आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, October 15, 2008

आजोबा

नेटवर वाचनात आलेली एक मस्त कविता ...

जेवताना आजोबा लाडात येत,
मला आपल्या कवित भकर देत;
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत !

मी म्हणायची रागवूनः
"आजोबा, बॅड मॅनर्स,
व्हॉट आर यू डुइंग?"
आजोबांचं हसून उत्तरः
"आय अॅम जस्ट ढेकरिंग !"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल !
आजोबा म्हणायचेः
"ज्याला असं टक्कल
त्यालाच असते अक्कल !"

मी खिजवून म्हणायचोः
"आजोबा, यमकासाठी
घ्या आता बक्कल !"
आजोबा मोठयाने ओरडून म्हणतः
"अरे साल्या यमक्या,
मला देतोस धमक्या?यमकांच्या धंद्यामधे
मी आहे खमक्या !"

आजोबा आपल्याच नादात
स्वतःशीच गात असत,
गाता गाता मधेच थांबून
स्वतःशीच गोड हसत !

मी जवळ गेले की
मला म्हणतः
बेटा एक लक्षात ठेवः
एकटं एकटं जाता आलं पाहिजे;
स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे !"

मी गोंधळून विचारीः
"म्हणजे काय?"
आजोबा मोठयाने हसून म्हणतः
" म्हणजे काय? म्हणजे काय?
म्हणजे नाकात दोन पाय !"

"आजोबा, एक गोष्ट विचारु?"
"विचार बेटा!"
"आजोबा, तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो?"
"वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की !
एक ती अशी होती,
दुसरी ती तशी होती !"

इतक्यात खोलीत आजी यायची,
आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची !
आजोबा स्वतःला सावरायचे,
चटकन विषय बदलायचे,
घसा खाकरत म्हणायचेः
"बेटा, तुला गीतेमधला
स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे?
चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे?"

आजोबा संध्याकळी
अंगणातल्या झाडाखाली
आपल्या आरामखुर्चीवर
एकटेंच बसत;
एकटक डोळे लावून
दूर कुठे बघत असत...
दूरदूरच्या ढगात असत,
कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत !!

पाय न वाजवता मी हळूच
तिथे जाई,
त्यांच्या आरामखुर्चीमागे
उभी राही!
काय बघत असतील हे?
मी दूर पाहीः
मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे,
तीच घरं...तीच झाडं...
सगळं अगदी तसंच असे !

पाय न वाजवता मी हळूच
परत मागे घरात यायची;
आजोबांची आरामखुर्ची
सावल्यांमधे बुडून जायची !

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

कवि: मंगेश पाडगावकर
काव्यसंग्रह: बोलगाणी

आलास का पुन्हा तू?

एक गजल

आलास का पुन्हा तू? देण्यास घाव आता,
केलास वार जो तू, तो ही मधाळ आहे.

रागावता असा तू, मी हासते जराशी,
व्यर्थ तुझेच कोपन, इतुके मवाळ आहे.

शोधू कुठे तुला मी? रे काळजात माझ्या,
रे अंतरी तुझ्या मी, झाली गहाळ आहे.

दे लाघवी अश्रूच, दिलखुलास मागणे हे,
हा हास्य मुखवट्यांचा, झाला सुकाळ आहे.

आता चर्चा कशाला? वैतागलास का तू?
नादान मी अशी ही, थोडी खट्याळ आहे.

पूरे तुझे उसासे,या स्वप्निल पापण्या ही,
ढळली निशा पहाटे, झाली सकाळ आहे.

ये तू अता विठ्ठ्ला, तूझीच ओढ मजला,
वारीत माणसांचा, पडला दुष्काळ आहे.

वृत्त: आनंदकंद
कवयत्री : निशा

तुला पाहुनी

तुला पाहुनी ... (नज़्म)

तुला पाहुनी जीव सांडतो
कळत नकळतच ...
तुला पाहुनि श्वास थाम्बतो
कळत नकळतच ...

मनात उठते उधाण वारे
पुन्हा एकदा...
अन् पाउस जातो शिंपून अत्तर
कळत नकळतच


-- महेश घाटपांडे