तिच ती माझी
--विराज
कॉलेजात जाताना, पहिल्यांदाच ती मला भेटली
लाल रंगाच्या कड्यांमध्ये, तिची कळी अधिकच खुलली
बहिण बरोबर असतानाही, मी तिच्याकडे बघत बसलो
काय, कसे कूणास ठाऊक? मी तिच्या प्रेमात पडलो।
आणि जेव्हा जेव्हा चान्स मिळेल, तेव्हा तेव्हा माझ तिला बघणं
हळु हळु तिलाही, माझं प्रेम उमगलं;
मग तिची जवळीक वाढून, आमचं प्रेम जुळलं
एकमेकांच्या साथीत आम्ही कोठे कोठे नाही फिरलो
स्टेशनपासून बिल्डिंगपर्यंत, येता जाता तिच्या कुशीतच शिरलो
तिच्याबरोबर पालथं घातल, जयराजनगर, योगीनगर;
अगदि सोडलासुद्धा नाही, रोड चंदावरकर.
कधी-कधी मात्र, ति वेळेवर नाही यायची
बिल्डिंगखाली फेऱ्याघालून, आम्ही मात्र तिची वाट बघायची
मग उशीरा आल्यावर, तिचं लांबुनच दिलगिरी व्यक्त करणं
आणि माझं मोठ्या मनानं, हसतं तिला माफ करणं .
माझ्यासारखेच तिची वाट बघणारे होते अनेकजण
कारण तिही तशीच होती; साधी,भाव न खाणारी आयटम नंबर वन
म्हणून कॉलेजसंपेपर्यत तिच्याबरोबर फिरायचो
तिच्या हातात हात घालून, तिला फुलासारखे जपायचो.
कॉलेज संपल्यावरही ती सदैव राहते आठवत
मला पाहून लांबूनच, डोळ्यांनी ती असे खुणवत
तिचं मनमोहक रुप अजुनही काळजात ठेवतो
म्हणूनच तिला विसरायचं ठरवतो आणि नेमके तेच विसरतो.
जॉब मिळाल्यानंतर मात्र, माझ्या मनात कायम असेल भिती
आपल्या दोघांच्या भेटी, होतील की नाही दिवसराती
कारण माझ्या वेळेचं भान तू राखशील कशी?
तरीहि कठिणचं आहे, तुला सोडून जाणं दुसऱ्यापाशी.
भेटी झाल्या तरी, ह्रदयावर तुझं प्रतिबिंब कायमचं कोरलेलं
मनाच्या एका कोपऱ्यात, तूझं नाव सदैव जपलेलं
तिचं नाव सांगू की नको, मला लाज वाटते
पण प्रेमचं ते, कोणावरही केलं तरीहि लपत नसते.
म्हणूनच ठरवलं तिचं नाव सांगून टाकायचं
झालं ते झालं, आता नाही घाबरायचं
तिच माझी बिल्डिंगखाली येणारी सखी सवंगडी
तिच ती १६ क्रमांकाची बस, पोस्ट ऑफिस ते चिकूवाडी.
No comments:
Post a Comment