते, तो
डोळ्यानेच जमेल तेव्हढे त्यांना मोठ्ठे करून त्याला दटावत होता, आणि तेव्हढ्तात कोणत्यातरी दगडाने तोल
जाऊन एकदम निशा समोरच्या चिखलात ढाडकन पडली.

दोन मिनिटे काय झालेय हे कळायलाच लागले सगळ्यांना. आजुबाजुला हशा पिकलेला पाहून काय झालेय याची
आता थोडी थोडी कल्पना गटाला यायला लागली. निशाला हात देऊन उठवण्याच्या नादात खरी गम्मत झाली
ते अरविंद ची. निशा हात धर म्हणता म्हणता साहेब तिच्याहून अधिक सपाट्याने चिखलात लोळण घेते झाले
आणि प्रक्षकांना आता फुकटात डबल मजा देते झाले.

चिखलात माखून रडवेली झालेली निशा सुद्धा अरविंदचा तो मदत प्रकल्प पाहून खो खो हसू लागली. गट
आणि तमाम प्रेक्षकवर्ग आता दोन चिखलात माखलेले गोळे एकमेकांकडे पाहून कसे घमासान हसतात, हे
पाहत होते.

"काय वेंधळा आहेस रे विंद्या", निशा हसता हसताच म्हणत होती, "कसली मदत रे तुझी?", आता ती
चिखलात रूळली होती.
"मदत नाही निशा", अरविंद अचानक शांत झाला, "तू अचानक पडलीस आणि सगळे तुझ्याकडे पाहून हसू
लागले, मला नाही आवडलं, नाही आवडलं मला. मग मी काय करणार तुला हात देऊन उभे केले तरीही
चिखलात माखलेलं सत्य काय मला बदलता येणार नव्हतं. मग माझ्याजवळ एकच उपाय होता."
आता निशाच्या अवाक होण्याची पाळी होती, "म्हणजे तू, तू, चिखलात..", आता निशाचा चेहरा आ वासून
अरविंदाकडे बघत होता.
"निशा, मला तू खूप आवडतेस, आयुष्याचा प्रवास एकत्र माझ्याबरोबर आखायला तुला आवडेल?", अरविंद
बोलून गेला आणि नंतर त्याला कळले की आपण बोलून गेलो आहे, आणि आता त्याची परिक्षेचा निकाल
लागण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यासारखी स्तिती झाली.

निशाने एकदा चिखलाकडे पाहिले, पुन्हा अरविन्दाकडे पाहून ती "तू, मुद्दाम..." असे काहीतरी पुटपुटली,
आणि एकदम चिखलाचा एक गोळा उचलून तिने तो अरविंदाकडे फेकला. आणि हसत हसत ती कॉलेज कडे
धावली. मधेच थांबून तिने मागे पाहिले आणि अरविंदाला लाहान मुलीसारखी जीभ दाखवून ती पुन्हा हसत
हसत कॉलेज च्या नळाकडे धावत गेली.

अरविंदाला तो चिखलाचा गोळा हृदयावर लागला. तो तसाच एका हाताने धरून तो अनिकेत कडे पाहत
होता. अनिकेत ने हुश्श केले आणि नळाकडे बोट दाखवून म्हणाला "चला, चिखल साजरा करूया"

-- तुषार जोशी, नागपूर

कल्पना-वास्तव

मी कल्पनेत रमणारा
तू वास्तावातच जगणारी

मी कधी कल्पनेच्या शिडीने स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचतो
पण तेवढ्यात तू पाय खेचून पुन्हा वास्तवाच्या आगीत ढकलतेस
मी स्वप्नांचे ईमले बांधलेलेच असतात की पुन्हा तू
वास्तवाच्या घणाचे घाव घालून एका क्षणात उध्वस्त करतेस

मी आत्तापर्यंत चाललेली वाट फुलांची होती असे म्हणतो
तेव्हा तू लगेचच पोळलेली पावले दाखवतेस
कधी मी पुन्हा कल्पनेच्या कुंचल्याने राजमहाल रंगवतो
तर तू ,"जरा प्रॅक्टीकल जगात रहात जा" असे म्हणतेस

कल्पना आणि वास्तव यात जितके अंतर आहे
तितकेच तुझ्या आणि माझ्या विचारांमधे आहे
पण खरं सांगू ? तरी देखील तू मला आवडतेस
कारण माझ्या कल्पनेतल्या तिच्यासारखीच तू आहे

वास्तवातील ही दुःखे, ह्या वेदना, ही संकटे
सारी आपल्या पाचवीलाच पुजली आहेत गं
ह्याजन्मीचे सगे सोयरेच जणू आपले ते
जम्नभाराची साथ देणारी हीच नाती आहेत गं

तुला खरं सांगू ?
वास्तवातल्या भळ्भळ्णार्‍या जखमेवर
कल्पनेचे पांघरून घेऊन बघ
कधी तरी असेच कल्पनेच्या गावा जाऊन बघ

कधी तरी वास्तव जगातून बाहेर पडून
असेच स्वप्नांच्या गावात शिरून बघ
पोळ्लेल्या पावलांना कल्पनेच्या पायघड्यांवर ठेवून बघ
मनीच्या असंख्य वेदनांवर स्वप्नांची फुंकर घालून बघ

वास्तवात असे जगताना
कल्पनांचा गाव हिंडून बघ
कवी नाही झालीस तरी चालेल पण
कधी तरी तू देखील स्वतःला विसरून बघ......
कधी तरी तू देखील स्वतःला विसरून बघ......

.... अमित वि डांगे

आंधळी जात.........

माझ्या डोळ्यातुन ओझरत्या
थेंबांतल्या सखे या तुझ्या जुन्या आठवणींना
आज ही सारी दुनिया "अश्रु" म्हणते
तु दिलेली अन आशेच्या उन्हात वाळवत ठेवलेली
जखम हीच दुनिया त्या एका शब्दातच ओली करते....

पण..... आता जणु सवय झाली
कालपर्यंतच्या माझ्या हळव्या मनाला
या ओल्या शब्दांची, सारख्या ओलावत्या जखमांची
रात्रीच्या एकांतात गप्पा मारत आता या मनाचा
दिवस काय आता त्याची रात्रही अगदी सहजच सरते....

सखे दुनिया म्हणजे भोवतालची हीच गर्दी सारी
नेहमीच या गर्दीच्या हाती शब्दांच्या नंग्या तलवारी
जिथं-तिथं ही आपलं सावज शोधत फ़िरते
या गर्दीची वार करण्याची [पाठीमागुन] रीत आगळीच असते
फ़क्त दोन-चार शब्दांच्या डोळ्यांनी पाहणारी ही जात आंधळी असते...
ही जात आंधळी असते.....

-- सचिन काकडे