आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, July 23, 2007

दिवेलागणीच्या वेळी !
नको तेच ते का स्मरते...दिवेलागणीच्या वेळी !तुझ्या आठवांना भरते...दिवेलागणीच्या वेळी !
जणू होत आहे चकवा...फिरे काळ एका जागी...पुढे वेळ कोठे सरते...दिवेलागणीच्या वेळी ?
- पडू लागता कायमचा जसा गाव मागे मागे...कुणी पोर डोळे भरते...दिवेलागणीच्या वेळी !
मला एकट्याला बघुनी म्हणे चांदणी एकाकी...तुझा हात मीही धरते...दिवेलागणीच्या वेळी ! !
तुला आठवे का पहिली तिची भेट एकाएकी...?मनी काय हे मोहरते...दिवेलागणीच्या वेळी ?
कुणी येत नाही...मन हे तरीही प्रतीक्षा वेडी -- कशाला कुणाची करते...दिवेलागणीच्या वेळी ?
सुचेनाच काही अगदी...सुचेनाच काही काही...कशाचे न काही ठरते...दिवेलागणीच्या वेळी !
क्षणी या रिकाम्या, परक्या कुठे मी मनाला नेऊ ?उदासी घरी वावरते...दिवेलागणीच्या वेळी !
कुणी दूर का आळवते तिथे मारव्याच्या ताना...?इथे दुःख माझे झरते...दिवेलागणीच्या वेळी !
अशी आर्तता, कातरता कळावी कुणाला माझी ?...मुकी वेदना हंबरते...दिवेलागणीच्या वेळी !
हसू आण ओठांवरती, जरी पापण्या या ओल्या...तुझे तूच घे आवरते...दिवेलागणीच्या वेळी !
- प्रदीप कुलकर्णी

No comments: