आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, April 24, 2007

नव्वदीतल्या बायजाबाईंना दहा लाखाची लॉटरी लागली. पण, ही बातमी त्यांना सांगायची कशी, हर्षातिरेकाचा धक्का त्या पचवू शकतील का? या प्रश्‍नाने नातंवाइकांना भंडावून सोडलं होतं. शेवटी डॉक्‍टरांना बोलवायचं ठरलं. डॉक्‍टर विनोदनी आल्याआल्या सर्व नातेवाइकांना मोठाच दिलासा दिला. रुग्णांना धक्का बसणार नाही अशा पद्धतीने त्यांना त्यांच्या आरोग्याबाबत कसं सांगायचं हे आम्हाला शिकवलेलंच असतं, असं सांगत ते बायजाबाईंना भेटायला त्यांच्या खोलीत गेले.

""समजा तुम्हाला दहा लाखाची लॉटरी लागली, तर तुम्ही काय कराल?'' हळूहळू गप्पांच्या ओघात डॉक्‍टरांनी मुद्‌द्‌याला हात घातला.
""त्यातले निम्मे मी तुम्हाला देऊन टाकीन।'' बाई सहज म्हणाल्या.डॉक्‍टर अजूनही धक्‍क्‍यातून सावरलेले नाहीत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शनिवार वाड्याजवळच्या टपरीमध्ये खालील पाट्या होत्या
* इडलीला चमचा मिळणार नाही
* चटणी फक्त दोनदाच मिळेल
* साबुदाणा वडा पार्सल घेतल्यास प्लॅस्टिकची पिशवी मिळ्णार नाही (???)
* पोहे एक प्लेट (२०० ग्रॅम) (प्लेट च्या आकारावरुन वाद नको)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नुकतेच कणेकरांच्या एका पुस्तकात वाचलेला हिंदी संवाद

`घर मै माजी है|`
`यहां माजी कोइ नही, बहेनजी हई` पत्नीचे फणकार्यात उत्तर.
`बहेनजी, आप साबुन कौनसा इस्तेमाल करती हो?`
`मेरेकू ईंपोर्टेड पिअर्स पसंद है, लेकिन परवडता किसको है? ये कवडीचुंबक का घर है`
`तो आपका परिवार कौनसा साबुन इस्तेमाल करता है?`
`परीवार तो घरके मालिक जैसाही बेशरम है. तीन दिन से मै घसा खरवडके चिल्ला रही हुं के साबुन संपा है, लेकिन किसीको ढीम्म नही है. महागलीच्छ परीवार है. मेरे माहेरकू हर आदमी का वेगळा वेगळा साबुन था. एक दिन चुकीसे मेरी माँने टायगर का साबुन लिया तो भडक के मेरे पिताने पूरी साबुनकी वडी गिळी थी. उससे उनका आतडा स्वच्छ हुआ. इतने स्वच्छ परिवारसे मै इस गलिच्छ परिवार मे आ गयी क्यों के मेरा नशीब फ़ुटका था...`
`तीन दिनसे पहेले आप कौनसा साबुन इस्तेमाल करती थी?`
`ये कार्यक्रम करने बाहरगाव गये थे ना, वहां के हॉटेलसे चुराके लेके आये वही छोटी वडी इस्तेमाल करते थे। इनका की नाई नवस है के साबुन विकत आणनेका नही, हॉटेलसे चोरनेका........

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
परमेश्वराच्या मूतीर्पुढे नतमस्तक होत भक्त कळवळून म्हणाला, ''परमेश्वरा, मला तुझी आठवण सतत राहावी, म्हणून तू मला आयुष्यभर दु:ख दे, यातना दे, टेन्शन दे, मला बरबाद कर, माझ्यामागे हरतऱ्हेची शुक्लकाष्ठं लाव, मला क्षणभराचीही शांतता मिळू देऊ नकोस...''

परमेश्वर कमरेवरचा हात काढून पायरीवरून उतरून पुढे आला, त्यानं भक्ताच्या अखंड बडबडणाऱ्या तोंडावर हात ठेवला आणि तो म्हणाला, ''वत्सा, सरळ सांग ना की तुला लग्न करायचंय!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.
बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार".

ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले.
"तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तुम्ही घरी येता आणि एक स्त्री तुमचं प्रेमानं स्वागत करते, तुम्हाला छान छान पक्वान्नं खाऊ घालते, दिवसभरातल्या तुमच्या दगदगीचा शीण आपल्या सोबतीनं हळुवारपणे घालवते... याचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे?...

...

विचार करा...

सापडलं उत्तर?

अहो, तुम्ही चुकीच्या घरात शिरला आहात!!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मुलगा: बाबा, बाबा मला दर महिन्याला जो पॉकेट मनी देता ना. तो थोडा वाढवून द्या. महागाई कसली वाढली आहे.
बाबा: अरे, कस शक्य आहे. परवा तर अर्थमंत्र्यानी सांगितले की सगळ्या गोष्टींचे भाव स्थिर राहतील. मी पाहिल्या ना बातम्या.
मुलगा: तुम्ही पण ना बाबा, अहो तुमचा विश्वास स्वताच्या मुलावर ज्यास्त आहे की अर्थमंत्र्यावर??
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुरुजी : बंड्या. सांग पाहु , एक कोंबडी रोज एक अडे देते , तर
एका महिन्यात ती किती आंदे देएल ?
बंड्या : गुरुजी, मला एक सांगा की ती पण "सोमवार बंद " असते का ?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एकदा देवाने माधवराव शिंद्यांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" माधवराव शिंदे म्हणाले, "एक". देवाने खूश होऊन त्यांना एक नवीकोरी मर्सिडीझ भेट म्हणून दिली.

नंतर देवाने विलासराव देशमुखांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" विलासराव म्हणाले, "तीन". देव थोडासा नाराज झाला आणि त्याने त्यांना एक होंडा सिटी भेट म्हणून दिली.

त्यानंतर देवाने लालूप्रसाद यादवांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" लालू म्हणाले, "बारा". देव चिडला. त्याने लालूंना एक जुनीपुराणी स्कूटर दिली.

हे तिघे रस्त्यातून जात असताना काही वेळाने त्यांना गांधीजी चालत येताना दिसले। लालूंनी गांधीजींना विचारलं, "काय हो गांधीजी, देवाने तुम्हाला काही दिलं नाही वाटतं?" गांधीजी म्हणाले, "ते राहू द्या. आधी मला सांगा की देवाला कोणी सांगितलं की मला 'राष्ट्रपिता' म्हणतात "
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पुणेरी पुणे
काही वेळेला 'खोडी' काढायचं मनात नसतं. पण ग्राहकाने अनाठायी शंका विचारून बेजार केलं तर इरसाल पुणेरी उत्तराची चपराक बसते. उदा. शिट्टीवर सुरेल गाणं सादर करणारा मित्रवर्य अप्पा कुलकर्णी मुळात महाराष्ट्र बॆकेत होता.
त्याचा बॆकेसमोरचा रस्ता ओलांडायचा अवकाश. समोरच आणखी एक सहकारी बॆक होती. तिथलाच चेक घेऊन आपल्या महाराष्ट्र बॆकेतल्या खात्यात भरण्यासाठी ग्राहक महाशय आले. नेमकं काउंटरवरच्या अप्पाला त्यांनी विचारलं की,'cash कधी होईल?'
अप्पा म्हणाला,'उद्या सुट्टी आहे. परवा होईल.'
ग्राहकानं विचारलं,'का पण? समोरच्या बॆकेचा तर चेक आहे. वेळ लागतोच कसा?'
'अहो उद्या सुट्टी आहे.'अप्पाचा नम्रपणा अद्याप सुटला नव्हता!
,पण समोर तर बॆक आहे.' ग्राहक हेका सोडेना.
मग खट्याळ अप्पाला राहावेना. तो म्हणाला,'काका काय आहे? केवळ रस्ता ओलांड्यावरचा बॆकेचा चेक आहे, म्हणून लगेच कॆश होतो, असं नसते, प्रोसिजर असते...असं बघा...'
'काही सांगू नका प्रोसिजर-बिसिजर.'
'ऎका तर काका. वॆंकुठ स्मशानभूमीच्या दारातच समजा तुम्ही गेलात म्हणजे मेलात, तर दारातच गेले म्हणून लगेच सरणावर चढवतील का? आधी ससूनला नेतील. चेक करतील. घरी नेतील. हार घालतील. म्रुत्युपास काढतील. मग वॆंकुठकडे...'
'कळलं!' फणकारत ग्राहक महाशय निघून गेले।

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments: