आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, July 05, 2007

आवडेल मलाही पाऊस व्हायला...

आवडेल मलाही पाऊस व्हायला...
न सांगता तुझ्या भेटीला यायला...
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला...
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला...
अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला...
आवडेल मलाही पाऊस व्हायला...

आवडेल मलाही पाऊस व्हायला...
गंध होऊनी श्‍वासात तुझ्या मिसळायला...
श्‍वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला...

काळ्या ढगांमधून पळून यायला...
अलगद तुझ्या कुशीत शिरायला...
आवडेल मलाही पाऊस व्हायला...

आवडेल मलाही पाऊस व्हायला...
नकळत हृदयात तुझ्या शिरायला...
हृदयात मेणाचं एक खोपडं बांधायला..

तुझ्या स्वप्नात येऊन तुला जागवायला..
काळजाचा तुझ्या वेध घ्यायला...
आवडेल मलाही पाऊस व्हायला...

आवडेल मलाही पाऊस व्हायला...
हातात हात घालून तुझ्या रानोमाळ हिंडायला...
पंखात तुला घेऊन भरारी घ्यायला...

आठवण बनून तुझ्या डोळ्यात उतरायला...
अश्रूंमध्ये आनंदाची साखर मिसळायला...
आवडेल मलाही पाऊस व्हायला...

आवडेल मलाही पाऊस व्हायला...
एकट्या मनाची सोबत करायला...
कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला...

भाळशील का तू माझ्या या रुपाला
सांग ना जमेल का तुला साथ द्यायला...
तरच आवडेल मला पाऊस व्हायला...

1 comment:

PRABHAKAR said...

ही कविता मी केली आहे
प्रभाकर भोसले 9881098010