आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, June 22, 2007

माझं अस्तित्व तुझ्याशिवाय
एक मोठं शून्य
जगातलं सारं काही व्यर्थ
तुझ्याशिवाय अन्य

जाणीव होताच ह्याची मला
कासावीस होतो जीव
तुझ्याविना माझ्या जगण्याची
मलाच येते कीव

कसली ती तगमग
कसली ती तडफ़ड
तुझ्याविना जगण्याची
कशासाठी ही धडपड

उधळून द्यावी सारी
बंधने वाटे आज
भिरकावून द्यावी ती
पांघरलेली लाज

धावत तुझ्याकडे येऊन
मनसोक्त रडून
सारं काही करावं मोकळं
कुशीत तुझ्या शिरुन।

कुणाला कुणी असं सोडुन का जातं?
रेशमी वाटणारी घट्ट नाती कुणी तोडुन का जातं?

मनाशी मनं आधी जुळवायची कशाला?
जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला?
कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनास
काट्यांतच मग खुडावं लागतं.....
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतं
बरसतानाच नकळत हरवुनही जातं
भर चांदरातीही मनास मग
एकट्यालाच झुरावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणास कुणी कधि आपलं म्हणु नये
झालात कुणाचे कधि तर दुर जाउ नये
वाळवंटी या जगात
एकट्यालाच मग जगावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

मी जगुन घेतो एकटा
माझ्याशीच मी हसुन घेतो एकटा
तरी एकट्यालाच रोज रोज मला मरावचं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

-- संदिप सुरळे
वेड्या पावलांची झुलकावणी,
कधीतरी ओळखायची असते,
हमरस्त्याला भेटणारी आडवाट,
कधीतरी चालायची असते,

सावल्यांची गळाभेट सायंकाळी,
कधीतरी अनुभवायची असते,
किलबिलणार्‍या पाखरांची मैफिल,
कधीतरी सजवायची असते,

स्वप्नांची हुरहुरणारी हुलकावणी,
कधीतरी चोखंदळायची असते,
आपली आपल्यावरची निसरपकड,
कधीतरी सोडायची असते,

एकांतातील मोरपंखी गुदगुली,
कधीतरी खुलवायची असते,
टपकन ओघळताना साठवण,
कधीतरी बाळगायची असते,

क्षितीजावरली पाखरण मलमली,
कधीतरी नेसायची असते,
नदीकाठची भिजलेली भटकंती,
कधीतरी आठवायची असते....

तो आणि ती .....

एकमेकांवर खूप प्रेम करतात, पण त्याचबरोबर स्वतःच्या काही तत्वांना कायम चिकटून असतात॥'शी बाई, एकत्र निवांत वेळच मिळत नाही' असं म्हणत असतात, पण निवांत वेळ मिळाला कि काहीतरी फालतू कारणावरुन प्रेमळ भांडणंही करतात। शेवटी म्हणतात 'काय आपण फालतू गोष्टीवरुन उगाच भांडत बसलो'. आणि एकमेकांच्या मिठीत गप्पा मारत बसतात.. तो कधी काळजीने म्हणतो, 'आपण एकमेकांवर इतके प्रेम करतो, मग का गं सारखे भांडतो?आता नाही हं भांडायचं..' ती म्हणते, 'अरे असं कसं, भांडणं तर होणारच थोडी, आपल्या दोघात तात्विक मतभेद आहेत टिळक आणि आगरकरांसारखे..पण आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतो हेही तितकंच माहिती आहे दोघांना. पण तू म्हणतोस ते खरं. खूप मोठी भांडणं नाही करायची आता.'असं म्हणून पुढच्या भांडणापर्यंत ती दोघं प्रेमानं नांदतात.. परत काहीतरी छोट्या कारणावरुन भांडतात..

कारण ......
हे नातंच असं. मुरलेल्या लोणच्यासारखं.. जुनं झाल्यावर अधिकाधीक चविष्ट होणारं ........



शब्द माझे असतात उनाड वा-यासारखे
अन कधि रिमझिमत्या श्रावणसरिसारखे
दोन क्षण घेतो विसावा कुणी कधि येथे...
मग होतात शब्द माझे खळखळणा-या झ-यासारखे...

शब्दांना जुळायला वेळ लागत नाही
शब्दांना कळायला वेळ लागतो
शब्दांशी खेळताना
मनाशी भावनांचा खराखुरा मेळ लागतो

शब्दांशी शब्द जुळतीलच असं नाही
शब्दांनी शब्द पेटतीलच असंही नाही
तरीही शब्दांना बांधावच लागतं
भावनांचा खेळ खेळताना शब्दांच्या कुशीत शिरावचं लागतं

शब्दांशी मैत्रि असावी
म्हणजे हवं तसं जगता येतं
जग रडत असलं बाहेर
तरी एकट्याला हसता येतं...

असं वाटतं आता शब्दांचीही साथ सुटेल
आणी मी पुरता एकटा होईल....
'आता कुणासाठी जगतोयसं?' असं म्हणत...
आयुष्य क्षणोक्षणी चटका देईल...

आयुष्यभर चातक बनुन
मी पावसाची वाट पाहीली
पण...या वाळवंटात मात्र
फ़क्त माझीच पापणी वाहीली...

अशा धुंद श्रावणात बेधुंद रात येते
छेडीत सप्तसुर थंडी गुलाबी गीत गाते
शरीरे दोन जरी...सूर त्यातुन एकच उमटे
मी गंध तुझा...तु रातराणी... मज सोडुन का जाते?

तु समोर असलीस की
सा-या जगात मी
अन तु गेल्यावर मात्र
शोधात माझ्याच मी

सांज ढळली...तारा तुटला...
मनात आशेचा एक अंकुर फ़ुटला...
समजावले मनास मीच
अरे वेडया...
जगणे त्यास असह्य झाले म्हणुन तोही निखळत सुटला...

एकदा तुला म्हटलं होतं
आयुष्यभर तुझी साथ देईल...
मला कुठं ठाऊक होतं तेव्हां
आयुष्यचं माझी साथ सोडुन जाईल

जखम झाली तरी
तीला मी वाहु देत नाही
माझी जखम मी
जगाला पाहु देत नाही

तुझ्या राज्यात मला थोडीशी जागा दे
राजा म्हणुन नको
पण....प्रजा म्हणुन तरी
मला तुझ्या राज्यात घे

कुणाला भेट म्हणुन काही दिलं की
त्याच्यावर मी माझं नावं टाकत नाही
कुणीतरी मला 'ऊगीचच' आठवावं
असं मी मुळीच वागत नाही

जुळले काही शब्द
पुन्हा चार ओळी झाल्या
नसलीस तु जरी
आठवणी तुझ्या तुलाच घेऊन आल्या...

तु फ़क्त सोबत रहा मित्रा
हे आयुष्य असचं जगुन घेईल...
मागितलंस कधि तर
सारं जगही जिंकुन तुला देईल...

सुर्य ढळला....आता चंद्र येईल
अन सबंध आसमंत त्याच्या मंद प्रकाशात न्हाऊन जाईल...
माझ्याही शब्दांना मग उधान येईल
आठवुन तुला...
अशीच एखादी कविता पुन्हा जन्म घेईल...

उद्याची वाट कशी पाहु?
मी तुला कसे समजावु?
उद्याचा भरवसा नाही सखे...
चल आजच जगुन घेऊ....


आभाळास पेलुन घेइल
मी वादळास झेलुन घेइल
तु फ़क्त साथ रहा..
क्षणभर मृत्युशीही खेळुन घेइल..


अशी वरवरची हाक नकोय
मनापासुन मला साद घाल...
अवघं आयुष्य तुला देईल
एकदा माझ्या भावनांना हात घाल

-- संदिप सुरळे

Wednesday, June 20, 2007

प्रेमा प्रेमा पन्ख दे
भरारीचा डन्ख दे
प्रेमा प्रेमा रन्ग दे
शामल दे गोरा दे
राजवन्शि तोरा दे
काजळाच्या कोरीला
तेजाचा पार दे

प्रेमा प्रेमा माळ दे
शेता सुपिक गाळ दे
क्रुति वन्शा नाळ दे
मणी मणी तुळस दे
मोती मोती कळस दे
प्रेमा प्रेमा धागा दे
प्रपन्चाचा त्रागा दे

प्रेमा प्रेमा माळ दे
आनन्दाचे चाळ दे
प्रेमा प्रेमा जोर दे
उत्साहाचा मोर दे
स्वप्न चन्द्रकोर दे.
प्रेमा प्रेमा पन्ख दे
भरारीचा डन्ख दे

स्वप्नातली ती.....

काय सांगू मित्रांनो
काल रात्री कमाल झाली
स्वप्नामध्ये ती आली
आणि एकदम धमाल उडाली

होत माझा वाढदिवस
म्हणूनी मला ती भेटली
पांढरा शुभ्र रंग तीचा
पाहुनी पप्पीच घ्यावीशी वाटली

घे‌ऊनी गेलो तीला मी जेव्हा
सुंदर साथ दिली मज तीने तेंव्हा
तीच्यासंगे सर्वत्र फिरताना
ओढ लागली मला तीची बागडताना

वाऱ्याबरोबर लागे तीची शर्यत
मनमोहक अशी तीची चाल

पहाताच क्षणी कोणीही म्हणेल
च्यायला काय दिसते याची माल!

स्तुती करण्याकरीता शब्द नाही
एवढी आवडली ती मज फार
स्वप्नात मला जी भेटली होती
प्रत्यक्षात कधी मिळेल मज ती "मर्सिडीज कार"
'नक्की कोण तू माझा'????????????/
'नक्की कोण तू माझा' प्रश्नाचा मी निकाल लावायचे ठरवले,
निकालाचा दिवस 'एक एप्रिल' ला निवडले,
प्रेमपत्र त्याच्या हातात दिले,
नजर त्याची झाली कावरीबावरी,
वाटलं हिची लग्नपत्रिकाच..हातात पडली..

त्याच्या चेह-यावरचे भाव वाचत होते,
माझ्या उतराच्या मी जवळ जात होत्ते,
आनंदाने तो बोलला,माझ्या मनातले बोललीस,
तुला विचारायची इच्छा होती पण नकाराने,
दोस्ती तुटु नये हीच काळजी होती..

विचार केला, विमान याचे खाली आणूया,
म्हटले त्याला, अरे वेडया, 'एप्रिल फूल' केले तुला,
दोस्तीत आपल्या प्रेम बिम आणाच कशाला,
उसने हसु आणत कसाबसा बिचारा बोलला,
'जातो,उशीर झालाय'..म्हणत त्याने रस्ता धरला..

डोळे भरले होते त्याचे,मी ही काही क्रूर नव्हते,
धावत त्याला थांबवले,परत 'एप्रिल फूल' बोलले,
माझ्या डोळ्यांतले भाव त्याने ऒळखले,
'एक एप्रिल'ने मैत्रीत प्रेमाचे धागे गुंफले,
'नक्की कोण आम्ही एकमेकांचे' ह्या प्रश्नाचे उत्तर दिले॥
१४ फेब्रुवारी
व्हेलेंटाईन दिवस
तरुणाईचा दिवस
प्रत्येक मनातला दिवस
मनातल्या प्रत्येकासाठीचा दिवस

असा हा प्रेमाचा दिवस
लवकरच येणार आहे
कुणास ठाउक यावर्षी किती
ह्रदयांचा वेध घेणार आहे

पुन्हा भेटवस्तुची दुकाने
कार्ड आणि गिफ्टस् नी भरतील
कॉलेज कट्टे, बागा गुलाबी
रंगात न्हाउन निघतील

प्रत्येक जण आपला आपला प्लान
बनवत असतो आणि तो
इतरांहून कसा वेगळा आहे
हे ग्रुपला पटवुन देत असतो

यातले most प्लान
पार पडतच नाहीत
घेतलेली गिफ्ट, गुलाबे
तिला पोहचतच नाहीत

गुलाबं कोमेजतात
गिफ्ट कपाटात जातात
मनातल्या भावना
मनातच विरुन जातात

पण मित्रा हार मानु नकोस,
पुढल्या वर्षी तुझ्या हातातले गुलाब
तिच्या हातात असेल
कुणी सांगावे कदाचीत
तिच्या कपाटातही न दिलेल्या
गिफ्टची आरास असेल.......
ओळ अशी,ओळ तशी...

एखादी ओळ,
चंद्राची कोर होते,
एखादी ओळ,
नाचणारा मोर होते,

एखादी ओळ,
चढणीचा घाट असते,
एखादी ओळ,
ठुमकणारी वाट असते

एखादी ओळ,
स्वतःशीच लाजुन हासते,
एखादी ओळ,
हळुच आपले डोळे पुसते

एखादी ओळ,
केशरी जंतरमंतर असते,
एखादी ओळ,
दोघातलं अंतर असते,

एखादी ओळ,
फ़ुलपाखरा मागे धावते,
एखादी ओळ,
अंधारत दिवा लावते,

एखादी ओळ,
सरींमधे चिंब भिजते,
एखादी ओळ,
आपलेच प्रतिबिंब बनते।
आयुष्य नक्की काय असत?

आयुष्य नक्की काय असतं ?
हासर्या फ़ुलावरचं दव असतं..
नाचर्या मुलाचं नाच असतं..
दुखर्या ह्रुदयाचा घाव असतं..

आयुष्य नक्की काय असतं,
समुद्रात चाललेलं दिशाहिनं जहाजं असतं,
किनारा शोधत फ़िरायच असत,
वादळांनी डगमगुन जायचं नसतं.

आयुष्य नक्की काय असत?
ते एक तलम रेशमी वस्त्र असत..
ज्याचे त्यानेच ते विणायच असत
पण अति ताणायच नसत..

आयुष्य नक्की काय असत?
सतत गुन्तत जाणारे ते एक कोडे असत
ते ज्याचे त्यानेच सोडवायच असत
गुन्तून मात्र त्यात पडायच नसत

जिथे वाटेल तुम्हास हे माणुस आपुले
जीव तिथे गुंतवावा दोस्त त्याच्यात पहावा
उरी ठेउ नये काही, त्याचा भरोसा धरावा
त्याला देव मानु नये त्याला सखा समजावा

मन्नुबुवा कल्याणकर

Tuesday, June 19, 2007

नसतेस घरी तू जेव्हा
जेवणही मीच बनवितो,
पोळ्यांचे होती नकाशे,
भाजीही मी करपवितो.....

नसतेस घरी तू जेव्हा
सर्वत्रच होई पसारा,
धुळ मणामणांची साचे,
कपड्यांचा होई ढिगारा.....

नसतेस घरी तू जेव्हा
बिल लॉंड्रीचे हे येते,
वाणीही लावी तगादा,
पाकीट रिकामे होते....

नसतेस घरी तू जेव्हा
मम इमेज हरवुन जाते,
ऑफिसला जातो तेव्हा,
सर्वत्रच चेष्टा होते.....

नसतेस घरी तू जेव्हा
भांड्यांचा होतो ढीग्,
मी घासत म्हणतो, सारे
नशिबाचे असती भोग.....

नसतेस घरी तू जेव्हा
टी.व्ही.ही मजेत असतो,
नसतात मालिका रडक्या,
मी मला हवे ते बघतो......

नसतेस घरी तू जेव्हा
जग सुनेसुनेसे भासे,
ना ओरडणे ना चिडणे,
घर्-दार सुखावून जाते.....

नसतेस घरी तू जेव्हा
जीव हा पोरका होतो,
दरक्षणी तुझ्या असण्याचा
आभास बोलका होतो.........

सांग पावसाशी लढु मी कसा,
दव ओंजळीतला राखु मी कसा,

सर सर धारांचे मला घेरणे,
मला न सांगता मला ओढणे,
नवनवीन ते अनोखे शहारणे,

भाव मनातला थांबवु मी कसा,
सांग पावसाशी लढु मी कसा,

सोडले सारे बहाने ते जुने पुराणे,
अन, वळुन पाहणारे भास दिवाने,
मग, मेघ होतो मी मेघांतला कशाने,

श्वास उरातला उरात दडपु मी कसा,
सांग पावसाशी लढु मी कसा,

झुरताना मग त्या बावर्‍याचे झुरणे,
एका क्षणासाठी एका क्षणी ताटकळणे,
होउन वीज स्वतःवरच ते गडगडणे,

ध्यास श्रावणातला बाळगु मी कसा,
सांगना....पावसाशी लढु मी कसा।

कसं गं तुला काही समजत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !

इतक्या सहजासहजी जाऊ का विचारतेस,
भावना का माझ्या तुला जाणवत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला करमत नाही !

तू दुर असलीस की जगही खायला उठतं,
कशातच लक्ष माझं लागत नाही !
एवढही तुला कसं कळत नाही,
तुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ नाही !

कधी कधी असं वाटतं,
तू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही !
माझ्या भावना तू चांगल्या जाणतेस,
पण मुद्दामच तू मला भेटत नाही !!

न भेटण्याने आता काही होणार नाही,
मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाही !
आपले मिलन ही तर दैवाचीच इच्छा,
त्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही !!

तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे,
हा काही आज उद्याचा खेळ नाही !
तुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू,
असं स्वप्नातही शक्य होणार नाही !!

किती साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तू हे समजुन का घेत नाही !!

भरलेल आभाळ रात्रभर गळल होत
तिच माझ नात फ़क्त पावसालाच कळल होत

रात्र भर पाउस थेंब अन थेंब सांडुन गेला
तिच्या माझ्या आठवणीवर ओलावा मांडून गेला
भिजण्यासाठी मग मन माझं वळल होत

तिच माझ नात फ़क्त पावसालाच कळल होत

ती रात्र पावसाने भिजवून काढली होती
मग वीजही कडाडून मांडली होती
भर पावसात माझं आभाळ जळल होत

तिच माझ नात फ़क्त पावसालाच कळल होत

मित्रापेक्षा जास्त आणि प्रियकरापेक्षा कमी,
नाही रे, तोलत नाहिये मी ही अनमोल नाती..

पण आहेस तरी नक्की कोण तू माझा,
अवचित या मोहक वळणावर भेटलेला..

गुंफलेस तू धागे विश्वासाचे,
देतोहेस साथ,पाळतोय निती नियम ही जगाचे..

केवढी आहे आपली मित्र-मैत्रिणींची फौज,
तरी कुणातही नाही अजुन ही कुजबुज..

पण ठाऊक आहे हे दोघांना,
आवडतो आपण एकमेकांना..

घेतो दु:ख वाटून,अडचणी समजुन,
नाही दुखवत भावनांना..

पाठराखण करतो एकमेकांची,
रोजच उत्सुकता संवादाची..

ना ओढ आहे ही,ना आकर्षण,
ना दिलेय मन एकमेकांना आंदण..

पण,बोलायला लागले आहेत डोळे,
मैत्रीच्या वाटेवर फुलताना

Monday, June 18, 2007


♥मुली असतात फुलासारख्या ♥
♥ मुली लहान मुलासारख्या ♥
♥ त्यांच्या हसण्यान जगात बहार आहे ♥
♥ त्यांच्या रडण्यात मानवजतीची हार आहे ♥
♥ मुली म्हणजे relations ♥
♥ मुली म्हणजे emotions ♥
♥ छोट्या छोट्या गोष्टीनी हिरमुसनार्‍या ♥
♥ शंभर जन्म कुरबान अशा लाघवी रुसणार्‍या ♥
♥ मुली म्हणजे पाऊस ग्रीष्मातला ♥
♥ मुली म्हणजे मोर श्रावणातल्या ♥
♥ मुली म्हणजे ठसून सौंदर्य ♥
♥ मुली म्हणजे त्याग औंदर्य ♥
♥ मुली असतात softcorner ♥
♥ मुली असतात melting point ♥
♥ घसरत्या आमच्या career च्या मुळीच असतात turning point ♥
♥ त्यांच नुसात् smile देण म्हणजे आमच्यासाठी हर्षवायू ♥
♥ पण रुसण म्हणजे अर्धान्गवायू ♥
♥ मुली वाटतात हव्याहव्याश्या ♥
♥ मुली वाटतात आपल्याशा ♥
♥ आमच मन समजून घेणार्‍या ♥
♥ दुखात आम्हाला आधार देणार्‍या ♥
♥ कधी कधी त्यांच्या माझ्या नात्याला ♥
♥ काही नाव नसत पण तरही ते जपायच असत..... ♥

फुलणाय्रा कळीत पाहून एकदा
मला गोड गोड हसायचय
अगदी त्या फुलपाखरासारखे
पानांनाही कधीतरी अस खुशाल पुसावं

दुरागावच्या त्या पक्ष्यासोबत
आपलही काहीतरी नातं असाव
पण का म्हणून प्रत्येकाला
प्रत्येकाची सोबत लाभावी
ह्या देवानेच जणू
ही अशी नाती बनवली

अगदी एका पातळ धाग्यासारखी . . . .

नाती जुळतात अनेक
जणू धागे गुंततात अनेक
त्याच धाग्यांना पडतात अनेक गाठी
त्या गाठी सोडवता सोडवता
अनेक अश्या गाठी सुटतात
अगदी एखाद्या नात्यासारखी

मला कधी कधी वाटतं
झय्राजवळ जाऊन क्षण्भर बसावं
मिटलेल्या दिवसाच दु:ख मनात असाव
मुठभर चांदण्यासाठी त्या आभाळावर रुसाव
अश्रूनी माझ्या डोळ्यांवर पाझर घालावी
अन तुझ्या स्पर्शाने ती धारच जणू गारठून जावी

तुला आयुष्यात जे काही हव
ते सर्व काही तुला सदैव मिळाव हीच माझी ईच्छा
भाग्यवान हा शब्द तुलाच फळो
ह्याचा अर्थ साय्रा जगाला तुझ्याचकडून कळो

काही न मागताच सर्व काही दिलस मला
आता अजून काय मागू मी तुझ्याकडे
मी सारखी हीच प्रार्थना करीन
माझे आयुष्यच मिळो तुला

आता ह्याशिवाय मजकडे काहीच उरले नाही । .

अचानक आला पाऊस
काय माहीत अचानक कुठुन आला
जाता जाता सगळं ओल करून गेला

शहाणा येतोय येतोय सांगून लवकर पळाला
आणि घाम पुसता पुसता आमचा रुमाल भिजून गेला

सांगून तर गेलाय तुमची वाट लावून जाणार
बघुया यंदा आमची महानगरपालिका तरी काय करणार

का यंदाही सामान्य नागरिकच भरडला जाणार
आणि परत परिस्थिती हाताळता हाताळता आमच्या नाकीनऊ येणार

सांगून तर गेलाय लवकर येतोय म्हणून
बघुया त्याला किती उशीर आहे अजून

मी म्हणालो यायचयं तर लवकर ये फार उकडतयं
तर बोलतो लवकर ये लवकर ये बोलायला तुमचं काय जातयं

बोलतो घरून पाठवल्याशिवाय आम्ही येऊ शकत नाही
तुमच्या या परिस्थितीला तुमच्याशिवाय दुसरं कोणीच कारणीभूत नाही

मला वाटतं यंदाही तो असचं करणार
पालिकेबरोबर झिम्मा खेळून मग आपल्याबरोबर लपंडाव खेळणार


आस धरून बसलो आहे

ना ही अर्थ होता माझ्या शब्दाना
ना ही अबोला होता या जीवाला
भान हरपून गेले आहे
काय झालय माहीत नाहि मला ??

बन्धनात शब्दान्च्या मी अडकतोय,
भाव मैत्रीचा मनी वसवतोय,
कधी हसतोय, कधी हसवतोय
मन माझे मलाच चकवतोय.

उन्हाने भिजून गेलो आहे मी
त्यागाने झलून गेलो आहे मी
श्रमाने थकून गेलो आहे मी
तुझ्या आठवनीत रुतून गेलो आहे मी

तूझा एक स्पर्श आणि त्याचा
व्यासन्ग मला इतके कर्म करायला
भाग पाडत आहेत.... तरी ही
त्या चातका सारखा तुझ्या वाटेवर
आस धरून बसलो आहे.

@ सचिन चाफेरकर

बघ दिसतो का तुला.....

आज मी हरवलो,
न सापडण्यासाठी,
बघ दिसतो का तुला,
मी भांडण्यासाठी,

थोडा आधी गहीवरलो,
न रडण्यासाठी,
बघ दिसतो का तुला,
मी हसण्यासाठी,

दुर देशी निवर्तलो,
न परतण्यासाठी,
बघ दिसतो का तुला,
मी झुरण्यासाठी,

पाताळी भुत गाडलो,
न अंकुरण्यासाठी,
बघ दिसतो का तुला,
मी फुलण्यासाठी,

तुझ्यात मी अवतरलो,
न विसरण्यासाठी,
बघ दिसतो का तुला,
मी आठवण्यासाठी

क्षणात तुझ्या सामावलो,
न संपण्यासाठी,
बघ दिसतो का तुला,
मी जगण्यासाठी......

अंतरी अंमळ उधाणलो,
न हारण्यासाठी,
बघ दिसतो का तुला,
मी जिंकण्यासाठी