आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, April 27, 2007


इन्स्पेक्शन

स्थळ : शाळा
वर्ग : एकदम गप्प
कारण : इन्स्पेक्शन

अधिकारी : बोल अफ़ज़लखानाचा खून कोनी केला ?
बन्डु : माफ़ करा सर, मला काही माहित नाही. मी काल शाळेतच आलो नव्हतो. मला तर हा अफ़ज़लखान कोन आहे हे सुद्धा माहित नाही.

अधिकारी : काय सर ! हे काय चाल्ले आहे. मुल्लान्ना काहिच माहित नाहिये.
सर : नाही साहेब, बन्डु तसा खोड्कर आहे पण कोनाचा खून काही तो करनार्यामधला नाहीये.
अधिकारी : काय ! मुख्याध्यापकाना बोलवा.

अधिकारी : महाशय ! आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना काहीच माहित नाही.
मुख्याध्यापक : माझ्या शाळेतील विद्यार्थी असे कधी करणारच नाही. मी ह्याची खात्री देतो.
अधिकारी : तुम्ही खरोखरच मुख्याध्यापक आहात काय ? सर तुम्ही रोज विद्यार्थ्यान्ची हजेरी घेता काय ? काय रे बन्डु ! तू रोज शाळेत येतोस काय ?

बन्डु : माफ़ करा सर, मी शाळेच्या बाहेर केळी विकतो. ह्या वर्गातला एक विद्यार्थी आज भारत-औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेलाय. त्याने मला इथे जबरदस्तीने पाठविले आहे.

सर : माफ़ करा सर, मी समोर पान टपरी चालवितो. ह्या वर्गाचे सर आज भारत-औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेले आहेत. त्यान्नीच मला इथे पाठविले आहे.

मुख्याध्यापक : माफ़ करा सर, मी मुख्यध्यापकान्चा भाऊ आहे. तो आज भारत-औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेलाय. त्याने मला इथे पाठविले आहे.

अधिकारी(हताश होवुन) : अरे बापरे ! मी आलोय तर ही अवस्था आहे। खरे साहेब आले असते तर काय झाले असते देव जाणे ?

**********

Apr 16
एक इन्स्पेक्टर शाळेची तपासणी करताना गुपचुप सातवीच्या वर्गात शिरले. तिथे खुप गोंधळ चालला होता त्यातील एका मुलाची collar पकडत त्याला बदडत त्यांनी मुख्याधापकांकडे चालवले.
"वर्गात सर्वात मोठा असून असा गोंधळ करतोस?"
मुले त्यांच्या मागोमाग चालू लागली, इन्स्पेक्टर मुख्याध्यापकांच्या रुममधे जाणार तोच मुलं म्हणाली,
"साहेब, आता तरी आमच्या गुरुजींना सोडा।"

No comments: