आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, September 26, 2007

...हा निरर्थ सर्व खेळ !

एकसारखा तुझा विचार मी करू किती ?
एकसारखा तुलाच सांग मी स्मरू किती ?

दूर दूर एकटीच दुःख साहतेस तू...
...आणि आपल्या व्यथेत चूर राहतेस तू
हे स्मरून लोचनात आसवे भरू किती ?

सारखा तुझ्यामुळेच मी उदास राहतो
तू जरी न यायचीस़; वाट मात्र पाहतो
या अशा मनःस्थितीत सांग वावरू किती ?

एकसारखी तुझीच खंत बाळगायची...
हीच, एवढीच रीत जाहली जगायची
सांग तू, तिथून सांग, धीर मी धरू किती ?

एकटेच आठवांत मी तुझ्या जळायचे...
अन् तुला कधी कधी कधी न हे कळायचे
भोवतालच्या जगात मी खुळा ठरू किती ?

वाटते, फुलापरी तुला जपायला हवे
वाटते, तुला कधी मिळू नयेत आसवे
व्यर्थ या विवंचनेत रोज मी मरू किती ?

गुंतलोच का तुझ्यात, वाटते कधी कधी
आर्त वेदना उरात दाटते कधी कधी
सैरभैर या मनास सांग आवरू किती ?

राहते मनातल्या मनात सर्व शेवटी
मी इथेच एकटा नि तू तिथेच एकटी
भावना मुक्या, अबोल सांग आवरू किती ?

वाटते, अखेर सर्व सर्व व्यर्थ व्यर्थ का ?
यायचा न जीवनास या कधीच अर्थ का ?
हा निरर्थ सर्व खेळ ! त्यात मी हरू किती ?

-- प्रदीप कुलकर्णी

No comments: