आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, July 06, 2007

"चकवा"

हरवलो असा मी कसा,
कुठेच काही मागमुस का नाही??
शोधतो वाट चाललो ती,
कुठेच एकही पाऊलखुण का नाही??

क्षितिजावर रक्ताळ शाई जरी,
कुठेच मावळतीचा भाव का नाही??
छाताडावर वेदनांचा नाच तो,
कुठेच ताजा घाव का नाही??

एकटाच उरलो रणावरी,
कुठेच जिंकण्याचा उन्माद का नाही??
जिवंतच जळतो सरणावरी,
कुठेच पावसाचा उच्छाद का नाही??

मागण्याचा हट्ट पुराणा,
कुठेच देणारा कर्ण का नाही??
लुबाडण्याचा नाद आजन्म,
कुठेच स्वार्थ पुर्ण का नाही??

काळाकुट्ट काळोख रात्रीचा,
कुठेच कसा काजवा का नाही??
पुन्हा एकदा हरवुदे मला,
कुठेच कसा चकवा का नाही??

-निलेश

No comments: