आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, July 05, 2007

गोरी गोरी पान, पैसेवाली छान
दादा मला एक वहिनी आण

वहिनीला आणायाला घेऊ या रे हुंडा
ऑफीसला जायला तुला नवी होंडा
डिग्रीची अपुल्या मनी ठेव जाण
दादा मला एक वहिनी आण

वहिनी अशी आण जशी कुबेराची मुलगी
कायमची राहो तिची पैशाशी सलगी
स्वाभिमान जरी तुझा पडला गहाण
दादा मला एक वहिनी आण

कधीपासून करायचा आहे तुला धंदा
पैसेवाला सासरा रे मग कसला वांधा ?
सासऱ्याच्या बोलण्याला डोलव रे मान
दादा मला एक वहिनी आण

सारं काही कर परी एक रे विनंती
आई-बापाची तरी जाण ठेव अंती
नाही तर बायको तुझी होईल वरताण
दादा मला एक वहिनी आण

सोनंचांदी, पैसाअडका हेच का रे सारं ?
माणसांच्या प्रेमातच सुख आहे खरं !
घेऊ नको मनावर शब्दांचे बाण
दादा मला एक वहिनी आण

गोरी गोरी पान, फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण !

No comments: