आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, April 27, 2007

शाळेतील विनोद।

मास्टर - अरे, तुम्हाला चांगलं वाचता येत नाही. मी वाचून दाखवतो त्याप्रमाणे उद्या धडा वाचून या. (असं म्हणून पांच - सात ओळी वाचून झाल्यावर)
एक वात्रट विद्यार्थी - पुरे, शाबास । दहा मार्क । चांगल वाचलं ।


इंग्लंडच्या इतिहासाचा शिक्षक - जॉन राजाने मॅग्ना चार्टवर सही कोठे केली ?
वर्गातील उजव्या बाजूचा हुशार मुलगा - कागदाचे खालच्या उजव्या कोपऱ्यावर, सर ।


आइ आमच्या सरांना घोडा कसा असतो ते माहित नाहि.
आई :- हे कसे शक्य आहे?
मुलगा:- अग हो , मि त्यांना मि काढलेल घोड्याचे चित्र दाखवले तर ते मला विचारतात हा कोणता प्राणि आहे?

बन्डु नापास होतो म्हणुन गुरुजी त्याच्या पालकान्ना बोलवितात.
गुरुजी : मी बन्डुला विचारले कि जर माझ्याजवळ ५ केळी आहेत आणि त्यातिल मी ३ केळी खाल्ली तर खाली किती केळी राहिली ? तर २ केळी राहिली हे साधे त्याला सान्गता आले नाही.
बन्डुची आई : काय मास्तर, २ केळासाठी पोराला नापास केलं व्हय. उद्या २ डझन केळी पाठवुन देते, करुन टाका पोराला पास.


बाई :- राजु , कायरे तुला आज शाळेत यायला उशिर का झाला?
राजु :- बाई माझे ना रस्त्यात पाच रुपये सांडले, ते शोधत होतो म्हणुन वेळ झाला.
बाई :- गप्पु तुला का उशिर झाला?
गप्पु :- मि त्याच्या पाच रुपयावर पाय ठेउन उभा होतो ना...


सर - चिंटु तुला माझ्या वर्गात झोपता येणार नाहि.
चिंटु :- हो सर तुम्हि जरा हळु बोला , म्हणजे मला निट झोपता येईल।


आमचे गणिताचे सर , एखादे प्रमेय सोडवुन झाले कि विचारायचे , " कळलं का ? "
मग आमचा काहेी जणांचा ग्रुप ओरडायचा " कळुन चुकलं..... "


एकदा गुरुजी विचारतात'माशी आणि हत्त्तीमध्ये काय फरक आहे?
एका बाकावरचा मुलगा'माशी ह्त्त्तीवर बसु शकते पण ह्त्त्ती माशीवर बसु शकत नाही'।


एकदा वर्गात इतिहासाच्या तासाला पुरंदरे सरांनी झोपलेल्या राजूला उठवून विचारले, "काय रे दिल्लीचे तख्त कोणी फोडले"?
राजू झोपेतून जागा होत म्हणाला, "आई शप्पथ सांगतो सर, मी नाही फोडले."
पुरंदरे सरांनी हा किस्सा मधल्या सुट्टीत शिक्षकांच्या खोलीत सांगितल्यावर जोशी बाई सोडून सर्व शिक्षक हसले.
जोशी बाई गंभीरपणे म्हणाल्या," कोण राजू ना? एक नंबरचा वाह्यात पोरगा आहे। त्यानीच फोडले असेल."

No comments: